ग्राहक तक्रार क्र. 189/2013
अर्ज दाखल तारीख : 13/12/2013
अर्ज निकाल तारीख: 05/03/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 22 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. महेश रामराव काळे,
वय-22 वर्षे, धंदा – शिक्षण,
रा. मांजरी ता.जि.लातुर,
ह.मु.तेर ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा. विभागिय अधिकारी साहेब,
नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि.,
विभागीय कार्यालय सोलापूर,
शुभराय टॉवर्स, दत्त चौक, सोलापूर
2. फॅन्चायसी प्रमुख, प्रमोद मेटे,
प्रमोद इंटरप्रायजेस तथा नेटसर्फ कम्युनिकेशन प्रा. लिमीटेड.
समर्थ नगर, कोर्टाच्या पाठीमागे, उस्मानाबाद-413501.
3. मुख्य कार्यालय,
नेटसर्फ कम्युनिकेशन प्रा. लिमीटेड,
ऑफिस नं.4 आणि 5 तारा आयकॉन,
पुणे- मुंबई रोड, पुणे - 41103 फोन नं.912025822603/4 ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.ए.बेलूरे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.ए.वि.मैंदरकर.
विरुध्द पक्षकार क्र.2 व 3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) 1) आपले वडलांचा विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 कडे विप क्र.2 व्दारा ग्रृप पर्सनल अॅक्सीडेंट विमा उतरविला असतांना वडलांच्या अपघाती निधनानंतर विम्याची रक्कम न देऊन विप यांनी सेवेत त्रुटी केली म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
2) तक याचे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात असे की, त्याचे वडील यांनी विप क्र.1 यांचेकडून विप क्र.2 मार्फत दि.19/02/2008 रोजी ग्रृप वैयक्तिक अपघात विम्याचे रु.1,00,000/- चे कवच प्रिमियम रु.6,000/- भरुन घेतले. विम्याचा कालावधी फेब्रूवारी 2008 ते फेब्रूवारी 2011 असा होता. नोंदणी नंबरसुध्दा रु.20,185 लॉग इन आय डी रामराव काळे असा देण्यात आला आहे. तक चे वडील रामराव दि.01/06/2008 रोजी अंब्याचे झाडावरुन पडून जबर जखमी झाले व उपचारा दरम्यान मयत झाले. मानेगांव पोलीस स्टेशन जि.लातूर येथे नंबर 108 ने अपघाती मृत्यूची नोंद झाली. ता.17/08/2008 रोजी तक ने विप क्र.1 कडे सर्व कागदपत्रे दाखल केली व विमा मागणी केली विप क्र.1 यांनी अशी विमा पॉलिसी नाही असे सांगून मागणी फेटाळली. नंतर तक ने विप क्र.2 यांचेकडून पॉलिसीची प्रत मिळविली व दि.18/04/20011 रोजी विमा रकमेची मागणी केली. विप यांनी विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. म्हणून ही तक्रार दि.13/12/013 रोजी दाखल करण्यात आली आहे. तक्रारीसोबत उशीर माफीचा अर्जपण दाखल करण्यात आलेला आहे.
3) तक्रारीसोबत तक ने पुर्वीची तक्रार नं.129/2009 मधील दि.26/04/2010 चे निर्णयाची प्रत हजर केलेली आहे जी रदद करण्यात आलेली आहे. तक ने पॉलिसी क्र.27/01/06/42/07/8200000928 या विप क्र.1 ने दिलेल्या पॉलिसीची प्रत हजर केली आहे. तिचे नाव ''टेलर मेड गृप पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी'' असे आहे. विप क्र.2 मार्फत काढलेल्या पॉलिसीचा कालावधी दि.21/02/2008 ते 20/02/2009 असा दिसून येतो. एकूण प्रिमीयम रु.81,203/- भरला असून 2409 सदस्यांचा प्रत्येकी रु.1,00,000/- चा विमा काढल्याचे नमूद आहे. सदस्यांचे यादीचे एक पान हजर करण्यात आले असून 2246 नंबरवर रामराव काळे यांचे नाव दिसून येते. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मयताची खबर. मरणोत्तर पंचनामा घटनास्थळ पंचनामा शवचिकित्सा अहवाल यांच्या प्रती हजर केलेल्या आहेत. दि.11/04/2011 चे विमा मागणी अर्जाची प्रत हजर केलेली आहे.
ब) विप क्र.1 यांनी हजर होऊन दि.17/04/2014 रोजी लेखी म्हणणे हजर केलेले आहे. त्याप्रमाणे रामराव यांचे निधन दि.01/06/2008 रोजी झाले आहे व प्रस्तुत अर्ज दि.13/12/2013 रोजी दाखल केला तो मुदतबाहय आहे. तक हा तेर येथे राहत नाही त्यामुळे ही तक्रार या मंचात चालणार नाही. विप क्र.2 यांचे कडून रामराव यांनी विमा कवच घेतले याबददल विप क्र.1 ला माहीती नसल्याने ते अमान्य आहे. विप क्र.1 यांनी कोणताही कसुर अगर टाळाटाळ केलेली नाही. तक तर्फे दाखल उशीर माफीचा अर्ज रदद होणे जरुर आहे. तसेच तक ची तक्रार रद्द होणे जरुर आहे.
क) विप क्र.2 व 3 यांना नोटीस बजावली असता ते गैरहजर राहीले त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे.
ड) तक्रारदाराची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे विप क्र.1 यांचे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्याची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) तक्रारीस झालेला विलंब माफ करणे उचीत आहे काय ? होय.
2) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? अंशत: होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? अंश:ता होय
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
इ) मुद्दा क्र. 1 :
1) तक व विप यांनी पुर्वीची तक्रार क्र.129/2009 चा उल्लेख तक्रार व म्हणण्यामध्ये टाळलेला आहे. मात्र तक ने त्यातील दि.26/04/2010 रोजीचे आदेशाची प्रत हजर केली आहे. तक्रारीप्रमाणे रामराव यांनी फेब्रूवारी 2008 पासून फेब्रूवारी 2011 पर्यंत विमा काढला होता. रामराव यांचा दि.01/06/2008 रोजी अपघाती मृत्यू झाला. दि.17/08/2008 रोजी तक ने विप क्र.1 यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली. म्हणजेच नेट सर्फ एजंट यांच्याकडे त्याने विप क्र.4 म्हणजेच नॅशनल इन्शूरंन्स कंपनीकडे जाण्याचा सल्ला दिला. इनशूरंन्स कंपनीने असे म्हणणे दिले की विमा कालावधीमध्ये रामराव यांचा मृत्यू झाला नाही. जी पॉलिसी हजर करण्यात आली होती तीचा कालावधी दि.21/02/2009 ते 20/02/2010 असा होता त्यामुळे मृत्यूसमयी रामराव पॉलिसीधारक नव्हता या कारणावरुन या मंचाने ती तक्रार फेटाळलेली आहे.
2) आता तक चे असे म्हणणे आहे की विमा कवच फेब्रूवारी 2008 पासून तीन वर्षाचे होते मात्र विमा पॉलिसी अभावी पुर्वीचा दावा फेटाळण्यात आला नंतर विप क्र.2 नेटसर्फ कम्युनीकेशन चे उस्मानाबाद येथील फेंन्चायजी यांच्याकडून पॉलिसी प्रत मिळविली व दि.18/04/2011 रोजी विप क्र.1 कडे विमा दाव्याची मागणी केली. पुर्वीच्या तक्रारीतील आदेश पाहता त्या कामी ही पॉलिसीची प्रत हजर करण्यात आलेली नव्हती हे स्पष्ट होते. आता ती पॉलिसीची प्रत हजर केलेली आहे. विप क्र.2 कडून नक्की कोणत्या दिवशी पॉलिसीची प्रत मिळाली याबददल तक ने मौन बाळगले आहे. मात्र पुर्वीच्या तक्रारीचा निकाल दि.26/04/2010 रोजी झाला नंतर दि.18/04/2011 रोजी विप क्र.1 कडे विमा रकमेची मागणी केली असे तक चे म्हणणे आहे. म्हणजेच दरम्यान विप क्र.2 कडून पॉलिसीची प्रत मिळाली असा अर्थ होतो. अशा परिस्थितीत विमा दावा मिळणे कामी झालेला उशीर माफ करणे उचीत आहे असे आमचे मत आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
मुद्दा क्र. 2 व 3 :
1) पुर्वीच्या निकालपत्रात स्पष्टपणे म्हंटले की जी पॉलिसी हजर करण्यात आली होती तिचा कालावधी दि.21/02/2009 ते 20/2/2010 असा होता. रामा याचा मृत्यू झाडावरुन पडून दि.01/06/2008 रोजी झाल्याबद्दल तक ने पुरावा हजर केलेला आहे. आता दाखल केलेल्या पॉलिसीचा कालावधी दि.21/02/2008 ते 20/02/2009 असा दिसून येतो म्हणजेच या पॉलिसीच्या कालावधीत रामा याचा मृत्यू झालेला होता. ज्या पॉलिसीची प्रत तक ने आता हजर केलेली आहे ती मूळ पॉलिसी किंवा स्थळप्रत विप क्र.1 कडे असली पाहीजे त्याप्रमाणे रामा याचे नाव नंबर 2246 ला होते की नाही हे विप क्र.1 याला पडताळता येईल.
2) विप क्र.1 चे म्हणणे आहे की रामा याने पुणे कार्यालयाकडून पॉलिसी घेतली होती त्यामुळे विप क्र.1 याला त्याबददल कल्पना नाही. येथे हे स्पष्ट केले पाहीजे की तक तर्फे दि.05/08/2014 रोजी दुरुस्तीचा अर्ज देण्यात आला त्यामध्ये विप क्र.1 च्या पुणे कार्यालयासह कलकत्ता कार्यालय तसेच नेटसर्फचे पुणे कार्यालय यांना विप म्हणून समाविष्ठ करावे असा अर्ज देण्यात आला. तो मंजूरही झाला मात्र तक ने ती दुरुस्ती केली नाही त्यामुळे प्रस्तुत विप या तक्रारीचे कामी सामील नाहीत. विप क्र.1 हे सोलापूरचे कार्यालय आहे.
3) तक ची अशी तक्रार आहे की आता मिळालेली पॉलिसी त्याला पुर्वी मिळाली नव्हती व विप क्र.2 यांनी ती आता दिलेली आहे. विप क्र.2 प्रस्तुत तक्रारीचे कामी गैरहजर राहीलेला आहे. नेटसर्फच्या पुणे कार्यालयाने सुध्दा हुध्दा ाने मी गैरहजर राहीलेली जेरी लावलेली नाही. जरी विप क्र.1 या नॅशनल इन्शूरन्सच्या सोलापूर कार्यालयाने पॉलिसी दिलेली नसली तरी विप क्र.1 ला विमा प्रस्ताव त्यांच्या पुणे कार्यालयाकडे पाठविण्यास काहीच अडचण नव्हती व नाही. तसे न करुन विप क्र.1 ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही अंशत: होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 यांनी तक यांचा विमा प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह आपल्या पुणे कार्यालयाकडे या आदेशासह पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा. जर प्रस्ताव अगर कागदपत्रे मिळाली नसतील तर तक कडून प्राप्त करुन घ्यावीत
3) खर्चाबददल कोणतेही आदेश नाहीत.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद