ग्राहक तक्रार क्रमांकः-200/2007 तक्रार दाखल दिनांकः-10/05/2007 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-03वर्ष0महिने21दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे विजय एनक्लेव्ह को.ऑप.हौसिंग सोसायटी लि., कावेसर,घोडबंदर रोड,ठाणे.(प)400 607 तर्फे सदस्य श्री.वाय आर.रघवान. ...तक्रारकर्ता विरुध्द विजय डेव्हलपर्स, ऑफिस कॉम्प्लेक्स विजय नागरी कावेसर, घोडबंदर रोड,ठाणे(प)400 607 ...वि.प.
उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.जी.एन.मोहिले विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.ए.आर.कुलकर्णी गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार विरुध्दपक्षकार यांचे विरुध्द दिनांक 10/05/2007 रोजी नि.1 प्रमाणे दाखल केली आहे.त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना आजतागायत पुढील सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने पुर्तता होऊन मिळण्याकरीता विनंती अर्ज दाखल केला आहे. 1)क्लब हाऊस, स्विमींग पुल तयार करुन मिळावा.2)ओरीजनल प्लॅन नुसार रिकामी ठेवण्यात आलेली जागा व पार्कींग एरीया न दिल्याने मिळणे बाबत प्लॅन नुसार असलेली जागा अन्य व्यक्तींनी अभिहस्तांतरण केले आहे. 3)ताबा प्रमाणपत्र मिळणे व अभिहस्तांतरण प्रमाणपत्र मिळावे.4)सोसायटीचे सर्व सभासदाचे सविस्तर हिशोब (अकौंट) मिळावे.5)सोसायटी कार्यालयाकरीता जागा उपलब्ध करुन दिलेली नाही.6)इमारतीस रंगकाम व्यवस्थित केलेले नाही व अनेक ठिकाणी गळती आहे योग्य दर्जाचे साहित्याचा वापर न केल्याने दुरुस्ती होऊन मिळावी. 2/- इतर अनुशंगीक दाद मिळावी. 7)अर्जाचा खर्च, नुकसान भरपाई रक्कम व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी नि.8वर लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर सादर केला आहे. त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणे. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचा अर्ज नाकबुल केला. तक्रारदार यांना विरुध्दपक्षकार यांचे बरीचशी रक्कम दिलेली नसल्याने दिवाणी न्यायालयामध्ये रक्कम वसुली करीता दावे दाखल केलेले असल्याने सदर तक्रार मंचात चालवण्यास पात्र नाही. बिल्डींग नं.1ते3 करीता सर्व सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. बिल्डींग नं.4व5 अपुर्ण कामे असल्याने प्रमाणपत्रे देता येत नाही. बिल्डींग नं.1ते3 करीता प्रमाणपत्र मिळण्याकरीता 18/12/2006 रोजी महानगर पालीकेमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत. सर्वसाधारण एकत्रीत सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देणे अशक्य आहे.टीएमसीकडे सदर नकाशा वाढीव बांधकामाकरीता मंजुरी दिली असल्याने प्रतिक्षेत आहे. सर्व सदस्यांचे 31/07/2006 पर्यंतचे हिशोब दिलेले आहेत. सोसायटी विरुध्दपक्षकार यांना 1,13,063/- रुपये देणे लागते. विरुध्दपक्षकार यांनी कोणतीही सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा,हलगर्जीपणा केलेला नाही. तक्रार खोटी,चुकीची असल्याने खर्चासह नामंजुर करण्यात यावी. 3)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब, उभयतांची कागदपत्रे,प्रतिज्ञालेख,रिजॉईंडर, लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केलेअसता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करणेत आले. 3.1)उभय पक्षकारामध्ये मा.दिवाणी न्यायालय ठाणे येथे रे.फ.न.645/2005,648/2005,650/2005 व 651/2005 या प्रलंबित रक्कम वसुलीसाठी असल्याने मंचाने यामध्ये कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ करणेचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून त्यांची दखल मंचाने घेतलेली नाही व हक्कास, हितास बाधा न येता पुढील आदेश परीत केलेले आहेत. 3.2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना अर्जात नमुद केलेल्या मिळकतीमध्ये विरुध्दपक्षकार यांच्या 5 मोठे अपार्टमेंटस व बांधकाम सुरु आहे. तथापी 1ते 3 बिल्डींग पुर्णपणे तयार आहेत. त्यातील कांही प्लॉटस फ्लॅटधारकांना त्यांचे फ्लॅटमध्ये फर्निचर व अन्य जादा सोई उपलब्ध करुन घेण्याच्या होत्या. म्हणून विरुध्दपक्षकार यांनी तात्पुरता ताबा फ्लॅटधारकांना दिला होता. तथापी फ्लॅटधारकांनी काम पुर्ण झालेनंतर ताबा परत न देता राहू लागले त्यावेळी संपुर्ण सोई उपलब्ध करुन दिलेल्या आहेत असे विरुध्दपक्षकार यांनी 3/- लेखी जबाबात नमूद केले आहे. तथापी विरुध्दपक्षकार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांतून एक मुद्दा पुर्णपणे स्पष्टपणे सिध्द झाला आहे की, विरुध्दपक्षकार यांनी एकुण 5बिल्डींगची मोठी योजना बांधकाम सुरु केलेनंतर 3 बिल्डींग पुर्ण झाल्या व 2 बिल्डींगचे बांधकाम त्या कालावधीत अपुर्ण असतांना टीएमसीठाणे यांनीही कांही क्षेत्राबाबत आक्षेप घेतले व वनक्षेत्रावर कब्जा करण्यास मज्जाव केल्याने विरुध्दपक्षकार यांनी बिल्डींग नं.1ते3 यांना कॉमन एकच स्विमींग टँक देण्याचा प्रस्ताव मांडला. रिकामी जागा, सोसायटीचे ऑफिससाठी जागा, पार्कींगसाठी जागा अपुर्ण झाल्याने हया सोयी उपलब्ध करुन दिलेल्या नव्हत्या व नाहीत. म्हणून तक्रारदार यांनी दिनां10/05/2007 रोजी मंचात तक्रार अर्ज दाखल करुन या सोई उपलब्ध होवून मिळाव्यात. म्हणून मागणी केलेली आहे. त्यांची पुर्तता आजपावेतो विरुध्दपक्षकार यांनी केली आहे. याबाबत कोणतांही सबळ कागदोपत्री पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही. म्हणून विरुध्दपक्षकार यांचे लेखी जबाब कथनावर विश्वास पुर्णणे ठेवणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक नाही. म्हणून विरुध्दपक्षकार यांनी या सर्व सोयी कराराप्रमाणे उपलब्ध करुन देणे बंधनकारक व जबाबदारी आहे. ती वेळेत पुर्ण न केल्याने सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केला आहे हेही मंचाने गृहीत धरलेले आहे. 3.3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना ताबा प्रमाणपत्र(ऑक्युपेशन सर्टीफिकेट) अभिहस्तांतरण प्रमाणपत्र(कन्व्हेन्स डीड) सोसायटीचे जमा खचार्चे हिशोब दिलेले नाहीत. म्हणून तशी पुर्तता करुन देणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. तक्रारदार यांनी अपुर्ण बाबी, सोईबाबत विरुध्दपक्षकार यांना दि.02/04/2007 रोजी कायदेशीर वकीलामार्फत वकील श्री.जी.एन.मोहिले यांचेतर्फे नोटीस पाठविली होती व ही सर्व मागणी केलेली आहे. नोटीस विरुध्दपक्षकार यांना दिनांक04/04/2007 रोजी मिळालेली आहे असे नमुद केलेले आहे. तथापी नोटीस पोहच झालेली पावती दाखल नाही व विरुध्दपक्षकार यांनीही नोटीस पोहच झालेली नाही असे कथन केलेले आहे. तथापी असे असले तरी मंचामध्ये तक्रार दाखल झालेनंतर विरुध्दपक्षकार यांनी सर्व सोई उपलब्ध करुन दिल्या आहेत. हया कथनाबाबत कोणतांही पुरावा दाखल केलेला नाही व कन्व्हेन्स डीड हे त्वरीत देवू शकत नाही. अन्य इमारतीचे बांधकाम सुरु आहे. टीएमसीकडे अर्ज 2006 मध्ये केलेला आहे असे स्पष्ट केले आहे. तथापी 2008 पासून 2010 पर्यंत परवानगी न मिळवणे व संपुर्ण बांधकाम पुर्ण मंजूर नकाशाप्रमाणे न करणे म्हणजे विरुध्दपक्षकार यांचे आहे. म्हणून तक्रारदार यांचे झालेले नुकसान विरुध्दपक्षकार हे जबाबदार आहेत. म्हणून पुढील आदेश पारीत केलेले आहे. 4/- 3.4)तक्रारदार यांनी मागणी केलेली आहेत की, विरुध्दपक्षकार यांनी कमी दर्जाची साधन सामुग्री फरशासाठी वापरली, लिकेजीस आहेत व रंगकाम चांगल्या दर्जाचे केलेले नाही. म्हणून अशा सुविधा उपलब्ध होवून मिळाव्यात. यावर विरुध्दपक्षकार यांनी हा मजकूर अमान्य केलेला आहे व तक्रारदार यांनी या मागणीकडे कोणताही सबळ पुरावा दाखल केलेला नाही. सविस्तर तपशिलवार मागणी नाही. म्हणून तक्रारदार यांनी हा मुद्दा प्रथम सिध्द करावा असे नमुद केलेअसता मंचाने या मुद्दयाची पडताळणी व अवलोकन केले असता या मुद्दयावर कोणताही पुरावा स्पष्टपणे नसल्याने हा मुद्दा मान्य करणेत आलेला नाही. म्हणून आदेश पुढील प्रमाणे. -आदेश - 1)तक्रारदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना करारप्रमाणे बिल्डींग नं.1,2व 3 यांना स्विमींग पुल,रिकामी जागा,पार्कींग जागा, ऑफिससाठी जागा त्वरीत उपलब्ध करुन दयावी. 3)विरुध्दपक्षकार यांनी ताबा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टीफिकेट) व अभिहस्तांतरण प्रमाणपत्र(कन्व्हेन्स डीड) तक्रारदारास त्वरीत करुन द्यावे. 4)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना वरील सुविधा आजतागायत उपलब्ध करुन न दिल्याने तक्रारदार यांना मंचात तक्रार अर्ज दाखल करुन न्याय मागणे भाग पडले. अर्जाचा खर्च 10,000/- (रु.दहा हजार फक्त) व मानसिक त्रासाबाबत रुपये20,000/-(रु.वीस हजार फक्त)नुकसान भरपाई दयावी. वरील आदेशाची तामिली सहिशिक्क्याची प्रत मिळाल्या तारखेपासून 30 दिवसांचे आंत परस्पर करावी.(डायरेक्ट पेमेंट) अन्यथा वरील रकमेवर जादा दंडात्मक व्याज 3टक्के द.सा.द.शे दराने आदेश पारीत तारखेपासून देय होईल. 5)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 6)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे (श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |