जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/212 प्रकरण दाखल तारीख - 31/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 27/04/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या कु.राहुबाई पि.लक्ष्मण भुस्सेवार वय वर्षे 19, धंदा शिक्षण रा.हिप्परगा,. ता.नायगांव जि.नांदेड सध्या रा.व्यंकटेशन नगर, मुखेड ता.मुखेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. विठठल जनार्धन गोरे रा.मानसपुरी ता.कंधार जि. नांदेड अध्यक्ष जय बळीराज शिक्षण संस्था, मानसपुरी संचलित जनार्धन पाटील गोरे गुरुजी नर्सिग कॉलेज कंधार जि. नांदेड गैरअर्जदार 2. शाहुराज जनार्धन गोरे रा.मानसपुरी ता.कंधार जि. नांदेड सचिव जय बळीराज शिक्षण संस्था, मानसपुरी संचलित जनार्धन पाटील गोरे गुरुजी नर्सिग कॉलेज कंधार जि. नांदेड - प्रशासक, महाराष्ट्र परिचर्या परीषद, राज्य कामगार विमा योजना
- रुग्णालय आवार परिचारिका वस्तीगृह, 2 रा मजला,
- एल.बी.एस.मार्ग,मुलुड (प.)मुंबई 400 080
अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.टी.वडजे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.3 तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, सदस्या) 1. अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे बळीराजा शिक्षण संस्था मानसपुरी संचलित जनार्धन पाटील गोरे गुरुजी नर्सिग कॉलेजचे अनुक्रमे अध्यक्ष व सचिव आहेत.गैरअर्जदार क्र.3 ही गैरअर्जदार क्र.1 यांच्या संस्थेस परवानगी देणारी शासकीय यंञणा आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ यांनी गैरअर्जदार यांच्या संस्थेला एन.एम.ए. सहायक परिचारीका या प्रशिक्षीत ओयासक्रमासाठी कायमस्वरुपी विना अनुदान तत्वावर मान्यता दि.24.7.2009 रोजी दिली होती. सदरील अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 25 विद्यार्थीनी साठी होती. सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य नर्सिग कौन्सिलची मान्यता नाही. Auxilly Nurse Midwife (A.N.M.) हा अभ्यासक्रम असिस्टट अड मिडवायफरी या अभ्यासक्रमापेखा वेगळा आहे. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल तसेच इंडियन नर्सिग कौन्सिल वैद्यकीय शिक्षण व औषध वीभाग मंञायल मुंबई यांची मान्यता घेणे आवश्यक आहे. परवानगी नसताना गैरअर्जदाराने जाहीरात काढून अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे आहे व शंभर टक्के नौकरीची सुवर्णसंधी फक्त मुलीसाठी आहे. संपर्क गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे करावा असे म्हटले आहे. अर्जदार हे हिप्परगा ता.नायगांव येथील रहिवासी असून त्यांनी 10 जुन 2009 रोजी या विद्यालयात रु.70,000/-अभ्यासक्रमाची फिस म्हणून दिले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी ए.एन.एम.साठी प्रवेश दिला. ओळखपञ तसेच बोनाफाईड प्रमाणपञ दि.22.9.2009 रोजी दिले. अर्जदार ही गैरअर्जदार यांच्या महावि’द्यालयात एक वर्ष शिक्षण घेतले व कंधार येथे भाडयाची रुम घेऊन शिक्षण घेतले त्यासाठी रु.30,000/- खर्च आला. अर्जदाराचे असे लक्षात आले की, गैरअर्जदार यांच्या संस्थेस ए.एन.एम. या अभ्यासक्रमाची मान्यता नव्हती. महाराष्ट्रामध्ये ए.एन.एम. अभ्यासक्रमाच्या परिक्षेचे वेळापञक दि.19.07.2010 ते 21.07.2010 असे आले परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 या संस्थेस परिक्षेचे वेळापञक आले नाही. नांदे जिल्हयातील फक्त गूरुगोविंदसिंघ हॉस्पीटल, नांदेड व इतर सहा संस्थेचे महाराष्ट्र नर्सिग् कौन्सिलने परिक्षेची मान्यता दिली होती. अर्जदारास परिक्षेचे हॉलतिकीट मिळाले नाही.गैरअर्जदारांकडे चौकशी केली असता त्यांनी दि.19.07.2010 रोजी परिक्षेचे हॉलतिकीट देण्यात येईल असे सांगितले. अर्जदार हिस मजले की गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या संस्थेस ए.एन.एम. या अभ्यासक्रमाची मान्यता नव्हती त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांची रु.70,000/- घेऊन फसवणूक केली आहे. त्यामूळे अर्जदार हिने उपजिल्हाधिकारी कंधार व जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस स्टेशन कंधार यांच्याकडे गैरअरर्जदार क्र.1 व 2 यांची तक्रार केली. कंधार पोलिस स्टेशनने कलम 420, 468, 409, 34 भा.द.वि. नुसार गैरअर्जदार क्र.1 व 2 व इतर कार्यकारणी सदस्याविरुध्द दि.22.7.2010 रोजी गून्हा दाखल केला व सदर गून्हयाचा तपास सुरु आहे. अर्जदार हि ए.एन.एम. या अभ्यासक्रमाची परिक्षा दि.19.7.2010 रोजी देऊ शकले नाही कारण गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या महाविद्यालयास ए.एन.एम. या अभ्यासक्रमाला मान्यता नव्हती. असे करुन गैरअर्जदारांनी अर्जदारास ञूटीची सेवा दिली म्हणून सदर तक्रार दाखल केली. त्यानंतर अर्जदार हिने दि.26.7.2010 रोजी इंदिरा गांधी नर्सिग स्कूल मुखेड येथे ए.एन.एम.अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे व त्यासाठी वेगळी फिस भरली आहे. अर्जदार हिचे एक वर्षाचे शैक्षणीक व आर्थिक नूकसान झाले म्हणून रु.50,000/- ची मागणी केली आहे. तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. तसेच फिससाठी घेतलेले रु.70,000/- तसेच त्यासाठी एक वर्ष झालेला खर्च रु.30,000/-व दाव्याचा खर्च रु.10,000/- असे एकूण रु.2,60,000/- मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावट असून गैरसमजातून व पैसे उकळण्यासाठी केलेली आहे म्हणून ती फेटाळावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी दिलेली जाहीरात कशी असते ते या जवाबासोबत जोडली आहे.गैरअर्जदार यांनी शासनमान्य अभ्यासक्रमा बाबतच्या परिक्षेसाठी झालेला पाठपुरावा व पञव्यवहार तसेच विद्यार्थ्याचे आलेले हॉल तिकीट दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा आक्षेप की, गैरअर्जदार यांनी कॉलेज व त्यांचा अभ्यासक्रम खोटी मान्यता मिळवून मिळवलेले आहे हे म्हणणे खोटे असून दीशाभूल करणारे आहे.गैरअर्जदार क्र.3 यांनी दिलेल्या जवाबाला गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आव्हान दिलेले आहे. यासाठी दि.18.2.2011 रोजी पञ पाठविलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांच्या लेखी जवाबाला तसेच पञ व्यवहाराला आव्हान दिले असून रिट पिटीशन क्र.2499/2011 यांची प्रत दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार खोटी आहे हे दाखविण्याकरिता गैरअर्जदाराने अभ्यासक्रमाबाबत असलेले मेमोरंडम सिलॅबस तसेच विद्यार्थ्याची यादी प्रवेश निर्गम उतारा असे पूरावे दाखल केले आहेत. अर्जदारा व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला असून त्यांची गैरअर्जदार क्र. 1 व 2 बददल कूठलीही तक्रार नाही या बददल त्यांनी शपथपञ दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे आव्हान केले असून त्यात शासनामार्फत दि.3.2.2009 रोजी दिलेली जाहीरात दै.वृत्तपञ लोकमत यांचा पुरावा तसेच ए.एन.एम.या अभ्यासक्रमाचा सिलॅबस व प्रस्तावना ज्यामध्ये National Rural health mission यांनी Govt. of India यांच्या मार्फत एपिल 2005 ते 2012 मध्ये सुधारणा आणण्या करिता Health system and status वाढवावे या उददेशाने चालू केलेली सदर योजना व ध्येयधोरण यावीषयी स्वच्छ खुलासा दिलेलो आहे.शासनामार्फत ठरवून दिल्याप्रमाणे ए.एन.एम. यांच्या सेवा व जबाबधा-या ठरवून दिलेल्या आहेत यावरुन अर्जदार याचा खोटेपणा सिध्द होतो.महत्वाचे म्हणजे Nursingh Council of Maharashtra यांच्या अभ्यासक्रमाचा तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या शासनमान्य पॅरामेडीकल ग्रुप मधील व्होकेशनल बोर्डमधील अभ्यासक्रमाचा अर्थाअर्थी संबंध नसल्याबाबतचा पुरावा मंचासमोर दाखल केला आहे.तसेच नर्सीग कौन्सील यांची या अभ्यासक्रमासाठी परवानगीची गरज नाही याबददल खुलासा दाखल केला आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे जाहीरातीमध्ये देखील नर्सिग कौन्सील मार्फत अथवा मान्यता असलेले गैरअर्जदार यांचे कॉलेज आहे किंवा नर्सिग कौन्सीलचा सिलॅबस अथवा शैक्षणीक अभ्यासक्रम असल्याचे कूठेली भासवले नसल्याचे तसेच दीशाभूल व फसवणूक खोटी व बनावट माहिती व मान्यता असल्याबाबत अर्जदार यांनी सिध्द केलेले नाही.अर्जदार यांनी सिलॅबस एक वर्षाच आहे म्हटले आहे परंतु गैरअर्जदार यांचे मते प्रवेश दिल्यापासून ते आजपर्यत 18 महिने कालावधीचा सिलॅबस आहे त्याबाबत पूरावा दिलेला आहे.अर्जदार यांनी जवळपास एक वर्ष कॉलेज करुन एक वर्षानंतर अभ्यासक्रमाबाबत संभ्रम निर्माण करीत आहेत.अर्जदार यांची शहानीशा करुनच तसेच कूठलीही शंका नसल्यामूळे प्रवेश घेतलेला आहे.गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सदर तक्रार दाखल केली आहे.अर्जदार यांनी प्रवेशाकरिता रु.70,000/- घेतल्याचे म्हटले आहे परंतु त्याबाबत कोणताही पूरावा दिलेला नाही.अर्जदाराचे नूकसान झाल्याचे म्हटले आहे परंतु त्यांनी स्वतःच नर्सिग कॉलेज मुखेड येथे प्रवेश घेतल्याचे म्हटले आहे म्हणजे एक वर्षाचे नूकसान झालेले नाही अर्जदार यांनी नर्सिग कौन्सीलचे RANM व महाराष्ट्र शासन व्होकेशनल बोर्ड यांचे ANM यामध्ये संग्धिदता निर्माण करुन कायदयाचा विपर्यास्त करण्याचा प्रयत्न केला आहे.अर्जदार यांनी तक्रारीत ए.एन.एम चा अर्थ Auxillary nurse and midwifery असा दाखविला आहे परंतु त्यावरुन स्वतःचे झालेले संभ्रम व गैरसमज यासाठी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे Assistant nurse and Midwifery चूकीचे खोटे बनावट दाखविण्याचा प्रयत्न केला असून ज्यामधून स्वतःची फसवणूक झाले असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जदाराची तक्रार ही स्वतःलाच कोर्सचा अर्थ न समजल्यामूळे फसवणूक झाली म्हणून दाखल केली आहे यात गैरअर्जदार यांनी कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नसून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून महाराष्ट्र व गोवा राज्यात नर्सिग प्रशिक्षण संस्थाना परिचर्या अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी परवानगी देणे, परिचारीकांची परिक्षा घेणे व उत्तीण परिचारीकांना नोंदणी व पदविका प्रमाणपञ देणे इत्यादी कामे करते.संदर्भिय पञानुसार गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना महाराष्ट्र परिचर्या परीषदेची मान्यता नाही त्यामूळे सदर संस्थेकडे सुरु असलेला परिचर्या अभ्यासक्रम हा अनाधिकृतपणे सूरु आहे असे म्हटले आहे.आपणाकडून आलेल्या तक्रारीनुसार सदर संस्थेला परीषदेकडून परिचर्या अभ्यासक्रम बंद करण्याविषयी नोटीस पाठविलेली आहे. असे म्हणणे दाखल केलेले आहे. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार व गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांचे म्हणणे व दोन्ही पक्षकाराचे कागदपञ पाहून खालील मूददे उपस्थित होतात ते मूदे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदारांच्या सेवेत ञूटी आहे काय ? नाही 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 व 2 ः- 5. अर्जदार यांनी तक्रारीसोबत गैरअर्जदार यांचे कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपञ दाखल केले आहे त्यात अर्जदार ही पहिल्या वर्षात शिकत आहे याबददल नमूद केलेले असून त्यावर ठिकाण कंधार व दि.22.09.2009 असे नमूद केलेले आहे व त्यावर प्राचार्य यांची सही व शिक्का आहे. यावरुन अर्जदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक होती हे सिध्द होते म्हणून मूददा क्र.1 चे वरील उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. 6. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या कॉलेजला महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मडळ यांची नर्सिग अड सिडवायफरी असिस्टंट या अभ्यासक्रमास 25 विद्यार्थ्यासाठी मान्यता असल्याचे मान्यतापञ दाखल केंले आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिग कौन्सील यांनी परिक्षेसाठी विद्यार्थ्याची सिट नबरची यांदी व सेंटरची यादी दाखल केली आहे.तसेच दि.31.01.2007 चे महाराष्ट्र शासनाचे Essentiality Certificate दाखल केले आहे व त्यांची प्रत गैरअर्जदार यांना दिलेली आहे. अर्जदार यांनी जेएमएफसी कोर्ट कंधार येथे गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार केल्याची प्रत दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी काही कागदपञे दाखल केली आहेत त्यात महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी त्यांनी एक पञ दिले आहे त्यात अभिलेख प्रमाणित करणे बाबत कळविले आहेत. त्यात नर्सिग अन्ड मिडवायफरी असिस्टंट या प्रमाणपञ अभ्यासक्रमाचा कालावधी हा 18 महिन्याचा असल्याचे म्हटले आहे. म्हणजे अर्जदार म्हणतात की, हा कालावधी एक वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा आहे हे अर्जदाराचे म्हणणे चूक ठरते.तसेच गैरअर्जदार यांनी Emrpllment Register June 2009 चे दाखल केले आहे त्यात भूस्सेवार राहूबाई लक्ष्मण हिचा नंबर 092270247 असा दिलेला आहे व त्यावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांची सही आहे. यावरुन ती कोर्ससाठी होती व तिने परिक्षेचे कालावधी पर्यत काहीही तक्रार केलेली नाही व तोपर्यत कॉलेज केले हे सिध्द होते. गैरअर्जदार यांनी एन.एम.ऐ. चा सिलॅबस दाखल केलेला आहे. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, Nurse & Midwifery Assistant असे म्हटलेले आहे. गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून त्यांचे कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या इतर विद्यार्थ्याचे हॉलतिकीट दाखल केलेले आहेत व त्यांचे शपथपञ सूध्दा दाखल केलेले आहेत त्यात अर्जदार हीचे सूध्दा हॉलतिकीट दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी त्यांचे कॉलेजची जी जाहीरात दिली होती तो पेपर दाखल केला आहे. त्यात असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र नर्सिग कौन्सील मान्यता प्राप्त यामध्ये आर.