SHANKAR NANA SAWANT filed a consumer case on 12 Jun 2015 against VILAS SARJERAO SABLE in the Satara Consumer Court. The case no is CC/12/154 and the judgment uploaded on 06 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 154/2012.
तक्रार दाखल दि.21-12-2012.
तक्रार निकाली दि.12-6-2015.
1. श्री.शंकर नाना सावंत.
2. सौ.शोभा शंकर सावंत.
रा.फ्लॅट क्र.5, शांतिनिकेतन अपार्टमेंट,
सि.स.नं.2806, मंगळवार पेठ, कोल्हापूर. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री.विलास सर्जेराव साबळे.
2. श्री.अमृत विलास साबळे.
दोघे रा. साईधाम, 349,
सोमवार पेठ, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे– अँड.ए.ए.पाठक/ अँड.ए.ए.महाडेश्वर.
जाबदारातर्फे– अँड.एस.एम.गायकवाड/ अँड.व्ही.जे.उथळे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदारानी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे कोल्हापूर येथील कायमस्वरुपी रहिवासी असून ते सध्या निवृत्त आहेत. तर जाबदार क्र.1 व 2 हे सातारा येथील रहिवासी आहेत. तक्रारदार व जाबदार हे एकमेकांचे स्नेही आहेत. जाबदारानी तक्रारदारास असे भासविले होते की, जाबदार क्र.1 व 2 हे साईज्योत इमू फार्म आणि हँचरीज या नावे इमू पालन आणि हॅचरीजचा व्यवसाय करतात. तक्रारदार हे परदेशी नोकरीस होते आणि ते निवृत्त होऊन मायदेशी परत आलेले होते. त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांना तक्रारदारांकडे गुंतवणुकीसाठी रक्कम उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती व जाणीव होती. त्यामुळे तक्रारदारांसमोर गुंतवणूक योजनेचा आभास निर्माण करुन त्याद्वारे तक्रारदारांनी जाबदार क्र.1 व 2 यांचेकडे रक्कम गुंतवणुकीकरिता दयावी यासाठी तक्रारदाराने जाबदाराला उदयुक्त केले व प्रस्तुत रक्कम गुंतवणूक केलेनंतर ती रक्कम गुंतवणूक योजनेप्रमाणे परत न करणे व स्वतः वापरणे असा कट जाबदार क्र.1 व 2 यानी केला. त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारास सांगितले की, साईज्योत इमू फार्म अँड हॅचरीज नावाची संस्था असून त्याद्वारे ते इमू पक्षी पालन उत्पादन, इमू पक्षांची अंडी विक्री इ.व्यवसाय जाबदार करतात व पुढे असे सांगितले की, सदर इमू फार्मिंग संस्थेमध्ये त्यांनी गुंतवणुकीची योजना सुरु केली असून त्या योजनेमध्ये तक्रारदाराने गु्ंतवणूक केलेस गुंतवणूक रकमेवर भरघोस परतावा मिळेल. सदर गुंतवणूक योजनेचे नाव कॉर्पोरेट इमू फार्मिंग आहे, तसेच सदर योजनेत गुंतवणूक केलेस तक्रारदाराला जाबदार क्र.1 व 2 कडून गुंतवणूक केलेपासून 24,36,48,60 आणि 72 महिन्यांनंतर अनु्क्रमे रक्कम रु.50,000/-, रक्कम रु.1,00,000/-, रक्कम रु.1,50,000/-, रक्कम रु.2,00,000/- आणि रक्कम रु.2,00,000/- असा परतावा देतील असे भासविले.
जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराना भासविले की, जर तक्रारदाराने सदर योजनेत रक्कम रु.4,00,000/- (रु.चार लाख मात्र)गुंतवले आणि त्या गुंतवणुकीवर जाबदार क्र.1 व 2 हे तक्रारदाराना जून 2011 अखेर रक्कम रु.50,000/-, जून 2013 अखेर रक्कम रु.1,00,000/- जून 2013 अखेर रक्कम रु.1,50,000/-, जून 2014 अखेर रु.1,00,000/- तर जून 2015 अखेर रक्कम रु.2,00,000/- असे एकूण रु.6,50,000/-(रु.सहा लाख पन्नास हजार मात्र)परतावा देतील, त्याप्रमाणे मुदतीअंती म्हणजेच सन 2015 अखेर जाबदार क्र.1 व 2 हे तक्रारदारानी गुंतवलेली रक्कम रु.4,00,000/- इतकी रक्कम परत देतील असा आभास निर्माण करुन जाबदाराने प्रस्तुत योजनेची माहिती नोंद केलेले माहितीपत्रक/प्रचारपत्रक (ब्राऊशर) तक्रारदारास दिले. सदर जाबदाराच्या योजनेत गुंतवणेसाठी तक्रारदाराने खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे रक्कम रु.4,00,000/- चेकने तसेच रोखीने जाबदाराला अदा केले.
अ.क्र. | बँक व चेक क्र. | दिनांक | रक्कम रु. |
1 | आय.डी.बी.आय.बँक लि.शाखा सातारा, चेक क्र.038503 | 2-5-2009 | 1,00,000/- |
2 | आय.डी.बी.आय.बँक लि.शाखा सातारा, चेक क्र.038504 | 10-5-2009 | 1,00,000/- |
रोखीने अदा केलेल्या रकमेचा तपशील
अ.क्र. | जाबदाराने दिलेल्या पावतीचा क्र. | दिनांक | रक्कम रु. |
1 | 139 | 19-5-2009 | 50,000/- |
2 | 147 | 6-8-2009 | 50,000/- |
3 | 150 | 23-10-2009 | 50,000/- |
4 | 154 | 23-11-2009 | 40,000/- |
त्याचप्रमाणे वरील रकमांशिवाय आणखी रक्कम रु.10,000/- तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 याना दि.15-1-2010 रोजी अदा केली आहे.
अशा प्रकारे तक्रारदारानी जाबदाराना एकूण रक्कम रु.4,00,000/- (रु.चार लाख मात्र)अदा केली आहे. तक्रारदाराने अदा केलेले चेक रितसर वटून जाबदारास रक्कम मिळाली आहे त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराकडून रक्कम घेताना जाबदार क्र.1 व 2 यानी सदर गुंतवणुकीवरील परतावा जून 2011 पासून विविध रक्कम देणेचे मान्य केले होते, प्रस्तुत गुंतवणूक योजनेबाबत जाबदार क्र1 व 2 यांनी तक्रारदारास दि.2-5-09 रोजी करारपत्र लिहून दिले असून ते नोटराईज्ड केलेले आहे. सदर करारात जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारांसमोर सादर केलेल्या गुंतवणूक योजनेच्या अटी नमूद करणेत आलेल्या नाहीत. जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराना ठरलेप्रमाणे जून 2011 पासून गुंतवणूक योजनेचा मोबदला देणे अपेक्षित होते. तथापि जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराना आजअखेर परतावा म्हणून कोणतीही रक्कम अदा केलेली नाही किंवा मूळ रक्कमही अदा केलेली नाही. तक्रारदाराने सदर गुंतवणुकीची रक्कम मिळणेसाठी जाबदाराना खूप विनंत्या केल्या, पाठपुरावा केला असता जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारांस केवळ रु.25,000/- (रु.पंचवीस हजार मात्र)एवढीच रक्कम अदा केली व उर्वरित रक्कम दि.30-6-2012 पर्यंत अदा करणेचे मान्य केले तथापि दि.30-6-2012 रोजीपर्यंत किंवा त्यानंतर जाबदाराने तक्रारदारास कोणतीही रक्कम अदा केली नाही, त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदाराची फसवणूक करुन त्यांना सदोष सेवा पुरवली आहे, सबब जाबदार क्र.1 व 2 यांचेकडून सदर गुंतवणुकीची व परतावा रक्कम वसूल होऊन मिळणेसाठी सदर तक्रारअर्ज तक्रारदाराने मे.मंचात दाखल केला आहे.
2. सदर कामी तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 यांचेकडून त्रुटीयुक्त सेवेबाबत व मानसिक, शारिरीक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/-(रु.दोन लाख मात्र)वसूल होऊन मिळावेत, जाबदार क्र.1 व 2 यानी तक्रारदारांचे पुर्नगुंतवणुकीपोटी घेतलेली रक्कम रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र)व त्यावरील जून 2011 अखेरचा परतावा रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र)आणि जून 2012 अखेरचा परतावा रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) अशी एकूण रक्कम रु.5,50,000/-(रु.पाच लाख पन्नास हजार मात्र)जाबदार क्र.1,2 कडून तक्रारदारांना वसूल होऊन मिळावेत, तसेच वकील फी, प्रवासखर्च, व इतर खर्चापोटी रक्कम रु.50,000/- जाबदार क्र.1,2 कडून वसूल होऊन मिळणेबाबत विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.
3. तक्रारदारानी सदर कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/13 कडे अनुक्रमे जाबदाराने कॉर्पोरेट इमू फार्मिंग गुंतवणूक योजनेबाबत प्रकाशित व प्रसिध्द केलेले माहितीपत्रक, तक्रारदार क्र.1 व 2 आणि जाबदार क्र.1 व 2 यांचेकडील सदर गुंतवणुकीचा करार, तक्रारदारानी जाबदाराना अदा रक्कम रु.2,00,000/- (रु.दोन लाख मात्र)अदा केलेची पुरसीस, तक्रारदारानी जाबदाराना अदा केलेले रक्कम रु.5,00,000/- अदा केलेची पावती, तक्रारदाराने जाबदाराना रक्कम रु.50,000/- अदा केलेची पावती, तक्रारदाराने जाबदाराना रक्कम रु.50,000/- अदा केलेची पावती, तक्रारदाराचे वकीलानी जाबारास पाठवलेली नोटीस, सदर नोटीस रजि.पोस्टाने पाठवलेची पोस्टाची पावती, जाबदार क्र.1 व 2 याना नोटीस मिळाल्याच्या पोहोचपावत्या, तक्रारदार क्र.2 ने जाबदार क्र.1 ला दिलेले वटमुखत्यारपत्र, नि.15 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञाप9, नि.18 कडे साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.19 कडे तक्रारदार क्र.2 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.23 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदारानी सदर कामी दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र.1 व 2 यानी सदर कामी नि.14 कड म्हणणे, नि.19 अ कडे जादार क्र.1 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.21 चे अर्जासोबत पा.क्र.1 ते 67-जाबदारानी इमू पक्षीपालनाबाबत शासनासोबत केलेला पत्रव्यवहार व पेपरमधील बातम्या, नि.22 कडे जाबदारातर्फे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदारानी सदर कामी दाखल केली आहेत. जाबदारानी त्यांचे म्हणण्यामध्ये पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत-
1. तक्रारदाराचा अर्ज व त्यातील मजकुर चुकीचा, दिशाभूल करणारा असून जाबदाराला मान्य व कबूल नाही.
2. वस्तुस्थिती अशी की, जाबदार क्र.1 व 2 हे साईज्योत इमू फार्म अँड हँचरीज या नावाने इमूपालन व हँचरीजचा व्यवसाय करीत होते. सदर व्यवसाय सुरु करतेवेळी महाराष्ट्र शासाकडून वेळेवेळी इमू फार्मिंगबाबत सदरील इमू व्यावसायिकांना आवश्यक त्या सुविधा देत असत. परंतु दरम्यानचे काळात सदरचा व्यवसाय जसा वाढत गेला तसतसे सदर व्यवसायातील त्रुटी सदरील व्यावसायिकांपुढे उभ्या राहिल्या. त्यामुळे सदरचे इमु व्यावसायिक मोठया प्रमाणात अडचणीत येऊ लागले. शासनाने इमू पालन व्यवसायात कोणत्याही स्वरुपाच्या सेवासुविधा प्रत्यक्षात देणार होते या सेवासुविधा प्रत्यक्षात सदर व्यावसायिकांना मिळालेल्या नाहीत. घोषणा फक्त कागदावरच राहिल्या त्यामुळे ख-या अर्थाने इमू व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाचा पाठपुरावा करुनही शासनाने दुर्लक्ष केल्याने इमू व्यवसाय खूपच तोटयात येऊन या व्यवसायाची दुर्दशा झाली. याबाबत इमू व्यावसायिकांनी शासनाबरोबर वेळोवेळी संपर्क साधून पत्रव्यवहार करुन इमू व्यवसायातील प्रश्न मांडले परंतु शासन कोणतेही लक्ष देत नाही त्यामुळे तक्रारदाराकडून जाबदार क्र.1 व 2 यानी घेतलेले रक्कम रु.4,00,000/- तक्रारदारास परत करु शकले नाहीत. जाबदार क्र.1 व 2 यांचा सदर तक्रारदाराची रक्कम बुडवणेचा आजिबात उद्देश नव्हता व नाही.
3. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक होऊ शकत नाहीत त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीत बसत नसल्यामुळे सदर तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेस पात्र आहे.
4. तक्रारदाराने गुंतवलेल्या रकमेवर वेळोवेळी गुंतवलेल्या पैशाच्या माध्यमातून जादा रक्कम ठराविक काळात कसे मिळतील यासाठी तक्रारदाराने सदर रक्कम जाबदार क्र.1 व 2 कडे गुंतविली होती व त्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम रु.25,000/- स्विकारलेले आहेत. उभयतामध्ये झालेल्या करारपत्रात सदरचे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक होत नाहीत हे स्पष्ट होते.
5. तक्रारदाराने व्यापारी हेतू मनात ठेवूनच सदरची रक्कम गुंतविली असल्याने तक्रारदारास या मे.मंचात दाद मागणेचा अधिकार नाही. तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. अशा प्रकारचे म्हणणे जाबदारानी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे प्रस्तुत गुंतवणुकीची व नुकसानभरपाईची रक्कम मिळणेस
पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील आदेशात नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी जाबदार क्र.1व 2 यांचेकडे साईज्योत इमूपालन व हॅचरीज या व्यवसायात डिपॉझिटचे रक्कम रु.4,00,000/- खालील नमूद कोष्टकातील वर्णनाप्रमाणे रक्कम गुंतवली होती व आहे-
अ.क्र. | बँक व चेक क्र. | दिनांक | रक्कम रु. |
1. | आय.डी.बी.आय.बँक लि.शाखा सातारा, चेक क्र.038503 | 2-5-2009 | 1,00,000/- |
2 | आय.डी.बी.आय.बँक लि.शाखा सातारा, चेक क्र.038504 | 10-5-2009 | 1,00,000/- |
रोखीने अदा केलेला तपशील-
अ.क्र. | जाबदाराने दिलेल्या पावतीचा क्र. | तारीख | रक्कम रु. |
1 | 139 | 15-5-2009 | 50,000/- |
2 | 147 | 6-8-2009 | 50,000/- |
3 | 150 | 23-10-2009 | 50,000/- |
4 | 154 | 23-11-2009 | 40,000/- |
|
|
|
| ||||||||
|
|
|
|
त्याचप्रमाणे दि.15-1-2010 रोजी तक्रारदाराने जाबदारांना रक्कम रु.10,000/- अदा केली आहे. जाबदाराने प्रस्तुत गुंतवणुकीचा परतावा जून 2011 पासून विविध टप्प्यांमध्ये करणेचे कबूल केले होते. त्यासंदर्भातील करारपत्र तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान झालेले आहे. प्रस्तुत गुंतवणुकीच्या पावत्या, करारपत्र व साईज्योत इमू फार्म अँड हँचरीजचे प्रसिध्द केलेले ब्राऊशर सदर कामी नि.5 चे कागदयादीसोबत दाखल केलेले आहे. तसेच जाबदाराने तक्रारदाराने सदरची रक्कम जाबदारांकडे गुंतवलेचे मान्य व कबूल केलेले आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे. तसेच प्रस्तुत करारात ठरलेप्रमाणे जाबदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सदर गुंतवणुकीचा परतावा केलेला नाही. परताव्यासंदर्भात ठराविक मुदतीत किती रकमेचा परतावा करायचा याचा स्पष्ट उल्लेख करारपत्रामध्ये नमूद आहे परंतु तरीही जाबदार क्र.1 व 2 यांनी ठरलेप्रमाणे गुंतवणुकीचा परतावा केलेला नाही. तक्रारदाराने वारंवार मागणी केली असता फक्त रु.25,000/- जाबदारांनी तक्रारदारास अदा केलेले आहेत. उर्वरित रक्कम अदयापपर्यंत अदा केली नाही व तक्रारदाराचे मागणीस कोणतीही दाद दिलेली नाही व तक्रारदाराची फसवणूक केली असून तक्रारदारास सदोष सेवा पुरवली असल्याचे स्पष्ट सिध्द होते त्यामुळे वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी जाबदारांचे बोलणेवर तसेच जाबदाराने प्रकाशित केलेल्या ब्राऊशरवर विश्वास ठेवून त्यांचे साईज्योत इमू फार्म अँड हँचरीज यांचेकडे गुंतवणूक म्हणून वर पॅरा.6 मधील परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे रक्कम रु.4,00,000/- डिपॉझिट स्वरुपात गुंतवणूक केलेचे जाबदारानी मान्य केले आहे. प्रस्तुत गुंतवणुकीवरील तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान झालेल्या करारात ठरलेप्रमाणे जाबदाराने तक्रारदाराना रक्कम परतावा म्हणून अदा करणेची होती परंतु तक्रारदाराना जाबदाराने फक्त रु.25,000/- अदा केलेले आहेत. उर्वरित रक्कम अदयापपर्यंत अदा केलेली नाही. तक्रारदाराने जाबदाराना बज्याच वेळा सदर रक्कम परत करणेची विनंती केली परंतु जाबदारानी रक्कम परत केलेली नाही. सदर कामी तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे नि.5/1 कडील जाबदाराने प्रकाशित केलेले प्रसिध्दीपत्रक, नि.5/2 कडील करारपत्र, नि.5/4, 5/5, 5/6 कडील रक्कम तक्रारदाराने जाबदारास अदा केलेल्या पावत्या वगैरे बाबींचा विचार करता तकारदाराना जाबदारानी खोटया अमिषांना बळी पाडलेले असून तक्रारदाराकडून सदर इमू फार्मसाठी गुंतवणूक म्हणून रक्कम स्विकारुन व ठरलेप्रमाणे तक्रारदाराना परतावा न देऊन जाबदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांची फसवणूक करुन तक्रारदारास सदोष सेवा पुरवलेचे दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. जाबदाराने तक्रारदाराकडे गुंतवलेली रक्कम देणेची जबाबदारी जाबदाराची असलेचे तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद रक्कम जाबदाराकडे गुंतवलेचे मान्य व कबूल केले आहे. सबब तक्रारदार जाबदाराकडून गुंतवणुकीची व नुकसानभरपाईची रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मे.मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. सबब सदर कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना त्यांनी गुंतवलेली रक्कम रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र) तसेच सदर रकमेवर ठरलेला जून 2011 अखेरचा परतावा रक्कम रु.50,000/-(रु.पन्नास हजार मात्र) व जून 2012 अखेरचा परतावा रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र)असे एकूण रक्कम रु.5,50,000/- अदा करावेत.
3. जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबाबत रक्कम रु.25,000/- अदा करावेत. तसेच अर्जाचा खर्च, प्रवास खर्च, वकील फी वगैरेसाठी जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना रक्कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 60 दिवसात करावे.
5. वरील आदेशाचे पालन जाबदारानी मुदतीत न केलेस तक्रारदारांना जाबदारांविरुध्द कलम 25 व कलम 27 नुसार कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.12-6-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.