Maharashtra

Akola

CC/14/151

Arvind Madhukar Thakare - Complainant(s)

Versus

Vinod Tulshiram mankar through Prop.Vrushali Krushi Kendra - Opp.Party(s)

S V Talreja

01 Sep 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/151
 
1. Arvind Madhukar Thakare
R/o.Akoli Jahagir, Tq. Akot
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Vinod Tulshiram mankar through Prop.Vrushali Krushi Kendra
Shivaji Chowk, Akot
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रारकर्त्‍यातर्फे वकील          :- ॲड. एस. व्‍ही. तलरेजा

             विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 तर्फे       :- एकतर्फी

             विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 तर्फे वकील  :- ॲड. एम.डी. सारडा

 

::: आ दे श प त्र  :::

 

मा. सदस्‍य, श्री कैलास वानखडे यांनी निकाल कथन केला :-

 

      ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्‍वये तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-

     तक्रारकर्ता हे आकोली जहॉगीर ता. अकोट, जि. अकोला येथील कायमचे रहिवाशी असून शेतकरी आहेत.  तक्रारकर्ता क्रमांक 1 हा तक्रारकर्ता क्रमांक 2 चा मुलगा असून वरील ठिकाणी एकाच घरात सोबत राहतात.  शेती हा तक्रारकर्ता यांचा उदरनिर्वाहासाठी मुख्‍य स्‍त्रोत आहे.  तक्रारकर्ता क्रमांक 1 यांचे मालकीची मौजे आकोली जहॉगिर, ता. अकोट, जि. अकोला येथील गट क्रमांक 279 मधील 2 हे. 05 आर शेती  आहे आणि तक्रारकर्ता क्रमांक 2 यांचे मालकीची मौजे आकोली जहॉगिर ता. अकोट, जि. अकोला येथील गट क्रमांक 276 मधील 2 हे. 60 आर शेती आहे.  तक्रारकर्ता क्रमांक 1 हा तक्रारकर्ता क्रमांक 2 चा मुलगा असल्‍याने तक्रारकर्ता क्रमांक 2 च्‍या शेतीची देखभाल, काळजी आणि वहिती करतो.  तक्रारकर्त्‍याचे शेतात विहीर पंपाची सुध्‍दा सोय आहे.  तक्रारकर्ता क्रमांक 1 हा 19 जून 2014 मध्‍ये शेतीमध्‍ये सोयाबीन पेरण्‍याचे उद्देशाने तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 हया दोघांच्‍या शेतीच्‍या पेरणीकरिता विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडे बियाणे खरेदी करण्‍याचे उद्देशाने गेला.  त्‍यावेळेला विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 हया कंपनीने निर्मित केलेले सोयाबीन एशियन 335 बियाणे विकत घेण्‍याचा प्रस्‍ताव मांडला.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 ने तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ही अत्‍यंत उच्‍च दर्जाची, नामांकित आणि प्रसिध्‍द बियाणे निर्माण करणारी कंपनी असून व बियाणे उच्‍च दर्जाचे असून पेरणीनंतर भरघोस उत्‍पन्‍न मिळवून देण्‍याची हमी व आश्‍वासन दिले.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या हमीवर भिस्‍त ठेवून व विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 या कंपनीचे मोठे नांव पाहून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडून दिनांक 19-06-2014 रोजी बिल क्रमांक एस-568 अन्‍वये सोयाबीन एशियन-335 या बियाण्‍याच्‍या 16 पिशव्‍या प्रत्‍येकी 30 किलो ग्रॅमच्‍या ₹ 2,450/- च्‍या भावाने एकूण रक्‍कम ₹ 39,200/- रोख देवून विकत घेतल्‍या.  जेव्‍हा साधारण कंपनीचे बियाणे कमी भावाने मिळत होते.  परंतु, त्‍यावेळेस विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चे मोठे नांव पाहून व विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या हमीवर तक्रारकर्त्‍याने एवढी मोठी रक्‍कम देवून बियाणे विकत घेतले.  त्‍याचदिवशी तक्रारकर्ता क्रमांक 1 ने विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून शेतात पेरणी नंतरच्‍या मशागतीकरिता डीएपी ( सम्राट ) खत 50 किलोचे 16 बॅग ₹ 1,180/- प्रमाणे एकूण ₹ 18,880/- चे व त्‍याचसोबत किटकनाशक म्‍हणून बायर कंपनीचे 100 मि.ली. चे एकूण 5 नगर ₹ 320/- प्रत्‍येकी प्रमाणे ₹ 1600/- चे खरेदी केले, असे एकूण ₹ 59,680/- चा माल विकत घेतला.

    तक्रारकर्त्‍याने पेरणीच्‍या काळात त्‍या बियाण्‍यांची योग्‍य ती काळजी घेतली आणि सावधानी बाळगली.  तक्रारकर्त्‍याने योग्‍य ते खत आणि पाणी सुध्‍दा पुरविले.  पेरणी दरम्‍यान वातावरणाची परिस्थिती ही सुध्‍दा अनुकूल होती.  परंतु, अशा परिस्थितीतही तक्रारकर्त्‍याला सदर बियाण्‍यांपासून काहीच उत्‍पन्‍न मिळाले नाही. तक्रारकर्त्‍याने पाहिजे तेवढे खुप परिश्रम घेतले. परंतु, बियाणे हे दोषमुक्‍त निघाल्‍याने तक्रारकर्त्‍याची संपूर्ण मेहनत वाया गेली.  नंतर तक्रारकर्त्‍याने बियाणे अपयशी निघाल्‍याचे कारणे शोधण्‍याकरिता कृषी अधिकारी, जिल्‍हा परिषद, अकोट यांच्‍याकडे निरीक्षण करण्‍याकरिता अर्ज केला.  जिल्‍हास्‍तरीय चौकशी समितीच्‍या दिनांक 02-08-2014 च्‍या परिक्षणानंतर जिल्‍हा चौकशी समितीच्‍या अहवालामध्‍ये स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, मे. एशियन ॲग्रो जिनीटिक प्रा. लि. या कंपनीने उत्‍पादन केलेले सोयाबीन एशियन – 335 हे बियाणे सदोष असल्‍याने उत्‍पन्‍न मिळाले नाही.

     विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला दोषयुक्‍त बियाणे आणि निकृष्‍ट दर्जाचे बियाणे देवून दिशाभूल करुन छळ केलेला आहे.   जर सदर बियाणे चांगल्‍या किंवा उच्‍च दर्जाचे असते तर तक्रारकर्त्‍याला प्रति एकर प्रमाणे 13 क्विंटल एकंदरीत अंदाजे 120 क्विंटल सोयाबीनचे पिक झाले असते आणि त्‍याचा बाजार भावाचा सरासरी विचार करता ₹ 3,50,000/- चे किंमतीचे उत्‍पन्‍न मिळाले असते.  विरुध्‍दपक्षाने आपल्‍या मोठया नावाखाली दोषयुक्‍त दर्जाचा माल विकून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे,  विरुध्‍दपक्षाने त्‍यांनी देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये न्‍युनता दर्शविली आहे.  तक्रारकर्त्‍याने बियाणे खत व फवारणी घेण्‍याकरिता ₹ 59,680/- गुंतविले होते तसेच शेत मजुरी आणि पेरणीच्‍या कामाची मजुरी म्‍हणून ₹ 45,000/- गुंतविले होते आणि सदर दोषयुक्‍त बियाण्‍यांपासून पिक न निघाल्‍यामुळे ₹ 3,50,000/- चे नुकसान तक्रारकर्त्‍यास सहन करावे लागले.  अशाप्रकारे तक्रारकर्त्‍यास एकंदरीत ₹ 4,54,680/- चे नुकसान झालेले आहे जे तक्रारकर्ता विरुध्‍दपक्षाकडून घेण्‍यास पात्र आहे तसेच नोटीस खर्च ₹ 1,000/- व त्‍याशिवाय तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासापोटी ₹ 30,000/- व न्‍यायालयीन खर्चाची रक्‍कम ₹ 10,000/- सुध्‍दा विरुध्‍दपक्षाकडून घेण्‍यास पात्र आहे.  सबब, तक्रारकर्त्‍याची प्रार्थना की, 1) तक्रारकर्त्‍याची तक्रार पूर्णपणे मंजूर होवून विरुध्‍दपक्षाकडून तक्रारकर्त्‍याला दोषयुक्‍त बियाणे विकल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानीची एकूण रक्‍कम ₹ 4,54,680/- तसेच नोटीस खर्च ₹ 1,000/- व शारिरीक, मानसिक त्रासापोटी ₹ 30,000/- व तक्रारीचा खर्च ₹ 10,000/- अशी एकूण रक्‍कम ₹ 4,95,680/- मिळण्‍याचा आदेश दयावा.  2) आदेशित रकमेवर विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास तक्रार दाखल केल्‍यापासून रक्‍कम मिळेपर्यंत दर साल दर शेकडा 18 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍याचा आदेश दयावा.

      सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्‍यासोबत एकंदर 11 दस्‍तऐवज पुरावा म्‍हणून दाखल केलेले आहेत.

      विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांना नोटीस बजावल्‍यानंतर देखील विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 गैरहजर असल्‍याने सदर प्रकरण विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 च्‍या विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचे आदेश या न्‍यायमंचाने दिनांक 06-02-2015 रोजी पारित केले.  

विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा लेखी जवाब :-

     सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी  लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्‍हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की,  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चे बियाणे खरेदी केले तसेच शेतीची मशागतीकरिता खर्च लावला हे अमान्‍य असून नाकबूल आहे. तसेच विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ने दोषयुक्‍त बियाणे दिले.  तक्रारकर्त्‍याची दिशाभूल, छळ केला हे म्‍हणणे पूर्णत: नामंजूर आहे. परिच्‍छेद क्रमांक 5, 6, 7, 8 व तक्रारकर्त्‍याची विनंती प्रार्थना अमान्‍य असून नाकबूल आहे. तक्रारकर्त्‍याने केलेली तक्रार ही बिनबुडाची व अर्थहिन आहे.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ला मानसिक त्रास देण्‍यासाठी खोटी तक्रार दाखल केली आहे तेव्‍हा सदर तक्रार ही खारीज करण्‍यात यावी,  ही विनंती.

    कृषी अधिकारी जिल्‍हा परिषद, अकोट यांनी बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे कोणत्‍याही तरतुदीचे पालन केले नाही. म्‍हणून सदर अहवाल पूर्णत: दोषपूर्ण आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या पेरणीमध्‍ये दोष आहे, त्‍यांनी चुकीच्‍या पध्‍द्तीने सोयाबीनची पेरणी केली. करिता तक्रारकर्त्‍याची तक्रार ही कायदयाच्‍या चौकटीत नसून पूर्णत: खोटी व बनावटी दाखल केली असल्‍यामुळे खर्चासह खारीज करावी, ही विनंती.

 

 

    का र णे  व  नि ष्‍क र्ष

      तक्रारकर्त्‍याची तक्रार, दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांचा लेखी जवाब, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्‍तर व तोंडी युक्‍तीवाद, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा लेखी युक्‍तीवाद व उभयपक्षाने दाखल केलेले न्‍यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्‍कर्ष कारणे देवून पारित केला तो येणेप्रमाणे.

     तक्रारकर्ते यांचा युक्‍तीवाद असा आहे की, तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 यांच्‍या शेतजमिनीमध्‍ये तक्रारकर्ते क्रमांक 1 यांनी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याद्वारे निर्मित केलेले सोयाबीन एशियन-335 या बियाण्‍याच्‍या 16 पिशव्‍या विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांच्‍याकडून बिलाप्रमाणे खरेदी केल्‍या.  त्‍यासोबत पेरणी नंतरच्‍या मशागतकरिता डी.ए.पी. ( सम्राट ) खत 50 किलोचे 16 बॅग व किटकनाशक बायर कंपनीचे 100 मि.ली. चे एकूण 5 नग खरेदी केले.  दिनांक 14-07-2014 रोजी वर खरेदी केलेल्‍या बियाण्‍यांची पेरणी केली.  परंतु, बियाणे खुप प्रमाणात उगवले म्‍हणून त्‍याची तक्रार केली असता कृषी अधिकारी जिल्‍हा परिषद अकोट यांनी या समितीतील तज्ञ मंडळीसोबत तक्रारकर्ते यांच्‍या शेताची पाहणी दिनांक 02-08-2014 रोजी प्रत्‍यक्ष भेट देवून केली व अहवाल दिला.  त्‍यानुसार सोयाबीन एशियन-335 या वाणाचे बियाणे सदोष आहे असे मत दिले, त्‍यामुळे प्रार्थनेतील नुकसान भरपाई दयावी.

     यावर विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला तो येणेप्रमाणे.

    तक्रारकर्ते यांनी केलेला विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कंपनीवरील आरोप हा पूर्णत: बिनबुडाचा असल्‍यामुळे अमान्‍य आहे.  तक्रारकर्ते यांनी सदरील बियाणे हे उधारीत खरेदी केले असल्‍याने तक्रारकर्ते हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक नाही.  तक्रारकर्त्‍याकडे वेगवेगळी शेती आहे.  तक्रारकर्त्‍याने 5 वेगवेगळया लॉटचे बियाणे खरेदी केले आहे.  केलेल्‍या बियाण्‍यापैकी कोणत्‍या लॉटच्‍या बियाण्‍यामध्‍ये दोष आहे ? त्‍यापैकी कोणते बियाणे पेरले ?, याचे कुठेही तक्रारकर्त्‍यांनी विश्‍लेषण केले नाही व याचा बोध तक्रारीमधून होत नाही.  तक्रारकर्त्‍यातर्फे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिलेला अहवाल पाहता त्‍यात सदर बियाण्‍यांचा लॉट क्रमांक नमूद नाही व तक्रारकर्त्‍याने  केवळ 10 बॅग पेरणी केल्‍याचे अहवालामध्‍ये नमूद आहे.  तसेच अहवाल हा प्रथमदर्शनी पाहून दिलेला आहे. 

    उपविभागीय कृषी अधिकारी, अकोट यांनी बियाण्‍याबाबत तक्रार झाल्‍यानंतर सदरचे बियाणे नमुना घेऊन ते बिज प्रयोगशाळेत तपासण्‍याकरिता पाठविणे आवश्‍यक आहे.  परंतु, या प्रकरणात तसे झाले नाही.  त्‍यामुळे परीक्षण अहवाल येईपर्यंत निश्चितपणे बियाण्‍यात दोष आहे हे सांगता येत नाही.  बियाणे उगवणीकरिता दुसरे इतर घटकही जबाबदार असतात.  उपविभागीय कृषी अधिकारी यांनी बियाणे कायदा कलम 23-अ प्रमाणे तरतुदींचे पालन केलेले नाही. त्‍यामुळे अहवाल दोषपूर्ण आहे.

