जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.222/2007. प्रकरण दाखल दिनांक – 10/09/2007. प्रकरण निकाल दिनांक – 30/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते. सदस्य. श्री.संगरत्न पि.सुदाम नरवाडे, अर्जदार. वय वर्षे 24, व्यवसाय वकीली, रा.घर नंबर 679,जयभीमनगर, नांदेड. विरुध्द. 1. विशाल कम्युनिकेशन, महात्मा गांधी पुतळया जवळ, गैरअर्जदार. नांदेड. 2. रिलायन्स इंडिया मोबाईल, कम्युनिकेशन हेड ऑफिस, कलेक्टर ऑफिस समोर,नांदेड. 3. एल.जी.ईलेक्टॉनिक्स इंडिया प्रा.लि. देवांश मायक्रोट्रॉनिक्स,फॉरेस्ट ऑफिस रणभीडीकर्स, चिखलवाडी कार्नर, नांदेड. 4. एल.जी.ईलेक्टॉनिक्स इंडिया प्रा.लि, अमीत रॉय,एल.जी.ईलेक्ट्रॉनिक्स, प्रा.लि, प्रिमीअम पॉइंट, दुसरा मजला, जे.एम.रोड, मॉडर्न स्कुल, पुणे. अर्जदारा तर्फे. - अड.एक.एन.झकडे. गैरअर्जदारा तर्फे - अड.ए.एस.चौधरी. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजात पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची थोडक्यात हकीकत अशी आहे की, अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन दि.04/09/2007 रोजी मोबाईल मॉडेल एज.जी.आर.डी.2650, एफसीसी आयडीबीइजेआरडी 2330/एस/एन 606 केपीक्यजे 0923804 खरेदी केलेला होता. सदर मोबाईल फोन दि.30/07/2007 पर्यंत व्यवस्थीत कार्यरत होता. दि.30/07/2007 रोजी सकाळी 11.15 नी एक कॉल रिसीव्ह केला त्यानंतर मोबाईल फोनच्या डिस्प्लेमध्ये आणि ऑन – ऑफ फंक्शनमध्ये प्रॉब्लेम येऊ लागला त्यामुळे सदरचा मोबाईल फोन अर्जदाराने ऑथोराइज एल.जी. रिपेअरींग सेंटर म्हणजे देवांच मायक्रोट्रॉनिक या सर्व्हीस सेंटरकडे दिला त्यावेळे सदरच्या मोबाईलमध्ये पाणी गेल्यामुळे सदरचा मोबाईल डॅमेज झालेला आहे यासाठी दुरुस्तीसाठी रु.1,518/- खर्च येणार आहे त्यामुळे सदरीची रक्कम रु.1,518/- दिल्यास मोबाईल दुरुस्त होवुन मिळेल असे सांगितले. अर्जदार हे 3,4,6 ऑगष्ट 2007 मध्ये देवांच मायक्रोट्रॉनिक या सर्व्हीस सेंटर मध्ये गेलेले होते. अर्जदारांनी मोबाईल विकत घेतला त्यावेळेला मोबाईलचे रु.1,800/- टॉक टाईम मोफत मिळाले होते परंतु अर्जदाराचा मोबाईल बंद झाल्यानंतर ऑगष्ट 2007 मध्ये वॅलीड कालावधी असतांना अर्जदाराचे रु.300/- बॅलन्स काढुन घेतलेले आहे. अर्जदार व्यवसायाने वकील आहे ते जिल्हा शेषन न्यायालय नांदेड येथे वकीली व्यवसाय करतात व त्यांच्या वकीली व्यवसायास अनुसरुन फोन बंद झाल्यामुळे त्यांना त्यांचे पक्षकारांशी व संबंधीत लोकाशी संपर्क करता आलेले नाही त्यामुळे त्यांचे आर्थीक नुकसान झालेले आहे. त्यांच्या जवळुन अनेक तक्रारी व पक्षकार गेल्यामुळे त्यांना आर्थीक व शारीरिक व मानिकसत्रास झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ते 4 हे सर्वार्थाने अर्जदारास त्रासाठी जाबबदार आहेत. अर्जदाराचा मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये बंद झालेला आहे त्यामुळे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडुन अर्जदाराचा मोबाईल मोफत दुरुस्त करुन द्यावी अशी तक्रारअर्जात मागणी केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये गैरअर्जदार क्र. 1 हे मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात त्यामध्ये ते नोकिया एल.जी.,मोटोरोला, सोनी या नामांकित कंपनीचे मोबाईल विक्री करतात. गैरअर्जदार क्र. 1 मोबाईल रिपेअरचा व्यवसाय करीत नाही. ग्राहकांचा मोबाईलमध्ये काही तांत्रिक बीघाड झाल्यास अधिकृत सर्व्हीस सेंटरला लावे लागेल. सदरचा विकत घेतलेला मोबाईल हे रिलायन्स कंपनीचा असल्यामुळे त्यामध्ये काही तांत्रिक बीघाड झाल्यास त्या बीघाडासाठी अधिकृत सर्व्हीस सेंटरला संपर्क साधने आवश्यक आहे. त्याबाबतचे कोणतेही अधिकार कंपनीने गैरअर्जदार क्र. 1 ला म्हणजेच रिटेलर, विक्रेता यांना दिलेले नाही व सदरची बाब गैरअर्जदार यांनी दिलेल्या बिलावर सुध्दा नमुद केलेली आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये अर्जदाराचा एल.जी.कपंनीच्या मोबाईल संचामध्ये पाणी गेल्यामुळे नादुरुस्त झाल्यामुळे आमच्याकडे दुरुस्तीसाठी आणले असता, संचामध्ये जरी पाणी गेलेले असल्यामुळे एल.जी. अशा प्रकारची नादुरुस्त झालेला संच जरी ते वॉरंटी कालावधीमध्ये असले तरी मोफत दुरुस्त करुन देण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे सदर संच दुरुस्त करण्यासाठी रु.1,518/- खर्च येईल, असे गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारांना सांगितले. गैरअर्जदार हे एल.जी.कंपनीचे अटी व शर्तीप्रमाणे ग्राहकांना सेवा पुरविते एल.जी.च्या कंपनीच्या अटी व शर्तीप्रमाणे मोबाईल संचात जर पाणी गेले असल्यास व तो वॉरंटी कालावधीत असले तरी तो मोफत दुरुस्त करुन देवू शकत नाही त्यामुळे अर्जदारांनी एल.जी. कंपनीला पक्षकार करणे आवश्यक होते. अर्जदार यांचा मोबाईल संचामध्ये पाणी गेल्यामुळे तो वॉरंटी कालावधीत जरी असले तरी तो मोफत दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजुर करण्यात यावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 4 यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये अर्जदार यांनी त्यांची स्वतःच जबाबदारी असुन सुध्दा फक्त पैसे उकळण्याच्या उद्येशाने सदरची तक्रार दाखल केलेली आहे ती खर्जासह नामंजुर करणे न्यायावह राहील असे म्हटले आहे. अर्जदाराने त्यांचा एल.जी. कंपनीचा मोबाईल संचामध्ये पाणी गेल्यामुळे नादुरुस्त झाल्यामुळे तो नांदेड येथील अधिकृत दुरुस्ती केंद्रात आणला होता. अर्जदाराच्या मोबाईल संचाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे पाणी गेलेले असल्यामुळे अधिकृत दुरुस्ती केंद्रामध्ये अर्जदाराचा संच रिपेअर करण्यासाठी रु.1,518/- खर्च येईल असे सांगितले. मोबाईल संच वॉरंटी कालावधीमध्ये जरी असला तरी त्यात पाणी केल्याने आमची कंपनी ती मोफत दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी घेत नाही त्यामुळेच नांदेड येथील दुरुस्ती केंद्राने अर्जदार यांचा मोबाईल संच दुरुस्त करुन देण्यास रु.1,518/- खर्च येईल असे सांगितले होते. कोणतीही कंपनी त्यांचे उत्पन्न ग्राहकांच्या चुकीमुळे नादुरुस्त झाल्यास वॉरंटी किंवा गॅरंटी कालावधीमध्ये असले तरी ते मोफत दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी घेत नाही. एखादे ग्राहकांनी खरेदी केलेला दुरदर्शन संच जमीनवर आपटल्यास व त्यामुळे तो खराब झाल्यास कोणतीही कंपनी तो दुरध्वनी संच जरी तो वॉरंटी कालावधीत असले तरी तो दुरस्त करुन देण्यात येत नाही असे म्हटले आहे. त्यामुळे अर्जदार यांचा सदर गैरअर्जदाराच्या विरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळुन लावुन गैरअर्जदारास अर्जदाराकडुन नुकसान भरपाई देण्यात यावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचा मार्फत नोटीस काढण्यात आली होती परंतु गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदरची नोटीस घेण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे यांच्या विरुध्द सदरची तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.22/06/2007 करण्यात आलेला आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत शपथपत्र व यादीप्रमाणे दाखल केले. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत शपथपत्र त्यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. अर्जदारा तर्फे वकील एस.एन.झकडे गैरअर्जदार यांचे तर्फे वकील ए.एस.चौधरी, यांनी युक्तीवाद केला. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार क्र. 2 व 4 यांनी सेवा देणेमध्ये कमतरता केली काय? गैरअर्जदार 2 व 4 यांनी सेवा देणेमध्ये कमतरता केली आहे. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 –अर्जदार यांनी अर्जासोबत त्यांनी विकत घेतलेले मोबाईलची मुळ पावती दाखल केलेली आहे. सदरची बाब गैरअर्जदार क्र. 1,2,4 नाकारलेली नाही.यांनी मोबाईल संच गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे दुरस्तीसाठी नेले होते ही बाब गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये नाकारलेले नाही आणि याचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 ते 4 चे ग्राहक आहेत अस या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2- अर्जदार यांनी दि.04/09/2007 रोजी रिलायन्स एल.जी. कंनीचा हॅण्डसेट खरेदी केलेला होता ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेले मुळ पावतीवरुन स्पष्ट होते. अर्जदार यांचा मोबाईल हॅण्डसेट दि.30/07/2007 पासुन चालु स्थितीत न राहील्याने त्यांनी सदरचा हॅण्डसेट एल.जी. कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे म्हणजे गैरअर्जदार क्र. 3 कडे नेलेले होते त्या वेळेला गैरअर्जदार क्र. 3 यांनी सदरचा हॅण्डसेट मध्ये पाणी गेल्यामुळे सदरचा मोबाईल दुरुस्तीसाठी रु.1,518/- खर्च येईल असे अर्जदारांना सांगितले. अर्जदाराचा हॅण्डसेट वॉरंटी कालावधीत असल्यामुळे अर्जदारांनी सदरचा हॅण्डसेट विना मोफत दुरुस्त करुन देण्यास सांगितले परंतु गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदाराचा मोबाईल वॉटर डॅमेज असल्याने कंपनीच्या अटी व शर्तीनुसार मोफत दुरुस्त करुन देता येत नाही असे त्यांना सांगितले. अर्जदार यांनी युक्तीवादाच्’या वेळेला श्री.अरुन आंतरकर या तज्ञ व्यक्तिचे प्रमाणपत्र जोडलेले आहे त्यामध्ये अर्जदार यांचा मोबाईल टेस्टींगसाठी आलेले होते, टेस्टींग केल्यानंतर संपुर्ण मोबाईल हॅण्डसेट मध्ये पाणी वैगरे गेले नव्हते कारण पाणी गेले असते तर मोबाईल मधील पार्टस व्हाईट मॉइश्चर वर कोणत्याही प्रकारचे कारणांमुळे होणारे कथीलवर जमणारे कार्बन सुध्दा नव्हते असे म्हटलेले आहे. सदरचे प्रमाणपत्र हे मोबाईल तज्ञ यांचे अर्जदारांनी या मंचामध्ये दाखल केलेले आहे. सदरचे प्रमाणपत्र गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी नाकारलेले नाही अगर त्याचे विरोधात स्वतःचे कोणतेही तज्ञ व्यक्तिचे शपथपत्र अगर कागदपत्र पुराव्यासाठी म्हणुन या मंचात दाखल केलेले नाही त्यामुळे अर्जदाराचा मोबाईल हॅण्डसेट मध्ये पाणी गेलेले होते आणि त्यामुळे सदरचा अर्जदाराचा मोबाईल नादुरुस्त झालेला आहे ही बाब गैरअर्जदार क्र.1 ते 4 शाबीत करु शकले नाही. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, त्यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद. तसेच गैरअर्जदार याचा जबाब, शपथपत्र त्यांचे तर्फे त्यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 1. गैरअर्जदार क्र.2 व 4 यांनी अर्जदार यांचा मोबाईल क्र. एज.जी.आर.डी.2650, एफसीसी आयडीबीइजेआरडी 2330/एस/एन 606 केपीक्यजे 0923804 हा मोफत दुरुस्त करुन द्यावा. 2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी दि.30/07/2007 रोजी अर्जदाराच्या कार्डमध्ये गैरअर्जदार क्र. 2 च्या स्किमप्रमाणे रक्कम रु.300/- शिल्लक बॅलेंस अर्जदारांना देण्यात यावे. 3. मानसिक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी प्रत्येकी रु.500/- अर्जदारास द्यावे. 4. अर्जाचा खर्च रु.1,000/- गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी संयुक्तीकरित्या द्यावा. 5. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 6. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंहराणे) (श्रीमती.सुजातापाटणकर) (श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |