// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 245/2014
दाखल दिनांक : 18/11/2014
निर्णय दिनांक : 28/04/2015
कैलास महादेवराव गवई
वय 35 वर्षे व्यवसाय – मजुरी
रा. फत्तेपुर (जावरा), ता. तिवसा
जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- विभागीय कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.
अमरावती विभाग अमरावती
- उपविभागीय कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.
तिवसा विभाग तिवसा, ता. तिवसा
जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. इंगळे
विरुध्दपक्ष तर्फे : अॅड. अळसपुरकर
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 28/04/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे तो विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. सुरवातीला त्याच्या घरात त्याचे आईचे नावाने विज मिटर घेतलेले होते, ते खुप जुने झाल्याने सन २०१२ रोजी त्याने विरुध्दपक्ष यांचेकडे अर्ज देवून नविन विद्युत वाहिनी जोडण्याकरीता विनंती केली. त्यानुसार विरुध्दपक्षाने ती करुन दिली. परंतु ते करीत असतांना विरुध्दपक्षाने निष्काळजीपणा बाळगुन जोडणी केली व मिटर सुरु करुन दिले. त्यानंतर विद्युत वाहिनी वाढ होणे किंवा कमी होणे सुरु झाले, त्याबद्दलची तक्रार दि. २.८.२०१३ रोजी तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे केली तसेच वेळोवेळी तोंडी विनंती केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे दि. २७.६.२०१४ रोजी त्याची पत्नी घरात पोछा मारतांना तिचा धक्का कुलरला लागला व कुलर मध्ये विद्युत प्रवाह असल्याने तिला विजेचा शॉक लागुन ती मरण पावली. तक्रारदार हा संध्याकाळी घरी आल्यावर याबद्दल त्याला माहिती झाली. त्याची तक्रार पोलिस स्टेशन तिवसा येथे केली. पोलिसांनी घटना स्थळ पंचनामा केला असतांना असे लक्षात
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..3..
आले की, कुलरची बटन बंद असतांना कुलर मध्ये विद्युत प्रवाह होता. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या पत्नीचा शॉक लागुन मृत्यु झाला. त्याला 5 वर्षाची मुलगी आहे ती पोरकी झाली. तक्रारदाराची पत्नी ही आशा या संस्थे अंतर्गत स्वयंसेविका होती तिला रु. ५,०००/- प्रतिमाह मिळत होते. तिच्या मृत्युमुळे तक्रारदाराचे नुकसान झाले त्यासाठी रु. १२,००,०००/- नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याने हा तक्रार अर्ज दाखल केला.
4. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 16 ला त्यांचा लेखी जबाब दाखल करुन तक्रार अर्जातील त्यांच्या विरुध्द केलेल्या बाबी नाकारल्या. त्यांच्या कथनानुसार कुलर मध्ये जो विद्युत प्रवाह होता, असे तक्रारदाराचे कथन आहे, तो कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, यासाठी भरपुर तोंडी पुरावे देणे आवश्यक आहे. त्यामुळे हा तक्रार अर्ज या मंचात चालु शकत नाही, तक्रारदार हे योग्य त्या दिवाणी न्यायालयात दाद मागु शकतात. त्यांचे कथन असे आहे की, तक्रारदाराच्या घराला जो विद्युत प्रवाह देण्यात आला होता त्याची बरेचशी बिले हे न भरल्यामुळे विद्युत पुरवठा कायम स्वरुपी खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराच्या अर्जावरुन तो पुन्हा सुरु करण्यात आला. मिटर पर्यंत अर्थींग
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..4..
घेण्याचे काम हे विरुध्दपक्षाचे असते परंतु घरातील अर्थींग हे ग्राहकास स्वतः करावे लागते. घटना घडली त्यावेळी तक्रारदार हा घरी हजर नव्हता व त्यामुळे त्याला घटनेची प्रत्यक्ष माहिती नाही. या प्रकरणात तज्ञांचा अहवाल हा महत्वाचा आहे. तक्रारदाराची तक्रार आल्यानंतर विद्युत निरीक्षकाकडे प्रकरण सोपविण्यात आले व त्याची तपासणी करुन अहवाल दिला ज्यात विरुध्दपक्षाचा कोणतीही दोष नाही असे निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई देण्यास विरुध्दपक्षाची जबाबदारी येत नाही. त्यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नसल्याने तक्रार अर्ज रद्द करावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केली.
5. तक्रारदाराने निशाणी 19 ला प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. अळसपुरकर यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
6. तक्रार अर्ज, लेखी जबाब, प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. अळसपुरकर यांचा तोंडी युक्तीवाद विचारात घेवून खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- तक्रारदाराच्या पत्नीचा मृत्यु हा
विरुध्दपक्षाच्या निष्काळजीपणामुळे झाला
आहे का ? .... नाही
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..5..
- तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे का ? नाही
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
7. तक्रारदाराच्या घरात असलेले जुने मिटर बदलवून नविन मिटर लावण्यात आले ही बाब वादातीत नाही. दि. २.८.२०१३ रोजी तक्रारदाराने जी तक्रार केली होती त्यावरुन असे दिसते की, त्यावेळी त्याच्या घरात विद्युत पुरवठा हा कधी कमी दाबाचा तर कधी जास्त दाबाचा होत असल्याची त्याची तक्रार होती. त्यानंतर घरातील विज वाहिनीची त्याने तपासणी घेतली किंवा नाही याबद्दलचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही.
8. तक्रारदाराने तक्रार अर्जात दाखल केलेले दस्तावरुन ही बाब शाबीत होते की, तक्रारदाराच्या पत्नीचा मृत्यु हा विजेचा करंट लागल्याने झालेला आहे, परंतु त्यासाठी विरुध्दपक्ष जबाबदार आहे किंवा नाही हे पाहावे लागेल.
9. तक्रारदाराने निशाणी 2 सोबत विज मिटरचे फोटोग्राफ दाखल केले परंतु त्यावरुन हे शाबीत होत नाही की, अर्थींग हे दोषपूर्ण झालेले होते. विरुध्दपक्षाचे कथन असे आहे की,
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..6..
घरातील विजेची वाहिनी व अर्थींग ही योग्य असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही ग्राहकाची असते. विरुध्दपक्षाने मिटर पर्यंत योग्य स्थितीत अर्थींग लावून दिले होते. ते योग्य नव्हते याचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. तक्रारदाराने प्रतिउत्तरात जरी असे म्हटले असेल की, विरुध्दपक्षाने नविन मिटर लावतांना कोणताही टेस्ट रिपोर्ट दिला नव्हता. परंतु टेस्ट रिपोर्ट देण्याची जबाबदारी ही ग्राहकाची असते. या प्रकरणात तक्रारदाराने टेस्ट रिपोर्ट दिला होता किंवा नाही हे शाबीत केलेले नाही.
10. दि. १६.८.२०१४ रोजी तक्रारदाराने विरुध्दपक्षाला जी नोटीस पाठविली होती त्यावरुन असे दिसते की, त्याला घरातील विज वाहिनीचे अर्थींग बाबत दोष असल्याची माहिती होती, तो दोष दूर करण्यासाठी सन २०१२ पासुन त्याने काय प्रयत्न केले याबद्दल लेखी पुरावा दाखल केला नाही. जर तो दोष सन २०१२ पासुन होता तर त्याने तज्ञांकडून स्वतःच्या घरातील विज वाहिनी तपासणी करुन घेणे योग्य झाले असते, जे त्याने केलेले दिसत नाही.
11. तक्रारदाराने तक्रार केल्या नंतर विरुध्दपक्षाने त्याची तक्रार तंज्ञ असलेले विद्युत निरीक्षकाकडे पाठविली होती. विद्युत निरीक्षकाने जो अहवाल दिला तो विरुध्दपक्षाने या
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..7..
प्रकरणात दाखल केलेला आहे. त्यावरुन हे शाबीत होते की, विरुध्दपक्षाने कोणताही निष्काळजीपणा अर्थींग बद्दल केलेला नाही. तो अहवाल चुकीचा आहे हे दर्शविणारे इतर कोणताही लेखी पुरावे तक्रारदाराने दाखल केलेले नाही. जेव्हा या प्रकरणात तज्ञांचा अहवाल उपलब्ध आहे तेव्हा त्यात नमुद बाबी विरुध्द कोणताही निष्कर्ष काढणे हे न्यायोचित होणार नाही त्यामुळे हा अहवाल स्विकारुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, विरुध्दपक्षाने निष्काळजीपणा केला ही बाब तक्रारदाराने शाबीत न केल्याने विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढणे योग्य होत नाही. यावरुन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
12. मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येत असल्याने तक्रारदार हा कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होत नाही. यावरुन मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
13. हे जरी खरे असले की, तक्रारदाराची पत्नी ही विजेचा शॉक लागुन मृत्यु झालेली आहे व त्या मृत्युमुळे त्यास तसेच त्याचे कुटुंबियांना खचितच मानसिक धक्का बसलेला असून मय्यत पत्नी ही कमावती असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले असे जरी असले तरी त्या मृत्युस विरुध्दपक्षाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी
ग्राहक तक्रार क्रमांकः 245/2014
..8..
तक्रारदाराची होती, त्यात त्याला यश येऊ शकले नाही, त्यामुळे हा तक्रार अर्ज खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज हा नामंजूर करण्यात येतेा.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 28/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष