:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे), मा.सदस्या )
(पारीत दिनांक : 14/08/2013)
1) अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराचे संक्षेपात म्हणणे असे की, अर्जदार क्र. 2 यांना गैरअर्जदार क्र. 1 ने गैरअर्जदाराच्या ‘ मानो या ना मानो प्रस्ताव- 08’ याबाबत माहिती देऊन सांगितले की, व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट सिटी.व्ही. खरेदी केल्यानंतर देण्यात येणारे मुळ प्लाझ्मा 32 (81 से.मी.) ऐंटायटलमेंट सर्टीफिकेट गैरअर्जदारांना 35 महिन्याच्या नंतर परत केल्यास प्लाझ्मा 32 (81 से.मी.) टिव्ही अर्जदारांना मिळेल. अर्जदाराने, गै.अ. क्र. 1 ने दिलेल्या प्रस्तावावर विश्वास ठेवून अर्जदार क्र. 2 ने अर्जदार क्र. 1 च्या नावाने गैरअर्जदार क्र. 1 कडून दिनांक 09/10/2008 रोजी ‘ मानो या ना मानो प्रस्ताव- 08’ या योजनेअंतर्गत व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट सिटिव्ही खरेदी केला. त्यावेळी अर्जदारांना प्लाझ्मा 32 (81 सेमी) ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट देण्यात आले.
2) अर्जदारांनी व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट सीटिव्ही खरेदी करुन 35 महिने होताच गै.अ. क्र. 1 ला ‘ मानो या ना मानो प्रस्ताव- 08’ चे योजनेप्रमाणे प्लाझ्मा 32 (81 सेमी) ची मागणी केली असता गै.अ.क्र. 1 ने नागपूर कार्यालयात संपर्क करा म्हणून गै.अ. क्र. 2 चा पता व फोन नंबर दिला. गै.अ.क्र.2 सोबत फोन वर संपर्क केला असता त्यांचे अधिकारी प्रमोद यांनी उद्या फोन करा, प्लाझ्मा ऐवजी दुसरी वस्तु घ्या अशी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू शेवटी अर्जदाराच्या सतत संपर्कामुळे श्री प्रमोद यांनी गै.अ.क्र. 2 ला मुळ प्लाझ्मा 32 (81सेमी) ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट, व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट सीटिव्ही खरेदीच्या बिलाची मुळ प्रत व सोबत वाहतुक खर्च व इतर कर म्हणून रुपये 4,980/- चा डिमांड ड्राफ्ट पाठविण्यास सांगितले.
3) अर्जदारांनी गैरअर्जदार क्र. 2 ला उपरोक्त सर्व अस््सल दस्तऐवज व डिमांड ड्राफ्ट दिनांक 16/09/2011 रोजी नोंदणीकृत डाकेने पाठविले. सदरचे पञ मिळून 1महिना उलटून गेला तरी गैरअर्जदार कडून प्लाझ्मा टिव्ही प्राप्त न झाल्याने परत अर्जदार क्र. 2 ने दिनांक 21/11/2011 रोजी स्वतः पञ तसेच दिनांक 30/07/2012 रोजी अधिवक्ता एम. ए. निभ्रड यांचे मार्फत गैरअर्जदारांना नोंदणीकृत डाकेने पञ व नोटीस पाठविला परंतू गैरअर्जदारांनी पञ व नोटीस ची पुर्तता ही केली नाही तसेच उत्तर ही पाठविले नाही.
4) गैरअर्जदार ही नामांकीत कंपनी असून त्यांनी अर्जदाराची पिळवणूक व फसवणूक केली तसेच ऑफरप्रमाणे वागण्यास हेतू पुरस््सर टाळाटाळ करुन अर्जदारांना मानसिक, शारीरीक व आर्थिक ञास दिला म्हणून अर्जदारांनी सदरहू तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी अर्जदाराला प्लाझ्मा 32 (81सेमी) टिव्ही देण्याचा तसेच मानसिक,शारीरीक ञासापोटी रुपये 20,000/-, इतर खर्च रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावा असा आदेश गैरअर्जदार विरुद्ध पारीत करावा अशी मागणी केली आहे.
5) अर्जदाराने तक्रारीच्या कथनापुष्ठार्थ निशानी 4 नूसार 12 दस्तऐवज दाखल केले आहे.
6) गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 हजर होऊन गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने निशानी 11 वर लेखी जबाब दाखल केले. गै.अ.क्र. 1 ने निशानी 10 वर पुर्सिस दाखल करुन गै.अ.क्र. 2 व 3 चे लेखी बयाणच, गै.अ.क्र.1 चे लेखी उत्तर समजण्यात यावे अशी पुर्सिस दाखल केली.
7) गैरअर्जदाराच्या म्हणण्यानूसार सदरचे प्रकरण मा. मंचाच्या अधिकारक्षेञात येत नाही कारण दस्तऐवज क्र. 1 मधील अट क्र. 13 प्रमाणे ऑफर संदर्भात कोणताही वाद हा औरंगाबाद येथील कोर्टाच्या अधिकारक्षेञात येईल म्हणून सदरची तक्रार खारीज करावी.
8) गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरात मान्य केले आहे की, अर्जदाराने गै.अ.कडून दिनांक 09/10/2008 रोजी 34 इंच फ्लॅट टिव्ही, किंमत रुपये 19,400/- ला विकत घेतला तेव्हा अर्जदाराला ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट ‘मानो या ना मानो’ या ऑफर मध्ये मिळाले गैरअर्जदाराचे पुढे असे म्हणणे की, प्लाझ्मा टिव्ही ची बाजारपेठेतील मागणी संपुष्टात आलेली आहे त्यामुळे गै.अ. कंपनीने सदर टिव्ही चे उत्पादन बंद केले, त्यामुळे दिनांक 1 मार्च 2011 रोजी अर्जदारालापञ पाठवून प्लाझ्मा टिव्ही ऐवजी एल.सी.डी. किंवा एल.ई.डी. टिव्ही घेण्याची ऑफर दिली व पञ प्राप्त झाल्यावरच अर्जदाराने रुपये 4,980/- पाठविले व यानंतर एल.सी.डी. किंवा एल.ई.डी. यामधुन एक निवडावा व त्या अनुसरुन उर्वरीत रक्कम जमा करावी अशी विनंती केली. गैरअर्जदाराने अर्जदाराला योग्य ऑफर दिलेली आहे व ती गैरअर्जदार आज देखील देण्यास तयार आहे.
9) ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट दस्त क्र. अ 1 मधील अटीप्रमाणे सर्टिफीकेटच्या बदल्यात पैसे मिळणार नाही व व्हिडीओकॉन त्याबद्दल ग्राहकाला दुसरी पर्यायी वस्तु ची ऑफर सुद्धा देऊ शकेल.
10) परंतू अर्जदारांनी पर्यायाला काहीही उत्तर न देता सदरची तक्रार दाखल केली. गै.अ. नी न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही त्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
11) गैरअर्जदारांनी निशानी 13 वर लेखी उत्तरातील माहितीस पुरावा समजण्यात यावा अशी पुर्सिस दाखल केली तसेच अर्जदाराने निशानी 14 वर शपथपञ दाखल केले आणि निशानी 15 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदारांनी लेखी उत्तरातील माहितीस युक्तीवाद समजण्यात यावा म्हणून निशानी 16 नुसार पुर्सिस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदारांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रार मंचाच्या अधिकारक्षेञात आहे काय ? होय
2) गै.अ. ने सेवेत न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा होय
अवलंब केला आहे काय ?
3) अर्जदार मागणी प्रमाणे तक्रार मंजूर करण्यास अंशतः
पाञ आहे काय?
4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
12) गैरअर्जदारांनी दिलेल्या ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट निशानी क्र. 4 वरील दस्त क्र. अ- 1 प्रमाणे जरी ‘मानो या ना मानो’ ऑफर च्या संदर्भातील वाद फक्त औरंगाबाद न्यायालयाच्या अधिकारक्षेञात राहील असे असले तरी अर्जदारांनी सदरहू टिव्ही गै.अ.क्र. 1 कडून, मुल, जि. चंद्रपूर येथून खरेदी केला आहे. ग्राहक सरंक्षण अधिनियम 1986 च्या कलम 11 मधील 2 ब प्रमाणे मंचाच्या कार्यकक्षेबद्दल खालिलप्रमाणे तरतूद आहे.
Section 11. Jurisdiction of the District Forum
1) ……………………………….
2) A complaint shall be instituted in a District Forum within the local limits of whose jurisdiction,-
a) ………………………….
b) Any of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides, or carries on business ( or has a branch office, or personally works for gain:
provided that in such case either the permission of the District Forum is given, or the opposite parties who do not resides, or carry on business, ( or have a branch office) or personally work for gain, as the case may be, acquiesce in such institution; or
वरील तरतूदीप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 मुल येथे या मंचाच्या कार्यक्षेञात राहत असल्याने सदर तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे. ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट ऑफर मधील औरंगाबाद न्यायालयाच्या कार्यक्षेञाची अट ग्राहक हक्क संरक्षण कायद्याच्या तरतुदीशी विसंगत असल्यामुळे लागू होत नाही. म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र. 2 व 3 बाबत
13) अर्जदाराने गै.अ. क्र 1 कडून व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट टिव्ही ‘मानो या ना मानो ऑफर-08’ या ऑफरअंतर्गत विकत घेतला. या ऑफर प्रमाणे 35 महिन्यानंतर ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट नूसार अर्जदाराने प्लाझ्मा 32 (81 सेमी) टिव्हीची मागणी केली याबाबत कोणताही वाद नाही. अर्जदाराने दस्त क्र. अ-1 प्रमाणे मागणी केल्यानंतर गैरअर्जदाराने प्लाझ्मा 32 (81सेमी) टिव्ही द्यावयाला हवा होता परंतू गैरअर्जदारांनी अर्जदारांचे मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करुन अर्जदारास प्लाझ्मा टिव्ही देण्याचे टाळले. अर्जदाराने, गै.अ.क्र. 1 च्या सांगण्यानूसार अस््सल ऐंटायटलमेंट सर्टिफीकेट, व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट सिटिव्ही चे बिल आणि त्यासोबत वाहतुक खर्च व इतर करापोटी रुपये 4,980/- चा दिनांक 16/09/2011 असलेला डिडी असे सर्व मुळ दस्तऐवज गैरअर्जदाराला पाठविले. सदरचे दस्तऐवज निशानी क्रमांक 4 वर दस्त क्र.अ 1 ते अ 3 वर दाखल आहेत. ही बाब गैरअर्जदाराने नाकबुल केली नाही. तरीसुद्धा गैरअर्जदारांनी अर्जदाराचे मागणीची पूर्तता केली नाही म्हणून अर्जदाराने अनुक्रमे दिनांक 21/11/2011 ला स्वतः व दिनांक 30/07/2012 रोजी वकीलामार्फत पञ/नोटीस पाठविला. सदरचे दस्तऐवज पोस्टाची पावतीसह निशानी 4 वर दस्त क्र. अ 7 ते अ 12 (2) वर दाखल आहेत. गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि पञे व नोटीसला उत्तर दिले नाही, ही गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेली न्युनतापूर्ण सेवा आहे. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानूसार प्लाझ्मा टिव्हीचे बाजारपेठेमध्ये मागणी नसल्याने उत्पादन बंद झाले. त्यामुळे गैरअर्जदारांनी तोंडी तसेच दिनांक 1 मार्च 2011 रोजी अर्जदाराला पञ पाठवून प्लाझ्मा टिव्ही ऐवजी एल.सी.डी. किंवा एल.ई.डी. टिव्ही घेण्याची ऑफर दिली होती परंतू या कथनापुष्ठार्थ रेकॉर्डवर पञाची नक्कल तसेच पोस्टाची पावती काहीही दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे विश्वासार्ह नाही. वरील बाब गैरअर्जदाराचे सेवेतील ञुटी तसेच अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब ठरणारी आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास ऑफर प्रमाणे प्लाझ्मा 32 (81सेमी) टिव्ही द्यावा व प्लाझ्मा टिव्ही देऊ शकत नसेल तर अर्जदाराने खरेदीकेलेल्या टिव्ही च्या किंमतीइतकी रक्कम रुपये 19,990/- तसेच नुकसान भरपाई आणि मानसिक ञासाबद्दल रुपये 4,000/- आणि या प्रकरणाच्या खर्चाबाबत रुपये 1,000/- एवढी नुकसान भरपाई मंजूर करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र 2व 3वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात आला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
अर्जदाराचा अर्ज अंशतः खालिलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) अर्जदाराला, गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी प्लाझ्मा 32 (81सेमी) टिव्ही द्यावा व प्लाझ्मा टिव्ही देणे शक्य नसल्यास त्याबदल्यात अर्जदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेल्या व्हिडीओकॉन जंबो 34 फ्लॅट टिव्ही च्या किंमतीऐवढी रक्कम रुपये 19,990/- वैयक्तीक व संयुक्तरीत्या द्यावी.
2) अर्जदाराला, गैरअर्जदार क्र. 1 ते 3 कडून मानसिक ञासापोटी रुपये 4,000 व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- असे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने वैयक्तीक व संयुक्तपणे द्यावा. वरील आदेशाची पुर्तता गैरअर्जदारांनी आदेश झाल्याचा दिनांकापासून 1 महिण्याचे आत करावी.
3) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठवावी.
चंद्रपूर
दिनांक - 14/08/2013