Maharashtra

Kolhapur

CC/13/353

M/s.Siddhavin Enterprises through Gajanan Dinkar Patil - Complainant(s)

Versus

Vibhagiya Vyavasthapak, The Oriental Insurance Company Ltd., - Opp.Party(s)

R.N.Powar/V.B.Sarnaik

19 Nov 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/353
 
1. M/s.Siddhavin Enterprises through Gajanan Dinkar Patil
A/p. Halkarni, Tal.Chandgad,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Vibhagiya Vyavasthapak, The Oriental Insurance Company Ltd.,
Mandal Karyalaya, 204E Station Road, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madke PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:R.N.Powar/V.B.Sarnaik, Advocate
For the Opp. Party:
Adv.Mankame & Adv. Patil
 
ORDER

नि का ल प त्र :- (मा. श्री. दिनेश एस. गवळी, सदस्‍य) (दि .19-11-2015) 

(1)   प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये वि.प. विमा कंपनी ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केल्‍याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे. 

     प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला.  वि.प.  विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले. तक्रादार व वि.प. यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

       वि. प. ही वित्‍तीय विमा कंपनी असून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे स्‍टॅन्‍डर्ड फायर अॅन्‍ड स्‍पेशल पेरील्‍स पॉलिसी शेडयुल (Standard Fire & Special Perils Policy Schedule) या तत्‍वाखाली मे. “सिध्‍दविण एंटरप्राईझेस” हलकर्णी, ता. चंदगड मधील चॉकलेट, बिस्‍कीट व अन्‍य कन्‍झयुमर्स प्रोडक्‍टसचे रक्‍कम रु. 7,00,000/- चा विमा उतरविला असून त्‍याचा पॉलिसी नं. 161600/11/2011/1978 असा असून पॉलिसीचा कालावधी दि. 1-03-2011 तके 29-02-2012 पर्यंत आहे.   तक्रारदार यांचा  मे. “सिध्‍दविण एंटरप्राईझेस” हलकर्णी, ता. चंदगड, जि. कोल्‍हापूर येथे होलसेल चॉकलेट, बिस्‍कीट व अन्‍य कन्‍झयुमर्स प्रोडक्‍टस विक्रीचा व्‍यवसाय असून  वि.प. कडे रक्‍कम रु. 7,00,000/- चा विमा उतरविलेला आहे.  दि. 29-01-2012 रोजी वर मिळकतीत शॉर्ट सर्कीटने आग लागल्‍याने इमारतीमध्‍ये असलेले चॉकलेट, बिस्‍कीट व अन्‍य कन्‍झयुमर्स प्रोडक्‍टस जळून खाक झाले असून तक्रारदाराचे रक्‍कम रु. 7,00,000/- इतके नुकसान झाले.  त्‍यानंतर तक्रारदारांनी सदर घटनेबाबत नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेसाठी वि.प. यांचेकडे क्‍लेम फॉर्म व आवश्‍यक असलेली सर्व कागदपत्र  दाखल  केली.  परंतु वि.प. यांनी दि. 2-01-2013 रोजी तक्रारदार यांना वि.प. यांनी चुकीचे कारण दाखवून न्‍याययोग्‍य क्‍लेम नामंजूर केला आहे.  तक्रारदार यांनी सदर घटनेची कल्‍पना दि. 29-01-2012 रोजी तहसीलदार हलकर्णी यांना कळविले असून तक्रारदाराचे व्‍यावसायाचे ठिकाण अग्‍नीशामक दलाची सोय नाही.  वि.प.  चे सर्व्‍हेअरने सर्व्‍हे करतेवेळी तक्रारदार यांना इलेक्‍ट्रीक इन्‍स्‍पेक्‍टर यांना हजर ठेवणेसाठी सांगितलेले नाही.   तक्रारदारांचा व्‍यवसाय ग्रामपंचायत मध्‍ये असलेने त्‍यांना व्‍यावसायासाठी शॉप अॅक्‍ट लायसन्‍स मधील तरतुद लागू नाही. तक्रारदारांनी सदरच्‍या घटनेनंतर क्‍लेमफॉर्मबरोबर तक्रारदारांचे देना बँक हलकर्णी शाखेमध्‍ये असलेले स्‍टेटमेंट, स्‍टॉक स्‍टेटमेंट व सर्व कागदपत्रे दिली असूनही वि.प. यांनी तक्रारदारांचा क्‍लेम चुकीचे कारणास्‍तव नाकारुन नामंजूर केला आहे. वि.प. यांनी  तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे.  सबब, वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईची रक्‍कम रु. 7,00,000/- दि. 29-01-2012 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळावेत. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु. 20,000/-  तक्रारदारांना देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदारांनी तक्रार अर्जात केली आहे.                               

(3)    तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत क्‍लेम नाकारलेबाबत वि.प. यांचे पत्र दि. 2-01-2013, स्‍टॉकची पॉलिसी इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.  तक्रारदार तर्फे  शपथपत्र दाखल केलेले आहे. ‍ तसेच दि. 15-07-2015 रोजी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल  केलेले आहे.       

(4)    वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदाराचे  तक्रारीस म्‍हणणे दाखल केले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.   वि.प. त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये असे कथन करतात की, तक्रारदाराने घेतलेली विमा पॉलिसी ही कमर्शिअल आहे.  तक्रारदार हे कमर्शिअल स्‍वरुपाचा व्‍यवसाय करतात ते त्‍यांचे तक्रारीतील नमूद कथनावरुन स्‍पष्‍ट हाते.  त्‍यामुळे ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदीनुसार प्रस्‍तुत तक्रार चालणेस पात्र नाही ती नामंजूर करणेत यावी.  तसेच प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 24-ए प्रमाणे मुदतीत दाखल केलेली नाही. 

     वि.प. त्‍यांचे म्‍हणणेत पुढे असे कथन करतात की, मे. सिध्‍दविण एंटरप्राईजेस ही प्रोप्रायटरी फर्म कोल्‍हापूर जिल्‍हा, तालुका चंदगड येथील हलकर्णी या छोटया गावातील आहे.  सदर फर्मचा विमा Standard Fire & Special Perils Policy Schedule  अंतर्गत उतरविला आहे.  विमा पॉलिसीचा कालावधी दि. 1-03-2011 ते 29-02-2012 असा आहे.  विमा घेतलेले जागेमध्‍ये दिनांक 29-01-2012 रोजी रात्र आग लागली आगीत रक्‍कम रु.7,39,280/- रुपयांचा स्‍टॉक आगीत जळाला.  वि.प. यांनी  लगेचच श्री. बिराजदार सर्व्‍हेअर यांची नेमणुक केली त्‍यांनी सर्व्‍हे करुन दि. 6-08-2012 रोजी सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे.  सदर रिपोर्टची वि.प. यांनी पडताळणी केली असता खाली नमूद त्रुटी आढळुन आल्‍याने तक्रारदाराने दाखल केलेला विमा क्‍लेम वि.प. यांनी नाकारला आहे.  त्‍यामध्‍ये (1) पोलिस पंचनामा, एफआयआर नाही, (2) फायर बिग्रेड रिपोर्ट नाही (3) इलेक्‍ट्रीक  इन्‍स्‍पेक्‍टर रिपेार्ट नाही.  ­(4) लोकल न्‍यूज पेपरला बातमी नाही (5) शॉप अॅक्‍ट लायसन्‍स नाही. (6) नोकरांचे मस्‍टररोल नाही. (7) वैध बँक अकौंट नाही. (8) Loss & Profit statement made without verification (9) परचेस बिले नाहीत. (10) आगीचे खरे कारण स्‍पष्‍ट नाही. (11) विमा घेतलेली जागेची सद्यस्थिती - no business activities are exercised in insured premises सदरील बाबींचा विचार करुन विमा पॉलिसीचे अटींचा भंग झाल्‍याने तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. 

      सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी आणि त्‍यांचेवरती ग्राहक सरंक्षण कायदा, कलम 26 प्रमाणे दंडात्‍मक खर्चाची रक्‍कम बसवावी अशी विनंती वि.प. यांनी केली आहे.   

(5)   वि.प. यांनी दि. 9-02-2015 रोजी सर्व्‍हे रिपोर्ट- (Fire Policy)  दाखल केले आहेत.

(6)   तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे,  वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा लेखी व तोंडी युक्‍तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्‍कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.

               मुद्दे                                                                 उत्‍तरे 

                    

1.   तक्रारदार हे वि.प. विमा कंपनीचे ग्राहक

     आहेत काय ?                                                            होय 

2.   प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत आहे काय ?                         होय

3.    वि.प. विमा कंपनीने  तक्रारदारांना द्यावयाच्‍या

     सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                                      होय.

4.   तक्रारदार हे तक्रार अर्जात नमूदप्रमाणे

     विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे का ?                      होय अंशत:                                   

5.   आदेश काय ?                                                          अंतिम निर्णयाप्रमाणे.

                                     

कारणमीमांसा:-

  मुद्दा क्र.1-

        प्रस्‍तुत प्रकरणात यातील वि.प. कंपनीने तक्रारदार यांनी त्‍यांचेकडे उतरविलेली विमा पॉलिसी ही व्‍यावसायीक कारणाकरिता उतरविली असल्‍याने ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे तरतुदीप्रमाणे ते ग्राहक होत नाहीत असे म्‍हटले आहे.

        प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांनी आपल्‍या युक्‍तीवादामध्‍ये जरी पॉलिसी Commercial असली तरी तक्रारदार हे सदर व्‍यवसायावरती आपली उपजिविका करतात व तसे त्‍यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.  त्‍यामुळे ते  वि.प. यांचे ग्राहक होतात असे कथन केले आहे व त्‍याअनुषंगाने या मंचात (1) 1998 CCJ 657 National Consumer Disputses Resdressal Commission, New Delhi  Tata Engineering & Locomotive Co. Ltd and another    - Appellants  V/s. Gajanan Y. Mandrekar    - Respondent     Consumer Protection Act, 1986 section 2(1)(d)(i) – Consumser- Commercial  purpose – Complaint regarding supply of vehicle different from that booked and defects in it – Objection  that complainant is not a ‘consumer’ since the vehicle was purchased for commercial  purpose -  Complainant is a qualified driver and bought the vehicle for self occupation to earn his livelihood -  Whether complainant is a consumer under the Act – Held : yes.

2)      I (2005) CPJ 27 (NC)

National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi

HORSOLIA MOTORS                          - Appellant

Vs.

NATIONAL INSURANE CO. LTD    - Respondent

      Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(d), 2(1)(o) – Consumer  - Services – Commercial purpose – Insurance policy  taken by commercial units – Whether excluded from purview of C.P.Act – Complainants  availed service of insurance company for commercial purpose – Complaint dismissed by  State Commission as not maintainable – Hence appeal – Hiring of services of insurance company by complainants who are carrying on commercial activities cannot be held to be a commercial purpose – Policy is taken for reimbursement or indemnity for loss which may be suffered  due to various perils – No question of trading or carrying on commerce in insurance policy  - Contract of insurance generally belongs to general category of contract of indemnity – Services may be for any connected commercial activity, yet it would be within purview of Act – Commercial purpose means goods purchased or services hired should be used in activity directly intended to generate profit which is the main aim of commercial purpose  - Where goods purchased or service hired in activity which is directly not intended to generate profit, it would  not be commercial purpose – Person who takes insurance policy to cover envisaged risk not takes policy for commercial purpose – Policy is only for indemnification of actual loss, not intended to generate profit – Appeals allowed – Order of State Commission set aside – Matter remitted back fosr being decided on merit. Result : Appeal allowed  चे न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.

     सदरचे न्‍यायनिवाडयाचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये The words for any commercial purpose are wide enough to take in all cases where goods are purchased for being used in any activity directly inacted to generate profit. असे नमूद केले आहे. 

     तक्रारदाराचे तक्रारीमध्‍ये त्‍यांनी चालवीत असलेला व्‍यवसाय हे त्‍यांचे उपजिविकेकरिता चालवित आहेत असे नमूद केले आहे त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने घेतलेली विमा पॉलिसी तरी Commercial असली तरी सदरचे पॉलिसीचे अनुषंगाने  वि.प. यांनी  त्‍यांना सेवा देण्‍याचे मान्‍य केले आहे.  सबब, वरील सर्व विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे  ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 मुद्दा क्र. 2  :-

      प्रस्‍तुत प्रकरणात प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक  संरक्षण कायदा, 1986 कलम 24-ए प्रमाणे मुदतीत दाखल केली नाही असे वि.प. यांचे म्‍हणणे आहे.  तर तक्रारदाराने त्‍यांची तक्रार मुदतीत आहे असे म्‍हणणे आहे.  सदरचे  मुद्देचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने दाखल केलेल्‍या वि.प. यांचा दि. 2-01-2013 रोजीचे क्‍लेम नामंजूर  पत्र पाहिले असता, तक्रार दाखल करणेस कारण सदचे नामंजूर पत्र मिळालेपासून मुदत सुरु झाल्‍यापासून दोन वर्षाकरिता आहे.  तक्रारदारांची सदरची तक्रार दि. 7-12-2013 रोजी दाखल केली आहे त्‍यामुळे  तक्रारदाराची तक्रार मुदतीत दाखल आहे असे या मंचाचे मत आहे.  सबब, मुद्दा क्र.  2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

मुद्दा क्र  . 3   :-

     तक्रारदार यांचे मालकीचे “मे. सिध्‍दविण एंटरप्राईजेस “ या नावचे दुकान असून सदर दुकानातील स्‍टॉक म्‍हणजेच चॉकलेटस, बिस्‍कीटस व अन्‍य कंझुमर प्रॉडक्‍ट रक्‍कम रु. 7,00,000/- चा विमा आहे ”Standard Fire Spseial Peril Policy Scheme”  या तत्‍वाखाली वि.प. विमा विमा कंपनीकडे  उतरविला होता.  त्‍याचा पॉलिसी नं.161600 /11/2011/1978  असा  आहे.  त्‍याचा कालावधी दि. 1-03-2011 ते 29-02-2012 असा आहे.  विमा पॉलिसी व  तिचे कालावधीबाबत वाद नाही.  तथापि सदर पॉलिसीचे कालावधीमध्‍ये दि. 29-01-2012 रोजी सदर दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागून संपुर्ण स्‍टॉकचे नुकसान  झाले.  त्‍यानंतर वि.प. कडे नुकसान भरपाई क्‍लेम केला असता वि.प. यांनी (अ) तक्रारदार यांनी सदर घटनेबाबत पोलिस ठाण्‍याला कळविले नाही. (ब) फायर बिग्रेडला कळविले नाही (क)  इलेक्‍ट्रीक इन्‍स्‍पेटरचा अहवाल सादर नाही (ड) शॉप अॅक्‍ट लायसन्‍स नाही,इ. बँक अकौंट स्‍टेटमेंट, स्‍टॉक स्‍टेटमेंट सादर केले नाही. (ई) माल खरेदीच बिले खोटी तयार केली आहेत (फ) पॉलिसी अटीप्रमाणे व्‍हायोडेबल होती इ. कारणावरुन  क्‍लेम नामंजूर केलेला आहे.  सबब, प्रस्‍तुत कामी वि.प. यांनी वर नमूद  कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.

     सदरचे मुद्दयांचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदाराने तसेच वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले.  तसेच  सदर कामी तक्रारदाराने व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या लेखी युक्‍तीवादामध्‍ये नमूद केलेल्‍या सर्व बाबींचा सखोल विचार केला.  तक्रारदाराने आपल्‍या युक्‍तीवादामध्‍ये वि.प. यांनी क्‍लेम नाकारल्‍याचे कारणांना स्‍पष्‍टीकरण दिले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी (अ) पोलिसांना तक्रार दिली नव्‍हती कारण त्‍यांची त्‍यांना कल्‍पना नव्‍हती.  तसेच सदरचा प्रकार शॉर्ट सर्किटने झाल्‍याने सर्व्‍हेअरने  मान्‍य केले आहे.  तहसिलदार यांना कळविले होते. त्‍याप्रमाणे तलाठी यांनी पंचनामा केला आहे.  सदरचे कारणांचे अनुषंगाने  या मंचाने दाखल सर्व्‍हेअरचा अहवालाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये कलम 7.0 Cause of Fire – As per our obsesrvations and the paper shown to us the probable  cause of fire is due to electrical short circuit. असे नमूद आहे.  तसेच अनुक्रमे ‘ब’,’क’, ‘ड’ याबाबतीत ही तक्रारदाराने तक्रारदारांचे नमूद केले गांव – हलकर्णी येथे आहे तेथे फायर बिग्रेडची सोय नाही, तक्रारदारांनी विमा कंपनीस ताबडतोब कळविले त्‍याप्रमाणे सर्व्‍हेअरने सर्व्‍हे केला तसेच वि.प. विमा कंपनीने इलेक्‍ट्रीक इन्‍स्‍पेक्‍टरचा अहवाल द्या असे सांगितले नाही, तक्रारदाराचे दुकान ग्रामपंचायत हद्दीत येत असल्‍याने शॉप अॅक्‍टचे लायसन्‍स काढणेचा प्रश्‍न येत नाही असे स्‍पष्‍टीकरण दिलेले आहे.  सदरचे बाबतीत सर्व्‍हेअर रिपोर्टमध्‍ये  स्‍पष्‍टपणे उल्‍लेखही कलम 8.0 ते 12.0 मध्‍ये आहे.

     त्‍याचप्रमाणे वि.प. यांनी तक्रारदारांनी बँक स्‍टेटमेंट, स्‍टॉक डिक्‍लरेशन सादर केलेले नाही म्‍हणून क्‍लेम  नामंजूर केलेला आहे असे त्‍याचे दि. 2-01-2013 रोजी क्‍लेम  नामंजूर पत्रामध्‍ये नमूद केलेले आहे.  त्‍यास तक्रारदार यांनी त्‍यांचे लेखी युक्‍तीवादामध्‍ये  त्‍यांना सदरची सर्व कागदपत्रे सर्व्‍हेअरना सादर केली होती व त्‍यावरुनच सर्व्‍हेअरने त्‍याचे अलवालामध्‍ये तसा उल्‍लेख केलेला आहे असे म्‍हटले आहे.  याबाबतीत सर्व्‍हेअरचा सर्व्‍हे रिपोर्ट पाहिला असता सदर  रिपोर्टमध्‍ये  कलम 13.0  Inspecstion and Verification -

        We visited at insuresd shop and verified and examined the necessary records shown to us.

      13-1) During the survesy and assessment the papers received and enclosed shows following position:

   Partiulars

Observations

Shop Act Licence

Grampanchayat Halkarni Certificate dt. 04-06-2012 for business held on record

Dena Bank loan No. 069613001107

A/c extract copy enclosed.  Cash deposits and withdrawal are made. 5-09-2009 to 19-04-2012 a/c closed on 31-03-2010 of Rs. 5 lacs loan. 

Purchase bill copies

Zerox copies enclosed.

Photo copies

Fire spot

Trading A/c., P & L and Balance

Sheet 

2009-10 and 2010-11

Total Monthly purchase and sales

April 2011 to Jan 2012 

Dena Bank Halkarni Branch

Loan a/c extract

Claim form copy with list of loss of stock 

As per list attached details of loss.

Talathi Panchanama copy

Dt.31-01-2012 total loss sreported Rs. 8.50 lacs

Intimation letter to insurance Co.

Dt.30-01-2012 for loss of shop stock and FFF due to fire

Sketch of the premises

Copy given enclosed

 13-2) As per record the insuresd had not taken any loan from Dena Bank, Halkarni Branch in 2011-12.

13-3) The Trading account given on record for last 2 years and up to the date of loss shows following position.

Trading A/c

2007-08

Rs.In lacs

2008-09

Rs.In lacs

2009-10

Rs.In lacs

2010-11

Rs.In lacs

01.04.11

 to 30.01.12 upto date of lossRs. In lac

Remarks

Opening Stock

6.97

7.46

7.55

7.62

7.90

 

Purchases

26.32

27.32

27.15

29.03

23.94

 

Freight

0.03

0.03

0.03

0.04

0.10

 

Gross Profit

3.08

3.44

3.70

3.91

3.10

Average Gross Profit of last 4 years taken

Total

36.40

36.40

38.08

40.32

35.04

 

Sales

28.94

28.94

30.53

32.70

27.19

 

Closing Stock 

 7.46

 7.55

 7.62

 7.90

 7.85

Balancing figure shows as per acccounting principle

Total

36.40

38.08

40.32

39.11

35.04

 

G.P. %

10.66%

11.26%

11.30%

12.51%

11.43%

Average

 

      The above statement shows that total sales as compared to last year are decreased.  From the above statement and figures we notice that the tatal value of stock is not given correctly by the insuresd and the figures and same and as compared to market prices in 4 years but it must be changed.

Trading A/C.

2007-08

Rs. In Lac

Remarks

Opening Stock

2.74

The insursed had given to us two separate Trading A/c. of 2007-08 in one Trading A/c. stock shown Rs 3.71 lacs but in other Trading A/c. opf 2007-08 it shows Rs. 7.46 lacs also the Purchase  and sales amounts are changed and Incomes Tax return filed of 2007-08 A.Y. 2008-09 on record vides No.03177 and declared Income of Rs. 1.17 lacs as per stock of Rs 3.17 lacs. Therefore we have taken this amount.  Please see Annexure ‘B’.      

Purchses

17.08

Freight

0.03

Gross Profit

1.77

Total

21.64

Sales

17.93

Closing Stock

3.71

Total

21.64

G.P. %

9.90 %

Therefore we have calculated on the basis of personal discussion and inspection on the spot and appx increase in such types of business every year at Halkarni village considering the spot of the insured, area of the insured and local available information and the various persons purchasing power at Halkarni place.  

      13.4)  From the available records it appears that the insured is conducting trading businsess in biscuits, chocolets, other kirana items.

      13.5)      The purchase bill copies of items ares enclosed of following suppliers : Jamadade Tradelines Gadhinglaj, Kolhapur and Patel and Co Chandgad Dist. Kolhapur, Om Agency, Kolhapur, Girish Marketing, Gadhinglaj, Satkar Traders, Kolhapur etc.

      13.7) During our inspection and discussion we found that the stock stored in the shop is at various places in open in cartoon boxes.  One wooden cupboard was kept for storage of stock in the shop.         

      सदरचे सर्व्‍हेअरने केलेल्‍या रिपोर्टचे अवलोकन करता असे आढळून येते की, सर्व्‍हेअर यांना तक्रारदार यांनी सन 2009-10 आणि सन 2010-11 चे Trading Account  P  & L  आणि Balance Sheet, Purchase Bill copies, Total Monthly Purchses and Sales 2011 to 2012  इत्‍यादी कागदपत्रे सादर केली असून त्‍यांचे पडताळणी करुन सर्व्‍हेअरने आपला रिपोर्ट दिलेला आहे.  सदर रिपोर्टचे कलम 14.0 Valuation of Stock -

    As per list given to us of various items shows that the details given by insured are of all items amount and total value of stock in the shop prior to loss is as per summary details given in Annexure ‘A’ is Rs. 7,39,281/-.  We have gone through the papers  submitted and physically verified the situation of the shop and after noting the accommodating capacity of the area, space of keeping various material etc. In our opinion as per list given to us and considering sthe spot of the insured, storage area, locality area and capacity of local pesrsons and total loss of various items of stock value is Rs. 4,87,380/- Details in Annexture – ‘B’ कलम 18.0 Loss Assessment and Loss Payable  Net payable Rs. 4,77,380/- असे नमूद केलेले आहे. 

     वरील सर्व विवेचनाचा विचार करता वि. प. विमा कंपनी  यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम नामंजूर पत्राप्रमाणे अनुक्रमे ‘अ’ ते ‘फ’ या कारणास्‍तव नाकारलेला क्‍लेम ही वि.प. यांना तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.  3  चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.                                      

मुद्दा क्र.  4 :   

     वर मुद्दा क्र. 3 मध्‍ये विस्‍तृत विवेचनाचा विचार करता यातील तक्रारदार यांनी नुकसानपोटी रक्‍कम रु. 7,00,000/- ची मागणी केली असली तरी त्‍यांनी वि.प. यांनी नेमलेल्‍या सर्व्‍हेअरने काढलेली नुकसानभरपाईची रक्‍कम रु. 4,87,380/- इतकी रक्‍कम बरोबर आहे असे या मंचाचे मत आहे कारण सर्व्‍हेअरने त्‍यांचे सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये त्‍यांनी काढलेली रक्‍कमेबाबत ही तक्रारदाराने त्‍याचेकडे दाखल केलेल्‍या Trading Account, Balance Sheet, Income Tax return record तसेच  spot of insursed storages area, Loacaling aresa and capacity of local persons या सर्व बाबीचा विचार करुन         total loss of various itsems रक्‍कम रु. 4,87,380/- काढलेली आहे.  त्‍यातुन रक्‍कम  रुन 10,000/-  Less Excess  वजा केलेले  आहेत. परंतु  Excess रु. 10,000/- कशाबद्दल वजा केले हे स्‍पष्‍ट होत नाही.   सबब,  तक्रारदार हे नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु. 4,87,380/- वि.प. यांचेकडून मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदरचे रक्‍कमेवरती क्‍लेम नाकारलेची दि. 2-01-2013 रोजीपासून द.सा.द.शे. 9 %  प्रमाणे संपुर्ण  रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज अदा करावे.  तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 7,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 3,000/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 

                                                   दे

1.  तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.

2.  वि. प. विमा कंपनीने तक्रारदारांस नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु. 4,87,380/- (अक्षरी रुपये चार लाख सत्‍याऐंशी हजार तीनशे ऐंशी फक्‍त) अदा करावी व सदर रक्‍कमेवर दि.  2-01-2013 पासून द.सा.द.शे. 9 % प्रमाणे ते संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज अदा करावे.          

3.  वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 7,000/-(अक्षरी रुपये सात हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त ) अदा करावेत.

4 .    सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madke]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.