Maharashtra

Chandrapur

CC/18/123

Ku Akshata Kishor Vishwbramha - Complainant(s)

Versus

Vishwkarma Panchal Nagri Sahakari Pat Santha Ltd Ballarpur - Opp.Party(s)

Adv. Sanjeevani Moharkar

30 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/123
( Date of Filing : 31 Aug 2018 )
 
1. Ku Akshata Kishor Vishwbramha
S.T. Work shop tukum Chandrapur
chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Vishwkarma Panchal Nagri Sahakari Pat Santha Ltd Ballarpur
AtNear shalaka Gas Agencies Balaji Ward Ballarpur
chandrapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Aug 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्‍यक्ष,)

                      (पारीत दिनांक ३०/०८/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्तीने  ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ सह कलम १४ अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्ती ही चंद्रपूर येथील रहिवासी आहे.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही बल्‍लारपूर येथील सहकारी पतसंस्‍था असून त्‍याचा नोंदणी क्रमांक सी.एच.डी./(सी.एच.डी.)/आर.एस.आर./सी.आर. ४०१ असा आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे संस्‍थेचे सचिव असून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे संस्‍थेच्‍या  सदस्‍यांपैकी एक आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ संस्‍थेमध्‍ये रुपये २००/- प्रतिमाह प्रमाणे दिनांक २४/०९/२०१२ रोजी ५ वर्षे कालावधी करिता आवर्त ठेव (आर.डी.) योजनेचे खाते उघडले होते. सदर खाते  हे ५ वर्षाच्‍या मुदत ठेवीसाठी विरुध्‍द पक्ष संस्‍थेच्‍या  योजनेनुसार ११ टक्‍के  व्‍याज देण्‍याची योजना होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ अथवा ३ हे उपरोक्‍त रक्‍कम गोळा करण्‍यास तक्रारकर्ती यांचे घरी नियमीतपणे येत होते. तक्रारकर्तीने दिनांक २४/०९/२०१२ पासून ते दिनांक १४/०७/२०१७ पर्यंत नियमीतपणे महावारी हप्‍त्‍याची रक्‍कम रुपये २००/- विरुध्‍द पक्ष क्रमांक २ मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे जमा केले. परंतु दिनांक १४/०७/२०१७ या तारखेनंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ तर्फे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे महावारी हप्‍ता वसूल करण्‍याकरिता तक्रारकर्तीच्‍या घरी आलेच नाही. तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे जाऊन चौकशी केली असता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली. सदर घटनेनंतर तक्रारकर्ती बरेच वेळा सदर पतसंस्‍थेमध्‍ये प्रत्‍यक्षपणे जाऊन चौकशी करीत होते परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ ज्‍यांच्‍याकडे ग्राहकांकडून महावारी हप्‍ता गोळा करण्‍याची जबाबदारी होती यांच्‍याबाबत कोणतीही माहिती विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने दिली नाही व तक्रारकर्तीच्‍या खात्‍याबद्दल सुध्‍दा कसलीही माहिती दिली नाही. विरुध्‍द पक्षांनी जमा केलेली रक्‍कम तसेच त्‍यावरील व्‍याज रक्‍कम देण्‍याबद्दलही काहीही बोलणी केली नाही. विरुध्‍द पक्षांच्‍या या ञासामुळे कंटाळून तक्रारकर्तीने त्‍यांचे वकीलामार्फत दिनांक ५/३/२०१८ रोजी त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठविला. विरुध्‍द पक्षांनी सदर नोटीसला प्रतिसाद न दिल्‍यामुळे तक्रारकर्तीने  आयोगासमक्ष विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये  पुढीलप्रमाणे मागणी केली आहे.
  3. तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्षांच्‍या अनुचित व्‍यापार प्रकारामुळे तसेच दोषपूर्ण सेवेमुळे सहन कराव्‍या लागलेल्‍या मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्‍कम रुपये १,००,०००/- नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्षांच्‍या संस्‍थेमध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये ११,८००/- तसेच त्‍यावर दिनांक २४/०९/२०१२ पर्यंत ठरल्‍याप्रमाणे रुपये १६,००६/- व दिनांक २४/०९/२०१७ पासुन रक्‍कम परत करत नाही तो पर्यंत ११ टक्‍के व्‍याज तक्रारकर्तीस देण्‍याबाबत आदेश पारित करण्‍यात यावा तसेच तक्रारीचा खर्च अदा करण्‍यात यावे अशी मागणी केली आहे.
  4. तक्रारकर्तीची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍यात आले.                                                                                                                                                           विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही. करिता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विरुध्‍द  प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक ६/७/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना ‘दैनिक महाविदर्भ’ या वृत्‍तपञातून जाहीर नोटीस काढण्‍यात आली. तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे आयोगासमक्ष हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द सुध्‍दा प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक २८/६/२०२२ रोजी पारित  करण्‍यात आला.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये असे नमूद केले की, सदर संस्‍थेचे सन २०१६-२०१७ चे लेखा परीक्षण अहवालांत संबंधित लेखा परीक्षकाने संस्‍थेच्‍या पदाधिकारी यांनी रुपये २४,७४,७६५/- ची अफरातफर केल्‍याबाबत विशेष अहवाल सादर केलेला आहे त्‍यानुसार मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था, तालुका बल्‍लारपूर यांनी आदेश क्रमांक सनिब/विनियम/वि.क.पा.ना.पत.स./क.८३/आदेश/१०८१/२०१८ नुसार महाराष्‍ट्र  सहकारी संस्‍था अधिनियम १९६० चे कलम ८८ अंतर्गत संस्‍थेच्‍या दोषी पदाधिका-यांवर वसुल पाञ रकमेची निश्चिती कार्यवाही सुरु केलेली आहे तसेच मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्‍था, तालुका बल्‍लारपूर यांचे आदेश क्रमांक सनिब/विनियम/कलम.७७(अ)/वि.पा.ना. सह.पत.सं. बल्‍लारपूर दिनांक ८/६/२०१८ नुसार सदर संस्‍थेवर त्‍यांची प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्‍हणून नियुक्‍ती  करण्‍यात आली आहे आणि पदभार दिनांक ११/०६/२०१८ रोजी स्‍वीकारलेला आहे. अफरातफरी बाबत संबंधित लेखापरीक्षक यांनी दिनांक ३/८/२०१८ रोजी प्रथम वर्दी अहवाल पोलीस स्‍टेशन बल्‍लारपूर येथे दाखल केला आहे. त्‍यात गैरअर्जदार क्रमांक २ यांचा समावेश आहे. सदर तक्रारीमध्‍ये पक्षकार केलेले विरुध्‍द पक्ष क्रमांक २ श्री प्रभाकर तोगट्टीवार हे माजी सचिव असून गैरअर्जदार क्रमांक ३ सौ. निर्मला प्रभाकर तोगट्टीवार ह्या संस्‍थेच्‍या बचत अभिकर्त्‍या  होत्‍या. सद्यस्थितीत हे दोघेही पती-पत्‍नी बेपत्‍ता आहेत. दिनांक ५/३/२०१८ रोजी अर्जदाराने पाठविलेला नोटीस हे माझ्या कार्यकाळात आलेला नाही. गैरअर्जदार क्रमांक २ व ३ हे संस्‍थेचे माजी पदाधिकारी असून त्‍यांनी संस्‍थेच्‍या  रकमेची अफरातफर केल्‍याबाबत कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. तसेच संस्‍थेच्‍या  थकीत व चालु कर्जदाराकडून कर्जाची वसुली करुन ठेवीदाराची ठेवी परत करण्‍यात येणार आहे. त्‍या करिता गैरअर्जदार क्रमांक १ संस्‍थेकडून नियोजन करण्‍यात येत आहे.
  6. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज तसेच मुळ तक्रारीलाच त्‍यांचा पुरावा आणि लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशी पुर्सिस दाखल यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

   अ.क्र.                 मुद्दे                                                            निष्‍कर्षे

    १.  तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे कायॽ                होय

    २.  विरुध्‍द पक्षांनी तक्रारककर्तीप्रति न्‍युनतापूर्ण सेवा दिली     होय

        आहे कायॽ

      ३.  आदेश कायॽ                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ संस्‍थेमध्‍ये रुपये २००/- प्रतिमाह प्रमाणे दिनांक २४/०९/२०१२  रोजी ५ वर्षे कालावधी करिता आवर्त ठेव (आर.डी.) योजनेचे खाते उघडल्‍याबाबत दस्‍तावेज प्रकरणात निशानी क्रमांक ४  वरील दस्‍त क्रमांक ६ वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ संस्‍थेमध्‍ये रुपये २००/- प्रतिमाह प्रमाणे दिनांक २४/०९/२०१२ रोजी ५ वर्षे कालावधी करिता आवर्त ठेव (आर.डी.) योजनेचे खाते उघडले होते. उपरोक्‍त  रकमेच्‍या महावारी हप्‍त्‍याची रक्‍कम तक्रारकर्तीकडून नियमीतपणे वसूल करण्‍यात येत होती परंतु दिनांक १४/०७/२०१७ पासून महावारी हप्‍त्‍याची रक्‍कम वसूल करण्‍यात आली नाही. तक्रारकर्तीने याची चौकशी केली असता विरुध्‍द  पक्षांनी उडवाउडवीचे उत्‍तर दिले. तक्रारकर्तीने  तिच्‍या आवर्ती ठेव  खात्‍याबाबत माहिती मागितली असता ती दिली नाही तसेच जमा केलेली रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज सुध्‍दा परत दिले नाही.  तक्रारकर्तीचा हा आक्षेप विरुध्‍द पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्‍या समर्थनार्थ कोणतेही म्‍हणणे प्रकरणात दाखल केले नाही. अशा परिस्थितीत गुंतवणुक केलेली रक्‍कम परत न करुन तक्रारकर्तीप्रति विरुध्‍द पक्षांनी न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेंचणावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.   

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार क्र. १२३/२०१८ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ आणि ४ यांनी तक्रारकर्ती यांना गुंतवणूक केलेली रक्‍कम रुपये ११,८००/- व या रकमेवर द.सा.द.शे. ९ टक्‍के  व्‍याजासह तक्रार दाखल झाल्‍यापासून ते तक्रारकर्तीच्‍या प्रत्‍यक्ष रक्‍कम हातात  मिळेपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ आणि ४ यांनी तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  5. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावेत.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.