निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11.06.2009 तक्रार नोदणी दिनांकः- 06.07.2009 तक्रार निकाल दिनांकः- 12.05.2010 कालावधी 10 महिने 04 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ वंदना भ्र.विनायक पाथरकर अर्जदार वय 33 वर्षे धंदा घरकाम रा.शिवसाईनगर, ( अड डि.यू.दराडे ) तरोडा (बृ) ता. जि.नादेड. विरुध्द 1 विनोद पटेल गैरअर्जदार वय सज्ञान धंदा व्यापार व्दारा गिता टिंबर, ( अड शिरीष वेलणकर ) जिल्हा परिषदेच्या मागे जिंतूर रोड, परभणी. 2 इंडूस इलेक्ट्रान्स अ डिव्हीजन ऑफ इलेक्ट्रोथर्म (इंडीया) लिमीटेड मार्फत मॅनेजर, 72, पालोडिया व्हाया तालतेज अहमदाबाद 382115. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- इलेक्ट्रीक यो बाइक मध्ये उत्पदनातील दोष राहून गेला म्हणून खरेदीची किंमत परत मिळण्यासाठी डिलर व उत्पादका विरुध्द प्रस्तूतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत गैरअर्जदार क्रमांक 2 यानी उत्पादीत केलेली बॅटरीवर चालणारी विना द्रव इंधन यो इलेक्ट्रीक बाईक अर्जदाराने दिनांक 11.02.2008 रोजी कंपनीचे परभणी येथील डिलर गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून रुपये 38986/- ला खरेदी केली होती तीचा आर.टी.ओ.रजि.क्रमांक एम.एच.26-डब्ल्यू 3179 असा आहे. वाहन खरेदीसाठी अर्जदाराने वरील रक्कमेचे कर्ज बुलढाणा अर्बन को-ऑप बॅक शाखा नांदेड येथून घेतले होते. अर्जदाराचे म्हणणे असे की, इले. बाईक खरेदी केल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने वर्कशॉप मधून 3 वेळा फ्री सर्व्हीसिंग करुन दिलेले होते त्यानंतर डिसेंबर 2008 मध्ये बाईकच्या मागील चाकला जोडलेली मोटर व्यवस्थीत चालत नसल्याचे व त्यामध्ये डिफेक्ट असल्याचे जाणवल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे बाईक नेली चेक केल्यावर दोष नेमका कशात आहे हे कळण्यासाठी बाइक ची मोटार व मागील चाक गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीकडे पाठवावे लागेल असे त्याने सांगितले त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 च्या ताब्यात वाहन दिले व 15 दिवसात कंपनीकडून दुरुस्त करुन येइल असे सांगितले मात्र जानेवारी 09 पर्यंत दुरुस्त करुन मिळाले नाही . अर्जदार त्यानंतर पुन्हा चौकशीसाठी गैरअर्जदाराकडे गेला असता त्याचे शोरुम व वर्कशॉप कायमचे बंद केले असल्याचे कळाले म्हणून गैरअर्जदार 1 च्या घरी जावून चौकशी केली असता कंपनीशी त्याचा कमिशन बाबत वाद झाल्यामुळे एजन्सी बंद केली असल्याचे सांगितले. त्यानंतर ही पुन्हा 20.04.2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ला भेटून बाइक चे चाक व मोटार दुरुस्त करुन आली का म्हणून विचारले असता कंपनीची एजन्सी त्याने बंद केली असल्याने चाका विषयी काही सांगू शकत नसल्याचे सांगितले. अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्रमांक 1 कडून खरेदी केलेली बाइक घरातील मुलाना शाळेत पोहोचवण्यासाठी व शाळा सुटल्यावर परत आणण्यासाठी घेतली होती मात्र बाइक सदोष निषाल्यामुळे तो हेतू साध्य झाला नाही. व गैरसोय होवून खरेदीची रक्कम वाया गेली शिवाय बॅकेच्या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड बसला. अशारितीने गैरअर्जदाराने सदोष बाइक माथी मारुन सेवेतील त्रूटी केली मानसिक त्रास दिला व आर्थिक नुकसान केले . गैरअर्जदारानी रिपेअरींग साठी ताब्यात घेतलेली चाक व मोटार दुरुस्त न करुन दिल्यामुळे बाइक विनावापर घरात तशीच पडून आहे त्यामुळे त्याची कायदेशीर दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन बाइक ची किंमत रुपये 38986/- डिसेंबर 08 पासून 18 % व्याजासह गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून मिळावी , मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- व अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे दिनांक 19.09.2009 रोजी प्रकरणात नि.12 ला आणि गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे शपथपत्रावर लेखी जबाब सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1 ( डिलर) यानी आपल्या लेखी जबाबात ( नि.12) गैरअर्जदार क्रमांक 2 यानी उत्पादीत केलेल्या यो इलेक्ट्रीक बाइकचे परभणी जिल्हयाचे ते डिलर होते हे मान्य केले आहे. तसेच त्याचेकडून अर्जदाराने दिनांक 11.02.2008 रोजी यो स्पिड बाइक खरेदी केल्या संबंधीचा तक्रार अर्जातील मजकूर ही त्याना मान्य आहे. माहे जानेवारी 2009 मध्ये अर्जदाराच्या बाइकच्या मागील चाकात दोष निर्माण झाल्यामुळे बाइक व्यवस्थीत चालत नव्हती म्हणून अर्जदाराने बाइक त्याच्याकडे आणल्यानंतर चेकिंग केली असता त्यांच्या सर्व्हीस स्टेशन मध्ये तो बिघाड काढता येणे शक्य नसल्याने बाइकचे चाक गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीकडे पाठवावे लागेल असे सांगितले होते हे साफ नाकारले आहे तसेच चाक दुरुस्त करुन 15 दिवसात मिळेल असे सांगितले होते हा मजकूरही साफ नाकारला आहे. याखेरीज तक्रार अर्ज परिचछेद 5 मधील मजकूर ही गैरअर्जदार क्रमांक 1 ने अमान्य केलेला आहे. अतिरीक्त लेखी जबाबात असा खुलासा केला आहे की,अर्जदाराच्या बाइकच्या मागील चाकात प्राब्लेम असल्याची अर्जदाराने पहिली तक्रार ऑगष्ट 09 मध्ये केली त्यानंतर ते चाक बदलून देण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 ने चाक कंपनीकडे लगेच पाठविले. कंपनीकडून चाक आल्यावर कंपनीच्या मॅकेनिक मार्फत 12.08.2009 रोजी वर्कशॉप मध्ये अर्जदाराच्या बाइकचे चाक बसवून दिले. केलेली दुरुस्ती समाधानकारक करुन दिली असल्याची खात्री करुन अर्जदाराने बाइक घरी नेली त्यानंतर बाइक संबंधी कसलीही तक्रार गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आलेली नव्हती असे असतानाही अर्जदाराने ग्राहक मंचात परस्पर खोटी केस दाखल केली आहे ती खर्चासह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयार्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र ( नि.13) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीतर्फे सर्व्हीस इंजिनीअर किरण सोमा प्रस्तूत प्रकरणी हजर होवून अथोरीटी लेटर ( नि.15) दाखल करुन शपथपत्राव्दारे दाखल केलेल्या लेखी जबाबातून ( नि.16) तक्रार अर्जातील सर्व विधानाचा त्यानी इनकार केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, मे. शिव मोटर्स याना परभणी जिल्हयासाठी यो बाइकची डिलरशीप दिलेली होती परंतू त्यानी जानेवारी 2009 पासून डिलरशीप बंद केली आहे. अर्जदाराने 11.02.2008 रोजी मे. शिव मोटर्स मधून यो बाइक खरेदी केल्यावर दिनांक 29.07.2009 पर्यंत बाइकच्या मागील चाकात दोष असल्याची कसलीही तक्रार कपनीला कळविलेली नव्हती किंवा गैरअर्जदार डिलरकडे ही त्यावेळी तक्रार केलेली नव्हती शिवाय डिलरने ही अर्जदाराच्या बाइक मधील मागील चाकात दोष असल्याचे कंपनीला कळविलेले नव्हते. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार डिसेंबर 08 मध्ये बाइकच्या मागील चाकात प्राब्लेम आला ही तक्रार कंपनीला जुलै 09 मध्ये कळविली. त्यामुळे बाइकचे चाक बदलून देण्याचा तो पर्यंत प्रश्न उदभवला नव्हता. तक्रार आल्यावर कंपनीच्या सर्व्हीस इंजिनीअरने अर्जदाराशी लगेच संपर्क साधून 12.08.2009 रोजी बाइकची दुरुस्ती समाधानकारक रित्या करुन दिली होती तशी लेखी नोट अर्जदाराने दिली आहे. मात्र अर्जदाराने त्यापूर्वीच ग्राहक मंचात प्रस्तूतची तक्रार केलेली दिसते बाइकची दुरुस्ती समाधानकारक रित्या दिली असल्याने हा वाद 12.08.2009 रोजी संपुष्टात आला आहे. बाइकमध्ये मुळातच कोणताही उत्पदनातील दोष नव्हता त्याबाबत खोटी तक्रार केली आहे. अर्जदाराने या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा किंवा तज्ञाचा रिपोर्ट मंचापुढे दिला नाही पोकळ स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ पुराव्यातील कागदपत्रात नि. 18 लगत बाइक दुरुस्तीचे 12.08.2009 चा जॉब कार्ड रिपोर्ट व कस्टमर कॉन्ट्रक्ट रिपोर्ट दाखल केला आहे. प्रस्तूतचे प्रकरण सुरवातीला 12.10.2009 रोजी युक्तिवादासाठी नेमले होते व त्याच कारणासाठी प्रलंबित असताना 20.11.2009 रोजी अर्जदारातर्फे नि. 23 चा अर्ज देवून वाहनाचे मागील चाकाचे कंट्रोलर कायमचे नादुरुस्त आहे व तो वाहन निर्मीतीमधील दोष असल्यामुळे परभणी येथील मॅकेनिकलचा संदर्भ देवून तज्ञ म्हणून वाहनाची पाहाणी करण्याची मागणी केली होती त्या अर्जावर गैरअर्जदारातर्फे अड. वेलणकर यानी तीव्र आक्षेप घेऊन संबंधीत मॅकेनीक यो इले. बाइकचा माहीतगार तज्ञ मॅकेनिक असल्या संबंधीचा पुरावा सादर केल्याखेरीज वाहन ताब्यात देवू नये असे म्हणणे दिले ते मान्य करुन मंचान आदेश पारीत केला. गैरअर्जदाराना अर्जदाराच्या वाहनात काही फॉल्ट असेल तो काढून देण्याबाबत दोघानाही मंचाने सुचविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे नि. 24 चा अर्ज सादर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे अर्जदाराच्या वाहनाची तपासणी करुन योग्य ती दुरुस्ती करुन देण्याची तयारी दर्शविली व वाहन ताब्यात घेतले व दुरुस्ती करुन टेस्टींगसाठी एक महिन्याची मुदत मागितली ती मंजूर करुन प्रकरणात 22.12.2009 ही तारीख नेमली. सदर तारखेस गैरअर्जदारातर्फे नि. 25 चा अर्ज सादर करुन वाहन योग्यप्रकारे सुस्थितीत चालत असल्याची खात्री केली आहे. व वाहन अर्जदाराच्या ताब्यात मंचातर्फे दयावे अशी विनंती केली. अर्जदार व त्याचे वकिल सदर तारखेस गैरहजर असल्यामुळे गैरअर्जदाराने वाहन परत नेले त्यानंतर पुढील नेमलेली तारीख 19.01.2010 रोजी गैरअर्जदारातर्फे नि. 