न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून नोकरीच्या कारणास्तव मालदीव येथे रहात आहेत. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करणेचे अधिकार त्यांनी त्यांचे वडील डॉ शशिकांत शंकर डोईजड यांना दिलेले असून त्याअनुषंगाने तक्रारीसोबत ता.15/6/2019 रोजीचे अधिकारपत्र दाखल केलेले आहे. वि.प.क्र.1 हे केबल नेटवर्क पुरविणारी संस्था असून वि.प.क्र.2 ही त्यांची सेवा देण्याचे काम करतात. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 कंपनीचे ग्राहक क्र.90282827 अन्वये ग्राहकत्व स्वीकारले होते. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीची डायरेक्ट टू होम डिजीटल सर्व्हिसेस टेलिव्हीजन केबल सुविधा पाच ते सहा वर्षापूर्वी घेतली होती. त्याचा आर.एम.एन.क्र. 9822611633 असा आहे. तक्रारदार यांनी दोन कनेक्शनसाठी तक्रारीत नमूद पत्त्यावर कनेक्शन घेतलेले होते. सदरची सुविधा तक्रारदार हे आजतागायत वापरत आहेत व त्याचा उपभोग घेत आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांनी दिलेल्या सेवेसाठी दोन कनेक्शन घेतलेली आहेत. त्याचा प्रॉडक्ट क्र. 410914780161097163 असा आहे सदरचे प्रॉडक्ट हे प्रिपेड कनेक्शनवर घेतलेले असून तक्रारदार यांनी मे 2018 मध्ये सदर दोन्ही कनेक्शन/प्रॉडक्ट करिता एक वर्षासाठी आगाऊ असे रिचार्ज केले आहे. फेब्रुवारी 2019 पासून सदर सेवा पुरविणेबाबत सरकारी नियमांमध्ये बदल झालेले होते. सदर नियमावलीनुसार प्रक्षेपित होणा-या चॅनेलचे सिलेक्शन हे वि.प. क्र.1 कंपनीचे अधिकृत वेबसाईटवरुन तशी यादी फ्रि टू एअर चॅनेल्स वगळता वि.प.क्र.1 कंपनीस वेबसाईटवर कळविणेची होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आवश्यक चॅनेल सिलेक्शन करुन त्याप्रमाणे सेवा पुरविणेबाबत वि.प.क्र.1 यांना वेळोवेळी कळविले. तथापि वि.प. कंपनीच्या ऑनलाईन सेवेवरुन तक्रारदार यांना अनावश्यक चॅनेलची सेवा सुरु राहिली. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांना मेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून सदरचे अनावश्यक चॅनेल सेवा सुरु राहिली असलेबाबतची तक्रार वि.प.यांना वेळोवेळी कळविली असून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची कोणतीही दाखल घेतली नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. सबब, तक्रारदार यांच्या खात्यातून प्रतिदिन रु. 28/- प्रमाणे दि. 4/07/2019 अखेर वजा झालेली रक्कम रु. 4,312/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार यांनी दिलेले अधिकारपत्र, वि.प.ने तक्रारदारास पाठविलेला मेल, तक्रारदार यांनी पाठविलेले मेल व त्यास वि.प. यांनी दिलेले उत्तर, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस व सदर नोटीसची पोहोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु विहीत मुदतीत त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश दि. 19/10/2019 रोजी पारीत करण्यात आला.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे त्यांच्या खात्यातून प्रतिदिन रु. 28/- प्रमाणे दि. 4/07/2019 अखेर वजा झालेली रक्कम परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर असून नोकरीच्या कारणास्तव मालदीव येथे रहात आहेत. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करणेचे अधिकार त्यांनी त्यांचे वडील डॉ शशिकांत शंकर डोईजड यांना दिलेले असून त्याअनुषंगाने तक्रारीसोबत ता.15/6/2019 रोजीचे अधिकारपत्र दाखल केलेले आहे. वि.प.क्र.1 हे केबल नेटवर्क पुरविणारी संस्था असून वि.प.क्र.2 ही त्यांची सेवा देण्याचे काम करतात. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 कंपनीचे ग्राहक क्र.90282827 अन्वये ग्राहकत्व स्वीकारले होते. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीची डायरेक्ट टू होम डिजीटल सर्व्हिसेस टेलिव्हीजन केबल सुविधा पाच ते सहा वर्षापूर्वी घेतली होती. त्याचा आर.एम.एन.क्र. 9822611633 असा आहे. तक्रारदार यांनी दोन कनेक्शनसाठी तक्रारीत नमूद पत्त्यावर कनेक्शन घेतलेले होते. सदरची सुविधा तक्रारदार हे आजतागायत वापरत आहेत व त्याचा उपभोग घेत आहेत. सदरचे ग्राहकत्व वि.प. यांनी आयोगात हजर होवून नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वि.प. यांनी दिलेल्या सेवेसाठी दोन कनेक्शन घेतलेली आहेत. त्याचा प्रॉडक्ट क्र. 410914780161097163 असा आहे. सदरचे प्रॉडक्ट हे प्रिपेड कनेक्शनवर घेतलेले असून तक्रारदार यांनी मे 2018 मध्ये सदर दोन्ही कनेक्शन/प्रॉडक्ट करिता एक वर्षासाठी आगाऊ असे रिचार्ज केले आहे. फेब्रुवारी 2019 पासून सदर सेवा पुरविणेबाबत सरकारी नियमांमध्ये बदल झालेले होते. सदर नियमावलीनुसार प्रक्षेपित होणा-या चॅनेलचे सिलेक्शन हे वि.प. क्र.1 कंपनीचे अधिकृत वेबसाईटवरुन तशी यादी फ्रि टू एअर चॅनेल्स वगळता वि.प.क्र.1 कंपनीस वेबसाईटवर कळविणेची होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आवश्यक चॅनेल सिलेक्शन करुन त्याप्रमाणे सेवा पुरविणेबाबत वि.प.क्र.1 यांना वेळोवेळी कळविले. तथापि वि.प. कंपनीच्या ऑनलाईन सेवेवरुन तक्रारदार यांना अनावश्यक चॅनेलची सेवा सुरु राहिली. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांना मेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून सदरचे अनावश्यक चॅनेल सेवा सुरु राहिली असलेबाबतची तक्रार वि.प.यांना वेळोवेळी कळविली असून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीची कोणतीही दाखल घेतली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी तक्रारी करुन देखील अनावश्यक चॅनेलची सेवा तशीच सुरु ठेवून व सदर सेवेपोटी तक्रारदार यांचे प्रिपेड खात्यातून प्रतिदिन सुमारे रक्कम रु.28/- प्रमाणे रक्कम वजावट करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांनी हजर होवून देखील मुदतीत 45 दिवसात म्हणणे दाखल केले नसलेमुळे ता.19/10/19 रोजी वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश पारीत केलेला आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच तक्रारदार यांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता ता. 12/2/19 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांस पाठविलेल्या मेलची प्रत दाखल केलेली आहे. अ.क्र.3 ला तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे दि.9/2/2019 रोजी प्रॉडक्टची मागणी केल्याचा मेल दाखल केलेला असून सदर मेलमध्ये अपडेटींग चॅनेल्सची यादी नमूद आहे. अ.क्र.4 ला सदर मेलला दि.23/2/19 रोजी वि.प. यांनी दिलेले उत्तर दाखल केलेले असून तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे फेब्रुवारी 2019 मध्ये प्रॉडक्ट मागणीबाबतचा मेल दाखल आहे. अ.क्र.5 ला तक्रारदार यांनी दि. 8/3/19 रोजी Number for deleting channels चा मेल वि.प. यांना केलेला असून त्यास वि.प. यांनी दिलेले उत्तर दाखल केलेले आहे. सदर मेलमध्ये तक्रारदार यांनी वि.प. यांना As there is a number for adding channels please let me know the number for deleting channel अशी मागणी तक्रारदार यांनी वि.प. यांना केली आहे. अ.क्र.6 ला तक्रारदार यांनी वि.प. यांना Negligence of services चा मेल केला असून सदर मेलचे अवलोकन करता,
I sent mail on 7/3/19 enquiring about the number for deactivating the channels. I resent the enquiries for 4 times, when you are sending many numbers for activating channels, you don’t have the courtesy to say that you do not have any number for deactivating of channels. I requested you to deactivate my product on 8th April I have not received any reply from you since then nor my product is deactivated. I want to know my account balance on 9th April.
असा मेल तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली आहे. अ.क्र.7 ला तक्रारदार यांनी पुन्हा एकदा वि.प. यांना Number for deleting channels चा मेल पाठविलेला असून अ.क्र.8 ला ता. 7/4/2019 रोजी Inappropriate response to the request चा मेल वि.प. यांना पाठविलेला आहे. सदर मेलचे अवलोकन करता,
My account is getting deducted by nearly @ Rs.28/- per day when my package shows total charges to be Rs.190 p.m. please clarify at the earlier.
याची विचारणा वि.प. यांना केली आहे. अ.क्र.9 ला ता. 9/4/2019 रोजी तक्रारदार यांनी Deactivation of the product चा मेल पाठविलेला असून मे 2019 मध्ये तक्रारदार यांना वि.प. क्र.2 च्या व्यक्तीने सेवा न पुरविल्याबाबतची तक्रारदार यांनी केलेली तक्रार दाखल आहे. अ.क्र.11 ला ता. 2/7/2019 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांना दुसरे प्रॉडक्ट बंद करण्यासाठी पाठविलेल्या मेलची प्रत दाखल आहे. सबब, तक्रारदार यांनी सदरचे सर्व मेल वि.प. यांना पाठवून अनावश्यक चॅनेलची सेवा बंद करणेबाबत वेळोवेळी कळविलेले दिसून येते. तसेच तक्रारदार यांच्या दरमहा रु.192 च्या पॅकेजमधून अधिक प्रिपेड खात्यातून प्रतिदिन रक्कम रु.28/- प्रमाणे अनावश्कय चॅनेलसाठी वजावट झालेचे दिसून येते. सदर मेलच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी ता. 23/11/2021 रोजी पुरावा शपथपत्र दाखल केले असून वि.प.क्र.1 व 2 यांना संधी असून देखील सदरच्या शपथपत्रातील कथने आयोगामध्ये हजर होवून नाकारलेली नाहीत. त्याकारणाने सदर पुरावा शपथपत्रातील कथने ही वि.प. यांचेवर बंधनकारक आहेत. सबब, तक्रारदार यांनी वि.प. कंपनीच्या नियमाप्रमाणे वेळोवेळी दर महिन्याची रक्कम ही वि.प. यांना 1 वर्षे आगाऊ स्वरुपात अदा केलेली होती. तक्रारदार यांनी वि.प. यांना अनावश्यक चॅनेलची सेवा बंद करणेबाबत ईमेलद्वारे कळवून देखील वि.प. यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही अथवा तक्रारदार यांनी आगाऊ भरलेल्या रकमेच्या पावत्याही तक्रारदार यांना दिलेल्या नाही असे तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्रात कथन केलेले आहे. अखेर तक्रारदार यांनी वकीलामार्फत ता.30/5/19 रोजी सदर वि.प. कंपनीचे सभासदत्व रद्द करणेसाठी नोटीस पाठविली. सदरचे नोटीसची प्रत तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली असून सदरच्या नोटीसा वि.प. कंपनीस प्राप्त झालेच्या पोहोच देखील तक्रारदार यांनी दाखल केलेल्या आहेत. सबब, वरील सर्व कागदपत्रांचे तसेच तक्रारदार यांचे पुरावा शपथपत्राचे बारकाईने अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. कंपनीला अनावश्यक चॅनेल्सची सेवा बंद करणेबाबत वेळोवेळी कळवून देखील वि.प. यांनी त्याबाबत तक्रारदार यांना कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर चॅनेल्सपोटी विनाकारण शुल्क भरावे लागले तसेच तक्रारदार यांना आवश्यक असलेले चॅनेल्स निवडण्याची मुभा देखील मिळाली नाही. या सर्व बाबींचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये तक्रारदार यांचे खात्यातून प्रतिदिन रक्कम रु.28/- प्रमाणे ता. 4/7/19 अखेर वजा झालेली रक्कम रु.4,312/- ची मागणी वि.प. यांचेकडून केली आहे. दाखल कागदपत्रांवरुन व तसेच तक्रारदार यांच्या पुरावा शपथपत्रावरुन तक्रारदार यांच्या खात्यावरुन सदरची रक्कम वजा झालेली दिसून येते तसेच सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. त्याकारणाने तक्रारदार हे सदरची वजा झालेली रक्कम रु.4,312/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारदार यांच्या खात्यातून प्रतिदिन वजा केलेली रक्कम रु.4,312/- अदा करावी.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|