Maharashtra

Bhandara

CC/19/85

YUSUF ALI SAIED YAKUB ALI - Complainant(s)

Versus

VIRAT MAHILA URBAN CREDIT CO OPERATIVE SOCIETY - Opp.Party(s)

MOHAN B. TURANKAR

17 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/85
( Date of Filing : 23 Aug 2019 )
 
1. YUSUF ALI SAIED YAKUB ALI
BHAI TALAV WARD PAUNI
BHANDARA
MAHARASHTR
...........Complainant(s)
Versus
1. VIRAT MAHILA URBAN CREDIT CO OPERATIVE SOCIETY
BRANCH AARMORIKAR COMPLEX GANDHI CHOWK PAUNI
BHANDARA
MAHARASHTRA
2. THROUGH MANAGER SHRIKANT ASHOK SAHARE
BRANCH AARMORIKAR COMPLEX GANDHI PAUNI
BHANDARA
MAHARASHTRA
3. THROUGH MANAGER JOTSHANA SHRIKANT SAHARE
BRANCH AARMORIKAR COMPLEX GANDHI PAUNI
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Sep 2021
Final Order / Judgement

                        (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार,मा.सदस्‍या)

                                                                                  (पारीत दिनांक-17 सप्‍टेंबर, 2021)

 

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 सहकारी पतसंस्‍थे तर्फे सचिव तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2सदर सहकारी पतसंस्‍थेचे व्‍यवस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी  आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 सदर सहकारी पतसंस्‍थेचे अध्‍यक्ष यांचे विरुध्‍द विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेच्‍या बचत खात्‍या मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह  मिळण्‍यासाठी  तसेच ईतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. सदर तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष चालू असताना दरम्‍यानचे काळात तक्रारकर्त्‍याचे निधन झाले असल्‍याने त्‍याचे  तर्फे त्‍याच्‍या कायदेशीर वारसदार मुले यांची नावे तक्रारी मध्‍ये समाविष्‍ठ करण्‍यात आलेली आहेत.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      सदर प्रकरणा मध्‍ये विरुध्‍दपक्ष विराट महिला अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी ही सहकारी कायदया अन्‍वये नोंदणीकृत संस्‍था असून अनुक्रमे विरुध्‍दपक्ष क्रं 1 सचिव तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 व्‍यवस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी तर विरुध्‍दपक्ष क्रं 3 अध्‍यक्ष असे पतसंस्‍थेचे पदाधिकारी आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांचे मध्‍ये अनुक्रमे नात्‍याने पती-पत्‍नी असे संबध आहेत. विरुध्‍दपक्ष विराट महिला अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी ही बॅकींगचा व्‍यवसाय करते.  तक्रारकर्ता हा  विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये बचत खाते, आर्वत खाते व मुदत ठेवी खात्‍यामध्‍ये नियमित रक्‍कम जमा करीत होता त्‍यामुळे तो विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षां कडे मुदत ठेव व आर्वत ठेवीची परिपक्‍व रकमेची मागणी केली असता विरुध्‍दपक्षांनी त्‍याची कोणतीही सहमती न घेता सदर रक्‍कम त्‍याचे बचत खाते क्रं-100081 मध्‍येजमा केली आणि मागील एक वर्षा पासून नियमित मागणी करुन सुध्‍दा बचत खात्‍या मधील रक्‍कम त्‍याला दिली नाही. तक्रारकर्ता हा मधुमेह व ह्दय विकाराने आजारी असून त्‍याला औषधोपचारासाठी पैशाची अत्‍यंत आवश्‍यकता होती. त्‍याने विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये रुपये-1,00,000/- देण्‍याची मागणी मागील एक वर्षा पासून वारंवार करुन सुध्‍दा रक्‍कम मिळाली नाही त्‍यामुळे तो औषधोपचार घेऊ शकला नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था आणि तिचे पदाधिका-यांनी त्‍याला दोषपूर्ण सेवा दिलेली असून त्‍यामुळे त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक-30.01.2019 रोजी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये लेखी अर्ज करुन बचत खात्‍यात जमा असलेल्‍या रकमेची मागणी केली परंतु आज पर्यंत त्‍याला सदर रक्‍कम मिळालेली नाही. त्‍याने विरुध्‍दपक्षांना रजि. पोस्‍टाने कायदेशीर नोटीस  दिनांक-12.02.2019 रोजी पाठविली, सदर नोटीस मिळून सुध्‍दा त्‍यांनी कोणतीही पुर्तता केलेली नाही. त्‍याच्‍या बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम रुपये-1,24,289/-तसेचत्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3,00,000/- त्‍याच बरोबर त्‍याला वेळेवर रक्‍कम न मिळाल्‍यामुळे स्‍वास्‍थ्‍यावर केलेला खर्च रुपये-70,000/- आणि रुपये-3000/- नोटीस खर्च असे मिळून एकूण रुपये-4,97,289/- मिळण्‍यास तो पात्र आहे. म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्षांनी  तक्रारकर्त्‍याला रुपये-4,97,289/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याला एकूण रकमेवर 24 टक्‍के दराने व्‍याज तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो देण्‍याचे  आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारीचा संपूर्ण खर्च विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   सदर प्रकरणात जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने प्रथम रजिस्‍टर पोस्‍टाने विरुध्‍दपक्ष क्रं 1 पतसंस्‍थेच्‍या कार्यालयाचे पत्‍त्‍यावर नोटीस पाठविण्‍यात आली होती परंतु पतसंस्‍थेचे कार्यालय बंद सबब सेंडरला परत या पोस्‍टाचे शे-यासह नोटीसचे पॉकीट जिल्‍हा ग्राहक आयोगा मध्‍ये परत आले. अशी स्थिती असताना विरुध्‍दपक्ष क्रं-2 श्री श्रीकांत अशोक सहारे, व्‍यवस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विराट महिला अर्बन क्रेडीट सोसायटी, भंडारा हे दिनांक-11.03.2020 रोजी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रत्‍यक्ष उपस्थित झाले होते व त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष स्‍वतःची,  विरुध्‍दपक्ष क्रं-1 विराट महिला अर्बन क्रेडीट सोसायटी, भंडारा व्‍दारा सचिव आणि विरुध्‍दपक्ष क्रं-3 सौ.ज्‍योत्‍सना श्रीकांत सहारे, अध्‍यक्ष, विराट महिला अर्बन क्रेडीट सोसायटी, भंडारा यांची नोटीस स्विकारली होती व अशी नोटीस मिळाल्‍याबाबत त्‍यांनी लेखी पोच सुध्‍दा दिलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्रं -2 आणि विरुध्‍दपक्ष क्रं-3 हे नात्‍याने अनुक्रमे पती व पत्‍नी आहे.  अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी प्रत्‍यक्ष जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस स्विकारुनही लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 श्री श्रीकांत अशोक सहारे यांचे विरुध्‍द तक्रार त्‍यांचे लेखी उत्‍तरा शिवाय पुढे चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-03.02.2021 रोजी पारीत केला तर विरुध्‍दपक्ष क्रं-3सौ.ज्‍योत्‍सना श्रीकांत सहारे, अध्‍यक्षा यांची नोटीस त्‍यांचे पती विरुध्‍दपक्ष क्रं-2 श्री श्रीकांत सहारे यांनी स्विकारुनही विरुध्‍दपक्ष क्रं 3 हया जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयात उपस्थित झाल्‍या नाहीत वा त्‍यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 3 सौ.ज्‍योत्‍सना सहारे यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाने दिनांक-03.02.2021 रोजी पारीत केला. तर विरुध्‍दपक्ष क्रं-1  विराट महिला अर्बन क्रेडीट सोसायटी विरुध्‍द त्‍यांचे लेखी उत्‍तरा शिवाय तक्रार पुढे चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-27.08.2021 रोजी पारीत केला.

