जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/317 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या 1. निर्मला सुधाकर कांबळे वय 21 वर्षे, धंदा शिक्षण रा. फूले नगर, मुखेड ता.मुखेउ जि. नांदेड 2. रेखा भुजंगा वाघमारे वय 26 वर्षे, धंदा शिक्षण रा. मल्हार नगर, कंधार ता.कंधार जि.नांदेड 3. सुनिता पुंडलिक सुर्यवंशी वय 22 वर्षे, धंदा शिक्षण रा.बाचोटी ता.कंधार जि.नांदेड 4. मंजूळाबाई व्यकंटेश केंद्रे वय 21 वर्षे, धंदा शिक्षण रा.बाभूळगांव ता.कंधार जि.नांदेड अर्जदार. 5. रेणुका नारायण बोधले वय 19 वर्षे, धंदा शिक्षण रा.गौळ ता.कंधार जि. नांदेड 6. मयुरी धनाजी देवकांबळे वय,22 वर्षे, धंदा शिक्षण रा. गवळ ता.कंधार जि. नांदेड 7. ज्योती हणमंत तेलंग वय,20 वर्षे, धंदा शिक्षण रा.गवळ ता.कंधार जि. नांदेड विरुध् 1. विठठल जनार्धन गोरे रा.मानसपुरी ता.कंधार जि. नांदेड अध्यक्ष जय बळीराज शिक्षण संस्था, मानसपुरी संचलित जनार्धन पाटील गोरे गुरुजी नर्सिग कॉलेज कंधार जि. नांदेड गैरअर्जदार 2. शाहुराज जनार्धन गोरे रा.मानसपुरी ता.कंधार जि. नांदेड सचिव जय बळीराज शिक्षण संस्था, मानसपुरी संचलित जनार्धन पाटील गोरे गुरुजी नर्सिग कॉलेज कंधार जि. नांदेड 3. प्रशासक, महाराष्ट्र परिचर्या परीषद, राज्य कामगार विमा योजना 3.रुग्णालय आवार परिचारिका वस्तीगृह, 2 रा मजला, 3.एल.बी.एस.मार्ग,मुलुड (प.)मुंबई 400 080 अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.टी.वडजे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.3 तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या) 1. अर्जदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे बळीराजा शिक्षण संस्था मानसपुरी संचलित जनार्धन पाटील गोरे गुरुजी नर्सिग कॉलेजचे अनुक्रमे अध्यक्ष व सचिव आहेत.गैरअर्जदार क्र.3 ही गैरअर्जदार क्र.1 यांच्या संस्थेस परवानगी देणारी शासकीय यंञणा आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ यांनी गैरअर्जदार यांच्या संस्थेला एन.एम.ए. सहायक परिचारीका या प्रशिक्षीत अभ्यासक्रमासाठी कायमस्वरुपी विना अनुदान तत्वावर मान्यता दि.24.7.2009 रोजी दिली होती. सदरील अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 25 विद्यार्थीनी साठी होती. सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य नर्सिग कौन्सिलची मान्यता नाही. Auxilly Nurse Midwife (A.N.M.) हा अभ्यासक्रम असिस्टट अड मिडवायफरी या अभ्यासक्रमापेखा वेगळा आहे. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल तसेच इंडियन नर्सिग कौन्सिल वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंञायल मुंबई यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. परवानगी नसताना गैरअर्जदाराने जाहीरात काढून अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे आहे व शंभर टक्के नौकरीची सुवर्णसंधी फक्त मुलीसाठी आहे. संपर्क गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे करावा असे म्हटले आहे. अर्जदार या नांदेड जिल्हयातील रहिवासी असून त्यांनी 10 जुन 2009 रोजी या विद्यालयात प्रत्येकी रु.70,000/-अभ्यासक्रमाची फिस म्हणून दिले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी ए.एन.एम.साठी प्रवेश दिला. प्रत्येक अर्जदाराला ओळखपञ तसेच बोनाफाईड प्रमाणपञ दिले. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या महावि’द्यालयात एक वर्ष शिक्षण घेतले व कंधार येथे भाडयाची रुम घेऊन शिक्षण घेतले त्यासाठी प्रत्येकी रु.30,000/- खर्च आला. अर्जदारांच्या असे लक्षात आले की, गैरअर्जदार यांच्या संस्थेस ए.एन.एम. या अभ्यासक्रमाची मान्यता नव्हती. महाराष्ट्रामध्ये ए.एन.एम. अभ्यासक्रमाच्या परिक्षेचे वेळापञक दि.19.07.2010 ते 21.07.2010 असे आले परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 या संस्थेस परिक्षेचे वेळापञक आले नाही. नांदेड जिल्हयातील फक्त गूरुगोविंदसिंघ हॉस्पीटल, नांदेड व इतर सहा संस्थेचे महाराष्ट्र नर्सिग् कौन्सिलने परिक्षेची मान्यता दिली होती. अर्जदारास परिक्षेचे हॉलतिकीट मिळाले नाही.गैरअर्जदारांकडे चौकशी केली असता त्यांनी दि.19.07.2010 रोजी परिक्षेचे हॉलतिकीट देण्यात येईल असे सांगितले. अर्जदार यांना समजले की गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या संस्थेस ए.एन.एम. या अभ्यासक्रमाची मान्यता नव्हती त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांची रु.70,000/- घेऊन फसवणूक केली आहे. त्यामूळे अर्जदार यांनी उपजिल्हाधिकारी कंधार व जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस स्टेशन कंधार यांच्याकडे गैरअरर्जदार क्र.1 व 2 यांची तक्रार केली. कंधार पोलिस स्टेशनने कलम 468, 409, 34 भा.द.वि. नुसार गैरअर्जदार क्र.1 व 2 व इतर कार्यकारणी सदस्याविरुध्द दि.22.7.2010 रोजी गून्हा दाखल केला व सदर गून्हयाचा तपास सुरु आहे. अर्जदार या ए.एन.एम. या अभ्यासक्रमाची परिक्षा दि.29.7.2010 रोजी देऊ शकले नाही कारण गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या महाविद्यालयास ए.एन.एम. या अभ्यासक्रमाला मान्यता नव्हती. असे करुन गैरअर्जदारांनी अर्जदारांना ञूटीची सेवा दिली म्हणून सदर तक्रार दाखल केली. त्यानंतर अर्जदार यांनी इतर महाविद्यालयात ए.एन.एम.अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे व त्यासाठी वेगळी फिस भरली आहे. अर्जदार यांचे एक वर्षाचे शैक्षणीक व आर्थिक नूकसान झाले म्हणून प्रत्येकी रु.50,000/- ची मागणी केली आहे. तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी प्रत्येकी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. तसेच फिससाठी घेतलेले रु.70,000/- तसेच त्यासाठी एक वर्ष झालेला खर्च रु.30,000/-व दाव्याचा खर्च रु.10,000/- असे एकूण रु.2,60,000/- प्रत्येकी मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना मंचाची नोटीस घेण्यास इन्कार केला, म्हणून अर्जदाराने पोस्टाच्या तशा शे-यासह बंद पाकीट दाखल केले. म्हणून गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द एकतर्फा चालविण्याचे आदेश दि.5.2.2011 रोजी करण्यात आले. 3. गैरअर्जदार क्र.3 हे नोटीस मिळूनही तारखेस गैरहजर राहिले म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा चालविण्याचे आदेश दि.9.3.2011 रोजी करण्यात आले. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? सिध्द केले नाही 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 व 2 ः- 5. सर्व अर्जदार यांनी एकाच गैरअर्जदार यांचे संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला होता हे त्यांनी दाखल केलेल्या ओळखपञावरुन सिध्द होते. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत यास्तव मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. 6. सर्व अर्जदार यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे गैरअर्जदार यांचे शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला हे अर्जदारांनी सिध्दता केली आहे. पण अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे जी मागणी केलेली आहे रु.70,000/- प्रवेश फिस, शिक्षणासाठी झालेला खर्च रु.30,000/- एक वर्षाचे शैक्षणीक नुकसान झाल्याबददल रु.50,000/- व मानसिक ञासाबददल रु.1,00,000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- असे एकूण प्रत्येकी रु.2,51,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. पण या केसमध्ये अर्जदारांनी गैरअर्जदार यांचेकडे प्रवेश घेतला त्याबददल फक्त ओळखपञाची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. या व्यतिरिक्त काहीही कागदपञ दाखल केलेले नाहीत. तसेच अर्जदार हे जर प्रवेश फि बददल रु.70,000/- वापस मागत असतील तर त्यांनी रु.70,000/-फिस भरल्याची पावती मंचापूढे दाखल करणे आवश्यक होते. पण महत्वाची कागदपञे अर्जदारांनी मंचासमोर दाखल न केल्यामुळे अर्जदारांची मागणी सिध्द होऊ शकत नाही. 7. सदरील तक्रारीमध्ये गैरअर्जदार हे गैरहजर आहेत. त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारीत झालेला आले. सदरील तक्रारीमध्ये सखोल पुरावा तक्रारीच्या मूळाशी जाण्यासाठी आवश्यक आहे. त्यास्तव ही तक्रार दिवाणी न्यायालयात चालवल्यास अर्जदार यांना योग्य न्याय मिळेल. या नीर्णयास्तव हे मंच आलेले आहे. 8. यापूर्वी देखील इतर एक विद्यार्थीनी नामे कू.राहूबाई लक्ष्मण भूस्सेवार यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द अशाच आशयाची तकार मंचासमोर दाखल केली होती. ती तक्रार दि.31.08.2010 रोजी दाखल केली होती त्या तक्रारीचा निकाल दि.27.04.2011 रोजी झाला. त्या तक्रारीचा नंबर 212/2010 असा आहे. त्या तक्रारीमध्ये अर्जदार हिंस योग्य न्यायालयात तक्रार चालविल्यास योग्य न्याय मिळेल या नीर्णयास्तव हे मंच आलेले होते. त्याचप्रमाणे प्रस्तुत तक्रारीमधील अर्जदार नंबर 1 ते 7 यांनी दिवाणी न्यायालयासमोर आपली तक्रार दाखल करुन योग्य तो सखोल पुरावा दाखल करुन न्याय मिळवावा, या मतापर्यत हे मंच आलेले आहे. 9. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 1. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. अर्जदारांची इच्छा असेल तर किंवा त्यांना तसा सल्ला मिळाला तर ते योग्य त्या दिवाणी न्यायालयात सखोल पुरावा देऊन न्याय मागू शकतात. 3. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |