Maharashtra

Gadchiroli

EA/2/2018

Anil Madhav Mhashakhetri - Complainant(s)

Versus

Vipin Jivan Meshram - Opp.Party(s)

Adv. Kanchan Mhashakhetri

23 Mar 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Execution Application No. EA/2/2018
In
Complaint Case No. CC/23/2017
 
1. Anil Madhav Mhashakhetri
At - Visapur, Po - Pardi Tah - Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Vipin Jivan Meshram
At- Rampuri Ward, Chamorshi Road, Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Appellant:Adv. Kanchan Mhashakhetri, Advocate
For the Respondent:
Dated : 23 Mar 2018
Final Order / Judgement

(मंचाचे निर्णयान्‍वयेश्री. सादिक मोहसिनभाई झवेरीसदस्‍य)

  1.       अर्जदाराने सदरचा दरखास्‍त अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27 अंतर्गत दाखल केला असुन अर्जदाराचे आपल्‍या अर्जात असे कथन केले आहे की, गैरअर्जदाराने त्‍याचे विरुध्‍द सदर मंचात तक्रार क्र. सी.सी.23/2017 दाखल केली होती. सदर तक्रार दि.22.11.2017 रोजी निकाली काढून त्‍यात अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या घराचे उर्वरित बांधकाम 6 महिन्‍यांचे आंत पूर्ण करुन द्यावे व गैरअर्जदाराने त्‍याचेकडील बाकी रक्‍कम 6 महिन्‍यात टप्‍या-टप्‍प्‍याने अर्जदारास द्यावी. तसेच अर्जदाराने गैरअर्जदारास शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावे व आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 60 दिवसांचे आंत करावी असा मंचाने आदेश दिलेला आहे. 
  1.       अर्जदाराने दि. 28.11.2017 रोजी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यानंतर अंमलबजावणी करण्‍याकरीता बरेच प्रयत्‍न केले, परंतु गैरअर्जदारांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही व आदेशीत रक्‍कम घेण्‍यांस स्‍पष्‍ट नकार दिला. त्‍यानंतर अर्जदाराने दि.25.01.2018 रोजी आपल्‍या मजुरांसह साईडवर जाऊन स्‍वतःचे काम करण्‍यास सुरवात केली तेव्‍हा त्‍यांचे असे लक्षात आले की, साईडवर ठेवलेली बांधकामाची सामुग्री गैरअर्जदाराने नाहीसे केली व दुस-या ठिकाणी हलवुन काम करण्‍यास अडथळा निर्माण केला. अर्जदारानु पुढे असे नमुद केले आहे की, त्‍याने दि.28.02.2018 रोजी उपरोक्‍त गैरअर्जदारास आदेशानुसार रु.5,000/- व रु.1,000/- खर्च दिला असुन तो त्‍यांनी स्विकारला त्‍यामुळे अर्जदाराची आदेशाची अंमलबजावणी करण्‍याची तयारी होती हे स्‍पष्‍ट होते. तसेच अर्जदाराने नमुद केले आहे की, गैरअर्जदारास दि.28.11.2017 रोजी आदेशाची प्रत प्राप्‍त झालेली असुन आजतागायत त्‍यांनी कुठलीही रक्‍कम अर्जदारास दिलेली नाही. त्‍यामुळे गैरअर्जदाराने मा. मंचाचे आदेशाची अवमानना केली असल्‍यामुळे ते शिक्षेस पात्र आहे. 

                 - // कारणमिमांसा // -

  1.       अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27 अंतर्गत दाखल करुन गैरअर्जदाराविरुध्‍द तक्रार क्र.23/2017 नुसार पारित अंतिम आदेशामधील आदेश क्र.2 नुसार गैरअर्जदारावर आरोप केले आहे की, अर्जदार हा सदर आदेशानुसार काम करण्‍यास तयार असुन व काम करण्‍यासाठीर कामाचा साईडवर गेला असता गैरअर्जदाराने त्‍याला काम करण्‍यास मज्‍जाव केला. अर्जदाराने गैरअर्जदारास मोबाईलव्‍दारे  संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु गैरअर्जदाराने कुठलाही प्रतिसाद दिला नाही व स्‍वतःहून काम करण्‍याचा प्रयत्‍न केला असता गैरअर्जदाराने साईडवरील बांधकामाची सामुग्री नाहीसी केली, परंतु अर्जदाराने याबाबत कुठलेली पुरावे सादर केलेले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्‍द या मंचामध्‍ये दाखल केलेला दरखास्‍त अर्ज क्र.1/2018 (विपीन विरुध्‍द अनिल) मध्‍ये बचावासाठी सदरचा दरखास्‍त अर्ज गैरअर्जदाराविरुध्‍द दाखल केल्‍याचे प्रथम दर्शनी दिसुन येते. अर्जदाराने गैरअर्जदाराव्‍दारे अर्जदाराविरुध्‍द दरखास्‍त अर्ज क्र.1/2018 दाखल केल्‍यानंतर व त्‍यात जमानत घेतल्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास ग्राहक तक्रार क्र.23/2017 मध्‍ये आदेशीत शारीरिक मानसिक त्रासाची रक्‍कम मंचासमोर गैरअर्जदारास दिलेली आहे. तसेच सदर दरखास्‍त अर्जामध्‍ये उल्‍लेखीत ग्राहक तक्रार क्र.23/2017 मधील पारित आदेशा विरुध्‍द जर अर्जदारास काहीही उजर / तक्रार असेल तर त्‍यांनी ती दरखास्‍त अर्ज मा. राज्‍य आयोगाकडे करायला पाहीजे. अर्जदाराने दाखल केलेली दरखास्‍त अकाली (Pre-Mature) असल्‍यामुळे तो खारिज होण्‍यास पात्र आहे. वरील कारण मिमांसेवरुन हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.                 

                         - // अंतिम आदेश // -  

  1. अर्जदाराचा दरखास्‍त अर्ज खारिज करण्‍यांत येत आहे.
  2. अर्जदाराने दरखास्‍त अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. अर्जदारास सदर आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यांत यावी.
 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.