जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १५६/२०११
तक्रार दाखल दिनांक – ११/०८/२०११
तक्रार निकाली दिनांक – २३/११/२०१३
साजिद हमीद सय्यद,
उ.व.२६, धंदा – नोकरी
(फौजी) श्रीनगर,
रा.मु.पो. कुसुंबा, ता.जि. धुळे ------------- तक्रारदार
विरुध्द
१) केअर मॅनेजर,
नोकीया इंडिया प्रा.लि.
एम.पी. इंन्फोसिटी, इंडस्ट्रियल
प्लॉट २४३, उदयोग विहार,
गुरगाव १२२०१६, हरियाणा.
२) नोकीया केअर सेवा इन्फोटेक,
गरूड मैदान, फ विंग शॉप,
नं.२७,२८,२९, कमलाबाई
कन्या शाळेसमोर, धुळे.
३) कोमल प्लॅस्टीक,
जमनालाल बजाज रोड, धुळे. ---------- सामनेवाला
सदर प्रकरण आज दि.२३/११/२०१३ रोजी लोकन्यायालयात ठेवण्यात आले. मंचासमोर तक्रारदार व सामनेवाला व त्यांचे वकील हजर आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे नोकीया कंपनीचा मोबाईल बदलुन दिला. तसेच तक्रारदार यांची खर्चीक व मानसीक त्रासापोटीच्या कोणत्याही रकमेबद्दल तक्रार नाही. याबाबत लोकन्यायालयात तडजोड पत्र दाखलकेले आहे. याचा विचार होता दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्याने सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये लोकन्यायालयात समझोता झाल्याने सदर अर्ज पूर्णफेड म्हणून निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२३/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.