(मंचाचे निर्णयान्वये, अनिल एन. कांबळे, अध्यक्ष,प्रभारी)
(पारीत दिनांक : 13 मार्च 2009)
1. अर्जदाराने, सदरची तक्रार, गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात असमर्थता दाखविल्यामुळे रुपये 18,858/- वसुली करीता दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदाराने घर बांधकामाकरीता लागणारे साहित्य पुरविण्याचा करार गैरअर्जदाराकडे केला. गैरअर्जदार वेल्डींग वर्कचे काम करुन सेवा
... 2 ...
... 2 ...
पुरवीत असल्यामुळे, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक झालेला आहे. अर्जदाराने, गैरअर्जदाराशी करार केला, त्या संबंधित व्यवहाराचा करारनामा दिनांक 23/2/2008 लिहून घेण्यात आला. करारनाम्यानुसार मुदत 31/5/2008 ठरविलेली होती. करारनाम्यानुसार लोखंडी ग्रिलचे काम, घडाई प्रती किलो रुपये 30/-, महाराजा गेट प्रति किलो रुपये 40/- याप्रमाणे ठरविण्यात आले. अर्जदाराने दिनांक 23/2/2008 चा करारनामा लिहून घेण्यापूर्वी नगदी लोहा रुपये 42,763/- व पुरविण्यात येणा-या सेवेकरीता रुपये 11,582/- असे एकुण 54,345/- रुपये गैरअर्जदारास दिले. गैरअर्जदाराने, अर्जदारास लोखंडी ग्रिलचे 759.700 कि.ग्रॅ. दर रुपये 30/- प्रमाणे रुपये 22,860/- ची सेवा पुरविली. तसेच, महाराजा गेट 317.400 कि.ग्रॅ. दर 40/- प्रमाणे 12,680/- ची सेवा पुरविली असे एकुण रुपये 35,487/- ची सेवा गैरअर्जदाराने पुरविली.
3. अर्जदाराने, गैरअर्जदारास दिलेल्या एकुण रकमेतून,गैरअर्जदाराने पुरविलेल्या सेवाच्या रकमाची रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कम अर्जदारास देणे बंधनकारक होता. अर्जदाराने, एकुण रुपये 54,343/- दिले, त्यापैकी 35,487/- एवढयाच रुपयाची सेवा पुरविली, उर्वरीत रुपये 18,858/- गैरअर्जदाराकडून घेणे आहे. अर्जदाराने, गैरअर्जदारास देय असलेल्या रकमेबाबत वारंवार मागणी केली आहे. परंतु, गैरअर्जदाराने, त्याकडे लक्ष दिले नाही. गैरअर्जदाराने, दिनांक 23/2/2008 च्या करारनाम्याच्या शर्ती व अटीचा भंग करुन सेवा देण्यात असमर्थता दाखविल्यामुळे,अर्जदाराने आपले वकील, एन.यु. लोडलीवार यांचेमार्फत दिनांक 26/9/2008 रजीष्टर पोष्टाने नोटीस दिला. सदर नोटीस गैरअर्जदारास मिळून सुध्दा नोटीसाचे पालन केले नाही. गैरअर्जदाराने, अर्जदारास, घेणे असलेल्या रकमे पासून वंचीत ठेवल्यामुळे, झालेल्या मानसिक ञासाकरीता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आणि घेणे असलेली रक्कम रुपये 18,858/- असे एकुण रुपये 33,858/-, 13 % टक्के व्याजाने वसुल करुन द्यावे, अशी मागणी आपले तक्रारीत केली आहे.
4. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ निशाणी 2 वरील यादीनुसार एकुण 4 मुळ दस्ताऐवज दाखल केले आहे. ज्यात, दिनांक
... 3 ...
... 3 ...
23/2/2008 ला केलेल्या करारनाम्याची प्रत, पोस्टल पावती, पोचपावती, नोटीसाची प्रत दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन निशाणी 10 नुसार आपले लेखी उत्तर दाखल केले आहे.
5. गैरअर्जदाराने, आपले लेखी उत्तरात अर्जदाराच्या तक्रारी मधील मजकुर खोटा आधारावर असल्यामुळे अमान्य केला आहे. गैरअर्जदाराने, आजपर्यंत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा करारनामा लिहून दिला नाही. गैरअर्जदाराने, परिच्छेद 2 मधील सर्व मजकुर अमान्य केले आहे. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात, परिच्छेद 4 मधील मजकुर अमान्य केला आहे. गैरअर्जदाराने हे ही अमान्य केले आहे की, अर्जदारास लोखंडी ग्रिल 759.700 कि.ग्रॅ. दर रुपये 30/- एकुण रुपये 22,660/-, तसेच महाराजा गेट 317.400 कि.ग्रॅ. दर रुपये 40/- एकुण रुपये 12,680/- हे कथन खोटे व बनावटी असल्यामुळे, अमान्य केले आहे. गैरअर्जदाराने, अर्जदाराच्या तक्रारीतील परिच्छेद 5, 6, 7 मधील कथन बनावटी असल्याने अमान्य केले आहे.
6. गैरअर्जदाराने, आपले विशेष कथनात असे नमुद केले आहे की, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही ग्राहक व विक्रेता या व्याखेत नसल्यामुळे, हा अर्ज खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदार आपला उदरनिर्वाह जोडारीच्या कामावरुन करतो, आणि दिलेल्या कामा प्रमाणे लोखंडी साहित्य करुन देतो. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने एकुण रुपये 75,591/- चे लोखंडी साहित्य तयार करुन अर्जदाराला दिलेला आहे. सदर माल खरेदी करतेवेळी अर्जदार स्वतः हजर होता. अर्जदाराने, गैरअर्जदारास त्यापैकी रुपये 39,129/- दिले. गैरअर्जदाराने, अर्जदाराला वारंवार पैशाची मागणी केली असता, आज देईल उद्या देईल असे म्हणून शेवटी पैसे देण्यास नकार दिला. गैरअर्जदाराला एकुण रुपये 36,462/- अर्जदाराकडून घेणे आहे.
7. गैरअर्जदाराने, आपले विशेष कथनात पुढे असेही नमुद केले आहे की, अर्जदाराने, गैरअर्जदाराचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे.
... 4 ...
... 4 ...
करारनाम्यातील संपुर्ण मजकुर अर्जदराने स्वतः लिहिला व त्यावर स्वाक्षरी गैरअर्जदाराची नाही. आपल्या नातेवाईकाला सोबत घेऊन सदर दस्ताऐवजावर, साक्षदार असे दर्शविले आहे. गैरअर्जदारास, अर्जदाराकडून घेणे असलेले रुपये 36,462/- वसुल करुन द्यावे आणि अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा, अशी मागणी लेखी बयाणात केली आहे.
8. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणासोबत निशाणी 11 वरील यादीनुसार कागदपञ दाखल केले आहेत. अर्जदारास तयार करुन दिलेला लोखंडी सामानाचा तपशिल दाखल केलेला आहे. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ निशाणी 14 नुसार शपथपञ दाखल केला आहे. गैरअर्जदारास शपथपञ दाखल करण्यास संधी देण्यात आली, परंतु शपथपञ दाखल केले नाही. गैरअर्जदारास युक्तीवाद करण्याकरीता संधी देण्यात आली, परंतु गैरअर्जदार किंवा त्याचे वकील हजर झाले नाही. त्यामुळे, उपल्बध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्याकरीता ठेवण्याबाबत निशाणी 1 वर आदेश पारीत करण्यात आला.
9. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन आणि अर्जदाराचे वकीलानी केलेल्या युक्तीवादावरुन, खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
10. अर्जदाराने, आपले तक्रारीत गैरअर्जदाराकडून घराला लागणारे लोखंडी साहीत्य ग्रिल, खिडक्या, गेट बनविण्याचा काम दिला होता, ही बाब गैरअर्जदाराच्या लेखी बयाणातील विशेष कथनावरुन सिध्द होतो. अर्जदाराने, आपले तक्रारीत लोखंडी ग्रील 759.700 कि.ग्रॅ. एवढेच काम गैरअर्जदाराने केले असे नमुद केले आहे व त्यानुसार प्रति किलो रुपये 30/- प्रमाणे त्याची किंमत लावलेली आहे. परंतु, सदर वजनाबाबत कुठलाही तपशिल तक्रारीत दाखल केलेला नाही. त्यामुळे, अर्जदाराचे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. अर्जदाराने, आपले तक्रारीत महाराजा गेटचे वजन 317.400 कि.ग्रॅ. नमुद केले आहे. तर गैरअर्जदाराने आपले लेखी
... 5 ...
... 5 ...
बयाणासोबत अर्जदारास बनवून दिलेल्या लोखंडी साहित्याचा तपशिल निशाणी 11 वरील यादीनुसार दाखल केला, त्याचे अवलोकन केले असता गेट 374.300 कि.ग्रॅ. वजन दाखविले आहे. यावरुन, अर्जदार व गैरअर्जदार यांच्या म्हणण्यात तफावत असल्यामुळे, त्याबाबत सखोल पुरावा घेतल्या शिवाय तक्रार गुणदोषावर निकाली काढणे शक्य नाही, असा या न्यायमंचाचा निष्कर्ष आहे.
11. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात असे म्हटले आहे की, अर्जदाराने केलेला करारनामा हा स्वतःच लिहिलेला असून आपल्या नातेवाईकांना, साक्षदार दाखवून, खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने, आपले तक्रारी सोबत निशाणी 2 अ-1 वर दाखल केलेल्या करारनाम्याचे अवलोकन केले असता असे दिेसुन येते की, सदर स्टॅम्प 29/11/2007 ला घेण्यात आलेला असून करारनामा 23/2/2008 या तारखेत करण्यात आला. त्यावर लिहीणा-याची सही आहे, परंतु ते कुणी लिहिले हे स्पष्ट होत नाही. तसेच, करारनाम्यावर त्यानंतर वेल्डींग दुकानदाराकडून तयार करुन दिलेल्या मालाचा तपशिल दिलेला आहे व त्यानुसार, खिडक्या, बालकनी, जीना 759.700 कि.ग्रॅ. दर 30/- व महाराजा गेट व चॅनल गेट 317.400 कि.ग्रॅ. दर 40/- याप्रमाणे एकुण 35,487/- चा माल मिळाल्याचे नमुद आहे. सदर करारनाम्यावर अर्जदार व गैरअर्जदार यांच्या सहया असून फोटो लागलेले आहे. तसेच, साक्षदाराच्या सहया असून अर्जदार व गैरअर्जदार यांचे आंगठे लावलेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने करारनाम्याचे शर्ती व अटीचा भंग करुन 31/5/2008 पर्यंत काम करुन दिले नाही, त्यामुळे सेवा देण्यात असमर्थता केली आहे, ही बाब सुध्दा सखोल पुरावा घेतल्या शिवाय सिध्द होऊ शकत नाही. समरी पध्दतीने निकाली काढण्यास शक्य नाही कारण की, अर्जदाराने करार सिध्द केलेला नाही. गैरअर्जदाराने सदर करार हा खोटा व बनावटी असून, अर्जदाराने आपले नातेवाईकाला हाताशी धरुन करार केला असल्याचा आक्षेप घेतला आहे, त्यामुळे समरी पध्दतीने बनावट , कपट अश्या बाबी निकाली काढता येत नाही असे वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे असल्यामुळेही अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही, या निष्कर्षा प्रत हे न्यायमंच आले आहे.
... 6 ...
... 6 ...
12. अर्जदाराने, दाखल केलेल्या 23/2/2008 च्या करारनाम्याचे अवलोकन केले असता, एक बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदाराने लोखंडी साहित्य हे पूर्वी तयार करुन दिले होते व त्यानंतर, करारनामा लिहिण्यात आलेला आहे. सदर करारनाम्यात, पुढे अजुन किती काम बाकी आहे व किती काम करुन देणे बाकी आहे, याबद्दलचा कुठलाही उल्लेख करारनाम्यात केला नाही. यामुळेही अर्जदाराची तक्रार समरी पध्दतीने निकाली काढण्यास ग्राह्य नाही.
13. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाण शपथेवर दाखल केला आहे, त्यासोबत तयार करुन दिलेला लोखंडी साहित्याचा तपशिल दाखल केला, त्याचे अवलोकन केले असता खालीलप्रमाणे काम केल्याचे नमुद केले आहे. 1) ग्रिल 342 कि.ग्रॅ., 2) रिलींग 295.500 कि.ग्रॅ., 3) पोर्स व पोर्स रिलींग 651.600 कि.ग्रॅ. असे एकुण 1269.100 कि.ग्रॅ. एवढे काम केले असल्याचे नमुद केले आहे. तर, पोर्स, चेंबर झाकन, टंकी झाकन इत्यादी काम गैरअर्जदाराने करुन दिल्याचे म्हटले आहे. परंतु, गैरअर्जदाराने लेखी बयाण दाखल केल्यानंतर अर्जदाराने शपथपञ दाखल केलेला आहे, त्यात या बाबीचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळेही अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
14. अर्जदाराने, आपले तक्रारीत गैरअर्जदाराने रुपये 18,858/- ची सेवा दिली नाही, ती रक्कम 13 % टक्के व्याजाने रक्कम मिळेपर्यंत देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी तक्रारीत केली आहे. तर, गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदारास 75,591/- रुपयाचे लोखंडी साहित्य तयार करुन दिले, त्यापैकी, रुपये 39,129/- अर्जदाराने दिले, बाकी असलेले रुपये वारंवार मागणी करुनही दिले नाही, त्यामुळे अर्जदाराकडून रुपये 36,462/- वसुल करुन द्यावे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी एक दूस-यांकडून पैसे वसुल करुन देण्याची मागणी केलेली आहे. यामुळेही, सदर तक्रार ही समरी पध्दतीने निकाली काढणे न्यायोचित नाही, या निष्कर्षा प्रत हे न्यायमंच ठामपणे पोहचलेले आहे. अर्जदाराने योग्य त्या फोरम मधून दाद मागावी, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे.
... 7 ...
... 7 ...
15. वरील कारणे व निष्कर्षावरुन अर्जदाराच्या तक्ररीत खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आप-आपला खर्च सहन करावा.
(3) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–13/03/2009.