26 चा अर्ज सादर करुन अर्जदाराने वाहन चालवून खात्री करुन पाहिले असता सुस्थितीत चालत असल्याचे मान्य करुन त्याची बाइक एम.एच.26/डब्ल्यू 3179 ताब्यात घेत असल्याचे व वाहान कोणताही दोष राहिलेला नाही असे नि.26 वर लिहून देवून वाहन ताब्यात घेतले होते त्यानंतर 15 दिवस वाहन चालवून पाहतो व त्यानंतर चा रिपोर्ट मंचापुढे देत असल्याचे अर्जदार व त्याचे वकिलानी तोंडी मंचापुढे सांगितले त्यानंतर 26.09.2010 पासून 28.04.2010 पर्यंत वेळोवेळी 6 वेळा अर्जदाराचा रिपोर्ट येण्यासाठी किंवा स्टेप घेण्यासाठी प्रकरण प्रलबित ठेवले होते परंतू अर्जदार किंवा त्याचे वकिल या काळात मंचापुढे हजर न राहिल्यामुळे प्रकरणाचा मेरीटवर अंतिम निर्णय देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराने खरेदी केलेल्या यो इले. बाइकल्या मागील चाकात जोडलेल्या मोटार मध्ये उत्पादनातील दोष राहून गेला आहे व ते चाक व मोटार सदोष आहे हे अर्जदाराने कायदेशीररित्या शाबीत केले आहे काय ? नाही 2 गैरअर्जदाराने या बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? नाही 3 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे . कारणे मुद्या क्रमांक 1 ते 3 – अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीचे यो इलेक्ट्रीक बाइक रजि.क्रमांक एम.एच.26/डब्ल्यू 3179 दिनांक 11.02.2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 डिलरकडून खरेदी केली होती ही अडमिटेड फॅकट आहे. फेबृवारी 2008 नंतर कंपनीतर्फे 3 फ्री सर्व्हीसिंग करुन देइपर्यंत बाइकच्या बाबतीत कसलाही प्राब्लेम नव्हता ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराचे म्हणणे असे की, डिसेंबर 08 मध्ये अचानक मागील चाकात जोडलेल्या मोटार मध्ये दोष निर्माण झाला व चाक व्यवस्थित फीरत नव्हते म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 कडे बाइक नेली परंतू त्याने तो दोष काढण्यासाठी कंपनीकडे पाठवावे लागेल असे सांगितले व चाक ठेवून घेतले वगैरे तक्रार अर्ज परिच्छेद क्रमांक 4 मध्ये जे अर्जदाराने कथन केले आहे त्या संबंधीचा कसलाही कागदोपत्री पुरावा ( उदाः गैरअर्जदार क्रमांक 1 च्या ताबयात वाहन दिल्या संबंधी लेखी रिशीट किंवा जॉब कार्ड ) प्रकरणात दाखल केलेले नाही तसेच वाहन ताब्यात दिल्यावर 20.04.2009 पर्यंत दुरुस्त वाहन ताब्यात घेण्यासाठी गैरअर्जदार 1 केडे वेळोवेळी मागणी केली होती या संबंधीचा परिच्छेद 6 मधील कथनाबाबतचा देखील ठोस पुरावा सादर केलेला नाही याउलट गैरअर्जदारांचे म्हणणे असे की, जुलै 09 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदार 1 कडे बाइकच्या मागील चाकामध्ये प्रॉब्लेम आल्याबदलची पहिली तक्रार घेऊन आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने कंपनीला त्याबाबत कळविले व कंपनीचा मॅकेनिक लगेच 12.08.2009 रोजी समक्ष येवून बाइकच्या चाकातील दोष काढून दिला होता दुरुस्ती समाधानकारकरित्या करुन मिळाल्याचा रिपोर्ट ही अर्जदाराने दिला होता हे पुराव्यातील नि. 11 लगत गैरअर्जदारातर्फे दाखल केलेल्या जॉब कार्ड ( नि.11/1) आणि (नि.11/2) लगत वाहानाचे समाधानकारक दुरुस्ती करुन मिळाल्या संबधीचा अर्जदाराचा रिपोर्ट ( कस्टमर कॉट्रक्ट रिपोर्ट ) दाखल केला आहे म्हणजे 12.08.2009 रोजी वाहनाची समाधानकारक रित्या दुरुस्ती करुन घेऊन वाहन ताब्यात घेतले होते मात्र ही वस्तूस्थिती तक्रार अर्जामध्ये अर्जदाराने कुठेही नमूद केलेली नाही व मंचाची दिशाभूल केलेली आहे. माहे जुलै 09 मध्ये ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल केल्यावर बाइक मधील मागील चाकात उत्पादनातील कायमचा दोष राहून गेला आहे असा नि. 23 चा अर्ज देवून तज्ञामार्फत पाहाणी रिपोर्ट मागवण्याची विनंती केली होती मात्र संबंधीत मॅकेनिक इलेक्ट्रीक बाइकची हाताळणी केलेला तज्ञ आहे या संबंधीचा कसलाही कागदोपत्री ठोस पुरावा न दिल्यामुळे मोघमपणे मॅकेनिकचे नाव दिल्याने व त्याला गैरअर्जदारातर्फे तीव्र आक्षेप घेतल्याने मंचाने नि. 23 व नि. 27 चे अर्जातील मागणी फेटाळली होती. प्रकरण 20.11.2009 रोजी मंचापुढे सुनावणीसाठी आले असताना अर्जदार व गैरअर्जदाराने आपसात बोलणी करुन वाहनामध्ये अजूनही काही फॉल्ट शिल्लक राहिला असेल तर तो दुरुस्त करुन देण्याचे मान्य करुन वाहन ताब्यात घेतले होते त्यानंतर 19.01.2010 रोजी वाहनाचा ताबा अर्जदाराने घेऊन वाहन व्यवस्थित चालत असल्याचे व वाहानामध्ये दोष राहीला नसल्याचे नि. 26 वर लिहून देवून वाहान घेवून गेला व 15 दिवस वाहन चालवून पाहातो व त्या संबधीचा रिपोर्ट व तक्रार मागे घेत असल्याची स्टेप घेतो असे मंचापुढे निवेदन केले मात्र त्यानंतर वेळोवेळी 6 तारखाना प्रकरण प्रलबिंत ठेवून ही अर्जदार मंचापुढे आला नाही यावरुन वाहान निश्चीतपणे व्यवस्थीत चालू असावे असा निष्कर्ष निघतो मात्र तक्रार अर्ज मागे घेण्याबाबत अर्जदार मंचापुढे आलेला नाही व निष्काळजी पणा केला आहे असे खेदाने म्हणावे लागते. वाहानात अद्यापी काही दोष आहे असे अर्जदाराचे म्हणणे असले तर त्याने ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीप्रमाणे त्या क्षेत्रातील त्या वाहानाच्या तज्ञ मॅकेनिककडून तपासणी करुन तसा अहवाल पुराव्यात आणण्याचा प्रयत्न केलेला नाही व अर्जदाराकडून ही बाब कायदेशीररित्या मुळीच शाबीत झालेली नाही त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदाराकडून सेवा त्रूटी झाली असे मुळीच म्हणता येणार नाही या संदर्भात रिपोर्टड केस 2010 (1) सी.पी.आर. पान 118 ( राष्ट्रीय आयोग ) याने देखील अशा तक्रारीच्या बाबतीत असे मत व्यक्त केले आहे की, Allegation of mfg. defects has to be proved only by expert evidence . हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ग्राहक मंचात अर्जदाराने हा जो प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जाच्या सत्यते विषयी अथवा खरेपणा बदल अर्जाच्या शेवटी प्रतिज्ञा लेखही दिलेला नाही किंवा तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ शपथपत्र ही दाखल केलेले नसल्यामुळे तक्रार अर्ज मुलतः कायदेशीर अपूर्णतः असल्याचे तथा Without following procedure of law केलेला असल्यामुळे कायदेशीररित्या निरर्थक वाटतो. वरील सर्व बाबी विचारात घेऊन मुद्या क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदारानी आपापला सोसावा.. 3 संबंधीतानाआदेशकळविण्यातयावा. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |