(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून घेतलेल्या कर्जास अर्जदार हे जामिनदार आहेत. कर्जफेड न झाल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या खात्यातून रक्कम वळती करुन घेतली, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून कर्ज घेतले आहे. अर्जदार हे या कर्जास जामिनदार आहेत. कर्जदाराने कर्जाची परतफेड न केल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराच्या बँकेतील खात्यातून 18900/- रुपये वळते करुन घेतले. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे तक्रार केली व वळती करुन घेतलेली रक्कम त्यांच्या खात्यात परत जमा करण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे व रक्कम परत न केल्यामुळे मंचात तक्रार दाखल केली असून, व्याजासह रक्कम परत करण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर वकीलपत्र दाखल केले, परंतु संधी देऊनही मंचामध्ये जवाब दाखल केलेला नाही म्हणून मंचाने नो से चा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना ही मंचाची नोटीस प्राप्त होऊनही उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीवरुन व सोबत जोडलेल्या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराच्या खात्यातून दि.07.04.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांच्या खात्यात 7,000/- रुपये ट्रान्स्फर केले. तसेच दि.25.11.2008, 07.03.2009, 08.04.2009 रोजी 11900/- रुपये असे एकूण 18,900/- रुपये वळते करुन घेतले. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचात जवाब दाखल केलेला नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने (पवनकुमार जैन विरुध्द पी.आय.सी.यु.पी.) 2004 एस.ए.आर. 723 व (युनियन बँक विरुध्द मानकु नारायण ए.आय.आर.1987 एस.सी.1078) या निवाडयामध्ये कर्जदाराची तारण गहाण मालमत्ता विक्री केल्याशिवाय (3) त.क्र.403/10 व प्रथम कर्जदाराच्या गहाण मिळकती संबंधी वसुलीचे प्रयत्न करावेत व नंतर जामिनदाराविरुध्द वसुली मागणी करण्यासंदर्भात सांगून बँकेची जामिनदाराविरुध्दची वसुली अमान्य केली. सदरील प्रकरणामध्ये गैरअर्जदार यांनी कोणताही जवाब दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांनी कर्जदाराविरुध्द कर्ज वसुलीची कारवाई कायद्याच्या तरतुदीप्रमाणे पूर्ण करुन नंतर अर्जदाराकडून उर्वरित कर्ज रक्कम वसुल केल्याबददल कोणतीही कागदपत्रे दाखल केली नसल्यामुळे अर्जदाराने शपथेवर दाखल केलेली तक्रार मान्य करण्यात येत आहे. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराकडून वसूल केलेली रक्कम 9% व्याजासह 30 दिवसात परत करावी. 2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबददल रु.2500/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |