जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1426/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 16/10/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 05/12/2012
भोला शंकर कपूर,
उ.व.सज्ञान, धंदाः रिटायर रेल्वे कर्मचारी,
रा.टिंबर मार्केट, राठोड बिल्डींग, भुसावळ. ........ तक्रारदार
विरुध्द
1. विठठल रुखमाई को-ऑप.क्रेडीट सोसायटी,
लहान मारोती मंदीराजवळ, भुसावळ तर्फे मॅनेजर.
2. सौ.चेतना संजय फालक,
रा.लहान मारोती मंदीर जवळ, विठठल मंदीर वार्ड,भुसावळ.
3. महेश देवीदास फालक,
रा.जामनेर रोड, अमीत मोटर्स, भुसावळ.
4. सौ.सुजाता प्र.विसपुते,
रा.लहान मारोती मंदीर जवळ, विठठल मंदीर वार्ड,भुसावळ.
5. प्रदीप प्रभाकर नेहते,
रा.लहान मारोती मंदीर जवळ, विठठल मंदीर वार्ड,भुसावळ.
6. विजय म.फालक,
रा.लहान मारोती मंदीर जवळ, विठठल मंदीर वार्ड,भुसावळ.
7. अनिल पी.महाजन,
रा.वी.एम.वॉर्ड, लहान मारोती मंदीराजवळ, भुसावळ.
8. विनोद की.बडगे,
रा.वी.एम.वॉर्ड, लहान मारोती मंदीराजवळ, भुसावळ.
9. मिलींद भा.कुलकर्णी,
रा.वी.एम.वॉर्ड, लहान मारोती मंदीराजवळ, भुसावळ.
10. राहुल पु.ब-हाटे,
रा.लहान मारोती मंदीर जवळ, विठठल मंदीर वार्ड,भुसावळ.
11. श्रीमती ललिता कि.महाजन,
रा.वी.एम.वॉर्ड, लहान मारोती मंदीराजवळ, भुसावळ.
12. सौ.शारदा नि.पाटील,
रा.लहान मारोती मंदीर जवळ, विठठल मंदीर वार्ड,
भुसावळ. ....... सामनेवाला.
कोरम-
श्री.डी.डी. मडके अध्यक्ष.
सौ.एस.एस.जैन सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री एस.बी.सरोदे वकील हजर.
सामनेवाला क्र.2 तर्फे कविता एस.जगपती वकील हजर.
सामनेवाला क्र. 3 व 5 तर्फे श्री.एम.एन.ढाके वकील हजर.
सामनेवाला क्र.1,4,6 ते 12 एकतर्फा.
निकालपत्र
सौ.एस.एस.जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव
पावती अन्वये गुंतविलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणुन त्यांनी
प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष विठठल रुखमाई को-ऑप.क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतवणूक केल्याचा तपशिल खालीलप्रमाणेः
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 31/20180 | 16/07/2007 | 11,750/- | 16/04/2008 |
2 | 31/2010 | 12/12/2007 | 17,315/- | 12/03/2008 |
3 | 21/21068 | 16/01/2008 | 12,000/- | 16/07/2008 |
4 | सेव्हींग खाते क्र.24/672 | | 6,630/- | |
3. तक्रारदार यांनी गुंतविलेल्या रक्कमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडे गुंतवणुक केलेली रक्कम व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
4. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
5. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र. 2,3 व 5 यांनी हजर होऊन प्रस्तुत तक्रारीकामी म्हणणे सादर केलेले आहे. विरुध्द पक्ष क्र. 1,4,6 ते 12 हे प्रस्तुतकामी हजर झाले नाहीत अगर लेखी म्हणणे सादर न केल्याने सामनेवाला क्र. 1,4,6 ते 12 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
6. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. संस्थेने मोठया प्रमाणावर कर्जाचे वाटप केलेले असल्याने व सदर कर्जाची वेळेवर परतफेड होत नसल्याने सर्वच ठेवीदारांना एकदम रक्कम देणे शक्य नाही. संस्थेची योग्य त्या मार्गाने कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु आहे. तसेच सहायक निंबंधकाचे आदेशानुसार रु.10,000/- चे आतील ठेवीदारांना रक्कमा अदा करण्याचे असुन 10,000/- पेक्षा जास्त ठेवीदारांचे रक्कमेबाबत विचार करण्याजोगे आदेश आहेत. ठेवीदारांची रक्कम कर्ज वसुल होऊन टप्याटप्याने अदा करील. सबब वरील कारणांचा विचार होऊन तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी केली आहे.
7. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा दि.27/04/2007 रोजी दिलेला आहे तसेच विरुध्द पक्ष क्र.5 यांनी दि.5/4/2007 रोजी संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी पतसंस्थेचे चेअरमन / व्यवस्थापक यांचेकडे राजीनामा सादर केलेला असतांना देखील त्यांनी व्देषबुध्दीने राजीनामा मंजुर केलेला नाही. याबाबत विरुध्द पक्ष यांनी जिल्हा उपनिबंधक (निवडणूक) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे दि.26/01/2009 रोजी केलेल्या तक्रारीवरुन दि.7/03/2009 रोजी जा.क्र.निवडणूक/श्री.विठठल रुखमाई/को.ऑप./चे.व्हा.रा.2009 नुसार उपनिबंधक, निवडणुक, सह.संस्था पुणे यांनी जिल्हा उपनिबंधक, जळगांव यांना राजीनामा मंजुरीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत कळविले होते. तसेच विभागीय सह.निबंधक, सह.संस्था नाशिक विभाग यांनी दि.26/11/2009 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांना दि.9/11/2009 रोजी तात्काळ कार्यवाही करुन अवगत करावे अशा सुचना दिल्या होत्या व त्यानुसार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी जा.क्र.युआरबी-2/फालक/त.अ./वि.रुखमाई/09, दि.12/11/2009 नुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था, भुसावळ यांना कार्यवाही करण्याबाबतची सुचना केली होती तसेच सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.8/2/2010 रोजी चेअरमन / व्यवस्थापक, विठठ्रल रुखमाई अर्बन को.ऑप.सोसा.भुसावळ यांना संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत व तसा अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश पतसंस्थेला दिलेले होते. तसेच विरुध्द पक्ष क्र. 5 यांनी दि.5/4/2007 रोजी राजीनामा दिलेला असतांना देखील संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापक यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने विरुध्द पक्ष क्र. 5 यांनी केलेल्या विनंती अर्जानुसार विभागीय आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, नाशिक यांनी दि.29/1/2010 रोजी राजीनामा मंजुरी बाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिलेले होते. त्याचप्रमाणे सहकार आयुक्त, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या दि.8/2/2010 रोजीचे जा.क्र.ना.बँका/डी-4/विठठल रुखमाई/राजीनामा/2010/260 नुसार सोसायटीचे चेअरमन व व्यवस्थापक यांना पोटनियमातील तरतुदीनुसार तात्काळ राजीनामा अर्जावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले होते. तथापी व्देषबुध्दीने व आकसबुध्दीने विरुध्द पक्ष यांना प्रचंड मानसिक त्रास व्हावा या हेतुने संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापक यांनी विरुध्द पक्ष यांचा राजीनामा मंजुर केलेला नाही. सबब वरील परिस्थितीचा विचार करता विरुध्द पक्ष क्र. 3 व 5 यांचे नांव वगळण्यात यावे अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 3 व 5 यांनी केली आहे.
8. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्षाचे म्हणणे, दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयतांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
9. मुद्या क्र.1 - प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावत्यामध्ये रक्कम गुंतविलेली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
10. मुद्या क्र.2 – तक्रारदार यांनी तक्रारदार यांनी त्यांची संपुर्ण रक्कम देण्याची जबाबदारी पतसंस्थेची व संचालक यांची वैयक्तीक व संयुक्तीक आहे असे नमुद करुन त्याबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. यासंदर्भांत आम्ही मा.मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक 5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई // विरुध्द // राजश्री राजकुमार चौधरी या न्यायीक दृष्टांताचा आधार घेत आहोत. सदर निकालात पुढीलप्रमाणे तत्व विषद करण्यात आलेले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertainable against the society, the Directors or members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/ members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
वरील न्यायीक दृष्टांतातील तत्व पाहता संचालकांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 88 नुसार चौकशी होऊन जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत संचालकांना वैयक्तीकरित्या जबाबदार ठरवता येणार नाही असे म्हटले आहे त्यामुळे रक्कम देण्यास संचालकांना वैयक्तीकरित्या जबाबदार ठरवता येणार नाही व तक्रारदार यांची रक्कम देण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष क्र. 1 पतसंस्थेची आहे या मतास आम्ही आलो आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष क्रं.1 संस्था यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्राच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत. तसेच सेव्हींग खाते क्रमांक 24/672 मध्ये शिल्लक असलेली एकुण रक्कम सदर खात्यावर प्रचलीत असलेल्या व्याजदरासह तक्रारदारास त्वरीत अदा करावी.
( क ) विरुध्द पक्ष क्रं.1 संस्था यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( ड ) वर नमुद आदेश अनुक्रमांक (ब) मधील मुदत ठेवीच्या रक्कमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरीत रक्कम अदा करावी.
ज ळ गा व
दिनांकः- 05/12/2012. ( सौ.एस.एस.जैन ) ( श्री.डी.डी.मडके )
सदस्य अध्यक्ष