जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/55. प्रकरण दाखल तारीख - 11/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 06/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. बजरंग पि.नरसिंगराव बंदल वय 65 वर्षे, धंदा पेन्शनर अर्जदार रा. भोकर ता. भोकर, नांदेड. विरुध्द. 1. विज कामगार को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.नांदेड मार्फत व्यवस्थापक, अध्यक्ष, विद्यूत भवन, नविन मोंढा, नांदेड 2. जि.सी.थळंगे, अध्यक्ष विज कामगार को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.नांदेड विद्यूत भवन,नविन मोंढा, नांदेड 3. एस.डी.सरसर सचिव, विज कामगार को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.नांदेड विद्यूत भवन,नविन मोंढा, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.यु.पी.कांबळे गैरअर्जदार 1 ते 3 तर्फे वकील - अड.राजी वीर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे एफ.डी.ची रक्कम रु.55,000/- न देऊन सेवेत अनूचित व्यापार केला म्हणून त्यांने तक्रार नोंदविली असून ते म्हणतात की, अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 या पतपेढीचे ते महाराष्ट्र विज मंडळ येथे वीभागीय लेखापाल या पदावर असल्याकारणने सदस्य होते. ते सेवानिवृत्त झाल्यावर नाममाञ सभासद होते. त्यांनी मूदत ठेव पावती क्र.4413 याप्रमाणे रु.50,000/- दि.15.10.2005 रोजी ठेवले होते. याची व्याजासह रु.53,003/- रक्कम झाली. हे परत दि.11.12.2006 रोजी रु.55,000/- पूनर्गूतवणूकीसाठी मूदत ठेवीत ठेवा असे सांगून रु.2003/- अर्जदाराने गैरअर्जदाराकडून चेकने उचलून घेतले. यानंतर परत 2007 सालीची मूदत अर्ज झाल्याचे नंतर गैरअर्जदारांनी पावती नंबर 5253 दि.1.1.12.2006 ते 11.12.2007 या कालावधीसाठी 10 टक्के व्याज दराने दिली. 2007 ला मूदत संपल्यावर गैरअर्जदार यांनी पावती रदद करुन मूदत ठेवीची रक्कम व्याजासह अर्जदारास दिली नाही. ही रक्कम मिळण्यासाठी अर्जदार यांनी वकिलामार्फत नोटीस दिली. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, रक्कम रु.55,000/- 10 टक्के व्याजाने अर्जदाराना मिळावेत, तसेच मानसिक ञासाबददल रु.15,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचे आदेश करावेत. गेरअर्जदार क्र.1. ते 3 यांनी एकञितरित्या वकिलामार्फत आपले लेखी जवाब दाखल केलेला आहे. यात गैरअर्जदार क्र.2 व 3 हे गैरअर्जदार क्र.1 संस्थेचे अध्यक्ष व सचिव सध्या नाहीत. त्यांचे जागी नवीन अध्यक्ष व सचिव यांची नेमणूक झालेली आहे. अर्जदाराने प्रतिवादीचे विरुध्द वैयक्तीक पदनामाने तक्रार केलेली आहे. अर्जदार यांना संस्थेकडे ठेव जमा करण्याकरिता दि.15.10.2005 रोजी एस.बी.एच. शाखा वजिराबाद नांदेड यांचा चेक क्रमांक 251184 रु.50,000/- चा दिला होता. तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव शंकरराव देशमूख व सचिव एन.जी.दावलबाजे यांनी दि.15.10.2005 रोजी रु.50,000/- रक्कमेची मूदत ठेवी पावती अर्जदार यांना देण्यात आले. मूदत ठेवीच्या अनुषंगाने संस्थेस दिलेला चेक त्यांचे खाती वटविण्यासाठी पाठविला असता चेक नंबर 251184 हा न वटता वापस आला. त्यामूळै चेकची रक्कम प्राप्त न झाल्या कारणाने मूदत ठेवीची रक्कम ग्राहय धरता येणार नाही. संस्थेचे म्हणणे असे आहे की, तक्रारीत अध्यक्ष व सचिव त्या संस्थेचे त्या काळात रोखपाल बी.एच. देशमूख यांच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळया हेडवर संस्थेमध्ये अपहार झालेलो असून, लेखा परिक्षण अहवालामध्ये सदर बाबी निर्दशनास आणून दिलेल्या आहेत. त्यामूळे गैरअर्जदार यांनी संस्थेच्या खात्याचे रिकंसीलेशन करण्याचा नीर्णय घेऊन संस्थेच्या व्यवहाराची तपासणी केली असता संस्थेच्या काही बेकायदेशीर बाबी निर्दशनास आल्या आहेत. त्यात अर्जदाराची मूदत ठेवी पोटी दिलेला चेक क्र.251184 रु.50,000/- एस.बी.एच. शाखा वजिराबाद नांदेड हा वटलेला नाही, त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना दि.12.09.2007 रोजी लेखी पञाने कळविले आहे. यासाठी रक्कम दिली असल्यास तसा पूरावा दाखल करावा असे म्हटले आहे. यानुसार अर्जदार यांनी त्यांचे पञ दि.24.3.2008 रोजी लेखी खूलासा करुन कळविलेले आहे. त्यांनी दिलेला धनादेशाचा नंबर 251184 हा त्यांचे खातेवर पैसे नसताना दिलेला आहे ? अर्जदार यांचा दि.24.3.2008 रोजीचा खूलासा संस्थेला प्राप्त झाल्यावर संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक अदवंत यांनी डि.के.शिंदे मार्फत रु.50,000/- रोखीने रक्कम प्राप्त झाली काय यांची विचारणा केली असता अर्जदार यांनी खूलासा केला की, रु.50,000/- रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामूळे संस्थेकडे रक्कम प्राप्त झाली नसल्याने मूदत ठेवीचे प्रमाणपञ गोठविण्यात आलेले आहे. गैरअर्जदाराने सेवेत कोणताही अनूचित प्रकार केलेला नसून अर्जदाराची मागणी ही मूदत बाहय आहे.म्हणून ती नामंजूर करावी व गैरअर्जदार यांना नूकसान भरपाई पोटी रु.25,000/- दयावेत असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी सेवेतील अनूचित प्रकार केला काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी दि.15.10.2005 रोजी मूदत ठेवी पावती क्र.6713 रु.50,000/- गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे मूदत ठेव ठेवले होते व त्याअनुषंगाने गैरअर्जदार क्र.1 यांनी चेक क्र.251184 एस.बी.एच. शाखा वजिराबाद नांदेड यांचा चेक दिला होता. गैरअर्जदाराने त्यांना पहिल्या वर्षासाठी मूदत ठेवी प्रमाणपञही दिले. एक वर्षानंतर मूदत पूर्ण झाल्यावर एकूण रक्कम रु.53,003/- पैकी अर्जदाराने वरची रक्कम उचलून पून्हा पूनर्गूंतवणूक केली व 2007 मध्ये गैरअर्जदार यांचे लक्षात आले की चेक नंबर 251184 हा वटलेला नाही. म्हणजे गैरअर्जदार यांना हा चेक वटला का नाही हे समजण्यासाठी दोन वर्षाचा अवधी लागला. अर्जदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये यांचा उल्लेख केलेला नसला तरी त्यांने गैरअर्जदार यांना पञ लिहून जो खूलासा दिला आहे तो 24.3.2008 रोजीच्या पञात असे स्पष्ट म्हटले आहे की, त्यांनी दि.15.10.2005 रोजी मूदत ठेवीच्या गूंतवणूकीसाठी चेक दिला होता परंतु हे सांगितले आहे की, पूढे दोन दिवस सूटटया आहेत व सूटटयानंतर डि.के.शिंदे यांचे सोबत रु.50,000/- पाठविले व त्यांनी संस्थेत श्री. अदवंत यांना रक्कम दिली. पैसे मिळाले तेव्हाच बॉंड मिळाले असे समजून ते निश्चित राहीले. यांचा अर्थ असे की, अर्जदार यांचे खात्यात रक्कम नसताना त्यांनी तो चेक दिला व सत्य घटना अशी आहे की, तो चेक वटलेला नाही. यानंतर अर्जदार यांनी ज्या गोष्टीचा आपल्या तक्रार अर्जात उल्लेख केलेला नाही तो डिफेन्स घेऊन ते असे म्हणतात की, त्यांनी जो चेक दिला त्यांचे अगेंस्ट रोख रक्कम रु.50,000/- श्री. डि.के.शिंदे यांचे हस्ते भोकरहून पाठविला व ती रक्कम अंधवत यांना दिली. यावीषयीचे डि.के.शिंदे यांचे शपथपञ यूक्तीवादानंतर दिलेले आहे. नूसते शपथपञ सून जमणार नाही कारण पतपेढी ही किराणा दूकान नसून फायनान्स संस्था आहे. जर नगदी रक्कम अर्जदारांनी पाठविली असेल तर ती रक्कम कोणीतरी गैरअर्जदार संस्थेच्या अकांऊटस मध्ये भरणे जरुरीचे आहे. त्यावीषयीची काऊंटर स्लीप घेऊन ती स्लीप अर्जदाराने जपून ठेवणे आवश्यक असताना, असे अर्जदाराने केलेले नाही व यानंतर अंधवत यांचे चौकशी मध्ये रक्कम मिळाल्या बाबत स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यामूळे या शपथपञास महत्व देता येणार नाही व पूरावा म्हणून ही काऊंटर स्लीप अर्जदाराकडे नाही म्हणजे ती रक्कम गैरअर्जदार यांचे खात्यामध्ये जमा झाली नाही हे स्पष्ट आहे. त्यामूळे हा शपथपञाचा पूरावा ग्राहय धरता येणार नाही. हे दोन वर्षानंतर म्हणजे 2007 मध्ये गैरअर्जदार यांचे लक्षात आले. यानंतरही त्यांनी अर्जदार यांचे विरुध्द निगोशियेबल इन्स्ट्रमेंट अक्ट कलम 138 अन्वये कारवाई केलेली नाही. म्हणजे आधी अर्जदार यांना मूदत ठेवीचे प्रमाणपञ दिले व नंतर चेक वटला नाही तरी त्यांचे विरुध्द कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही व मूदत ठेव प्रमाणपञ गोठविण्यात आले. एकंदर गैरअर्जदार संस्थेत किती गोंधळ आहे हे दिसून येतो. गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे सांगितले आहे की, संस्थेचे अध्यक्ष देशमूख व सचिव दावलबाजे व रोखपाल देशमूख याच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळे हेडवर अपहार झालेला आहे. लेखा परिक्षण अहवालामध्ये सदर बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामूळे गैरअर्जदार यांनी संस्थेचे व्यवहाराची तपासणी केली असता ब-याच गोष्टी लक्षात आल्या आहेत. यावर सध्याचे मॅनेजमेंट बॉडीने अपहार करणा-या गून्हेगारांना अभय न देता त्यांचे विरुध्द गून्हे दाखल करुन व कोण कोण दोषी आहेत यांचेवर कारवाई केली पाहिजे. गैरअर्जदार संस्थेचे प्रमाणपञ असताना अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2. व 3 यांनी वैयक्तीक रित्या पार्टी केलेले आहे ते कायदा बाहय आहे. अर्जदार यांचेकडे गैरअर्जदार यांनी पञ पाठवून खूलासा मागितल्याप्रमाणे दि.09.10.2007 रोजीच्या पञाप्रमाणे अर्जदार यांनी रोख रक्कम दिल्याबददलची काउंटर स्लीप आहे किंवा कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. केवळ तोंडी बोलण्यावर गैरअरर्जदारा यांनी कार्यालय अधिक्षक अधंवत यांनी पञ पाठवून खूलासा मागितला तो खूलासा गैरअर्जदार यांनी दाखल केलेला आहे. यात स्पष्टपणे अशी काही रक्कम मिळाली ाहे या बददल नकार दिलेला आहे. खरे तर गैरअर्जदार संस्थेने चेक वटल्याशिवाय मूदत ठेवीची पावती देण्याची गरज नव्हती, त्यांना फार घाई झालेली दिसते. तरी ही पावती अगेंस्ट चेक दिली असल्याकारणाने चेक रिलीज हया अटीवर पावती दिलेली आहे. तेव्हा चेक जर वटला नसला तर ही मूदत ठेवीची पावती कायदयानुसार रदद होते. म्हणून मूदत ठेवीची रक्कम अर्जदार यांना मिळणार नाही पण त्यांनी जी व्याजबददलची रक्कम त्यांनी दोन वेळा उचललेली आहे ती देखील रक्कम वसूल करण्याचा अधिकार गैरअर्जदार संस्थेचा आहे. एकंदर पतसंस्थेमध्ये किती प्रचंड गोंधळ झाला. संस्था कशामूळे बूडतात हे या प्रकरणावरुन दिसून येते. आम्ही चर्चा केल्याप्रमाणे सर्व कागदपञ गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहेत यांचे अवलोकन करुन आम्ही ठरविले की, गैरअर्जदार यांचे सेवेत अनूचित प्रकार झालेला नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्यात. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |