Maharashtra

Satara

CC/14/15

VIKRAM SHIVAJINAGAR NALAWADE - Complainant(s)

Versus

VIBHAG NIYANTRAK S T DEPOT. - Opp.Party(s)

11 Feb 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                           मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 15/2014.

                                                                                                     तक्रार दाखल दि.28-01-2014.

                                                                                                      तक्रार निकाली दि.11-2-2015. 

 

श्री.विक्रम शिवाजीराव नलावडे,

रा.शिवरत्‍न, संगमनगर, सहकारनगर,

वेदभवन मंगल कार्यालयासमोर, सातारा.              ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. विभाग नियंत्रक,

   महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ,

   कोल्‍हापूर.

2. आगार व्‍यवस्‍थापक,

   महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ,

   संभाजीनगर आगार,कोल्‍हापूर.                     ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.एस.एल.नलवडे.

                 जाबदारातर्फे अँड.अनिता जगताप.                                                 

 

                       न्‍यायनिर्णय

सदर न्‍यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

2.        तक्रारदार हे शिवरत्‍न, संगमनगर, सहकारनगर, वेदभवन मंगल कार्यालयासमोर, सातारा येथील रहिवासी असून ते नोक‍रीनिमित्‍त मुंबई-अंधेरी येथे रहातात.  प्रस्‍तुत तक्रारदार हे त्‍यांचे पत्‍नीसह मुंबई येथून सातारा येथे येणेसाठी प्रवासाचे आयोजन केले व त्‍याप्रमाणे दि.6-9-2013 रोजी त्‍यांनी जाबदारांकडे ई तिकीट रिझर्वेशन पध्‍दतीने दि.8-9-2013 रोजी सकाळी 6.30 वा. मुंबई सेंट्रल येथून सुटणा-या व संभाजीनगर येथे जाणा-या बसचे दादर पूर्व स्‍टॉपवर बसणेसाठी सातारा येथील प्रवासापर्यंतचे पती पत्‍नी असे दोघांचे रिझर्वेशन काढले, त्‍याचा ट्रीप क्र.15252 असा असून तिकीट क्र.14359926 व ट्रँझेक्‍शन आय.डी.क्र.MICI3098574664  असा होता व या प्रवासापोटी तक्रारदाराने रु.700/- जाबदारांकडे भरले होते.  वरीलप्रमाणे प्रवासाचे रिझर्वेशन झालेवर तक्रारदार हे दि.8-9-2013 रोजी सकाळी 6.25 वा. दादर पूर्व या बसथांब्‍यावर दादर पूर्व ते सातारा जाणेसाठी वेळेत हजर झाले.  विषयांकित रिझर्व बस मुंबई सेंट्रलवरुन 6.30 वा. सुटते, ती दरदर पूर्व या प्रवासी थांब्‍यावर येणेसाठी 15 मिनीटे कालावधी म्‍हणजे 6.45 ची वेळ अपेक्षित आहे.  परंतु ती न आल्‍याने प्रस्‍तुत तक्रारदारानी जाबदाराकडे तसेच मुंबई सेंट्रल बस स्‍टेशनकड तसेच दादर पूर्व बसथांब्‍यावरील नियंत्रककाकडे चौकशी केली असता विषयांकित  बस ही ठरलेले वेळी मुंबई सेंट्रल येथून 6.30 वा. गेली आहे असे सांगणेत आले.  विषयांकित बस दादर पूर्व या बस थांब्‍यावर न येता पुलावरुन गेली असण्‍याची शक्‍यता दादर पूर्व बस थांब्‍यावरील नियंत्रकाकडून तक्रारदारास सांगणेत आले.  प्रस्‍तुत तक्रारदारानी त्‍यांचे रिझर्वेशन तिकीट दादर पूर्व थांब्‍यावरील नियंत्रकास दाखवलेनंतर विषयांकित बस ही दादर पूर्व या थांब्‍यावर आली नसल्‍याची व त्‍याबाबतची  नोंद दादर पूर्व बस थांब्‍यावरील नियंत्रण कक्षात रजिस्‍टरला केली नसल्‍याची खात्री नियंत्रकाने कली व त्‍यानंतरच तेथील नियंत्रकाने "सातारा मार्गे जाणा-या कोणत्‍याही गाडीतून प्रवास करणेस परवानगी आहे" असा शेरा मारुन शिक्‍का मारुन सही करुन तक्रारदारास दिले, परंतु सदर दिवशी म्‍हणजे दि.8-9-2013 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत तक्रारदार त्‍यांचे पत्‍नीसह दादर पूर्व बस थांब्‍यावर थांबूनही त्‍यांना गणेशोत्‍सवाचे प्रचंड गर्दीमुळे कोणतीच बस मिळू शकली नाही व तक्रारदारास सातारा येथे लवकर पोहोचणे आवश्‍यक असल्‍याने त्‍यानी दि.8-9-13 रोजी सकाळी 11.20 वा. दादर पूर्व येथून शिवनेरी बसने पुण्‍यापर्यंत व तेथून दुस-या गाडीने साता-यापर्यंत प्रवास करावा लागला व त्‍यापोटी शिवनेरी बसभाडे रु.780/-  व पुणे सातारा भाडे रु.208/- असे एकूण रु.988/- त्‍याना प्रवासासाठी अतिरीक्‍त दयावे लागले त्‍यामुळे तक्रारदाराना त्‍यांच्‍या नियोजित वेळेत बस रिझर्वेशन करुनही त्‍यांना जाबदारांच्‍या अक्षम्‍य हलगर्जीपणामुळे, सदोष सेवेमुळे प्रस्‍तुत तक्रारदाराना वेळेत सातारा येथे पोहोचता आले नाही.  त्‍यांना आत्‍यंतिक मानसिक, शारिरीक त्रास सोसावा लागला.  प्रवासापोटी अतिरीक्‍त खर्च करावा लागला.  यासाठीची एकूण नुकसानभरपाई म्‍हणून रु.6,988/- ची व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- जाबदाराकडून मिळावेत अशी विनंती मे.मंचास केली आहे. 

3.     सदर प्रकरणाच्‍या नोटीसा रजि.पोस्‍टाने मे.मंचातर्फ जाबदाराना पाठवणेत आल्‍या.  सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्‍या, त्‍याप्रमाणे त्‍यांनी नि.8 कडे वकील नेमून नि.9 कडे दाखल वकीलपत्राप्रमाणे ते वकीलांतर्फे हजर झाले व त्‍यांनी त्‍यांची कैफियत/म्‍हणणे नि.11 कडे, त्‍याचे पृष्‍टयर्थ नि.12 कडे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे एकूण पुराव्‍याची 3 कागदपत्रे, नि.15 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, नि.18 कडे लेखी युक्‍तीवाद प्रकरणी दाखल केलेला आहे व प्रस्‍तुत जाबदारानी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नसून तक्रारदारांची तक्रार खोटी आहे असे म्‍हटले आहे.  विषयांकित रिझर्व बस तक्रारदारांचे दादर पूर्व थांब्‍यावर येऊन तेथून तिने एक प्रवासी घेतला (सीट क्र.28).  त्‍यावेळी प्रस्‍तुत तक्रारदार हे थांब्‍यावर उपस्थित नव्‍हते त्‍यामुळे त्‍यांची तक्रार खोटी असून ती काढून टाकावी व तक्रारदाराकडून कॉम्‍पेंसेटरी कॉस्‍ट म्‍हणून  रु.10,000/- मिळावेत असे आक्षेप नोंदलेले आहेत. 

4.       तक्रारदारांचा वरील नि.1 चा अर्ज, नि.2 चे प्रतिज्ञापत्र, नि.5 सोबतचे पुराव्‍याची कागदपत्रे व जाबदारांचे कैफियत/म्‍हणणे, पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद यातील आक्षेप विचारात घेता आमचेसमोर खालील मुद्दे न्‍यायनिर्णयासाठी उपस्थित होतात-

अ.क्र.      मुद्दा                                           निष्‍कर्ष

 1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                  होय.

 2.  जाबदारानी तक्रारदारांना प्रवासी सेवेत निष्‍काळजीपणा

    करुन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे काय?               होय.

 3. अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर.

5.                    विवेचन मुद्दा क्र.1 ते 3

        प्रस्‍तुत तक्रारीचे व जाबदारांचे नि.11 चे म्‍हणणे, नि.12 चे म्‍हणण्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र पहाता जाबदार हे महाराष्‍ट्र राज्‍य व महाराष्‍ट्राबाहेर राज्‍य परिवहन महामंडळाचे नावाने एस.टी.बसद्वारा योग्‍य ती आकारणी घेऊन प्रवासी वाहतूक करणेचा व्‍यवसाय करतात.  अशाच प्रकारची सेवा सदर जाबदारानी तक्रारदाराना दिली आहे व प्रस्‍तुत तक्रारदारानी जाबदारांकडे मुंबई सेंट्रल ते सातारा या प्रवासमार्गाचे ई रिझर्वेशन करुन दि.8-9-2013 चे सकाळी मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6,30 वा.सुटणा-या सेमी लक्‍झरी बसने, सीट क्र.34,35 चे रिझर्वेशन रक्‍कम रु.700/-(रु.सातशे मात्र) भरुन दोन सीटचे केले होते.  यावरुन याठिकाणी जाबदार हे सेवापुरवठादार व तक्रारदार हे सेवा घेणारे या नात्‍याने तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक असल्‍याचे निर्विवादरित्‍या शाबीत होते, त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देतो. 

5.1-      प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारानी ते स्‍वतः व त्‍यांच्‍या पत्‍नी यानी दि.6-9-2013 रोज मुंबई सेंट्रल येथून दि.8-9-2013 रोजी सकाळी 6.30 वा.सुटणा-या सेमी लक्‍झरी बसगाडीचे सीट क्र.34 व 35 चे मुंबई सेंट्रल ते सातारा या प्रवासीमार्गाचे रिझर्वेशन रु.700/- (रु.सातशे मात्र) भरुन केले होते व या विषयांकित रिझर्व गाडीमध्‍ये तक्रारदार हे दादर पूर्व या थांब्‍यावर  (Passenger Boarding point ) थांबणार होते. या बाबी उभय पक्षकारांना मान्‍य आहेत, त्‍याबाबत दुमत नाही, परंतु दि.8-9-2013 रोजी विषयांकित बस मुंबई सेंट्रलवरुन 6.10 वा. नियोजित वेळेस मार्गस्‍थ झाली परंतु ती तिच्‍या नियोजित दादर पूर्व थांब्‍यावर आली नाही त्‍यावेळी सदर बस थांब्‍यावर वेळेवर तक्रारदार हे विषयांकित गाडीच्‍या प्रतिक्षेत उभे होते.  याबाबतही दुमत नाही कारण नि.5/1 ला तक्रारदारानी दाखल केलेले प्रवासी तिकीट पहाताच स्‍पष्‍ट होते परंतु तक्रारदारानी रिझर्व केलेली 6.30 ला सुटणारी बस मुळात दादर पूर्व थांब्‍यावर आलीच नाही, ती बहुतेक पुलावरुन गेली असेल व दादर पूर्व थांब्‍यावर विषयांकित बस आली असती तर दादर पूर्वच्‍या कंट्रोल पॉईंटला त्‍याची नोंद कंट्रोल रजिस्‍टला नक्‍कीच झाली असती परंतु ती झालेली नाही हे तक्रारदारांचे कथनावरुन व नि.14 चे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्रावरुन पूर्णतः शाबीत होते कारण प्रवास नियोजित तारखेस, त्‍या दिवशी तक्रारदार दादर पूर्व थांब्‍यावर हजर होते.  विषयांकित  गाडीची वाट पाहूनती न आल्‍याने त्‍यानी दादर पूर्व वरील थांब्‍याच्‍या नियंत्रकास विषयांकित बस अदयाप का आली नाही असे विचारले असता त्‍याने सदर बस या थांब्‍यावर आलली नाही, कदाचित ती पुलावरुन गेली असेल असे सांगितले आहे व तक्रारदारानी त्‍यांना विषयांकित गाडीची नोंद त्‍यांचे रजिस्‍टरला झाली आहे का? असे विचारले असता त्‍यांनी विषयांकित गाडी दादर पूर्व थांब्‍यावर आलेली नसल्‍याने तिची नोंद या रजिस्‍टरला झालेली नाही त्‍यामुळे सदर थांब्‍यावरील नियंत्रकाने तक्रारदारांचे रिझर्व तिकीटावर 'सातारा मार्गे जाणा-या कोणत्‍याही गाडीतून प्रवास करणेस परवानगी आहे' असा शेरा व शिक्‍का मारुन सही करुन दिला व त्‍याना दुस-या बसने नियोजित प्रवास करणेस सांगितले.  या बाबी हेच दाखवतात की, विषयांकित बसचे नियोजित वेळेपूर्वी तक्रारदार हे दादर पूर्व बस थांब्‍यावर हजर होते त्‍यामुळे जाबदारानी या कामी घेतलेले आक्षेप गैरलागू ठरतात.  प्रस्‍तुत प्रकरणी जाबदारानी तक्रारदाराला केलेला पत्रव्‍यवहार नि.13/2 कडील बुकींग चार्ट, नि.13/3 कडील पत्र पहाता त्‍यांनी दादर पूर्व याठिकाणी सिट नं.28 चा प्रवासी घेतला होता त्‍यामुळे गाडी पुलावरुन गेली  नाही.  गाडी दादर पूर्व थांब्‍यावर आली होती त्‍यामुळे नुकसानभरपाई देता येत नाही असे तक्रारदाराला कळवले आहे.  या वस्‍तुस्थितीचा विचार करता मंचासमोर एक बाब प्रकर्षाने समोर येते ती अशी की, या सर्व प्रवासाच्‍या मार्गातील महत्‍वाची बाब ही आहे की, विषयांकित आरक्षण केलेली बस ही नियोजित दादर पूर्व थांब्‍यावर आली होती किंवा  नाही व आली असलेस तिची नोंद दादर पूर्व बसथांब्‍याच्‍या नियंत्रण कक्षास झाली होती का एवढी एकच बाब स्‍पष्‍ट झाली तर जाबदारांचे सर्व आक्षेप कोलमडून पडतात. आमचे मते प्रस्‍तुत जाबदारानी दादर पूर्व थांब्‍यावरील नियंत्रण कक्षातील दि.8-9-2013 रोजीचे वाहनांचे आवक जावक रजिस्‍टर नोंदणीचा उतारा या कामी हजर केला असता तर विषयांकित आरक्षित केलेली बॉंबे सेंट्रल ते संभाजीनगर ही मुंबई सेंट्रलवरुन सकाळी 6.30 वा.सुटणारी गाडी दादर पूर्व थांब्‍यावर आली असती तर तिची नोंद दादर पूर्व कंट्रोल पॉईंटला नक्‍कीच झाली असती.  ती तशी आलेली नव्‍हती म्‍हणूनच सदर गाडीची नोंद दादर पूर्व कंट्रोल पॉईंटला नाही असे स्‍वच्‍छ दिसून येते.  याबाबतचा वरील प्रवासाच्‍या तारखेचा रजिस्‍टरचा उतारा जाबदारानी जर येथे दाखल केला असता तर ते सूर्यप्रकाशाइतके स्‍पष्‍टपणे शाबीत झाले असते की, दादर कंट्रोल पॉईंटवर विषयांकित आरक्षित गाडी प्रवासादरम्‍यान थांबली होती का?  परंतु असा कोणताही कागदोपत्री पुरावा जाबदारानी दाखल न करुन तक्रारदाराविरुध्‍दच खोटे आरोप केले आहेत.  वरील वस्‍तुस्थितीवरुन एक बाब स्‍पष्‍ट होते की, दि.8-9-2013 रोजी नियोजित दादर कंट्रोल पॉईंटला विषयांकित तक्रारदारानी आरक्षित केलेली बस आलेली नव्‍हती.  ती तेथील कंट्रोलरने सूचित केलेप्रमाणे पुलावरुन गेल्‍याचे निर्विवादरित्‍या शाबीत होते व त्‍यामुळेच तक्रारदारानी त्‍यांनी नि.5/1 कडे सादर केलेल्‍या त्‍यांचे रिझर्वेशन तिकीटावरुन असे स्‍पष्‍ट होते की, सदर कंट्रोलरने सातारा मार्गे जाणा-या कोणत्‍याही गाडीतून प्रवास करणेस परवानगी आहे असा शेरा मारुन शिक्‍का मारुन त्‍याची सही घेऊन दिले आहे.  वास्‍तविकतः सदरचा सीझन हा गणपती उत्‍सवाचा सीझन असलेने गाडया तुफान गर्दीने भरुन वहात होत्‍या.  त्‍यामुळे स.6.30 ते 11.30 पर्यंत तक्रारदाराना प्रवासासाठी बस मिळू शकली नाही.  नाईलाजास्‍तव तक्रारदारानी मुंबई ते पुणे असा शिवनेरी गाडीतून रक्‍कम रु.780/-भरुन प्रवास केला.  पुन्‍हा पुण्‍यातून गाडी बदलून पुणे ते सातारा गाडी पकडून रु.208/- खर्च करुन एक्‍सप्रेस गाडीने प्रवास करावा लागला.  असा एकूण मुंबई सेंट्रल ते सातारा प्रवासासाठी त्‍याना रु.988/- खर्च आला.  हा खर्च त्‍यानी रिझर्वेशन केलेल्‍या रु.700/-च्‍या शिवाय आहे.  या सर्व बाबीवरुन एक बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदारानी रिझर्व केलेली बस ही दादर पूर्व थांब्‍यावर दि.8-9-13 रोजी थांबली नव्‍हती हे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते त्‍यामुळे जाबदारांचे सर्व आक्षेप येथे नाशाबीत होतात व तक्रारदारानी त्‍यांची केस पुराव्‍यानिशी शाबीत केली असल्‍याचेही दिसते.   वरील सर्व कथनांचा विचार करता असेही दिसून आले आहे की, शिवनेरी बसमधून प्रवास करीत असताना शिवनेरीच्‍या बसचालकाने दादर कंट्रोल पॉईंटवरील कंट्रोलरने कोणत्‍याही गाडीतून प्रवासास मुभा दिली होती त्‍यावेळी शिवनेरीच्‍या वाहकाने या तिकीटाचा विचार करुन या रिझर्व तिकीटाचे पैसे वजा करुन त्‍याना जादाचे पैसे घेऊन प्रवास करु देणेस कोणतीही अडचण नव्‍हती परंतु येथे असे घडलेचे दिसून येत नाही.  एकूणच वरील सर्व बाबी जाबदारांच्‍या अत्‍यंत निष्‍काळजीपणा व दुर्लक्षामुळे झालेल्‍या असून तक्रारदाराना जाबदारानी गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा दिल्‍याचे निर्विवादरित्‍या शाबीत होते, त्‍यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो.  त्‍यामुळे सदर कामी तक्रारदाराना अत्‍यंत शारिरीक, मानसिक त्रास सोसावा लागला, त्‍यांचे नियोजित वेळी आरक्षित गाडीमुळे सातारा येथे पोचून त्‍यांना महत्‍वाची कामे करता आली असती ती करता आली नाहीत, जादा पैसा खर्च करुन विस्‍कळीतपणे प्रवास करावा लागला.  त्‍यामुळे त्‍यांना शारिरीक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, मनस्‍ताप सोसावा लागला हे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  सदर प्रकरणातील दाखल कागदपत्रावरुन असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदारांच्‍या नियोजित प्रवासाचे दिवशी तक्रादारानी आरक्षित केलेली बस दादर पूर्व थांब्‍यावर आलेली नव्‍हती हे पूर्णतः शाबीत होते त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार ही मंजूर होणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत मंच आले असून सदर तक्रारदाराना जाबदाराकडून त्‍यानी आरक्षित केलेल्‍या बसला नियोजित प्रवासभाडयापोटी दिलेल्‍या रु.700/- शिवाय त्‍याच नियोजित प्रवासासाठी करावा लागलेला अतिरीक्‍त खर्च रक्‍कम रु.988/-, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.2000/- सातारा येथे वेळेत पोचू न शकलेने झालेले नुकसान रु.500/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.3000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत मंच येत आहे. 

6.       वरील कारणमीमांसा व विवेचन यास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                            आदेश  

1.     तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो. 

2.    सदर जाबदारानी तक्रारदारांना प्रवासी सेवेत निष्‍काळजीपणा करुन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असलेचे घोषित करणेत येते.

3.    सदर जाबदारानी तक्रारदाराना अतिरीक्‍त प्रवासभाडयाची रक्‍कम रु.988/-शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.2,000/- नियोजित ठिकाणी वेळेत पोचता न आलेने झालेले नुकसान रु.500/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.3,000/- असे एकूण रु.6,488/- आदेश प्राप्‍त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदारास अदा करावी.

4.    जाबदारानी वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील.

5.      सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

6.      सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.   

ठिकाण- सातारा.

दि.11-2-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.  

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.