जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/202. प्रकरण दाखल तारीख - 11/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 28/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य सपना पि. संगमनाथ भालके सध्या सौ.सपना भ्र. संतोष भालके वय,25 वर्षे, धंदा शिक्षण, रा. काबरा नगर, नांदेड ता.जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. विवेक वर्धिनी अध्यापिका महिला महाविद्यालय, शांताराम सगणे जलतरणिका समोर, नांदेड 2. प्रबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी, नांदेड. गैरअर्जदार 3. बाबाराव ऊर्फ तुकाराम पि. संभाजी माटाळकर, रा. निवघा बाजार ता.हदगांव जि. नांदेड. 4. अशोक एम पांडे, लिपीक, विवेध वर्धिनी अध्यापिका महिला महाविद्यालय, जलतरणिके समोर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. गैरअर्जदार क्र. 1 व 4 तर्फे वकील - अड.ऐ.एस. बंगाळे. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.मोहनराव नीखाते. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा निकाल व टी.सी.त्यांना न देऊन त्यांना पूढील वर्षी पदवीत्तर अभ्यासक्रमापासून वंचीत ठेऊन नूकसान केले म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार मूख्यतः गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द नोंदविली आहे. अर्जदारांनी वर्ष 2007-08 या वर्षाच्या शैक्षणीक सञात बी.एड. साठी प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्यांनी गैरअर्जदार क्र.3 जे की, वर्ष 2007-08 साली सचिव होते. यांचेकडे रु.35,000/- देऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नंतर ब-याच वेळा गैरअर्जदार क्र.1,3 4 यांना पावतीची मागणी केली असता त्यांनी ते देण्याचे टाळले. यानंतर विश्वासाने अर्जदाराने पूर्ण शिक्षण घेतले. उर्वरित रक्कम रु.10,000/- ते परिक्षेच्या पूर्वी पावती नंबर 784 नुसार भरले. त्यामूळे त्यांचकडे आता कोणतीही बाकी राहीली नाही. अर्जदारास परिक्षेचे प्रवेश पञ गैरअर्जदार क्र.1 व 2 मार्फत देण्यात आले. त्यानंतर अर्जदारास निकालही कळविण्यात आला. निकालानंतर अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे उत्तीर्ण झाल्याची गुणपञिका व टीसी ची मागणी केली परंतु त्यांनी तूमचे रु.35,000/- शैक्षणीक शूल्क बाकी आहे ते भरल्याशिवाय तूम्हास टीसी व मार्कमेमो मिळू शकत नाही असे सांगितले. अर्जदार हिने या बाबतची लेखी तक्रार दि.10.12.2008 रोजी उपसंचालक,उच्च शिक्षण विभाग यांचेकडे केली. अर्जदार असेही म्हणतात त्यांनी जर रककम दिली नसती तर त्यांना प्रवेश कसा मिळाला व परिक्षा कशी देता आली. गैरअर्जदार क्र.3 हे संस्थेचे त्यावेळेस सचिव होते व मोठया विश्वासाने त्यांचेकडे ही रक्कम दिली. संस्थेने प्रवेश दिल्यामूळे व परिक्षा देता आल्यामूळे अर्जदाराला वर्षभर संशय घ्यायचे काही कारण नाही. मार्कमेमो व टीसी न मिळाल्यामूळे अर्जदार ही एमए ला प्रवेश घेऊ शकली नाही त्यामूळे तिचे एक वर्षाचे शैक्षणीक नूकसान झाले. अर्जदार यांची मागणी आहे की, त्यांना बी एड ची गूणपञिका व टीसी देण्याचे आदेश व्हावेत तसेच झालेल्या शैक्षणीक नूकसानी बददल व मानसिक ञासाबददल रु.50,000/- दयावेत तसेच दावा खर्च म्हणून रु,5000/- देण्यात यावेत, अशी मागणी केली. गैरअर्जदार क्र.1 व 4 हे वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे संयूक्तपणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांची तक्रार नीखालस खोटी व बिनबूडयाची असल्यामूळे ती गैरअर्जदार यांना मान्य नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र.3 यांचेत झालेला व्यवहार हा महाविद्यालयास माहीती नाही. अर्जदार यांनी रु.35,000/- शैक्षणीक शूल्क म्हणून डि.डि. द्वारे महाविद्यालयाचे नांवे दयावयास पाहिजे होते. त्यांनी ते दिले नाही म्हणून त्यांचेकडे पावतीपण नाही. अर्जदार यांचा व्यवहार गैरअर्जदार क्र.3 शी असल्यामूळे त्यांना ते माहीती नाही. शैक्षणीक शूल्क हे रु.35,200/- असताना दाव्यामध्ये रु.10,000/- भरल्याची पावती आहे. म्हणजे महाविद्यालयाची दीशाभूल केलेली आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर पूर्ण रक्कम दिली असेल तर त्यांनी रु.200/- जमा करावयास पाहिजे. गैरअर्जदार क्र.3 यांना त्यांनी अर्जदार हे त्यांचे नातेवाईक असल्याचे सांगून उर्वरित शैक्षणीक शूल्काचा नंतर भरणा करु तसेच शिक्षण क्षेञात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामूळें व विद्यार्थ्याचे शैक्षणीक नूकसान होऊ नये त्यामूळे अर्जदार यांना परिक्षा प्रवेशपञ देण्यात आले व परिक्षाही घेण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 4 यांनी अर्जदार यांना वेळोवेळी शूल्क भरण्याचे सांगितले असता गैरअर्जदार क्र.3 यांना यापैकी फक्त रु.10,000/- रोखीने भरुन घ्या व नंतरचे परिक्षेनंतर भरु अशी त्यांनी हमी घेतली. त्यामूळे अर्जदारांना वेळ देण्यात आला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.3 यांनी उर्वरित शैक्षणीक शूल्क रु.25,000/- भरल्याचे सांगितले असते ते त्यांनी अद्यापपर्यत भरलेले नाही. यानंतरही अर्जदाराचे नातेवाईक तथा गैरअर्जदार क्र.3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांना वेळोवेळी दमदाटी करुन मार्कमेमो व टीसी देण्याचे सांगितले होते. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी दि.14.12.2008 रोजी टीसी व मार्कमेमो मागण्यासाठी उपसंचालक, उच्च शिक्षण यांना अर्ज दिला हे म्हणणे खोटे आहे. दि.10.12.2008 रोजी अर्जदाराने पाठविलेला लेखी अर्ज नसून ते स्मरण पञ होते त्यामूळे मूळ अर्ज गेला कूठे ? गैरअर्जदाराने एवढी मोठी रक्कम भरल्यावर नियमानुसार पावती का घेतली नाही ? त्यांनी शूल्क मूददामहून भरले नाही व कागदपञाची मागणी करीत आहेत म्हणून अर्जदार यांना रु.25,000/- भरण्याचे आदेश करावेत तसेच रु.5,000/- दंड आकारण्यात यावा व तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे नोटीस मिळूनही गैरहजर राहीले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात येऊन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 या संस्थेचे सन 2007-08 मध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी रु.35,000/- दिले हे म्हणणे निव्वळ खोटे होते. त्यांनी वेळोवेळी पावतीची मागणी केली व गैरअर्जदाराने पावती देण्याचे टाळले हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराने पूर्ण वर्ष शिक्षण घेतले व उर्वरित शूल्क रु.10,000/’ भरले यांची माहीती कार्यालयास आहे. अर्जदारास परिक्षेचे प्रवेशपञ हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेमार्फत देण्यात आले यांची पण त्यांना माहीती नाही. परिक्षेचे सर्व कागदपञ देण्याची सर्व जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 व 4 यांची आहे. त्यामूळे रु.35,000/- त्यांचेकडे दिले हे खोटे आहे. अर्जदाराचा पञव्यवहार व मागणी ही संस्थेच्या कार्यालयाशी संबंधीत आहे. त्यामूळे त्यांचे उत्तर देणे योग्य नाही. अर्जदारी यांनी संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात रु.35,000/- गैरअर्जदार क्र.4 यांचे समोर दिले हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराचा आरोप खोटा असल्याकारणाने त्यांचा तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1,3 व 4 यांनी देखील पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी बी.एड.यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचे संस्थेत सन 2007-08 या वर्षासाठी प्रवेश घेतला. अर्जदार यांचे म्हणणे की, गैरअर्जदार क्र.3 हे त्या वर्षी सचिव होते म्हणून त्यांचेकडे त्यांनी रु.35,000/- देऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रु.35,000/- अर्जदारानी गैरअर्जदार क्र.3 यांना दिले का नाही हे त्या दोघानांच माहीती, याविषयी उपलब्ध पूरावा जरी नसला तरी गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांना बी.एड. साठी त्यांचे महाविद्यालयात प्रवेश दिला ही गोष्ट खरी आहे.