Maharashtra

Chandrapur

CC/21/177

Shri.Rajkumar Fatechand Manwani - Complainant(s)

Versus

Vijay Wing Honda and others - Opp.Party(s)

Adv.Abhay U.Kullarwar

03 May 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/177
( Date of Filing : 07 Oct 2021 )
 
1. Shri.Rajkumar Fatechand Manwani
R/o.Jaiswal Colony ,Sindewahi,chandrapur Sindhi Colony,Khamla,Nagpur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Vijay Wing Honda and others
Vijay Suresh Agrawal 107/63,Plot no.1,Mul Road,Chandrapur
chandrapur
Maharshtra
2. Vijay Suresh Agrawal
107/63,Plot no.1,Mul Road,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 03 May 2023
Final Order / Judgement

:::नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

                    (पारीत दिनांक०३/०५/२०२३)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम ३५ सह ३८अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्ता हा नागपूर येथील रहिवासी आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे होंन्‍डा कंपनीचे अधिकृत विक्रेता आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे कार्यकारी संचालक असून त्‍याच्‍या नियंञणाखाली विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व्‍यवसाय करतात. तक्रारकर्त्‍यास जानेवारी २०१८ मध्‍ये होंन्‍डा कंपनी निर्मित हॉरनेट- १६० SPED ही मोटरसायकल विकत घ्‍यावयाची असल्‍याने ते विरुध्‍द पक्षाचे शोरुम मध्‍ये गेले असता त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडून  कोटेशन ची मागणी केली. विरुध्‍द पक्ष यांनी दिलेल्‍या कोटेशन नुसार वाहनाची किंमत रुपये १,०३,६५०/- आहे. तक्रारकर्त्‍यास मोटरसायकल खरेदी करण्‍याकरिता कर्ज घ्‍यावयाचे असल्‍यामुळे त्‍यांनी कर्जाकरिता लागणारे दस्‍तावेज व कोटेशन निवेदिता महिला क्रेडिट को-ऑप सोसायटी, नवरगांव, शाखा सिंदेवाही कडे जमा केले.  सोसायटीने दिनांक १७/०१/२०१८ रोजी तक्रारकर्त्‍यास रुपये १,०३,६५०/- मंजूर करुन ही रक्‍कम दिनांक १४/८/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍या  खात्‍यात धनादेश क्रमांक ३६७३४८ व्‍दारे जमा केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून मिळालेल्‍या कोटेशन नुसार रुपये १,०३,६५०/- रक्‍कम उपरोक्‍त गाडी खरेदी करण्‍याकरिता दिल्‍यानंतर त्‍यांनी ती गाडी एक महिण्‍यांत मिळेल असे तक्रारकर्त्‍याला सांगितल्‍याने तक्रारकर्त्‍याने मार्च २०१८ पर्यंत विरुध्‍द पक्षांकडे  मोटरसायकल करिता पाठपुरावा केला नाही. तक्रारकर्त्‍याने मोटरसायकल खरेदी केल्‍यानंतर ती तक्रारकर्त्‍याचे नावाने आर.टी.ओ. कार्यालय, चंद्रपूर येथे पंजीकरण करुन देण्‍याची जबाबदारी ही विरुध्‍द पक्ष यांची होती आणि आहे. विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक ३१/०३/२०१८ पर्यंत तक्रारकर्त्‍यास मोटरसायकल पंजीकरण करुन ताबा दिला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांकडे चौकशी केली असता त्‍यांनी उपरोक्‍त गाडीचा कंपनीकडून कमी पुरवठा होत आहे त्‍यामुळे डिलेवरी देण्‍यास विलंब होत असल्‍याचे कारण सांगितले. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांचेकडे प्रत्‍येक वेळी मोटरसायकल चे पंजीकरण करुन ताबा देण्‍याची विनंती केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास टाळले. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त वाहन पंजीकरण करण्‍याकरिता रहिवासी बाबत दस्‍तावेज व फोटो तसेच इतर आवश्‍यक दस्‍तावेज सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांना फेब्रुवारी २०१८ मध्‍येच दिले होते याची जाणीव तक्रारकर्त्‍याने करुन दिली. तेव्‍हा विरुध्‍द पक्षांनी  तक्रारकर्त्‍याकडून गाडी पंजीकरण करण्‍याकरिता लागणा-या फॉर्मवर सह्रया सुध्‍दा घेतल्‍या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास गाडीचे कोटेशन देतेवेळी सुध्‍दा  गाडीची ऑनरोड किंमत फक्‍त रुपये ९०,०००/- असतांना सुध्‍दा जास्‍तीची किंमत आकारुन रुपये १,०३,६५०/- चे कोटेशन दिले व अतिरिक्‍त किंमत तक्रारकर्त्‍याकडून घेतली,ही सर्व रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे दिनांक १४/०२/२०१८ पासून  व्‍यवसायामध्‍ये उपभोगीत आहे. याउलट तक्रारकर्ता हा वाहन व पैसा या दोन्‍हीचे उपभोगापासून वंचित झाला असून त्‍याला संस्‍थेकडून घेतलेलया कर्जाच्‍या रकमेवर ११ टक्‍के दराने व्‍याज सुध्‍दा भरावा लागत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/४/२०१९  रोजी अधिवक्‍ता श्री अभय कुल्‍लवार यांचे मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना नोटीस पाठवून त्‍यामध्‍ये गाडी तसेच गाडी ताब्‍यात मिळेपर्यंत व्‍याजाची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाने नोटीसचा लिफाफा घेण्‍यास नकार दिल्‍याने तो वकीलाकडे परत आला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांना मोटरसायकल ची संपूर्ण मोबदला रक्‍कम रुपये १,०३,६५०/-, दिनांक १४/०२/२०१८ रोजी दिली असून ती विरुध्‍द पक्षांना प्राप्‍त झाल्‍यानंतर सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी गाडी पंजीकरण करुन ताबा तक्रारकर्त्‍याला दिला नाही ही विरुध्‍द पक्षाने अवलंबिलेली अनुचित व्‍यापार पध्‍दती असून तक्रारकर्त्‍यास न्‍युनतापूर्ण सेवा दिली त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास नवीन होंन्‍डा हॉरनेट-१६० SPED तक्रारकर्त्‍याच्‍या नावे पंजीबध्‍द करुन ताब्‍यात द्यावी आणि तक्रारकर्त्‍यास दिनांक १४/२/२०१८ पासून मोटरसायकल ताब्‍यात मिळेपर्यंत द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने व्‍याज द्यावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये ५०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे अशी प्रार्थना केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याची तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष हजर होऊन त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे होंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते आहे आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कंपनीचे मॅनेजींग डायरेक्‍टर आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून होंन्‍डा कंपनी निर्मित हॉरनेट- १६० SPED  चे कोटेशन घेतले होते तसेच तक्रारकर्त्‍याने  निवेदिता महिला क्रेडिट को-ऑप सोसायटी, नवरगांव, शाखा सिंदेवाही यांचेकडून रुपये १,०३,६५०/- विरुध्‍द पक्ष यांचे खात्‍यात जमा केले तसेच तक्रारकर्त्‍याने मोटरसायकल विकत घेतल्‍यानंतर तिचे आर.टी.ओ. चंद्रपूर यांचे कार्यालयात पंजीकरण करुन देण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष यांची आहे, या बाबी मान्‍य केल्‍या व त्‍यांनी पुढे नमूद केले की, गाडी पंजीकरण करण्‍याकरिता तक्रारकर्ता हा चंद्रपूर जिल्‍ह्याचा रहिवासी असल्‍याबाबत आधार कार्ड, वोटर आय.डी. व वीजेचे देयक हे दस्‍तावेज आवश्‍यक आहे आणि याची माहिती तक्रारकर्त्‍याला गाडी घेण्‍याअगोदर दिली होती. परंतु तक्रारकर्त्‍याने सदर दस्‍तावेज आणून न दिल्‍यामुळे वाहनाचे पंजीकरण आर.टी.ओ. कार्यालय, चंद्रपूर मध्‍ये होऊ शकले नाही. तक्रारकर्ता हे गाडी घेऊन गेले होते आणि ३ महिणे चालविल्‍यानंतर त्‍यांनी गाडी शोरुमला परत आणून दिली. सदर वाहनाचे पंजीकरण झाले नव्‍हते पंरतु विरुध्‍द पक्षाने वाहनाचे पंजीकरण करुन देण्‍यासाठी आर.टी.ओ. कार्यालय चंद्रपूर ला लागत असलेली सर्व कागदोपञी कार्यवाही तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने दिनांक ६/३/२०१८ रोजी पूर्ण केलेली होती. तक्रारकर्त्‍याचे रहिवासी बाबतचे दस्‍तावेज हे चंद्रपूर जिल्‍ह्याचे नसून नागपूर येथील आहे. यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या  वाहनाचे पंजीकरण हे चंद्रपूर जिल्‍हयात होऊ शकत नाही. वास्‍तविक तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाव्‍दारे चालविण्‍यात येणारे सिंदेवाहीच्‍या शोरुम मधून वादातील वाहन घेतलेले आहे आणि ते शोरुम श्री सुनिल जनबंधु चालवितात. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास वारंवार चंद्रपूर जिल्‍हयाचे रहिवासीचे दस्‍तावेजची मागणी केली परंतु तक्रारकर्त्‍याने सदर दस्‍तावेज विरुध्‍द पक्षास पुरविले नाही. जर रहिवासी बाबत दस्‍तावेज नसेल तर चंद्रपूर च्‍या आर.टी.ओ. मध्‍ये तात्‍पुरते पंजीकरण करुन नागपूर आर.टी.ओ. मध्‍ये त्‍याचे पंजीकरण करावे लागते असे तक्रारकर्त्‍यास सांगितले. परंतु तक्रारकर्त्‍याला चंद्रपूरलाच आर.टी.ओ. पासिंग करुन पाहिजे होते. तक्रारकर्त्‍याने वाहनाचे पंजीकरण करण्‍याकरिता आवश्‍यक दस्‍तावेजाची वारंवार मागणी करुन सुध्‍दा ते न दिल्‍याने आणि  बी.एस.४ मॉडेलच्‍या वाहनाचे दिनांक ३१/०३/२०२० पासून आर.टी.ओ. मध्‍ये पंजीकरण बंद होत असल्‍यामुळे आणि तक्रारकर्त्‍याने दस्‍तावेज न दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला सदर वाहनाचे पंजीकरण हे सिंदेवाही शोरुम चालविणारे श्री सुनिल जनबंधुच्‍या नावाने करावे लागले. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्ष हे सदर गाडीचे पंजीकरण तक्रारकर्त्‍याच्‍या नावाने ट्रान्‍सफर करुन देण्‍यास तयार आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने दस्‍तावेज दिले नाही आणि चंद्रपूर मधूनच पासिंग पाहिजे यावर तक्रारकर्ता अडून राहिला. तक्रारकर्त्‍याने सदर वाहन ३ महिणे चालविल्‍यानंतर ते वाहन सिंदेवाही शोरुमला सोडून गेले व अजुनही ते वाहन शोरुमला आहे. सबब तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केली असल्‍यामुळे ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.
  4. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ, तक्रार, शपथपञ आणि तक्रारीतील मजकुरालाच लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशी पुरसीस, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ आणि २ यांचे लेखी कथन, दस्‍तावेज, शपथपञ आणि लेखी उत्‍तर आणि शपथपञालाच लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशी पुरसीस, उभयपक्षांचे तोंडी युक्तिवाद आणि परस्‍पर विरोधी कथनावरुन निकालीकामी खालील मुद्दे व निष्‍कर्ष नोंदविण्‍यात आले असून त्‍यावरील कारणमीमांसा पुढीलप्रमाणे..

 

अ.क्र.                       मुद्दे                                                निष्‍कर्षे

१. विरुध्‍द पक्ष क्रं. १ व २ यांनी तक्रारकर्त्‍यास होय               होय

न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ       

२. आदेश काय?                                                  अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमीमांसा

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्ता यांनी होंन्‍डा कंपनीचे अधिकृत विक्रेता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून हॉरनेट-१६० SPED ही मोटरसायकल खरेदी करण्‍याकरिता त्‍यांनी दिलेल्‍या  कोटेशननुसार रुपये १,०३,६५०/- चे वाहन कर्ज निवेदिता महिला क्रेडिट को-ऑप सोसायटी, नवरगांव, शाखा सिंदेवाही यांचेकडून घेतले. त्‍यांनी दिनांक १०/०२/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे नावे एस.बी.आय. शाखा सिंदेवाही चा धनादेश क्रमांक ३६७३४८ दिले असून ते दिनांक १४/०२/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे खात्‍यात जमा झालेले आहे, ही बाब विरुध्‍द पक्षांनी मान्‍य केलेली असल्‍याने तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २यांचा ग्राहक आहे, ही बाब निर्विवाद आहे. तक्रारीत दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना उपरोक्‍त मोटरसायकल खरेदी करण्‍यासाठी संपूर्ण रक्‍कम रुपये १,०३,६५०/- दिनांक १४/०२/२०१८ रोजी दिल्‍यावर सुध्‍दा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍यास सदर गाडीचा ताबा देऊन त्‍याचा चंद्रपूर आर.टी.ओ. कार्यालय येथे पंजीकरण करुन दिले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास सदर वादातील वाहन त्‍याच्‍या नावे चंद्रपूर आर.टी.ओ. कार्यालय येथे नोंदणी करण्‍याकीरता रहिवासी दाखला आणि इतर आवश्‍यक दस्‍तऐवजाची मागणी केली तसेच तक्रारकर्त्‍याने सदर वाहन तीन महिणे चालविल्‍यानंतर सिंदेवाही शोरुमला सोडून दिले या बाबी  कोणताही दस्‍तावेज वा पुरावा दाखल करुन सिध्‍द केलेल्‍या  नाहीत. दाखल दस्‍तऐवजावरुन पूर्ण मोबदला रक्‍कम घेऊनही तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी वाहनाचा ताबा सुध्‍दा दिला नाही. तसेच वाहनाचे पंजीकरण करणे शक्‍य नसल्‍यामुळे त्‍याची पूर्ण मोबदला रक्‍कम सुध्‍दा तक्रारकर्त्‍यास परत केली नाही. दिनांक ३१/०३/२०२० पासून बी.एस.४ मॉडेलचे आर.टी.ओ. मध्‍ये  पंजीकरण बंद होत असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षांनी सदर वाहन हे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ शोरुम चे श्री सुनिल जनबंधु यांचे नावाने पंजीकरण करुन दिले आहे आणि ते वाहन विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे आहे असे विरुध्‍द पक्षाने लेखी उत्‍तरात कथन केले आहे. अशा परिस्थितीत वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडून होंन्‍डा हॉरनेट-१६० SPED मोटरसायकल खरेदी करण्‍याकरिता कोटेशन नुसार सोसायटीने धनादेशाव्‍दारे वाहनाच्‍या कर्जाची जमा केलेली संपूर्ण मोबदला रक्‍कम रुपये १,०३,६५०/- परत मिळण्‍यास तसेच त्‍याने वाहन खरेदी करण्‍याकरिता कर्ज घेतल्‍यामुळे त्‍याला कर्जावर व्‍याजाचा भरणा करावा लागला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला  आणि वाहनाच्‍या उपभोगापासून सुध्‍दा वंचित राहावे लागले त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडून नुकसान भरपाई रक्‍कम आणि तक्रार खर्च मिळण्‍यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ च्‍या विवेचनावरुन आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १७७/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास विवादीत होंन्‍डा हॉरनेट-१६० SPED मोटरसायकल खरेदी करण्‍याकरिता जमा केलेली मोबदला रक्‍कम रुपये १,०,३,६५०/- परत द्यावी.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये २५,०००/- व तकारीचा खर्च रक्‍कम रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.