(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) गैरअर्जदाराने दिनांक 10/5/2011 रोजी तक्रार खारीज करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावरील आदेश (पारीत दिनांक – 18 ऑगस्ट, 2011) यात गैरअर्जदाराने असा अर्ज केलेला आहे की, तक्रारदाराने त्यांचेकडून रुपये 1,25,000/- एवढे कर्ज दिनांक 31/8/2002 ला घेतले व त्याची परतफेड केली नाही, त्यामुळे तक्रारदार यांचेविरुध्द सहकार न्यायालय, नागपूर येथे दिनांक 24/9/2009 रोजी सहकार कायद्याचे कलम 91 अंतर्गत लवाद दावा क्र. 717/2009 हा वसूलीकरीता दाखल केलेला आहे. त्यामध्ये त्यांना रुपये 2,20,081/- एवढी रक्कम वसूली करावयाची आहे आणि तशी त्यांनी मागणी केलेली आहे. सदर दावा हा सहकार न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात तक्रारदार हजर झाले व लेखी उत्तर दाखल केले आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत असा दावा दाखल आहे, ही बाब मान्य केलेली आहे. अशा परीस्थितीत ही तक्रार पुढे चालविण्ो अयोग्य व गैरकायदेशिर होईल म्हणुन ती खारीज व्हावी. तसेच मंचास सदर तक्रार निकाली काढण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही असे सदर अर्जात नमूद केले आहे. तक्रारदाराने सदर अर्जास उत्तर दाखल केले आहे. यामध्ये दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. यात तक्रारदार यांचेविरुध्द गैरअर्जदार यांनी सहकार न्यायालयात दावा दाखल केला ही बाब दोन्ही पक्षास मान्य आहे आणि तो दावा उघडपणे या तक्रारीचे पूर्वीचा आहे. तक्रारदारास गैरअर्जदाराबद्दल जो काही विवाद आहे आणि जी काही त्यांची मागणी आहे ते सहकार न्यायालयासमोर तक्रारदार त्याच दाव्यात मांडू शकतात व त्यावर आवश्यक तो न्यायनिवाडा पारीत होऊ शकतो. सहकार न्यायालयात आधीच दावा प्रलंबित असताना या प्रकरणात आता ग्राहक मंचाने स्वतंत्रपणे निर्णय देणे योग्य नाही व आधिचे प्रलंबित दाव्याचे संदर्भात, पुढील तक्रार चालविणे योग्य नाही असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -000 आ दे श 000- 1) तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते. तक्रारदार हे सहकार न्यालयात प्रलंबित दाव्यात या तक्रारीतील विवाद उपस्थित करु शकतील. त्याबाबतचे त्यांचे हक्क अबादित ठेवण्यात येतात.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |