Exh.No.17
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 08/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि. 26/04/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 07/01/2014
1) श्री विलास यशवंत लोके
वय 37 वर्षे, धंदा- नोकरी
2) श्री विनोद यशवंत लोके
वय 35 वर्षे, धंदा- नोकरी
दोघे रा.बालवाडी चाळ कमीटी,
दत्तमंदीर रोड, वाकोला पाईप लाईन,
सांताक्रुझ (पूर्व) मुंबई -55 ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री विक्रम विलास जुवाटकर
वय 23 वर्षे, धंदा- ठेकेदार,
2) श्री विनोद विलास जुवाटकर
वय 20 वर्षे, धंदा- ठेकेदार
दोघे राहणार- पडवणे-पालये,
ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारतर्फेः- विधिज्ञ श्री विरेश रा.नाईक
विरुद्ध पक्ष 1 व 2 - एकतर्फा
निकालपत्र
(दि. 07/01/2014)
श्री डी. डी. मडके, अध्यक्ष तक्रारदार यांनी त्यांचे घराचे बांधकामाचा ठेका विरुध्द पक्ष यांस दिलेला होता. तसेच त्यांना आगावू रक्कम दिलेली होती. परंतू विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचेकडून बांधकाम ठेका स्वीकारुन मुदतीत बांधकाम करुन दिले नाही व तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत जाणीवपूर्वक न्यूनता ठेवली म्हणून तक्रारदारांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
2) तक्रारदार यांचे कुटूंबाचे मालकी वहिवाटीचा मौजे आयनल ग्रामपंचायत घर क्र.48 हा घर इमला होता. सदर घर इमला जीर्ण झाल्याने तो दुरुस्त करण्याचे तक्रारदार यांनी सन 2011 चे दरम्यान ठरविले. विरुध्द पक्ष हे एकमेकांचे सख्ये बंधू असून ते घर बांधकामाचा ठेका घेतात. माहे ऑक्टोबर 2011 चे दरम्यान उभय पक्षकारांमध्ये लेखी करार झाला त्यानंतर लगेचच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे अस्तित्वात असलेले घर पाडण्याचे काम सुरु केले. दि.23/10/2011 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस तीन वेगवेगळया धनादेशाद्वारे एकूण रक्कम रु.1,50,000/- व दि.19/11/2011 रोजी रोख रु.50,000/- अदा केले. विरुध्द पक्ष यांनी माहे डिसेंबर अखेरपर्यंत जुने घर पाडून नवीन घराच्या पायासाठी खोदकाम पूर्ण केले. त्यानंतर दि.02/01/2012 रोजी देवगड येथील नोटरी श्री अविनाश माणगावकर यांचेसमोर उभय पक्षकारांमध्ये लेखी करार झाला असे तक्रारदारांचे कथन आहे.
3) तक्रारदार यांचे पूढे असे कथन आहे की, सदर करारानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे घराचे बांधकाम करण्यास टाळाटाळ केली; तरीदेखील तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे सतत पाठपुरावा केल्याने संथगतीने विरुध्द पक्ष यांनी घराच्या भिंती उभ्या करण्यापर्यंतचे काम कसेबसे पूर्ण केले. तक्रादार हे मुंबई येथे कामधंदयानिमित्त राहात असतात; विरुध्द पक्ष यांनी घराचे काम करण्यास टाळाटाळ सुरु केल्याने तक्रारदार यास आपले काम टाकून वारंवार मुंबईहून गावी येऊन विरुध्द पक्ष यांच्याकडे सतत पाठपुरावा करावा लागत आहे.
4) तक्रारदार यांनी पुढे असे कथन केले आहे की, फेब्रुवारी 2012 मध्ये तक्रारदाराचे बांधकामासाठी विरुध्द पक्ष यांनी विलास हडकर यांचेकडून चिरे मागविले परंतु त्यांना रक्कम अदा केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या सांगण्यावरुन तक्रारदार यांनी दोन वेगवेगळया धनादेशाद्वारे रु.46,000/- श्री हडकर यांना दिले. मार्च 2012 च्या दुस-या आठवडयापर्यंत विरुध्द पक्ष क्र.2 यांने तक्रारदार यांचेकडून वेगवेगळया वेळी वेगवेगळया कारणाकरीता रक्कम रु.89,000/- उचल केली. त्याअगोदर दि.17/02/2012 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस रक्कम रु.1,00,000/- अदा केलेले होते. अशा प्रकारे दि.18/03/2012 पर्यंत तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस बांधकामापोटी रु.3,89,000/-, (तीन लाख एकोननव्वद हजार मात्र) चि-याचे रु.46,000/-(सेहेचाळीस हजार मात्र) व विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे जागेवरील ठेवलेले 700 नग दगड, सिमेंट स्वरुपाचे वापरलेल्या मानाचे मुल्य रु,34,600/-(चौतीस हजार सहाशे मात्र) असे मिळून रु.4,69,600/- (रुपये चार लाख एकोणसत्तर हजार सहाशे मात्र) अदा केलेले होते. त्या मोबदल्यात विरुध्द पक्ष यांनी केवळ तक्रादार यांचे जुने घर पाडणे नवीन घराचे 37 x 30 क्षेत्रामध्ये पाया बांधणे, चि-यांच्या भिंती उभ्या करणे, बिम्स व पिलर्स बांधणे, सज्जा व पोर्चवरती स्लॅब टाकणे एवढीच कामे पूर्ण केलेली होती. त्यानंतर वारंवार तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांची भेट घेऊन त्यांचे घराचे काम पूर्ण करुन देणेची विनंती केली; परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या घराचे काम पूर्ण केले नाही.
5) तक्रारदार पुढे कथन करतात की, दरम्यानच्या काळात विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस आपल्याला पैशाची अडचण आहे असे सांगून आपली मारुती ओमनी कार रक्कम रु.2,00,000/- इतक्या रक्कमेस विक्री केली. हाती पैसे आल्यामुळे विरुध्द पक्ष काम पूर्ण करतील असे वाटत होते; परंतु करारामध्ये ठरल्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी दि.15/04/2012 पर्यंत काम पूर्ण करुन दिले नसल्याने तक्रारदार यांनी पुन्हा विरुध्द पक्षाकडे विचारणा केली असता त्यांनी पावसाळयापूर्वी काम पूर्ण करुन देतो असे सांगितले.
6) त्यानंतर तक्रारदार यांनी माहे मे 2012 च्या अखेरच्या आठवडयामध्ये विरुध्द पक्ष यांची भेट घेऊन बांधकामाबाबत विचारणा केली असता विरुध्द पक्ष यांनी यापूढे आपणांस बांधकाम करणे जमणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पुढे असे ठरले की, आतापर्यंत झालेल्या व्यवहाराबाबत हिशेब करण्यासाठी विरुध्द पक्ष यांनी केलेल्या बांधकामाचे मुल्यांकन करुन घेणे व त्यानंतर अंतीम हि शेब करावा. तसेच उभय पक्षकारांच्या दरम्याने पूर्वी झालेला बांधकाम करार संपूष्टात आणण्याचे ठरले. सदर भेटीच्यावेळी दिगंबर बागवे रा.मुणगे हे हजर होते. वरील ठरावाप्रमाणे दि.13/07/2012 रोजी श्री ए.के. शेटये रा.मुंबई यांचेकडून विरुध्द पक्ष यांनी केलेल्या बांधकामाचे मुल्यांकन विरुध्द पक्ष यांच्या उपस्थितीत करुन घेतले. त्यांनी सदर बांधकामाचे मुल्य रु.2,55,600/- केलेले असून त्यामध्ये चि-याची रक्कम रु.46,000/- व विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे वापरलेल्या सामानाचे मुल्य रु.34,600/- यांचा समावेश असल्यामुळे वस्तुस्थितीप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या घराचे केवळ रु.1,75,000/- चे काम केलेले असून तक्रारदार यांचेकडून रु.3,89,000/- स्वीकारलेले आहेत. त्यामुळे स्वीकारलेली जादा उचल रक्कम रु.2,84,000/- विरुध्द पक्ष तक्रारदार यांना देणे लागत असल्याचे तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे.
7) तक्रारदार पूढे असेही कथन करतात की, विरुध्द पक्ष यांनी ठरलेल्या कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण न केल्याने त्यांना अन्य ठेकेदार श्री दिगंबर बागवे यांचेकडून काम करुन घ्यावे लागल्याने त्यांना अतिरिक्त रक्कम रु.50,000/- दयावे लागले. विरुध्द पक्ष यांच्या पुर्णतः बेजबाबदार व अव्यावसायीक वर्तनामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्या त्रासापोटी रक्कम रु.50,000/- वसूल होऊन मिळणेसाठी तसेच बांधकाम व्यवहारापोटी घेतलेली जादा उचलची रक्कम रु.2,84,000/- अतिरिक्त खर्चापोटी रक्कम रु.50,000/- असे मिळून रक्कम रु.3,84,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळावी, याकरिता तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
8) तक्रार अर्ज दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. तक्रार अर्जाची नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हजर झाले नसल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश निर्गमीत करणेत आले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांजवर नोटीस बजावणी झाल्याची पोष्टाची पोहोचपावती अनुक्रमे नि.8 व 7 वर आहेत.
9) तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उततरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? | होय; अंतीम आदेशानुसार. |
3 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
10) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात व शपथपत्रात म्हटले आहे की, त्यांच्या कुटूंबाचे मालकी वहिवाटीचा मौजे आयनल ग्रामपंचायत घर क्र.48 हा घर इमला होता. सदर घर इमला जीर्ण झाल्याने तो दुरुस्त करण्याचे तक्रारदार यांनी सन 2011 चे दरम्यान ठरविले. विरुध्द पक्ष हे एकमेकांचे सख्ये बंधू असून ते घर बांधकामाचा ठेका घेतात. माहे ऑक्टोबर 2011 चे दरम्यान उभय पक्षकारांमध्ये लेखी करार झाला त्यानंतर लगेचच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे अस्तित्वात असलेले घर पाडण्याचे काम सुरु केले. दि.23/10/2011 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस तीन वेगवेगळया धनादेशाद्वारे एकूण रक्कम रु.1,50,000/- व दि.19/11/2011 रोजी रोख रु.50,000/- अदा केले. विरुध्द पक्ष यांनी माहे डिसेंबर अखेरपर्यंत जुने घर पाडून नवीन घराच्या पायासाठी खोदकाम पूर्ण केले. त्यानंतर दि.02/01/2012 रोजी देवगड येथील नोटरी श्री अविनाश माणगावकर यांचेसमोर उभय पक्षकारांमध्ये लेखी करार झाला.
11) तक्रारदार यांनी पुढे म्हटले आहे की, फेब्रुवारी 2012 मध्ये तक्रारदाराचे बांधकामासाठी विरुध्द पक्ष यांनी विलास हडकर यांचेकडून चिरे मागविले परंतु त्यांना रक्कम अदा केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांच्या सांगण्यावरुन तक्रारदार यांनी दोन वेगवेगळया धनादेशाद्वारे रु.46,000/- श्री हडकर यांना दिले. मार्च 2012 च्या दुस-या आठवडयापर्यंत विरुध्द पक्ष क्र.2 यांने तक्रारदार यांचेकडून वेगवेगळया वेळी वेगवेगळया कारणाकरीता रक्कम रु.89,000/- उचल केली. त्याअगोदर दि.17/02/2012 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस रक्कम रु.1,00,000/- अदा केलेले होते. अशा प्रकारे दि.18/03/2012 पर्यंत तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस बांधकामापोटी रु.3,89,000/-, (तीन लाख एकोननव्वद हजार मात्र) चि-याचे रु.46,000/-(सेहेचाळीस हजार मात्र) व विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे जागेवरील ठेवलेले 700 नग दगड, सिमेंट स्वरुपाचे वापरलेल्या मानाचे मुल्य रु,34,600/-(चौतीस हजार सहाशे मात्र) असे मिळून रु.4,69,600/- (रुपये चार लाख एकोणसत्तर हजार सहाशे मात्र) अदा केलेले होते. त्या मोबदल्यात विरुध्द पक्ष यांनी केवळ तक्रादार यांचे जुने घर पाडणे नवीन घराचे 37 x 30 क्षेत्रामध्ये पाया बांधणे, चि-यांच्या भिंती उभ्या करणे, बिम्स व पिलर्स बांधणे, सज्जा व पोर्चवरती स्लॅब टाकणे एवढीच कामे पूर्ण केलेली होती. त्यानंतर वारंवार तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांची भेट घेऊन त्यांचे घराचे काम पूर्ण करुन देणेची विनंती केली; परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या घराचे काम पूर्ण केले नाही.
12) तक्रारदार यांनी पुढे म्हटले आहे की, त्यानंतर तक्रारदार यांनी माहे मे 2012 च्या अखेरच्या आठवडयामध्ये विरुध्द पक्ष यांची भेट घेऊन बांधकामाबाबत विचारणा केली असता विरुध्द पक्ष यांनी यापूढे आपणांस बांधकाम करणे जमणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पुढे असे ठरले की, आतापर्यंत झालेल्या व्यवहाराबाबत हिशेब करण्यासाठी विरुध्द पक्ष यांनी केलेल्या बांधकामाचे मुल्यांकन करुन घेणे व त्यानंतर अंतीम हि शेब करावा. तसेच उभय पक्षकारांच्या दरम्याने पूर्वी झालेला बांधकाम करार संपूष्टात आणण्याचे ठरले. सदर भेटीच्यावेळी दिगंबर बागवे रा.मुणगे हे हजर होते. वरील ठरावाप्रमाणे दि.13/07/2012 रोजी श्री ए.के. शेटये रा.मुंबई यांचेकडून विरुध्द पक्ष यांनी केलेल्या बांधकामाचे मुल्यांकन विरुध्द पक्ष यांच्या उपस्थितीत करुन घेतले. त्यांनी सदर बांधकामाचे मुल्य रु.2,55,600/- केलेले असून त्यामध्ये चि-याची रक्कम रु.46,000/- व विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे वापरलेल्या सामानाचे मुल्य रु.34,600/- यांचा समावेश असल्यामुळे वस्तुस्थितीप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या घराचे केवळ रु.1,75,000/- चे काम केलेले असून तक्रारदार यांचेकडून रु.3,89,000/- स्वीकारलेले आहेत. त्यामुळे स्वीकारलेली जादा उचल रक्कम रु.2,84,000/- विरुध्द पक्ष तक्रारदार यांना देणे लागत आहे.
13) तक्रार अर्ज दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. परंतू नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हजर झाले नसल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश निर्गमीत करणेत आले. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे असा निष्कर्ष निघतो. शिवाय तक्रारदार यांनी तक्रार दाखल करणेपूर्वी पाठविलेली नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी स्वीकारलेली नाही असे दिसून येते.
14) वरील विवेचनावरुन तक्रारदार यांच्याकडून रक्कम स्वीकारुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम अपूरे ठेऊन व जादा घेतलेली रक्कम परत न करुन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
15) मुद्दा क्रमांक 2 – तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून जादा उचल केलेली रक्कम रु.2,84,000/-, अतिरिक्त खर्चापोटी रक्कम रु.50,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- असे एकूण रु.3,84,000/- विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती केली आहे. आम्ही तक्रारदार यांनी नि.15/1 वर दाखल केलेल्या राजन अनंत शेटये यांचे व्हॅल्यूएशन रिपोर्टचे संबंधाने प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केले आहे. त्यानुसार बांधकामाचे मुल्यांकन रु.2,55,600/- झाल्याचे नमूद आहे. तक्रारदार यांनी आपल्या शपथपत्रात विरुध्द पक्ष यांना एकूण रक्कम रु.3,89,000/- आणि चि-याचे रु.46,000/- व जागेवर ठेवलेल्या 700 नग दगड आणि सिमेंट स्वरुपाचे वापरलेल्या मालाचे मुल्य रु.34,000/- असे मिळून रु.4,69,600/- अदा केले असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांचे सदर म्हणणे विरुध्द पक्ष यांनी नाकारलेले नाही. तक्रारदार यांनी तक्रार दाखल करणेपूर्वी पाठविलेली नोटीस देखील विरुध्द पक्ष यांनी स्वीकारलेली नाही. या परिस्थितीत तक्रारदार यांचे शपथपत्रातील म्हणणे मान्य करणे भाग आहे.
16) वरील परिस्थिती पाहता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून रक्कम रु.2,84,000/- व त्यावर तक्रार दाखल दि.26/04/2013 पासून 12% दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांनी मानसिक त्रास व तक्रारीसाठी खर्च झाला आहे हे स्पष्ट आहे. परंतू तक्रारदार यांची मागणी अवास्तव वाटते. तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत.
17) वरील विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
- आदेश –
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.2,84,000/-(रुपये दोन लाख चौ-याऐंशी हजार मात्र) व त्यावर तक्रार दाखल दि.26/04/2013 पासून 12% दराने व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत दयावे.
3) विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र), व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांचे आत दयावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी.
दिनांकः 07/01/2014
Sd/- Sd/- Sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.