अॅड सुरेन्द्र के शर्मा तक्रारदारांकरिता
अॅड संजय म्हाळगी जाबदेणार क्र 1 तर्फे
जाबदेणार क्र 2 एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 20/जुलै/2013
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार विमा कंपनी विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार यांचा मुलगा कै. जसविंदरसिंग वसिर याने जाबदेणार क्र 1 यांच्याकडे पॉलिसी क्र 956505154 उतरविली होती. दिनांक 26/09/2009 रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. दिनांक 26/09/2009 रोजी शवविच्छेदन करण्यात येऊन मृत्यूचे कारण traumatic and hemorrhagic shock and to head injury with abdominal injury असे नमूद करण्यात आले. तक्रारदारांच्या कथनानुसार घटनेपासून 16 महिन्यांनी म्हणजेच दिनांक 15/10/2010 रोजी कै. जसविंदरसिंग वसिर यांचे रक्त तपासणीसाठी फॉरेनसिक लॅब कडे पाठविण्यात आले. लॅबच्या अहवालानुसार 76 mgEthyl alcohol per 100 ml असे कळविण्यात आले. जाबदेणार क्र 1यांनी दिनांक 9/9/2011 रोजी अपघाती विमा फेटाळून मुळ रक्कम तक्रारदारांना अदा केली. जाबदेणार क्र 2 यांनी विलंबाने रक्त तपासणीसाठी पाठविले, तसेच ते कोठे व कशा पध्दतीने पाठविले याचे उत्तर तक्रारदारांना देण्यात आले नाही, लॅबचा अहवाल जसविंदरसिंग यांचा नसून जसवीर सिंग यांचा आहे. त्रयस्थ व्यक्तीचा रक्त चाचणी नमूना देऊन तक्रारदारांची फसवूणक केली आहे. म्हणून प्रस्तूतची तक्रार दाखल करुन तक्रारदार अपघाती विम्याची रक्कम रुपये 2,00,000/- व्याजासह जाबदेणार यांच्याकडून मागतात.
2. जाबदेणार क्र 2 यांना नोटीस बजावूनही गैरहजर म्हणून दिनांक 21/6/2012 रोजी एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत.
3. जाबदेणार क्र 1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणी विरोध दर्शविला. तक्रारदारांच्या मुलाचा – जसविंदरसिंग वसिर मृत्यू दिनांक 26/9/2009 रोजी झाला नसून दिनांक 28/6/2009 रोजी झालेला आहे. लॅबचा अहवाल जसविंदरसिंग यांचा नसून जसवीर सिंग यांचा आहे व त्रयस्थ व्यक्तीचा रक्त चाचणी नमूना देऊन तक्रारदारांची फसवूणक केली, तक्रारदारांचे म्हणणे चुकीचे आहे. जसविंदरसिंग यांच्या नावातील किरकोळ स्पेलिंग मिस्टेकचा आधार तक्रारदार घेऊ शकत नाहीत. शवविच्छेदनाचे वेळी कै. जसविंदरसिंग यांच्या रक्ताचा नमूना घेण्यात येऊन त्याला MLPM क्र 862/09 देण्यात आला होता. फॉरेनसिक लॅबलाही तपासणीसाठी MLPM क्र 862/09 हाच नमूना मिळालेला होता, तोच लॅबने तपासला होता. केमिकल अॅनलायझर, फॉरेनसिक लॅब, पुणे यांचा दिनांक 24/12/2010 रोजीचा अहवालामध्ये रक्ताच्या नमून्यामध्ये 76 mg of Ethyl alcohol per 100 ml असे नमूद करण्यात आलेले आहे. रक्ताचा नमूना पाठविण्यास विलंब झाल्यामुळे अथवा अयोग्य प्रिझरव्हेटिव्ह मुळे रक्ताचा नमूना डॅमेज झाला असता तर तसे फॉरेनसिक लॅब च्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले असते. पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार intoxicated condition मध्ये गाडी चालवत असतांना अपघाती विम्याचे फायदे मिळत नाहीत. पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे अपघाती विम्याचा तक्रारदारांचा क्लेम नामंजूर करण्यात येऊन मुळ रक्कम तक्रारदारांना अदा करण्यात आलेली आहे. जाबदेणार यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही सबब तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची, शपथपत्र, केमिकल अॅनलिसीस रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, पोलिस पंचनामा, पॉलिसी कागदपत्रे, लेखी युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. मुद्ये, त्यावरील उत्तरे व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | उत्तरे |
1 | जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही |
2 | आदेश काय ? | तक्रार नामंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये जरी त्यांचा मुलगा जसविंदरसिंग वसिर याचा मृत्यू दिनांक 26/09/2009 रोजी झाला असे नमूद केले असले तरी जसविंदरसिंग वसिर यांच्या मूत्यूच्या दाखल्यावरुन त्याचा मृत्यू दिनांक 28/6/2009 रोजी झाल्याचे स्पष्ट होते. मृत्यूच्या दाखल्याची खरी नक्कल मंचासमोर दाखल करण्यात आलेली आहे. मंचासमोर दाखल करण्यात आलेल्या पोस्टमार्टेम अहवालाचे अवलोकन केले असता त्यामध्ये केमिकल अॅनालिसीस साठी रक्ताचा नमूना घेण्यात आला असून त्याला MLPM No.862/09- दिनांक 29/6/2009 देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. फॉरेनसिक लॅब, पुणे यांच्या दिनांक 24/12/2010 रोजीच्या पत्रावरुन MLPM No.862/09 दिनांक 29/6/2009 प्राप्त झाल्याचा, तो सुरक्षित असल्याचे “one sealed bottle seals intact and as per copy sent… P.C.No.4226 received in this office on 15-10-10” करण्यात आलेले आहे. तसेच एक्झिबिट लेबल – जसवीरसिंग प्रितमसिंग असे नमूद करण्यात आले आहे. जरी एक्झिबिट मध्ये जसवीरसिंग प्रितमसिंग असे नूमद करण्यात आलेले असले तरी कै.जसविरसिंग वसिर यांचा रक्त तपासणी साठी घेतलेला नमूना हा MLPM No.862/09 क्रमांकाचा होता व फॉरेनसिक लॅबलाही MLPM No.862/09 याच क्रमांकाचा रक्ताचा नमूना तपासणीसाठी मिळालेला होता, त्यासंदर्भात त्यांनी पोहोचही दिल्याचे दाखल पत्रावरुन स्पष्ट होते. केवळ लेबल वर नमूद करण्यात आलेल्या नावातील स्पेलिंग मिस्टेक मुळे, रक्ताचा नमूना तक्रारदारांच्या मुलाचा नसून तिस-या इसमाचा होता हे तक्रारदारांचे म्हणणे मंच अमान्य करीत आहे. तसेच रक्ताच्या नमून्याची बाटली सील होती, सील सुरक्षित होते हेही वर नमूद पत्रात स्पष्ट करण्यात आलेले आहे. रक्ताचा नमूना विलंबाने तपासणीसाठी पाठविल्यामुळे अथवा अयोग्य प्रिझरव्हेटिव्ह मुळे रक्ताचा नमूना डॅमेज झाला असता तर तसे लॅबच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले असते. तसेच त्या परिस्थितीत तपासणी करणे शक्य नाही अथवा तपासणी करण्यात आली असती तर ती योग्य/पुरेशी होणार नाही असेही अहवालात नमूद करण्यात आले असते. परंतू तसे लॅबच्या अहवालामध्ये कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. तसेच प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्या दिनांक 19/9/2011 रोजीच्या पत्रावरुन रक्ताचे नमुने व्यवस्थित संरक्षित करुन योग्य काळजी घेतल्यास खराब होत नाहीत असेही नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे विलंबाने दिनांक 15/10/2010 रोजी तपासणीसाठी मिळालेला रक्ताचा नमूना खराब झाला असावा या म्हणण्याच्या पुष्टयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रारदारांचे म्हणणे मंच अमान्य करीत आहे.
लॅबच्या वर नमूद 24/12/2010 रोजीच्या पत्रामध्ये “Results of Analysis – Exhibit contains 76 milligrammes of Ethyl alcohol per 100 milliliter” असे नमूद करण्यात आलेले आहे. मोटार व्हेईकल्स अॅक्ट 1988 कलम 185 मध्ये “185. Driving by a drunken person or by a person under the influence of drugs - (a) has, in his blood, alcohol exceeding 30 mg per 100 ml. of blood detected in a test ..” असे नमूद करण्यात आलेले आहे. प्रस्तुतच्या प्रकरणात जसविंदसिंग वसिर यांनी 76 mg of Ethyl alcohol per 100 ml सेवन करुन वाहन चालविले होते व त्याचा अपघाती मृत्यू झाला होता हे वरील विवेचनावरुन स्पष्ट होते. 76 mg इथेल अल्कोहोल हे 30 mg पेक्षा अधिक असल्यामुळे, पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे तसेच Chapter V Double Accident Benefit and Permanent Disability Benefit मध्ये “if the death be caused by while the life assured is under the influence of any intoxicating liquor, drug or narcotic, the accident benefit will not be payable” असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे योग्य कारणावरुन जाबदेणार यांनी अपघाती विमा फेटाळून मुळ रक्कम तक्रारदारांना अदा केलेली आहे. यामध्ये जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
3. मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत उभय पक्षकारांनी घेऊन जावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.