निकालपत्र :- (दि.24.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील सामनेवाला क्र.1 ही संस्था महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीनुसार नोंदणी झालेली सहकारी संस्था आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत. सामनेवाला क्र.3 ते 15 हे संस्थेचे संचालक आहेत व सामनेवाला क्र.16 व 17 हे संस्थेचे अनुक्रमे सचिव व व्यवस्थापक आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट व विठ्ठलाई बॉण्ड ठेवीच्या स्वरुपात व सेव्हींग्ज खात्यावर रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | मुदतीनंतर मिळणारे व्याज | मिळणारी एकूण रक्कम | 1. | 002480 | 10000/- | 29.11.2008 | 20000/- | 2067/- | 22167/- | 2. | 1491 | 20000/- | 29.09.2012 | -- | 7709/- | 27709/- | 3. | 731 | 10000/- | 06.03.2011 | -- | 4430/- | 15530/- | 4. | 573 | 2000/- | 20.11.2012 | -- | 953/- | 2953/- | 5. | 1492 | 20000/- | 29.09.2012 | -- | 7709/- | 27709/- | 6. | 735 | 1000/- | 13.03.2011 | -- | 554/- | 1554/- | 7. | 572 | 2000/- | 20.11.2012 | -- | 953/- | 2953/- |
(3) ठेवी पावती क्र.2480 ची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी करुनही न दिल्याने सामनेवाला संस्थेने तक्रारदारांचा विश्वास गमावलेमुळे तक्रारदारांनी मुदत न संपलेल्या ठेवी त्यांच्या आर्थिक गरजेसाठी व्याजासह मागणी केलेल्या आहेत. तक्रारदारांनी सदर रक्कमा त्यांच्या प्रापंचिक, कौटुंबिक गरजा भागविणेकरिता, तसेच अडीअडचणीचेवेळी उपयोगी याव्यात या हेतूने ठेवलेल्या होत्या व आहेत. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा दिलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार व सामनेवाला संस्थेमधील वाद हा टचिंग द बिझनेस ऑफ द सोसायटी या स्वरुपाचा आहे. त्यामुळे सदरचा वाद हा सहकार न्यायालय यांचेकडे चालणेस पात्र आहे. तसेच, सामनेवाला क्र.15 यांनी पूर्वीच राजीनामा दिला असल्याने Mis-joinder of necessary parties या तत्त्वानुसार तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. (6) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्थेची सर्व कर्जे सुरक्षित आहेत, संस्थेमध्ये कोणताही भ्रष्टाचार, गैरव्यवहार इ. झालेला नाही. ठेवीदारांनी एकदम ठेवीच्या रक्कमेची मागणी केल्यामुळे संस्था अडचणीत आलेली असून ठेवीच्या मागणीच्या प्रमाणात वसुली होत नसल्याने सदर परस्पर विरोधी दृश्य दिसते. त्यास संस्थेचे चेअरमन, संचालक, कर्मचारी इत्यादी कधीही जबाबदार नाहीत. सामनेवाला यांनी त्यांचे कर्जदारांचे विरुध्द महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 101 अन्वये 400 पेक्षा अधिक दाखले मिळविलेले असून 10 प्रकरणे वसुलीसाठी दाखल आहेत. सदर वसुलीमधून 7 कोटी येणे आहेत. तसेच, सहकार न्यायालय यांचेकडे 10 प्रकरणे प्रलंबित असून काही कर्जदारांनी वसुलीस स्थगिती घेतली आहे. तसेच, दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, कोल्हापूर यांचेकडे प्रलंबित प्रकरणामध्ये स्थगिती असून त्यातून 7 लाख येणे आहेत. वसुलीस कर्जदारांनी अडथळे आणल्यामुळे कोणासही एकदम रक्कम देणे शक्य नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे ठे़वी ठेवलेल्या आहेत. सामनेवाला पतसंस्था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्यामुळे प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्च न्यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्द मेसर्स युनायटेड वैश्य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे. (8) सामनेवाला क्र.2 ते 17 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. (9) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 15 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.16 व 17 हे अनुक्रमे संस्थेचे सचिव व व्यवस्थापक असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता ठेव पावती क्र.2480 या दामदुप्पट ठेवींची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर दामदुप्पट ठेव पावतीवरील मुदतपूर्ण रक्कम मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या इतर ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या व विठ्ठलाई बॉण्ड असून त्यांच्या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्या नाहीत असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमा या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि.30.12.2009 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजाजाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत. (12) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.16 व 17 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना पावती क्र.2480 वरील दामदुप्पट रक्कम रुपये 20,000/- (रुपये वीस हजार फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर दि.30.11.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.16 व 17 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट ठेव पावत्यांच्या रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि. 30.12.2009 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का व्याज वजाजाता होणारे व्याज द्यावे व दि.31.12.2009 रोजीपासून सदर रक्कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 1491 | 20000/- | 2. | 731 | 10000/- | 3. | 573 | 2000/- | 4. | 1492 | 20000/- | 5. | 735 | 1000/- | 6. | 572 | 2000/- |
(4) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.16 व 17 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |