नि. ३८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.४५/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २०/१/२०१०
तक्रार दाखल तारीख : २५/१/२०१०
निकाल तारीख : १७/८/२०११
-------------------------------------------
१. श्री सुधाकर धोंडीराम चौगुले
व.व. – ५२, व्यवसाय – शेती
२. सौ सावित्री सुधाकर चौगुले
व.व. – ५२, व्यवसाय – शेती
३. कु.सारिका सुधाकर चौगुले,
व.व. – २१, व्यवसाय – शिक्षण
४. श्री गजानन सुधाकर चौगुले
व.व. – २५, व्यवसाय – शेती
५. श्री संतोष सुधाकर चौगुले
व.व. – २३, व्यवसाय – शेती
६. श्रीमती पार्वती धोंडीराम चौगुले
व.व. – ६५, व्यवसाय – घरकाम
सर्व रा.मु.पो. खटाव, ता.पलूस जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. श्री वीरशैव प्रभू ग्रामीण बिगर शेती सहकारी
पतसंस्था मर्या. अंकलखोप, ता.पलूस जि.सांगली
२. श्री सुरेंद्र मधुकर चौगुले, संस्थापक चेअरमन,
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
३. श्री नितीन मोहन नवले, व्हा.चेअरमन
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
४. श्री संजय बापूसो चौगुले, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
५. श्री मोहन विरुपाक्ष काटू, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
६. श्री प्रमोद महालिंग मिरजकर, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
७. श्री युवराज बाबूराव चौगुले, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
८. श्री दिलीप आप्पासो सावंत, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
९. श्री हेमंत गजानन मिरजकर, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
१०. श्री प्रकाश शंकर चौगुले, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
११. श्री नंदकुमार आबानंद हिरेमठ, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
१२. श्री विकास पांडुरंग कुराडे, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
१३. श्री सचिन संपतराव हजारे, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
१४. श्रीमती बाळूताई किसन भागवत, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
१५. श्री महावीर नेमा हनमाने, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
१६. श्री अरविंद रघुनाथ चौगुले, संचालक
व.व. – सज्ञान, व्यवसाय – शेती
अ.नं.१ ते १६, सर्व रा.मु.पो. अंकलखोप
ता.पलूस जि. सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. प्रकाश आ.पाटील
जाबदार क्र.१ व २ : +ìb÷. प्रविण म.खोत
जाबदार क्र.३ ते १६ :एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री वीरशैव प्रभू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अंकलखोप (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम मुदतठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्या मुदत ठेवींची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ३० कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. जाबदार क्र.१ व २ यांनी याकामी नि.२८ वर म्हणणे दाखल केले आहे. तथापि जाबदार यांनी नि.३२ वर केलेल्या आदेशाप्रमाणे तक्रारदार यांना कॉस्टची रक्कम अदा केली नाही व म्हणण्याची प्रत पाठविली नाही. त्यामुळे जाबदार यांचे म्हणणे याकामी विचारात घेण्यात येत नाही.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.३ ते १६ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी जाबदार संस्थेमध्ये खालीलप्रमाणे ठेवी गुंतविलेल्या आहेत. सदर ठेवपावत्यांच्या प्रती नि.३७ च्या यादीने दाखल केल्या आहेत. सदर प्रती तक्रारदार यांच्याकडील मूळ प्रतींवरुन तपासण्यात आल्या. सदर ठेवपावत्यांचा तपशील पटकन लक्षात यावा म्हणून पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
अ.क्र. | ठेवीदाराचे नाव | पावती नं. | ठेव रक्कम | ठेव तारीख | ठेव परत मिळणेची तारीख | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
१ | श्री सुधाकर धोंडीराम चौगुले | ५८ | ११०० | २९/०८/०३ | २९/११/०७ | २२०० |
२ | -“- | ७० | १००० | ०१/०९/०३ | १/१२/०७ | २००० |
३ | -“- | ७८ | २००० | ०५/०९/०३ | ५/१२/०७ | ४००० |
४ | -“- | १०४ | ६००० | ०६/१०/०३ | ६/१/०८ | १२००० |
५ | सौ सावित्री सुधाकर चौगुले | ३७ | ५०० | ०६/०८/०३ | ६/१०/०७ | १००० |
६ | -“- | ६२ | २००० | २९/०८/०३ | २९/१०/०७ | ४००० |
७ | -“- | ७१ | १००० | ०१/०९/०३ | १/११/०७ | २००० |
८ | -“- | ७७ | ५००० | ०५/०९/०३ | ५/११/०७ | १०००० |
९ | -“- | १०५ | ६००० | ०६/१०/०३ | ६/१२/०७ | १२००० |
१० | कु.सारिका सुधाकर चौगुले | ३८ | ५०० | ०६/०८/०३ | ६/१०/०७ | १००० |
११ | -“- | ६३ | २००० | २९/०८/०३ | २९/१०/०७ | ४००० |
१२ | -“- | ७२ | १००० | ०१/०९/०३ | १/११/०७ | २००० |
१३ | -“- | ७६ | ५००० | ०५/०९/०३ | ५/११/०७ | १०००० |
१४ | -“- | १०६ | ६००० | ०६/१०/०३ | ६/१२/०७ | १२००० |
१५ | श्री गजानन सुधाकर चौगुले | ५९ | ११०० | २९/०८/०३ | २९/११/०७ | २२०० |
१६ | -“- | ७४ | १००० | ०१/०९/०३ | १/१२/०७ | २००० |
१७ | -“- | ८० | १००० | ०५/०९/०३ | ५/१२/०७ | २००० |
१८ | -“- | १०८ | ६००० | ०६/१०/०३ | ६/१/०८ | १२००० |
१९ | श्री संतोष सुधाकर चौगुले | ६० | ११०० | २९/८/०३ | २९/११/०७ | २२०० |
२० | -“- | ७३ | १००० | ०१/०९/०३ | १/१२/०७ | २००० |
२१ | -“- | ७९ | १००० | ०५/०९/०३ | ५/१२/०७ | २००० |
२२ | -“- | १०७ | ६००० | ०६/१०/०३ | ६/१/०८ | १२००० |
२३ | श्रीमती पार्वती धोंडीराम चौगुले | ६१ | २००० | २९/०८/०३ | २९/१०/०७ | ४००० |
२४ | सौ पार्वती धोंडीराम चौगुले व श्री सुधाकर धोंडीराम चौगुले | १०९ | ४००० | ०६/१०/०३ | ६/१२/०७ | ८००० |
तक्रारदार यांच्या ठेवपावत्यांची मुदत संपूनही अद्याप जाबदार यांनी तक्रारदार यांना ठेवपावत्यांची रक्कम अदा न करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे. सबब, तक्रारदार यांची ठेवपावत्यांची मुदतीनंतर मिळणारी रक्कम १०% व्याजासह मंजूर करण्यात येत आहे.
५. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १६ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
६. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. जाबदार क्र.१ पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांना वरील
विवेचनामधील परिच्छेद ४ मध्ये तपशीलात नमूद केलेप्रमाणे ठेवपावत्यांची मुदतीनंतर
येणारी रक्कम मुदत पूर्ण तारखेपासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करण्यात
यावी असा आदेश करण्यात येतो.
३. जाबदार क्र.१ पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक,
मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.३,०००/- अदा करावेत.
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.३०/९/२०११ पर्यंत न केल्यास
तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु
शकतील.
सांगली
दिनांकò:१७/०८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११