नि.नं. ४०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३५०/२०१०
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – १७/७/२०१०
तक्रार दाखल तारीखः – १२/८/२०१०
निकाल तारीखः - २९/०९/२०११
----------------------------------------------
१. श्री माणिक उर्फ मनोज उर्फ जिनेंद्र जंबू पाटील
वय ४१ वर्षे, धंदा – शेती
रा.कसबेडिग्रज, ता.मिरज जि.सांगली
२. सौ कल्पना मनोज पाटील
वय ३५ वर्षे, धंदा – शेती
रा.कसबेडिग्रज, ता.मिरज जि.सांगली
३. ओंकार मनोज पाटील
वय ८ वर्षे, धंदा – शिक्षण
अ.पा.क. जनक वडील मनोज जंबू पाटील
४. कु.मयुरी मनोज पाटील
वय १३ वर्षे, धंदा – शिक्षण
अ.पा.क. जनक वडील मनोज जंबू पाटील .... तक्रारदार
विरुध्द
१. विश्वनाथ शामराव पाटील ग्रामीण बिगर शेती
सह.पतसंस्था मर्या. कसबेडिग्रज
२. श्री श्रीपाल भरमा चौगुले
३. श्री कुमार नेमू मिनचे
४. श्री श्रीपती तुकाराम लाड
५. श्री असलम अजीज तांबोळी
६. श्री कुमार श्रीपाल चौगुले
७. श्री कुमार जयवंत लोंढे
८. श्री रमेश जंबू चौगुले
९. श्री आण्णा बाबू चौगुले
१०. श्री धनपाल श्रीपाल गळतगे
११. श्री आनंदा मायप्पा पाटील
१२. श्री श्रीधर बंडू अवधूत
१३. सौ मंगल बाबासो वसगडे
१४. विमलाबाई रामचंद्र मोहिते
सर्व सज्ञान, नं. १ ते १४ सर्व राहणार
कसबेडिग्रज, ता.मिरज, जि. सांगली .....जाबदार
तक्रारदार तर्फेः - +ìb÷. श्री एस.एस.शहा
जाबदार क्र.२ ते ४ व ६ ते १४ - +ìb÷. श्री डी.एम.धावते
जाबदार क्र.१ व ५ – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी व दामदुप्पट ठेवीअन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार विश्वनाथ शामराव पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कसबे डिग्रज (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील सर्व मुदत ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत तर सर्व दामदुप्पट ठेवींच्या मुदती अद्यापी पूर्ण व्हावयाच्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने त्या देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण १७ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ व ५ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. जाबदार क्र. २ ते ४ व ६ ते १४ यांनी मंचाच्या नोटीशीची बजावणी त्यांचेवर झाल्यावर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांनी जाबदार पतसंस्था ही मर्यादित संस्था अशी नोंद झालेली संस्था आहे त्यामुळे या संस्थेमध्ये सभासदांची जबाबदारी ही सभासदांनी खरेदी केलेल्या शेअर्स इतकीच असते. त्यामुळे अर्जदारांच्या ठेवीची रक्कम परत देण्याची जबाबदारी त्यांच्या शेअर्सच्या रकमेइतकीच मर्यादित आहे असे म्हणणे मांडलेले आहे. सदरहू जाबदार पुढे असेही कथन करतात की, सहकार कायदा कलम ८८ अन्वये संचालकांची चौकशी होवून जर संचालकांना दोषी ठरविण्यात आलेले असेल तरच त्यांना तक्रारदारांच्या ठेवीच्या रकमेपोटी जबाबदार धरता येईल परंतु या संचालकांच्या विरुध्द कोणतीही चौकशी झालेली नाही व त्यांना कोणत्याही गैरकृत्यासाठी जबाबदार धरण्यात आलेले नाही. तसेच त्यांच्याविरुध्द कोणतीही कारवाई दाखल करण्यात आलेली नाही किंवा ती न्यायप्रविष्ट नाही. त्यामुळे सदरहू संचालकांना तक्रारदारांच्या ठेवीसाठी जबाबदार धरता येणार नाही. जाबदारांच्या म्हणण्याप्रमाणे पतसंस्थेच्या संचालकांनी कर्जवसुली करुन रक्कम वसूल होताच ठेवीदारांच्या ठेवी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व ते तक्रारदारांच्याही ठेवीतील रकमा कर्ज वसुल होताच अग्रक्रमाने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत आणि या सगळयांचा विचार करता तक्रारदार यांना जाबदार यांनी कोणतीही दूषीत सेवा दिलेली नाही अगर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही असे जाबदारांनी म्हणणे मांडले आहे. जाबदारांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदारांची रक्कम देण्यास योग्य व सुलभ हप्ते मिळावेत अशी मागणी केली आहे. म्हणण्याच्या पुष्ठयर्थ तक्रारदारांनी नि.३३ अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
४. जाबदारांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल झालेनंतर तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानंतर सदरहू प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले.
५. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थाबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायद्यातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र.२ ते १४ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. त्यामुळे पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
६. प्रस्तुत प्रकरणी दाखल ठेवपावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्या रकमांवर कोणतेही व्याज मिळाल्याचे दिसून येत नाही. मुदत ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. सबब या सर्व मुदत ठेवींतील गुंतविण्यात आलेल्या रकमा ठेव ठेवल्याचे तारखेपासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तसेच दामदुप्पट ठेवपावत्यांच्या मुदती अद्यापी पूर्ण होण्याच्या असल्यामुळे त्यातील मूळ गुंतविलेल्या रकमा ठेव ठेवल्या तारखेपासून १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्या क्र.००२३२३, ००२३२६, ००२३२५, ००२३२४, ००२३१३, ०२३१४, ००२३१२, ००२३११ मधील प्रत्येकी रक्कम रु.२०,०००/- (वीस हजार फक्त) दि.३/११/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.००३२०१ व ००३२०३ मधील प्रत्येकी रक्कम रु.१०,०००/- (दहा हजार फक्त) दि.२०/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावत्या क्र.००३२०० व ००३२०२ मधील प्रत्येकी रक्कम रु.१५,०००/- (पंधरा हजार फक्त) दि.२०/८/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
४. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.०००९९८ मधील रक्कम रु.१०,०००/- (दहा हजार फक्त) दि.२४/४/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
५. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.००१७३९ मधील रक्कम रु.५,०००/- (पाच हजार फक्त) दि.२२/३/२००४ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
६. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.००३४०५ मधील रक्कम रु.१०,०००/- (दहा हजार फक्त) दि.२४/१/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
७. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
८. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.१४/११/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २९/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११