    याप्रकारे उभयपक्षांचा युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या या प्रकरणात, तक्रारकर्ते यांची शेती गट क्रमांक 276 व 279 यामध्‍ये सदोष बियाण्‍याबाबत तक्रार असल्‍यामुळे  उपविभागीय कृषी अधिकारी, अकोट यांच्‍या अहवालामध्‍ये दोन्‍ही गट क्रमांकाबद्दलचा उल्‍लेख व निष्‍कर्ष आहे.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याच्‍या प्रकरणात समितीचा एकच अहवाल दाखल आहे, हे स्‍पष्‍ट करणे आवश्‍यक आहे.

     या प्रकरणात सोयाबीन एशियन-335 चे बियाणे खरेदी पावती तक्रारकर्ते क्रमांक 1 यांच्‍या नांवे आहे.  तक्रारकर्ता क्रमांक 1 हा तक्रारकर्ता क्रमांक 2 चा मुलगा आहे व हे एकत्र कुटूंबातील व्‍यक्‍ती आहेत, असे तक्रारकर्त्‍याचे कथन आहे.  विरुध्‍दपक्षाचा आक्षेप तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 हे ग्राहक होवू शकत नाही असा आहे.  परंतु, ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कायदयानुसार ग्राहक व्‍याख्‍या अशी नमूद आहे की,       “ The definition of Consumer contained in Sec. 2(d) of Consumer Act is very wide.  Sub-Clause (i) of the definition takes within its fold any person who buys any goods for consideration paid or promised and partly paid and partly promised of under any system of deferred payment.  It is also includes any person who uses the goods through he may not be buyer thereof.  Provided that such use is with the approval of the buyer. ”  म्‍हणजे तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 हे ग्राहक या संज्ञेत बसतात.  रेकॉर्डवरील दाखल दस्‍त असे दर्शवितात की, तक्रारकर्ते क्रमांक 1 यांनी वरील खरेदी केलेले बियाणे 7-12 दस्‍ताप्रमाणे त्‍यांचे शेत जमिनीत पेरणी केल्‍यानंतर कमी प्रमाणात उगविले.  त्‍याची तक्रार कृषी अधिकारी अकोट कडे दाखल केल्‍यामुळे दिनांक 02-08-2014 रोजी तक्रारकर्ते यांच्‍या मालकीच्‍या गट क्रमांक 276, 279 मधील क्षेत्राची उपविभागीय कृषी अधिकारी पंचायत समिती, अकोट यांनी प्रत्‍यक्ष भेट देवून पाहणी केली होती.  अहवालावर त्‍यांच्‍या सहया आहेत व समितीने असे मत नोंदवले  की, गट क्रमांक 276 मध्‍ये पावसाचे पाणी वाहल्‍यासारखे दिसून आले.  या कारणास्‍तव बियाणे जमिनीत थोपटल्‍यासारखे आढळले. तसेच गट क्रमांक 276 मध्‍ये उतारपाट असल्‍यामुळे पावसाचे पाणी वाहून गेल्‍याचे दिसले.  परंतु, दोन्‍ही गटांमधील झाडांची संख्‍या शिफारशीपेक्षा कमी असल्‍यामुळे बियाण्‍यांच्‍या उगवण शक्‍तीचा दोष आहे, अशा प्रकारचा अहवाल पाहून मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्‍याचे शेत गट क्रमांक 276 मध्‍ये बियाण्‍यांचा दोष सिध्‍द् होत नाही.  कारण त्‍यात उतारपाट होता.  तक्रारकर्त्‍याचे दुसरे शेत गट क्रमांक 279 बद्दल या रिपोर्टमध्‍ये समितीला झाडांची संख्‍या शिफारशीपेक्षा कमी आढळली होती.  विरुध्‍दपक्षाचा बचाव असा आहे की, पाच वेगवेगळया लॉटच्‍या बियाण्‍यामध्‍ये दोष आहे, याचे विश्‍लेषण तक्रारीत नाही किंवा अहवालात नाही. परंतु, तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेले सर्व लॉटचे बियाणे विरुध्‍दपक्षाकडीलच होते. याबद्दल विरुध्‍दपक्षाने कोणताही आक्षेप नोंदविला नाही.  त्‍यामुळे अहवालामध्‍ये खरेदी बिलाप्रमाणे बियाणे असा मोघम उल्‍लेख आढळलेला आहे व त्‍यात काही गैर नाही. कारण विरुध्‍दपक्षाने त्‍यांच्‍या लेखी जवाबात व तसेच लेखी युक्‍तीवादात फक्‍त उपविभागीय कृषी अधिकारी, अकोट यांनी दर्शनी पाहून अहवाल सादर केला आहे व उगवण शक्‍तीचा अहवाल देण्‍यापूर्वी सदरच्‍या बियाण्‍याचा नमुना घेवून बीज प्रयोगशाळेत पाठवणे आवश्‍यक आहे व असे या प्रकरणात घडले नाही, असा आक्षेप घेतला आहे. परंतु, तक्रारकर्त्‍याजवळ एक वेळेस बियाणे हे परिक्षणाकरिता उपलब्‍ध नाही हे आपण समजू शकतो.  परंतु, विरुध्‍दपक्षाने सुध्‍दा सदर बियाण्‍यांबाबत प्रयोशाळेतील तपासणी अहवाल दाखल केलेला नाही.  म्‍हणून तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले न्‍यायनिवाडे जसे की,

1) II 2008 CPJ 165 NC

Ankur Seeds P. Ltd., Vs. Kondabrolu Hasen Rao & Ors.

 

2) II 2008 CPJ 96 (NC)

India Seed House Vs. Ramjilal Sharma & Anr. 

 

3) AIR 2004 SC 3474

H.N. Shankara Shastry, Vs. Asst. Director of Agriculture, Karnataka

 

4) AIR 2012 SC 1160

M/s. National Seeds Corporation Ltd., Vs. Madhusudhan Reddy and Anr.

 

यातील निर्देशावर मंचाने देखील भिस्‍त ठेवली आहे.  म्‍हणून समितीचा अहवाल तक्रारकर्त्‍याचे शेत गट क्रमांक 279 मधील नुकसान भरपाई ठरविण्‍याकरिता मंचाने स्विकारलेला आहे.  गट क्रमांक 279 चे शेतकी दस्‍त जसे की, तलाठयाचा दाखला असे दर्शवितो की, या गट क्रमांकामधील क्षेत्र 2.05 आर शेत जमिनीमध्‍ये 2013-2014 च्‍या खरीप हंगामी सोयाबीन पिक होते तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती कडील दस्‍तांवरुन स्‍प्‍टेंबर ते ऑक्‍टोबर 2014 मधील सोयाबीन या शेतमालाचा सरासरी बाजार भाव कळून येतो म्‍हणून समितीचा अहवाल ग्राहय धरुन व एकरी अंदाजे 7 क्विंटल सोयाबीन प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे शेत गट क्रमांक 279 मधील नुकसान भरपाई ₹ 1,22,500/- तसेच इतर नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दिल्‍यास ते न्‍यायोचित होईल या निष्‍कर्षाप्रत सदर मंच आले आहे.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी जे न्‍यायनिवाडे दाखल केले त्‍यातील परिस्थिती हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडत नाही. म्‍हणून अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.

अं ति म   आ दे श

1)  तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

 

2)  विरुध्‍दपक्ष क्रमांक  1 ते 2 यांनी वैय‍क्तिकपणे व संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला दोषयुक्‍त बियाणे विकल्‍यामुळे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम 1,22,500/- ( अक्षरी रुपये एक लाख बावीस हजार पाचशे फक्‍त ) दयावी.  शारीरिक, मानसिक व आर्थिक  नुकसानीपोटीची रक्‍कम तसेच या प्रकरणाचे खर्चाची रक्‍कम 8,000/- ( अक्षरी रुपये आठ हजार फक्‍त ) तक्रारकर्त्‍याला दयावी.  

3 विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत करावे.  

4 उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी. 

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.