Maharashtra

Chandrapur

CC/15/98

Sau Sakuntala Dhanraj Thamke At Rajura - Complainant(s)

Versus

Vinfra Tech Realtors Pvt LtdShri Karmaveer Pundalik Telang - Opp.Party(s)

N.R.Khobragade

13 Jul 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/98
( Date of Filing : 15 Jun 2015 )
 
1. Sau Sakuntala Dhanraj Thamke At Rajura
Qu No 74/5 Dhopatala Colony Rajura
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Vinfra Tech Realtors Pvt LtdShri Karmaveer Pundalik Telang
S 12 Near Gurudwara Tukum Chandrpur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 HON'BLE MS. Kirti Gadgil (Vaidya) MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Jul 2017
Final Order / Judgement

            ::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये,  उमेश वि. जावळीकर  मा. अध्‍यक्ष

१.         सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.         तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍याकडे दिनांक २७/०७/२०१२ ते १८/०४/२०१३ पर्यंत प्रतिमाह प्रत्येकी रक्‍कम रू. ५,००/- असे एकूण रू.५,०००/ सामनेवाले यांच्‍या व्‍ही.एस.११६ या गुंतवणुक योजनेमध्‍ये गुंतविले. त्‍याबाबतचे नोंदणी प्रमाणपत्र सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिनांक २७.०७.२०१२ रोजी दिले. सदरहू योजनेप्रमाणे ४५० युनिटची मुदतपुर्तीनंतर दिनांक २७.०१.२०१४ रोजी  मिळणारी रक्‍कम रू.११२५०/- सामनेवाले तक्रारदारांस देण्‍यांस अटी व शर्तीप्रमाणे पात्र होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांस वेळोवेळी सदर योजनेत गुंतवणूक केल्‍याबद्दल पावती दिली. सामनेवाले यांच्‍या योजनेच्‍या अटी व शर्तीप्रमाणे १८ महिन्‍यानंतर सामनेवाले तक्रारदारांस १८०० चौ.फुट मिळकत तक्रारदारांच्‍या नांवे करतील, असे माहितीपत्रिकेत नमूद आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्रांची पाहणी केली असता सामनेवाले हे तक्रारदारांनी केलेल्‍या गुंतवणूकीमधून जमीन मिळकत विकसीत करून सामनेवाले यांच्‍या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारांनी संपूर्ण रक्‍कम सामनेवाले यांना अदा केल्‍यांस लाभांश व व्‍याजासह मुदतपूर्तीनंतर रक्‍कम व मिळकतीचा ताबा तक्रारदारांस देतील असे नमूद आहे. सामनेवाले यांच्‍या माहितीपत्रकात नमूद प्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍याकडे जमा केलेली रक्‍कम सामनेवाले यांनी मुदतीत परत न करून मिळकतीचाही ताबा न दिल्‍याने तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिनांक २४/१०/२०१४ रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून करारातील अटींची पुर्तता करणेंस लेखी कळविले. परंतु सदर नोटीस सामनेवाले यांनी न स्विकारल्‍याने तक्रारदारांस परत आली. त्‍यानंतरही सामनेवाले यांनी तक्रारदारांस गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह व लाभांशासह परत न दिल्‍याने तक्रारदाराने प्रस्‍तूत तक्रार गुंतवणूक रक्‍कम, व्‍याज व लाभांषासह तक्रारदारांस सामनेवाले यांनी अदा करावी तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्‍मक रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती केली आहे. 

३.         सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले यांचे कार्यालय बंद असल्‍याने तसेच नवीन पत्‍त्‍यावर पाठविले असता सामनेवाले सदर पत्‍त्‍यावर रहात नसल्‍याने मंचात परत आली. त्‍यानंतर सामनेवाले यांना दैनिक महाविदर्भ मध्‍ये दिनांक ०४.०३.२०१६ रोजी सामनेवाले यांना जाहीर नोटीस प्रसिध्‍द करून दिनांक १६.०३.२०१६ रोजी हजर राहून पुढील कार्यवाही करण्‍यांस लेखी कळविले. तरीदेखील सामनेवाले मंचासमोर हजर न राहिल्‍याने सामनेवाले यांच्‍याविरूध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍यांत यावी असा विनंतीअर्ज तक्रारदाराने दिला. न्‍यायाच्‍या दृष्‍टीने अर्ज मंजूर करण्‍यांत आला. सदर आदेश आज रोजी अबाधीत आहेत.

४.         तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाबाबतची पुरसीस व तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्‍यांत येतात. 

            मुद्दे                                                      निष्‍कर्ष 

(1)   तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र मंचास आहे काय?                नाही  

              

(2)   आदेश                                                                  तक्रार अमान्‍य

                                        

                        

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. १

५.         वि.प.यांच्‍या माहितीपुस्तिकेतील अटी व शर्तींचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी वि.प. यांच्‍या गुंतवणूक योजनेमध्‍ये नफा व मिळकत प्राप्‍त करण्‍याच्‍या उद्देशाने दिड वर्षांच्‍या मुदतीच्‍या योजनेत गुंतवणूक केल्‍याची बाब सिध्‍द होते. सामनेवाले यांच्‍या योजनेचे स्‍वरूप पाहता सामनेवाले यांच्‍या नफ्यावर आधारीत लाभांशाची टक्‍केवारी निश्चित करण्‍यांत येईल असे नमूद असून सामनेवाले यांच्‍या चार योजना व अनेकविध पर्याय उपलब्‍ध आहेत. त्‍यामध्‍ये मासीक व एकरकमी अशा स्‍वरूपाच्‍या गुंतवणूकीचे पर्यायही उपलब्‍ध आहेत. मुदतपूर्तीनंतर विशिष्‍ट चौरसफुटाची मिळकत तक्रारदारांच्‍या नावे करण्‍याबाबतही माहितीपुस्तिकेत नमूद आहे. तक्रारदारांना सदर माहिती पुस्तिकेतील व नोंदणी प्रमाणपत्र दि. २७.०७.२०१२ मधील अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाले यांच्‍याकडे जमा केलेली रक्‍कम गुंतवणूकीसाठी असून नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने केल्‍याची बाब कागदोपत्री पुराव्‍यावरून सिध्‍द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २ (१)(ड) अन्‍वये ग्राहक या संज्ञेची व्‍याप्‍ती पाहता नफ्यासाठी केलेल्‍या गुंतवणूकीबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येणार नाही असे न्‍यायतत्‍व आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्‍कर्षावरून तक्रारदारांनी सदर गुंतवणूक नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने केल्‍याने व ही बाब कागदोपत्री पुराव्‍याने सिध्‍द झाल्‍याने प्रस्‍तुत तक्रारीतील वादकथनाविषयी न्‍यायनिर्णय देण्‍याचे अधिकारक्षेत्र मंचास नसल्‍याने मुद्दा क्रं. १ चे उत्‍तर हे नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे. 

मुद्दा क्रं. २

६.         मुद्दा क्रं. १ च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

   आदेश

            (1) ग्राहक तक्रार क्र. ९८/२०१५ अमान्‍य करण्‍यात येते.

            (2) खर्चाबाबत आदेश नाहीत.                

            (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी.

 

 

 श्रीमती. कल्‍पना जांगडे  श्री. उमेश वि. जावळीकर   श्रीमती. किर्ती गाडगीळ          

       (सदस्‍या)          (अध्‍यक्ष)                (सदस्‍या)   

                             

 

 

 

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 
[HON'BLE MS. Kirti Gadgil (Vaidya)]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.