 

04.  तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे कडे त्‍याचे खात्‍यामधून वैद्दकीय उपचारार्थ रुपये-1,00,000/- मिळण्‍या बाबत केलेला दिनांक-30.01.2019 रोजीचा अर्ज, विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं 2 व क्रं 3 यांना वकीलांचे मार्फतीने दिनांक-12.02.2019 रोजीची पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती, रजिस्‍टर नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांना मिळाल्‍या बाबत रजिस्‍टर पोस्‍टाची पोच, तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये असलेले बचत खात्‍याचे पासबुकाचा उतारा अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

05.  तक्रारकर्त्‍याची सत्‍यापना वरील तक्रार, त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाच्‍या प्रती, लेखी युक्‍तीवाद ईत्‍यादीचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री मोहन तुरणकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. मौखीक युक्‍तीवादाचे वेळी विरुध्‍दपक्षा तर्फे तर्फे कोणीही जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित नव्‍हते. प्रकरणातील वस्‍तुस्थिती पाहता जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्‍यायनिवारणार्थ उपस्थित होतात-

अक्रं

                         मुद्दा

      उत्‍तर

01

तक्रारकर्ता हा  विरुदपक्षांचा  ग्राहक होतो काय?

     होय

02

तक्रारकर्त्‍याची  विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये  जमा असलेली रक्‍कम वारंवार मागणी करुनही परत न केल्‍यामुळे विरुध्‍दपक्षांनी दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

    होय

03

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

                                                                                          -कारणे व मिमांसा-

मुद्दा क्रं 1 ते 3

06.    तक्रारकर्ता युसूफ अली सईद वल्‍द याकुब अली याने तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केल्‍या नंतर दरम्‍यानचे काळात तक्रारकर्त्‍याचे दिनांक-09.01.2020 रोजी मृत्‍यू झाल्‍याचे महाराष्‍ट्र शासन, आरोग्‍य विभाग, मंगळवारी झोन नं.10 नागपूर यांचे प्रमाणपत्र  त्‍यांची मुले यांनी अभिलेखावर दाखल केले. तक्रारकर्त्‍याचे मृत्‍यू नंतर  त्‍याचे कायदेशीर वारसदार म्‍हणून त्‍याची मुले अनुक्रमे श्री सय्यद ईम्रान अली सन ऑफ युसूफ अली सय्यद आणि श्री सय्यद नोमान अली सन ऑफ युसूफ अली सय्यद यांची नावे तक्रारी मध्‍ये समाविष्‍ट करण्‍या बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष अर्ज दाखल करण्‍यात आला सदर अर्जा सोबत दोन्‍ही मुलांच्‍या आधार कार्डच्‍या प्रती सुध्‍दा दाखल करण्‍यात आल्‍यात. सदरचे अर्जावर विरुध्‍दपक्षांनी लेखी म्‍हणणे दयावे या करीता विरुध्‍दपक्षांना संधी देऊनही त्‍यांनी कोणतेही म्‍हणणे दिले नाही. जिल्‍हा ग्राहक आयोगाने कायदेशीर वारसदारांचा अर्ज मंजूर केल्‍याने त्‍यांची नावे मूळ तक्रारी मध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आलीत.

 

07.    यातील विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस प्रत्‍यक्ष तामील होऊन तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 व विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांची नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी प्रत्‍यक्ष स्विकारुनही विरुध्‍दपक्षांनी शेवट पर्यंत कोणतेही लेखी उत्‍तर/निवेदन जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे  विरुध्‍द तक्रारी मध्‍ये  त्‍यांचे लेखी उत्‍तरा शिवाय तक्रार पुढे चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला तर विरुध्‍दपक्ष क्रं 3 विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे पारीत करण्‍यात आला.  अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांना पुरेशी संधी देऊनही त्‍यांनी आपले कोणतेही लेखी निवेदन/उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले नाही तसेच तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये त्‍यांचे विरुध्‍द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. तक्रारकर्त्‍याची तक्रार सत्‍यापनावर आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार आणि त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज यावरुन सदर तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे गुणवत्‍तेवर (On Merit) निकाली काढण्‍यात येते.

 

08.   तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याने विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍येमुदतठेव मध्‍ये रकमेची गुंतवणूक केली होती परंतु सदर मुदतठेव परिपक्‍व होऊनही त्‍याला रक्‍कम दिली नाही व त्‍याची कोणतीही सहमती न घेता परस्‍पर त्‍याची मुदतठेवीची रक्‍कम विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेच्‍या त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली. तक्रारकर्त्‍याने आपले कथनाचे पुराव्‍यार्थ विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये त्‍याचे खाते उता-याची प्रत दाखल केली, त्‍यावरुन  त्‍याचे खात्‍यामध्‍ये दिनांक-15.01.2019 रोजी रुपये-1,24,289/- जमा असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍था ही बॅंकींगचा व्‍यवसाय करते आणि तक्रारकर्ता याचे सदर पतसंस्‍थेमध्‍ये बचत खाते असल्‍यामुळे तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष यांचे मध्‍ये “ग्राहक आणि सेवा देणारे” असे संबध प्रस्‍थापित होतात त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षांचा “ग्राहक” होतो म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

09.  तक्रारकर्त्‍याचे तक्रारी  प्रमाणे, तो हदयरोगाने व मधुमेहाने पिडीत असल्‍याने त्‍याला वैद्दकीय उपचार करण्‍यासाठी रकमेची आवश्‍यकता होती म्‍हणून त्‍याने विरुध्‍दपक्ष व्‍यवस्‍थापक तथा मुख्‍याधिकारी विराट महिला अर्बन क्रेडीट सोसायटी मध्‍ये दिनांक-30.01.2019 रोजी लेखी अर्ज सादर करुन त्‍याव्‍दारे वैद्दकीय उपचारासाठी त्‍याचे बचत खात्‍यातील जमा असलेल्‍या रकमे मधून  रुपये-1,00,000/- देण्‍याची मागणी केली होती परंतु तक्रार दाखल करे पर्यंत त्‍याला कोणतीही रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सदरचा अर्ज विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेला  दिनांक-30.01.2019 रोजी मिळाल्‍या बाबत पोच म्‍हणून सही व संस्‍थेचा शिक्‍का आहे. शेवटी त्‍याने वकील श्री मोहन तुरणकर यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 व विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांना दिनांक-12.02.2019 रोजीची नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविली, त्‍या बाबत रजि.पोस्‍टाच्‍या पावत्‍या पुराव्‍यार्थ दाखल केल्‍यात. विरुध्‍दपक्ष क्रं 3 सौ.ज्‍योत्‍सना सहारे यांना नोटीस मिळाल्‍याची पोच  अभिलेखावर दाखल आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 ची नोटीस गैरहजर असल्‍याचे कारणा वरुन परत आल्‍या बाबत लिफाफयाची प्रत पुराव्‍यार्थ दाखल केलेली आहे. सदरचे कायदेशीर नोटीस मध्‍ये मुदतठेव मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम परिपक्‍व होऊनही दिली नसून परस्‍पर त्‍याचे बचतखाते क्रं-100081 मध्‍ये जमा केल्‍याचे सुध्‍दा नमुद आहे.अशाप्रकारे तक्रारकर्ता हा जिवंत असे पर्यंत त्‍याला त्‍याची बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम वारंवार मागणी करुनही, लेखी अर्ज व कायदेशीर नोटीस देऊनही दिली नसल्‍याची बाब दाखल पुराव्‍यां वरुन सिध्‍द होते.वरील परिसिथतीजन्‍य पुराव्‍यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारकर्त्‍याची  विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये जमा असलेली रक्‍कम त्‍याने वैद्दकीय उपचारार्थ मागणी करुनही शेवट पर्यंत न देऊन विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था  आणि तिचे पदाधिकारी यांनी त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केल्‍याची बाब सिध्‍द होते. विरुध्‍दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे निश्‍चीतच तक्रारकर्त्‍याला शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला म्‍हणून मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर आम्‍ही “होकारार्थी” नोंदवित आहोत, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍या तर्फे त्‍याचे कायदेशीर वारसदार म्‍हणून त्‍याची मुले यांना  मयत तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍या मधील जमा असलेली रक्‍कम व्‍याजासह तसेच शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित ठरेल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

10.   वर नमुद केल्‍या प्रमाणे मुद्दा क्रं 1 व  2 यांचे उत्‍तर “होकारार्थी” आल्‍याने तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते आणि मुद्दा क्रं 3 अनुसार सदर तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे-

 

                                                                    ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्ता मयत युसूफ अली सईद वल्‍द याकुब अली तर्फे त्‍याचे कायदेशीर वारसदार मुले अनुक्रमे श्री सय्यद इमरान अली वल्‍द युसूफ अली सय्यद आणि श्री सय्यद नोमान अली वल्‍द युसूफ अली सय्यद यांची  तक्रार विरुध्‍दपक्ष विराट महिला अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड ही पतसंस्‍था आणि सदर पतसंस्‍थेचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-1) सचिव, विरुध्‍दपक्ष क्रं-2) श्री श्रीकांत अशोक सहारे, व्‍यवस्‍थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि विरुध्‍दपक्ष क्रं-3) सौ.ज्‍योत्‍सना श्रीकांत सहारे, अध्‍यक्षा यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष विराट महिला अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड ही पतसंस्‍था आणि सदर पतसंस्‍थेचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3)  यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या मयत तक्रारकर्ता  युसूफ अली सईद वल्‍द याकुब अली याचे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये असलेले बचत खाते क्रं-100081 मध्‍ये  दिनांक-15.01.2019 पर्यंत जमा असलेली संपूर्ण रक्‍कम रुपये-1,24,289/- (अक्षरी रुपये एक लक्ष चोविस हजार दोनशे एकोणनव्‍वद फक्‍त) आणि सदर रकमेवर दिनांक-16.01.2019 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पोवेता द.सा.द.शे.-12% दराने व्‍याज मयत तक्रारकर्त्‍याचे कायेदशीर वारसदार मुले अनुक्रमे श्री सय्यद इमरान अली वल्‍द युसूफ अली सय्यद आणि श्री सय्यद नोमान अली वल्‍द युसूफ अली सय्यद यांना दयावे.

 

  1.  तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा रकमा विरुध्‍दपक्ष विराट महिला अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड ही पतसंस्‍था आणि सदर पतसंस्‍थेचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या मयत तक्रारकर्त्‍याचे कायदेशीर वारसदार मुले अनुक्रमे श्री सय्यद इमरान अली वल्‍द युसूफ अली सय्यद आणि श्री सय्यद नोमान अली वल्‍द युसूफ अली सय्यद यांना दयाव्‍यात.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष विराट महिला अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड ही पतसंस्‍था आणि सदर पतसंस्‍थेचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

 

(06) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.