Maharashtra

Jalgaon

CC/08/1618

Pralhad sonu Dhande - Complainant(s)

Versus

Venktesh urban co.op society - Opp.Party(s)

Adv.Jagpati

09 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1618
 
1. Pralhad sonu Dhande
Bhusawal
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Venktesh urban co.op society
Bhusawal
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 1618/2008
                  तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 06/12/2008
                  सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 27/01/2009
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-09/10/2009
 
श्री.प्रल्‍हाद सोनू धांडे,
उ.व. सज्ञान, धंदाः शिक्षण,
रा.हनुमान नगर, प्‍लॉट नं.64,
भुसावळ, जि.जळगांव.                         ..........      तक्रारदार
            विरुध्‍द
1.     व्‍यंकटेश अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि,भुसावळ,
तर्फे मॅनेजर,
रा.सहकार नगर, शुभम अपार्टमेंट, भुसावळ,जि.जळगांव.
2.    रितेश देवराम पाटील, चेअरमन,
रा.सहकार नगर, शुभम अपार्टमेंट, भुसावळ, जि.जळगांव.
3.    सौ.स्‍वाती हरिश्‍चंद्र पाटील,
रा.गणेश कॉलनी, भुसावळ.                    ......... सामनेवाला
                       
न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 09/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
            तक्रारदारा तर्फे श्री.प्रवीण पी.भोंबे वकील हजर
            सामनेवाला क्रं.2 व 3 तर्फे सुनिलदत्‍त व्‍ही.अकोले वकील हजर.
            सामनेवाला क्रमांक 1 एकतर्फा.
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्‍त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या व्‍याजावर  ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.  तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-
           

अ.क्र.
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
490
08/08/2006
17,000/-
08/09/2007
2
491
08/08/2006
16,000/-
08/09/2007
3
492
08/08/2006
17,000/-
08/09/2007

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्‍हणून तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.        
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. सामनेवाला क्रमांक 1  यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश केला.
            3.    सामनेवाला क्रमांक 2 व 3 यांनी प्रस्‍तुत प्रकरणी लेखी म्‍हणणे सादर केलेले असुन तक्रार अर्जातील संपुर्ण मजकुर खोटा व लबाडीचा असुन तो मान्‍य नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे.   सामनेवाला क्रमांक 2 यांनी संस्‍थेचा दि.25/5/2006 रोजी राजीनामा दिलेला असुन संचालक मंडळाचे दि.25/5/2006 रोजीचे ठराव क्रमांक 4 ने सर्वानुमते मंजुर झालेला आहे.     सबब अशा परिस्थितीत सामनेवाला हे तक्रारदाराच्‍या ठेवीची रक्‍कम परत करण्‍यास जबाबदार नाहीत.   सबब सामनेवाला क्रमांक 2 व 3 यांचे नांवे तक्रारीतुन वगळण्‍यात यावीत व नुकसान भरपाई दाखल सामनेवाला क्र. 2 यांना रक्‍कम रु.10,000/- व सामनेवाला क्र. 3 यांना रक्‍कम रु.5,000/- तक्रारदाराकडुन मिळावेत अशी विनंती सामनेवाला क्रमांक 2 व 3 यांनी केली आहे.    
            4.          तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे    याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता व  तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             5.  मुद्या क्रमांक 1   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे.  म्‍हणून तक्रारदार ठेवीची रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत.
            सामनेवाला क्रमांक 2 यांनी सामनेवाला पतसंस्‍थेचे संचालक पदाचे राजीनामा सामनेवाला पतसंस्‍थेने मंजुर केलेबाबतचे ठरावांच्‍या सत्‍यप्रती सादर केलेल्‍या आहेत. सबब सामनेवाला क्रमांक 2 यांना तक्रारीतुन वगळण्‍यात येते. तसेच सामनेवाला क्र. 3 यांनी त्‍यांचा प्रस्‍तुत तक्रारीशी काहीएक संबंध नसल्‍याने त्‍यांना प्रस्‍तुत तक्रारीतुन वगळण्‍यात यावे याबाबत विनंती केली आहे.   याकामी सामनेवाला क्र. 2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यासोबत दाखल केलेल्‍या सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालक मंडळाची सन 2007-08 ते 2012-13 या कालावधीमधील संचालक मंडळाची यादी एस.बी.अंधारे, सहायक निबंधक, सहकारी संस्‍था भुसावळ यांनी दि.21/5/2007 रोजी जा.क्र.प्रशासन/क 73(3)/समिती निवड/प्रसिध्‍दी/सन2007 अन्‍वये प्रसिध्‍द केलेबाबतची छायाप्रत दाखल केली असुन तीचे बारकाईने अवलोकन केलेंडर असता त्‍यात सामनेवाला क्र. 3 यांचे नांव दिसुन येत नाही.   सामनेवाला क्र. 3 यांना प्रस्‍तुत तक्रारीकामी तक्रारदाराने विनाकारण कोणताही संबंध नसतांना सामील केल्‍याचे स्‍पष्‍ट होते., यास्‍तव सामनेवाला क्र. 3 यांचे नांव प्रस्‍तुत तक्रारीतुन वगळण्‍याचे निर्णयाप्रत हा मंच आलेला आहे.  सबब मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                              आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं.1 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावती क्रमांक 490, 491 व 492 मॅच्‍युअर्ड झालेली असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 (नऊ ) टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं.1 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं.1 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं.1 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
( ई )       सामनेवाला क्र. 2 व 3 यांचे नांव प्रस्‍तुत तक्रारीतुन वगळण्‍यात येते.
            ( फ )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 09/10/2009                
                                          (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )    ( श्री.बी.डी.नेरकर )
                                              सदस्‍य                                    अध्‍यक्ष 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.