एवढेच नव्हे तर गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराची परिक्षा प्रवेशपञ देखील दिले, परिक्षा देखील घेतली, निकाल ही सांगितला. एवढे होईपर्यत अर्जदाराने उर्वरित शैक्षणीक शूल्क म्हणून रु.10,000/- पावती नंबर 784 नुसार भरले. हया रक्कमेची पावती या प्रकरणात दाखल केलेली आहे. ती दि.15.4.2008 रोजीची आहे. या पावतीवर टयूशन फी बददल बाकी रक्कम रोखीने रु.10,000/- अर्जदार यांचे प्रतिनीधीकडून घेण्यात आले व पावती दिली. यानंतर परिक्षा घेण्यात आली. आता प्रश्न हा उरतो की, शैक्षणीक वर्ष हे साधारणतः जून मध्ये सूरु होते व परिक्षा ही मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात येते. गैरअर्जदार क्र.1 यांचे प्रमाणे जर त्यांना फि बददल रक्कम मिळालीच नाही तर अर्जदार यांना प्रवेश कसा काय दिला गेला ? प्रवेश दिल्याचे नंतर परिक्षेपर्यत गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना फिस का मागितली नाही ? एप्रिल मध्ये जी फिस घेण्यात आली त्यावर देखील बाकी रक्कम मिळाली म्हणजे बाकी ही फक्त रु.10,000/- च होते व तेवढी त्यांना मिळाली. यांचा अर्थ गैरअर्जदार क्र.1 यांना पूर्ण फिस मिळाली आहे. कारण खरेच जर फिस मिळाली नसती तर गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना नोटीस देऊन पैशाची मागणी करणे भाग असताना त्यांनी एकही पञ अर्जदार यांना पाठविले नाही. परंतु याउलट अर्जदारांनीच गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे अर्ज देऊन टीसी व मार्कमेमो मागितले व या बददलचे स्मरणपञ दि.10.12.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना देऊन वरील कागदपञाची मागणी केली आहे. तसेच अर्जदाराने माहीतीच्या अधिकाराखाली कार्यालयाच्या रेकॉर्ड बददल माहीती मागितली असताना ती माहीती गैरअर्जदार क्र.1 यांनी न पूरविता ते गूपीत ठेवलेले आहे तसेच अर्जदाराच्या अर्ज व स्मरणपञास उत्तर दिलेले नाही. गैरअर्जदाराची शैक्षणीक संस्था ही नसून किराणा दूकान असल्याचे वाटते. कारण गैरअर्जदार क्र.3 यांनी सांगितले म्हणून कोणतीही फिस न घेता अर्जदार यांना प्रवेश दिला. गैरअर्जदार क्र.1 हे जे नियम दाखवितात त्यांचे म्हणणे आहे की, डि.डि. नेच रक्कम दिली पाहिजे. मग प्रवेश कसा दिला व उर्वरित रक्कम रु.10,000/- ही रोखीने कसे स्विकारले हे गैरअर्जदार क्र. 1 व 3 या दोघामधील काही तरी गौडबंगाल असल्याचे दिसते. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराकडून घेतलेली रक्कम संस्थेस दिली नसेल व गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारांना गैरअर्जदार क्र.3 यांचे हमीवर प्रवेश दिला असेल तर आता रक्कम देखील संस्थेने गैरअर्जदार क्र.3 यांचेकडूनच वसूल करावी व अर्जदार यांना नाहक मानसिक ञास देऊन तिचे पूढील शैक्षणीक सञाचे नूकसान करणे योग्य नव्हते. गैरअर्जदार क्र.1 यांनी फिस बाबत विचारले असता त्यांनी गैरअर्जदार क्र.2 म्हणजे विद्यापिठाचे दि.25.11.2004 रोजीचे पञ दाखल केलेले आहे. यात विद्यापिठाने दिलेल्या पञानुसार महाविद्यालय शूल्क म्हणून रु.3,000/- घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अजून एक पूरावा म्हणून परिशिष्ठ नंबर 1 मध्ये एकूण फिस कशी घेतली जाते या बददलचे विवरण देखील दाखल केलेले आहे. अर्जदाराचे शैक्षणीक सञ हे 2007-08 असे जरी असले तरी रु.3,000/- या शूल्कात फार तर पूढच्या वर्षी रु.1000/- ते रु.500/- वाढू शकतील मग गैरअर्जदार क्र.1 यांनी या पेक्षा जास्त रक्कम का घेतली. गैरअर्जदार क्र.1 यांनी ऑडीट रिपोर्टच्या आधारे डायरेक्टर यांनी केलेल्या आदेशाद्वारे महाविद्यालय जे रु.58500/- घेत होते ते अयोग्य ठरविले होते व रु.31,000/- व रु.1200/- असे एकूण रु.32200/- च घेण्यास संस्था ही बांधील आहे असे म्हटले आहे. हे देखील सन 2003-06 या वर्षासाठीचे आहे. विद्यार्थ्याकडून शैक्षणीक फिस घेतल्याचे नंतर जर काही फिस शिल्लक असेल किंवा काही फरक असेल तर तो एक महिन्याच्या आंत घेण्यात यावा असे म्हटले आहे. इथे वर्ष झाले तरी ही गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रक्कम मागितली या बददलचा कोणताही पूरावा उपलब्ध नाही. गैरअर्जदार क्र. 1 व 3 या दोघाच्या भानगडीत अर्जदाराचे नूकसान करु नये. अर्जदारास दिलेल्या प्रवेशाच्या आधारे व तिने दिलेल्या परिक्षेवरुन गैरअर्जदार क्र.1 यांनी पूर्ण फिस प्राप्त झाली हे समजण्यात यावे व यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी अनूचित प्रथेचा अवलंब करुन अर्जदार यांची टीसी व मार्कमेमो न देऊन पूढील पदवीत्तर शिक्षणाचे नूकसान केलेले आहे. म्हणून अर्जदार ती नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिचा बी.एड. चा मार्कमेमो व टी.सी.कोणत्याही रक्कमेची मागणी न करता त्वरीत दयावेत. 3. अर्जदार यांनी जो मानसिक ञास दिला व पदवीत्तर शिक्षणाचे जे नूकसान केले त्याबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |