जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/239 प्रकरण दाखल तारीख - 23/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या सागर संतोश जैस्वाल वय वर्षे 23, धंदा शिक्षण रा.पोलिस क्वॉर्टर, परभणी . अर्जदार. विरुध् 1. विजय पवार, प्राचार्य व संस्थाचालक ग्रामीण तंञनिकेतन, विष्णूपूरी, नांदेड गैरअर्जदार 2. प्रकाश पवार,प्रबंधक, ग्रामीण तंञनिकेन, विष्णूपूरी,नांदेड अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदारा तर्फे वकील - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा परभणी येथील रहीवासी असून त्यांने आयटीआय येथून रेफ्रीजरेशन आणि कुलींग चा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे व मेकॅनिकल द्वितीय वर्षासाठी ग्रामीण तंञनिकेन विष्णूपरी नांदेड येथे प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केलेला होता. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडे दि.17.08.2009 रोजी रजिस्ट्रेशन फिस रु.100/- व द्वितीय वर्षासाठी फिस रु.17,500/- चा भरणा केलेला होता. यानंतर दि.18.08.2009 रोजी संस्थेत शिकण्यासाठी आलो असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तूम्ही रु.5000/- पून्हा भरा असे सांगितले. रक्कमेची तयारी होत नसल्यामूळे मी व वडिलांनी रु.5000/- भरु शकत नाही व संस्थेत भरलेले पैसे परत मिळावे असे म्हणालो असता आठ दिवसानंतर मिटींग झाल्यावर परत करतो असे सांगितले. यानंतर मी आठ दिवसानंतर व परत एक महिन्यानंतर संस्थेत जाऊन पैशाची मागणी केली असता प्रबंधक पवार यांनी प्राचार्य मूंबईला मिटींगला गेलेले आहेत ते परत आल्यावर त्यांना विचारुन तूमचे पैसे परत करु असे सांगितले. यानंतर मी प्रत्येक आठ ते दहा दिवसांला परभणी येथून विष्णूपूरी येथे जाऊन संस्थाचालक व प्रबंधक यांना पैसे परत करण्याची विनंती केली. पण अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पैसे परत केलेले नाहीत व चकरा मारुन शारीरिक, मानसिक व आर्थिक ञास दिलेला आहे. यानंतर दि.19.01.2010रोजी गैरअर्जदारांकडे गेलो असता रक्कम देण्यास नकार दिला. परत अर्जदार यांनी परत एकदा गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे दि.18.08.2010 रोजी जाऊन शेवटचा प्रयत्न केला असता त्यांनी रक्कम देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी आजपर्यत रक्कम दिली नाही. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, जमा केलेली रक्कम रु.17,500/- व नूकसान भरपाई मिळावी. 2. गैरअर्जदार हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार यांने वर्ष 2009-2010करिता संस्थेमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगला द्वितीय वर्षाकरिता दि.17.08.2009 रोजी प्रवेश घेतला होता. अर्जदाराने इतर मागासवर्ग प्रवर्गातून प्रवेश घेऊन रु.13,055/- भरले होते. त्यांची पावती क्र.8432 दि.21.08.2009 सोबत जोडली आहे. शैक्षणीक वर्ष 2009-2010 करिता प्रवेशाची कट ऑफ डेट ही दि.31.08.2009 अशी होती. अर्जदाराने दि.01.09.2009 रोजी संस्थेतून प्रवेश रदद करण्याकरिता अर्ज सादर केला त्यांची सत्य प्रत सोबत जोडली आहे. अर्जदाराने कट ऑफ डेट नंतर प्रवेश रदद करण्यासाठी अर्ज दिल्या असल्याने संस्थेतील एक जागा रिक्त राहीली आहे. अर्जदाराने दि.31.08.2009 रोजी शासकीय तंञनिकेतन नांदेड येथे मॅकेनिकल इंजिनिअरिंग थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतला होता व अर्जदाराने दि.01.09.2009 रोजी टि.सी.ची मूळ प्रत शासकीय तंञनिकेतन नांदेड येथे सादर केले आहे. शासकीय तंञनिकेतनचा येथील प्रवेश अर्ज सोबत जोडला आहे. अर्जदाराने वर्ष 2009-2010 हे वर्ष शासकीय तंञनिकेतन येथे पूर्ण केली आहे त्यासाठी त्यांच्या परिक्षेची गूणपञिका सोबत जोडली आहे. अर्जदाराचे या संस्थेकडून कोणतेही शैक्षणीक नूकसान झाले नसून अर्जदाराने शासकीय तंञनिकेतनमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरीग थेट द्वीतीय वर्षात प्रवेश मिळवला असून तसेच परिक्षा क्रमांक 629790 अन्वये तृतीय सञाची हिवाळी परिक्षा नोंव्हेबर 2009 मध्ये दिली आहे. म्हणून अर्जदाराची तक्रार ही चूकीची असून ती फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकल्यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तरे. 1. अर्जदार हे ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 व 2 – 4. हे दोन्ही मूददे परस्पराशी पूरक असल्यामूळे एकञितपणे चचिण्यात येत आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपञावरुन असे दिसते की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि.17.8.2009 रोजी प्रवेश घेतला होता. परंतु त्यादिवशी त्यांनी फक्त रु.100/- एवढीच रक्कम त्यांचेकडे भरली होती कारण तशा प्रकारची पावती नंबर 7200 अर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केलेली आहे ? पूढील काही रक्कम भरल्याबददलची पावती अर्जदाराने का दाखल केली नाही ? त्याबददलचा खूलासा अर्जदाराने केलेला नाही. तथापि गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दि.17.8.2009 रोजी त्यांचे संस्थेत अर्ज करुन प्रवेश घेतला होता व त्याबददल दि.21.8.2009 रोजी फक्त रु.13,055/- टयूशन फिस व डेव्हलपमेंट फिस साठी म्हणून एकञितपणे पावती नंबर 8432 प्रमाणे भरले होते. गैरअर्जदारांनीच सदरील पावतीची झेरॉक्स प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. त्यावरुन असे दिसते की, गैरअर्जदारांनी टयूशन फिस म्हणून रु.9300/- व डेव्हलपमेंट फिस म्हणून रु.3153/-असे एकूण फक्त रु.13,055/- गैरअर्जदाराकडे भरले होते. वरील तफावत जरी लक्षात धरली तरी अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे प्रवेश घेतल्यामूळे तो त्यांचा ग्राहक होऊ शकतो. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. 5. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराने फक्त एकच पावती रेकार्डवर दाखल केली व ती ही दि.17.8.2009 रोजी फक्त रु.100/- रजिस्ट्रशेन फिस म्हणून भरल्याची आहे ? इतर कोणतीही रक्कम भरल्याबददल अर्जदाराने कसलीही पावती दिलेली नाही. यावरुन असे स्पष्ट दिसते की, अर्जदाराचे अर्जातील कथन की, त्यांनी रजिस्ट्रेशन फि म्हणून रु.100/- व इतर रु.17500/- गैरअर्जदाराकडे प्रवेश घेण्यासाठी भरले होते हे धांदात खोटे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे गैरअर्जदाराने पावती नंबर 8432 दि.21.08.2009 रोजीची दाखल केली त्याप्रमाणे अर्जदाराने एकूण रक्कम रु.13,055/- एवढेच भरल्याचे दिसून येते. 6. गैरअर्जदाराच्’या कथनाप्रमाणे असे दिसते की, कट ऑफ डेट ही दि.31.08.2009 होती व अर्जदाराने त्या दिनांकापूर्वीच त्यांचा प्रवेश रदद करणे आवश्यक होते परंतु तसे न करता त्यांनी कट ऑफ डेट गेल्यानंतर दूसरे दिवशी म्हणजे दि.01.09.2009 रोजी प्रवेश रदद करण्याबददलचा अर्ज गैरअर्जदाराकडे दिला ? त्या अर्जाची प्रत रेकार्डवर दाखल आहे. त्या अर्जातील मजकूर पाहता असे दिसते की, अर्जदाराचा नंबर शासकीय तंञनिकेतन नांदेड येथे लागल्यामूळे त्यांला लागणारे मूळ कागदपञ गैरअर्जदाराकडून वापस पाहिजे होते व भरलेली फिस देखील वापस पाहिजे होती. सदरील अर्जावर अर्जदाराची सही आहे व त्यांचे खाली दि.01.09.2009 अशी स्वतःचे हस्ताक्षरात लिहीलेले आहे. यांचा अर्थ अर्जदाराने तो प्रवेश रदद करण्यासाठी अर्ज कट ऑफ डेट नंतर दिल्याचे सिध्द होते. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने शासकीय तंञनिकेतन नांदेड मध्ये प्रवेश घेऊन तेथे परिक्षाही दिलेली आहे त्यामूळे त्यांचे शैक्षणीक करिअरचे कोणतेही नूकसान झालेले नाही. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने प्रवेशापोटी मागासवर्गीय प्रवर्गातून मूळ फिस च्या फक्त अर्धी फिस म्हणजे रु.13,055/- भरली होती. त्यांचे म्हणणेप्रमाणे कट ऑफ डेट च्या दिवशी किंवा त्यापूर्वी अर्जदाराने अर्ज करावयास पाहिजे होता परंतु तसे न करता अर्जदाराने दि.01.09.2009 रोजी अर्ज दिला त्यामूळे तो आता फिस वापस मागू शकत नाही. 7. कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदार हा त्यानंतर पोलिस स्टेशन मध्ये गेला व त्यांने पोलिस स्टेशनमध्हये गैरअर्जदाराचे विरुध्द दि.19.01.2010 रोजी फिर्यादही दिली ? त्या फिर्यादीमध्ये ही त्यांनी एकूण रु.17500/- भरल्याचा खोटा उल्लेख केलेला आहे ? मूळ तक्रारीमध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांनी एकूण रु.17600/- भरले, पोलिस फिर्यादीत असे म्हटले आहे की, एकूण रु.17500/- भरले व नतंरही गैरअर्जदाराने त्यांना रु.5000/- ची मागणी केली, जी अर्जदार पूर्ण करु शकले नाही ? एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदार हा धांदात खोटे लिहीत आहे, विनाकारण पोलिस स्टेशनला खोटे अर्जही दिलेला आहे ? त्यांने स्वतःहूनच शासकीय तंञनिकेतन नांदेड मध्ये प्रवेश घेऊन आपले करिअर शाबूत करुन घेतले व त्यानंतर खोटया कथनाचे आधारावर ही खोटी तक्रार दाखल केली आहे. एका प्रामाणिक विद्यार्थीकडून अशी कृती अपेक्षीत नाही ? एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. त्यामूळे अर्जदार हा सदरी न भरलेली रक्कम रु.17500/- किंवा रु.17600/- मागण्यास हक्कदारच नाही. एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचापूढे आलेला नाही त्यामूळे तो वरील कोणतीही रक्कम मागण्यास पाञच नाही. म्हणून मूददा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मूददा क्र.3 ः- 8. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराने फक्त रु.100/- भरल्याची पावती रेकार्डवर आहे पण इतर कोणतीही रक्कम भरल्याचे पावती रेकार्डवर नाही ? ती का दाखल केली नाही ? याबददल कोणताही खूलासा केलेला नाही.पूराव्यावरुन असे दिसते की, कट ऑफ डेट गेल्यानंतर त्यांनी गैरअर्जदाराकडील आपला प्रवेश रदद करण्यासाठी स्व हस्ताक्षरात व स्वतःचे सहीने अर्ज दिला त्यामूळे अर्जदाराची चूक दिसते म्हणून तो कोणतीही रक्कम गैरअर्जदाराकडून मागू शकत नाही, असे आमचे मत झाले आहे.. एकंदर कागदपञावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |