Maharashtra

Nanded

CC/09/156

Yadvendra Singh Hira Singh Madnoorkar - Complainant(s)

Versus

Vijaya Bank,Nanded. - Opp.Party(s)

Adv.Sudershan S.Ade.

03 Oct 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/156
1. Yadvendra Singh Hira Singh Madnoorkar R/o Kankayya Compound,Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Vijaya Bank,Nanded. Kothari Complax,Shiviji Nagar,Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 03 Oct 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/156.
                          प्रकरण दाखल तारीख - 08/07/2009
                          प्रकरण निकाल तारीख 03/10/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
               मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
               मा.श्रीमती सुजाता पाटणकर            - सदस्‍या
 
यादवेंद्रसिंघ पि. हिरासिंघ मदनूरकर
वय 39 वर्षे, धंदा, व्‍यापार
रा.कनकयया कंपाऊंड, गुरुद्वारा गेट नं.02, नांदेड                अर्जदार
विरुध्‍द.
शाखाधिकारी,
विजया बँक लि.                                       गैरअर्जदार.                                    कोठारी कॉम्‍पलेक्‍स, शिवाजी नगर, नांदेड.
                   
अर्जदारा तर्फे वकील             - अड.सूर्दशन एस.
गैरअर्जदार  तर्फे वकील          - अड.आर.के.कौडगे.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या )
 
              गैरअर्जदार विजया बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेत खाते आहे सदर खात्‍याचा क्रमांक 505901010001618  असून अर्जदार हा नियमित खात्‍यात रक्‍कम जमा करतो.दि.1.3.2009 ते 25.03.2009चा बँकेचा खाते उतारा अर्जदाराने दाखल केलेला आहे. अर्जदाराच्‍या खात्‍यात दि.01.03.2009 रोजी रु.5,29,231/- जमा होते व दि.25.03.2009 रोजी रु.5,54,231/- रक्‍कमेची नोंद होती. अर्जदाराने बजाज अलांयन्‍स लाईफ इन्‍शूरन्‍स कंपनी लि. यांस रक्‍कम रु.25,000/- चा धनादेश क्र.2227872 पॉलिसी नूतनीकरणासाठी दि.20.03.2009 रोजी दिला होता. सदर धनादेश अर्जदाराचे बचत खाते 505901010001618 चा होता. सदर धनादेश विजया बॅक शाखा शिवाजी नगर नांदेड येथे दि.23.03.2009रोजी आला असता गैरअर्जदार बँकेने धनादेश वटवला नाही व सूचना दिली की अर्जदाराच्‍या बचत खात्‍यात रक्‍कम पूरेशी नाही करीता धनादेश वटविता येत नाही. सदर धनादेश क्र.2227872 ची प्रत सोबत जोडली आहे. सदर रक्‍कम बजाज अलांयन्‍स ला मिळाली असती तर अर्जदाराचा रु.1,00,000/- चा फायदा झाला असता. ही रक्‍कम न मिळाल्‍यामूळे अर्जदाराची पॉलिसी लॅप्‍स झाली. सदर पॉलिसी ही अर्जदाराने त्‍यांच्‍या कूटूंबाच्‍या भविष्‍याच्‍या तरतूदीसाठी काढली होती.अर्जदाराच्‍या खात्‍यात रक्‍कम असताना सूध्‍दा धनादेश न वटविल्‍यामूळे अर्जदाराची प्रतिमा मलीन झाली. अर्जदाराने गैरअर्जदार बँकेस झालेल्‍या नूकसानीची भरपाई मिळण्‍याकरिता दि.4.6.2009 रोजी अर्ज केला होता परंतु बँकेने कोणतीही दखल घेतली नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार बॅकेने अर्जदारास ञूटीची सेवा दिली म्‍हणून त्‍यांची मागणी आहे की, अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाबददल रु.25,000/-  तसेच रु.1,00,000/- वर 18 टक्‍के व्‍याज दराने पूर्ण रक्‍कम वसूल होईपर्यत मिळावे तसेच दाव्‍याचा खर्च रु.5,000/- मिळावा.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांचे त्‍यांचे बँकेत खाते हे त्‍यांना मान्‍य आहे. अर्जदाराचा अर्ज कायदयाच्‍या तरतूदीमध्‍ये येत नसल्‍यामूळे फेटाळण्‍यात यावा. अर्जदाराच्‍या इन्‍शूरन्‍स बददल त्‍यांना काहीही माहीती नाही. अर्जदाराचा धनादेश हा खाते नंबर 1618 चा असून अर्जदारांनी जो  धनादेश दिलेला आहे तो खाते नंबर 1617 चा होता. सदर खाते नंबर          दूस-या व्‍यक्‍तीचा आहे. सदर धनादेश हा दि.23.03.2009 रोजी अक्‍सीस बँक नांदेड यांच्‍याकडून गैरअर्जदार बॅककडे पाठविण्‍यात आला होता परंतु सदर धनादेश हा खाते नंबर 1617 चा असल्‍याने व सदर खात्‍यात पूरेशी रक्‍कम नसल्‍यामूळे दि.23.03.2009 रोजी सदरचा धनादेश न वटता परत अक्‍सीस बँक नांदेड यांना परत करण्‍यात आला. अर्जदाराचे रु.1,00,000/- चे नूकसान झाले हे खोटे व असत्‍य आहे. अर्जदाराचे खाते नंबर 1617 मध्‍ये पूरेशी रक्‍कम नसल्‍याबाबत गैरअर्जदार बॅकेने अक्‍सीस बॅक यांना कळविले. गैरअर्जदार यांनी कोणत्‍याही प्रकारे अर्जदारास ञूटीची सेवा व मानसिक ञास दिलेला नाही.म्‍हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
 
 
          मूददे                                      उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?            होय.
2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1
 
              अर्जदार यांचे गैरअर्जदार बॅंकेमध्‍ये बचत खाते आहे. सदरच्‍या बचत खात्‍यावरुन अर्जदार यांचे पैशा बाबतचे वाद चालू आहेत. अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेमध्‍ये असलेल्‍या बचत खात्‍याचा नंबर 1618 असा होता. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ त्‍यांनी दाखल केलेले मूळ बचत खात्‍याचे पूस्‍तक यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार यांचे खात्‍यामध्‍ये दि.01.03.2009 रोजी रु.5,29,231/- एवढी रक्‍कम जमा आहे. ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या खाते उता-यावरुन स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी बजाज अलांयन्‍स्‍ लाईफ इन्‍शूरन्‍स कंपनी लि. या कंपनीस रक्‍कम रु.25,000/- चा धनादेश पॉलिसी नूतनीकरण करण्‍यासाठी दिला होता.  सदरच्‍या दिलेल्‍या धनादेशचा नंबर 2227872 असा असून तो दि.20.03.2009 रोजीचा आहे. सदरचा अर्जदार यांनी दिलेला धनादेश बजाज अलांयन्‍स लाईफ इन्‍शूरन्‍स कंपनी लि. यांनी वटवण्‍याकरिता अक्‍सीस बॅंकेमध्‍ये दि..23.03.2009 रोजी टाकला आहे. सदरचा धनादेश वटण्‍याकरिता अर्जदार यांचे खाते असलेल्‍या विजया बँक शाखा शिवाजी नगर नांदेड येथे दि.23.03.2009 रोजी वटण्‍याकरिता आला असता गैरअर्जदार बँकेने अर्जदार यांचा धनादेश  खात्‍यात पूरेशी रक्‍कम नाही या कारणाकरिता वटवता येत नाही असे कारण देऊन प्रस्‍तूतचा धनादेश न वटविता परत पाठविला आहे.अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी त्‍यांचे गैरअर्जदार बॅंकेमध्‍ये असलेल्‍या खात्‍याचा उतारा दाखल केलेला आहे. त्‍यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे खाते नंबर 1618 या खात्‍यावरुन त्‍यांचा इतर पैशा बाबतचे व्‍यवहार झाल्‍याचे दिसून येत आहे. गैरअर्जदार विजया बँक यांनी दि.23.03.2009 रोजी अक्‍सीस बँकेला धनादेश न वटल्‍या बाबतचे पञ दिलेले आहे. प्रस्‍तूतचे पञ अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेले आहे. त्‍यानंतर अर्जदार यांनी दि.4.6.2009 रोजी गैरअर्जदार बँकेला नोटीस वजा पञ दिलेले आहे. त्‍यामध्‍ये अर्जदार यांनी चेक न वटल्‍यामूळे अर्जदार यांना झालेल्‍या नूकसानीची मागणी अर्जदार यांनी या पञाद्वारे गैरअर्जदार यांचेकडे केल्‍याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या दि..4.6.2009 रोजीच्‍या पञावरुन स्‍पष्‍ट होत आहे. सदरची नोटीस मिळूनही गैरअर्जदार यांनी या बाबत कोणतीही कारवाई केली नाही अगर अर्जदार यांना नोटीस ही दिलेली नाही. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी दाखल केलेल्‍या कागदपञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे गैरअर्जदार बँकेमध्‍ये असलेल्‍या बचत खात्‍यांचा नंबर 1618 असा आहे. गैरअर्जदार बँकेने अर्जदार यांनी दिलेला चेक  बूकही बचत खाते नंबर 1618 चेच आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये खाते नंबर 1617 मध्‍ये पूरेशी रक्‍कम नसल्‍यामूळे चेक परत पाठविल्‍याचे नमूद केलेले आहे. वास्‍तविक पाहता बँकेमध्‍ये एखादया ग्राहकाचा चेक वटण्‍यासाठी आला असताना त्‍या ग्राहकाचे खाते नंबर व त्‍या ग्राहकाची सही व त्‍यांचेकडे नोंदणी केलेली सही यांची खाञी करणे व त्‍यानंतरच चेक बाबत पूर्तता करणे हे बँकेचेच अद्य कर्तव्‍य आहे. परंतु या ठिकाणी गैरअर्जदार बँकेने अर्जदार यांचे बचत खाते नंबर 1618 व चेक बूक नंबर 1618 असे असताना  खाते नंबर 1617 मधील कलावतीबाई जोंधळे यांचे खात्‍यात अर्जदार यांचा चेक जमा करुन पूरेशी रक्‍कम नाही असा शेरा मारुन अर्जदार यांचा चेक परत पाठवून अर्जदार यांचा सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी अर्जदार यांची पॉलिसी लॅप्‍स झाल्‍यामूळे अर्जदार यांचे रु.1,00,000/- चे नूकसान झालेले आहे असे अर्जामध्‍ये नमूद केलेले आहे. परंतु तसे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्‍ये दाखल केलेला नाही. त्‍यामूळे अर्जदार यांचे रु.1,00,000/- ची नूकसान भरपाईची मागणी मान्‍य करता येत नाही असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांनी पॉलिसी नूतनीकरणाकरिता रक्‍कम रु.,25,000/- चा धनादेश गैरअर्जदार बँकेला दिलेला आहे. अर्जदार यांचे खात्‍यामध्‍ये पूरेशी रक्‍कम असतानाही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा चेक न वटता परत पाठविला आहे. सदर गैरअर्जदाराच्‍या  सेवेतील कमतरतेसाठी अर्जदार यांना या मंचामध्‍ये अर्ज करावा लागला व त्‍याअनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. अर्जदार यांचा धनादेश गैरअर्जदार बँकेने न वटवता परत पाठविल्‍यामूळे अर्जदार यांना पॉलिसीचे नूतनीकरण करिता ञास झालेला आहे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
              अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेली कागदपञे, त्‍यांचे तर्फे वकिलाचा यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ व त्‍यांचे तर्फे वकिलाचा यूक्‍तीवाद. वरील सर्व विवेचनाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.
 
                         आदेश
         आजपासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार
         यांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.
1.                                         मानसिक ञासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
2.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील     श्रीमती सुजाता पाटणकर    श्री.सतीश सामते     
          अध्‍यक्ष                                  सदस्‍या                           सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.