ए.एन.एम. प्रवेश असे स्पष्ट लिहीलेले आहे त्यामूळे अर्जदार यांनी जो आक्षेप घेतला आहे की त्यांची फसवणूक झाली, तो येथे खोडून काढला आहे. मंचाचे असे लक्षात आले आहे की,गैरअर्जदार यांचे लेखी यूक्तीवाद मधील म्हणणे खरे वाटते की, अर्जदार यांनी नर्सिग कौन्सीलचे RANM व महाराष्ट्र शासन व्होकेशनल बोर्ड यांचे ANM यामध्ये संग्धिदता निर्माण केली आहे. अर्जदार यांना या अभ्यासक्रमाबाबत पूर्व कल्पना होती व त्यांची खाञी करुनच त्यांनी प्रवेश घेतला व पूर्ण वर्ष कॉलेज करुन हॉलतिकीट आल्यावर परिक्षा सूध्दा दिली.म्हणजे त्यांची फसगत झाली असे त्यांना म्हणता येणार नाही.तसेच गैरअर्जदार यांनी जे इतर विद्यार्थीनीचे शपथपञ दाखल केले आहे त्यात स्पष्ट नमूद आहे की, जर्नादन पाटील गोरे गूरुजी ए.एन.एम. कॉलेज नर्सिग कॉलेज कंधार येथे साल 2009-11 च्या 18 महिन्याच्या कोर्ससाठी (नर्सिग व मिडवायफरी असिस्टंट) साठी विद्यार्थी म्हणून आहे. सदरील कॉलेज मध्ये दहा बेडचे हॉस्पीटल आहे व अडमीशन घेतल्यानंतर परिक्षा फिस सर्व विद्यार्थ्याची परिक्षा मंडळास प्रत्येकी रु.930/- प्रमाणे पाठविली आहे सदरील कोर्सची परिक्षा जानेवारी 2011 मध्ये होणार आहे. तसेच सदरील कॉलेजमध्हये शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डोनेशन दिलेले नाही. यावरुन अर्जदाराच्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही असे निदर्शनास येते. अर्जदार यांनी तक्रारीत ए.एन.एम चा अर्थ Auxillary nurse and midwifery असा दाखविला आहे परंतु त्यावरुन स्वतःचे झालेले संभ्रम व गैरसमज यासाठी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे Assistant nurse and Midwifery चूकीचे खोटे बनावट दाखविण्याचा प्रयत्न केला असून ज्यामधून स्वतःची फसवणूक झाली असे दाखविण्याचा प्रयत्न अर्जदार यांनी केला होता तो गैरअर्जदार यांनी पूर्णपणे खोडून काढलेला आहे. अर्जदार यांनी प्रवेशाकरिता रु.70,000/- घेतल्याचे म्हटले आहे परंतु त्याबाबत मंचासमोर कोणताही पूरावा दिलेला नाही किंवा गैरअर्जदार यांनी कोणतीही पावती दाखल केलेली नाही म्हणजे अर्जदार यांचे तकारीमधील म्हणणे पूर्णतः खोटे व बनावट आहे हे सिध्द होते. अर्जदार यांनी जे.एम.एफ.सी.कोर्ट कंधार येथे कू.राहूबाई लक्ष्मण भूस्सेवार विरुध्द विठठल जनार्धन गोरे व इतर असा आरसीसी दावा दि.22.07.2010 रोजीदाखल केला आहे. तो दावा अजूनही प्रलंबित आहे प्रथमदर्शनी तक्रारीमध्ये सखोल साक्षीपुराव्याची गरज आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या जवाबामध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना त्यांनी अभ्यासक्रम बंद करण्यावीषयी नोटीस पाठविलेली आहे परंतु तशा प्रकारची कोणतीही नोटीस मंचासमोर दाखल केलेली नाही. तसेच या कोर्सकरिता प्रवेश घेतलेल्या इतर विद्यार्थ्यानी प्रवेश घेतला आहे व त्यांचे हॉल तिकीट पाहता सदर तक्रारीमध्ये सखोल पूराव्याची गरज आहे तसेच कंधार न्यायालयात तक्रार चालू आहे त्यामध्ये अर्जदारास योग्य न्याय मिळेल त्यामूळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |