जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 95/2008. प्रकरण दाखल तारीख - 05/03/2008 प्रकरण निकाल तारीख - 20/10/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य 1. जिजाबाई भ्र. निवृत्ती पाटील वय 50 वर्षे, धंदा शेती रा. रेणापूर ता. भोकर जि. नांदेड 2. काशीनाथ पि. जयवंतराव सूर्यवंशी अर्जदार वय, 62 वर्षे, धंदा शेती रा. रेणापूर ता. भोकर जि. नांदेड. विरुध्द. 1. व्यकंठेश्वरा कृषि सेवा केंद्र किनवट रोड, भोकर, ता. भोकर जि. नांदेड 2. दत्ताञय कृषि सेवा केंद्र किनवट रोड, भोकर ता. भोकर जि. नांदेड. गैरअर्जदार 3. मोन्सॅन्टो इंडिया लि. 5 वा मजला, अहूरा सेंटर 96, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई 400 093 4. संतोष बिज भांडार नवा मोंढा, नांदेड, ता. व जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. रघूविर कूलकर्णी गैरअर्जदार क्र. 1,2 व 4 तर्फे वकील - अड.पी.एस. भक्कड गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.सतीश तवरावाला निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द बियाण्यातील दोषाबददल खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार क्र. 1 हे मौजे रेणापूर ता. कंधार येथील 2 हेक्टर 87 आर क्षेञाचे मालक व कब्जेदार आहेत. त्यांनी आपली जमीन अर्जदार क्र. 2 यांना सन 2007-08 या वर्षासाठी बटाईने दिली आहे. अर्जदार क्र. 2 यांनी रब्बी पिकासाठी गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून दि.24.12.2007 रोजी सूर्यफूल बियाणे विकत घेतले व अर्जदार क्र. 2 हे अर्जदार क्र. 1 यांचे 90आर क्षेञफळात ते पेरले. गैरअर्जदार कंपनीच्या जाहीरातीप्रमाणे सर्व सूचनाचे पालन करुन बियाण्याची लागवड केली. याप्रमाणे पेरणीच्या वेळेस खते, पाण्याच्या पाळया वेळोवेळी केल्या. अर्जदार यांनी 90 आर क्षेञफळात 20 क्विंटल एवढे सूर्यफूलाचे उत्पादन अपेक्षीत असताना सूर्यफूलाची उगवण कमी म्हणजे 2 टक्के झाली. बाजारभाव प्रति क्विंटल रु.3500/- एवढे धरले तरी रु.70,000/- चे उत्पन्न अपेक्षित होते. उत्पन्न न नीघाल्यामूळे अर्जदार यांचे नूकसान झाकले. दि.18.1.2008 रोजी कृषी अधिकारी, भोकर यांचेकडे बियाण्याची उगवण कमी झाल्याबददल तक्रार अर्ज दिला. त्याप्रमाणे कृषी अधिका-याने दि.7.2.2008 रोजी अर्जदाराच्या पिकाचा पंचनामा पंचासमक्ष केला व त्यात 2 टक्के बियाण्याची उगवण कमी झाली आहे व शेतीचे नूकसान झाले आहे असे नमूद केले. अर्जदार यांचे मागणी आहे की, गैरअर्जदार यांचेकडून झालेल्या नूकसानीबददल रु.70,000/- मिळावेत तसेच लागवडीचा खर्च रु.10,000/- दयावा तसेच दावा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले संयूक्त व एकञित जवाब दाखल केला आहे. प्रथमतः त्यांनी असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदार क्र. 2 यांनी सन 2007-08 मध्ये बटाईने जमीन दिली या बाबतचा ठोस कागदपञ पूरावा दाखल केलेला नाही. अर्जदार हा ग्राहक होऊ शकत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून अर्जदाराने क्र. 2 यांनी सूर्यफूलाची बँग विकत घेतली आहे. गावांमध्ये संतोष बीज भांडार यांचेकडून बियाणे घेतल्यामूळे त्यांना पक्षकार करणे गरजेचे आहे. गैरअर्जदार यांनी सूर्यफूल बियाणे पॅक कंपनीमध्ये उचलले व विकले. अर्जदार क्र. 1 व 2 यांनी दोन किलोग्राम बियाणे 90 आर क्षेञफळात पेरले. जेव्हा की एक एकरामध्ये 2 किलो बियाणे पेरणे आवश्यक आहे. सूर्यफूल बियाणे हे सर्टिफाईड टूथफूल बियाणे आहे. सूर्यफूलाचे उत्पन्न् हे एक एकरात 7 ते 8 क्विंटल होते. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे 20 क्विंटल बियाणे होणे अपेक्षीत आहे हे म्हणणे खोटे आहे. भाव प्रति क्विंटल 3500/- आहे हे ही म्हणणे खोटे आहे. त्यामूळे रु.70,000/- ची मागणी हे देखील चूक आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे सूर्यफूल बियाण्याची उगवण 2 टक्के झाली, याकरिता बरीच कारणे असून शकतात, यामध्ये पेरणी वेळेवर न करणे, योग्य पध्दतीने न करणे, किटकनाशक व जंतूनाशक खते न वापरणे, पेरणीची खोली इत्यादी. मूख्य म्हणजे हे बियाणे तपासणीसाठी अर्जदाराने प्रयोगशाळेत पाठवीणे आवश्यक होते, ते त्याने केले नाही. कृषी अधिका-याकडे तक्रार अर्ज केल्यावर त्यांनी सूध्दा नियमाने तो पंचनामा केला नाही व तो गैरअर्जदाराच्या समोर केला नाही. पंचनामा करण्याचा अधिकार हा फक्त सिड कमिटीला आहे. हा पंचनामा त्यांचेवर बंधनकारक नाही. त्यांनी दिलेला अहवाल हा तज्ञाचा अहवाल आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र. 3 हे उत्पादक कंपनी आहे. कलम 2 (1)(ड) नुसार हा ग्राहक वाद होऊ शकत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. अर्जदाराच्या तक्रारीवरुन बियाण्यामध्ये दोष होता व किमान उगवण शक्ती होती हे त्याने सिध्द केलेले नाही. दि.7.2.2008 रोजीचा पंचनामा हा चूक व ञूटीपूर्ण आहे. कृषी अधिका-याने त्यांचे लॉटचे बियाणे परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवीणे आवश्यक होते ते त्याने केले नाही. त्यामूळे निकृष्ट दर्जाचे बियाणे होते हे सिध्द होऊ शकत नाही. बियाणे उगवणशक्तीसाठी जमिनीची प्रत, वयमान, पाण्याची निपटारा व रासायनीक खताचा वापर हे मूख्य कारण असू शकते. या बाबत अर्जदाराने कोणताही उल्लेख केलेला नाही. तक्रारीसोबत चालू वर्षाचा 7/12 चा उतारा दाखल केला नाही. त्यामूळै सूर्यफूल बियाणे पेरले यांचा पूरावा नाही. बियाणे उगवण शक्तीसाठी 10-15 दिवसांचा कालावधी पूरेसा असतो. तक्रारदाराने दि.10.1.2008 रोजी पर्यत उगवण शक्तीवीषयी त्यांचे नक्कीच लक्षात आले असते. पण त्याने तक्रार केली नाही. तक्रारदाराची तक्रार व पंचनामा 45 दिवसांनी करण्यात आला. त्यामूळे नक्की अवस्था समजणे अशक्य आहे. अर्जदार हे निष्काळजीपणे किंवा बियाण्यातील दोष यामूळे सेवेतील ञूटी सिध्द करु शकले नाहीत. बियाणे खरेदी पावतीवर अर्जदार क्र. 2 यांचे नाव आहे व तयार केलेला बटाईनामा काल्पनिक आहे. त्यामूळे तो ग्राहक होऊ शकत नाही. मा. राष्ट्रीय आयोग, दिल्ली सी.पी. जे. 2005 पान 94 सोनेकरण ग्लॅडोली ग्रोवर्स विरुध्द बाबूलाल यांचे नीर्णयाचा आधार घेतला असता पूराव्याशिवाय किंवा सिध्द झाल्याशिवाय कंपनीने निकृष्ट दर्जाचा माल पूरवीला यांचे अनूमान काढले जाऊ शकत नाही. मा. राज्य आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अपील नंबर 1665/08 महाराष्ट्र सिडस विरुध्द मारोती जाधवच यांचे निकाल पञात असे म्हटले आहे की, जोपर्यत संबंधीत लॉटचे बियाणे परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविले जात नाही तोपर्यत त्यांचा निष्कर्ष काढता येणे अशक्य आहे. वरील सर्व बाबीचा वरुन अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 4 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार क्र. 2 यांना सदरील शेत सन 2007-08 यावर्षासाठी बटाईने करण्यासाठी दिले याबददल कोणताही ठोस कागदपञ पूरावा दाखल केला नाही. म्हणून अर्जदार ग्राहक होऊ शकत नाही. सूर्यफूल बियाणे हे टूथफूल आहे. अर्जदाराने नियमाप्रमाणे पेरणी केलेली नाही. अपेक्षीत उत्पन्न देखील एकरामध्ये 6-5 क्विंटल होते त्यामूळे त्यांची मागणी चूक आहे. कृषी अधिका-याने केलेला पंचनामा मान्य नाही. त्यांस तज्ञाचा अहवाल म्हणता येणार नाही. गैरअर्जदाराने गैरअर्जदार क्र. 4 यांचेकडून सिल, पॅकेट म्हणून घेतलेले आहे व तसेच विकले आहे. त्यामूळे त्याने यात काही केलेले नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केले आहेत. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? नाही. 2. अर्जदार हे गैरअर्जदार यांच्या सेवेमध्ये ञूटी आहे सिध्द करतात काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार क्र.1 यांनी त्यांचे मालकीचे मौजे रेणापूर येथील 2 हेक्टर 87 आर जमीनीचे मालक व कब्जेदार आहेत. या बददलचा पूरावा म्हणून त्यांचे नांवावर असलेले शेताचा 7/12 या प्रकरणात दाखल केलेला नाही व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यात याबददल आक्षेप आहे. अर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार क्र. 1 यांची जमीन सन 2007-08 सालासाठी बटाईने घेतली होती याबददल बटावपञ दाखल केलेले आहे जे की एका को-या कागदपञावर आहे व दि.26.2007 रोजीचे आहे. ज्याने हे बटावनामा करुन दिला व अर्जदार क्र. 1 जिजाबाई पाटील यांचा त्याचेवर अंगठा आहे व खाली पांच साक्षीदाराच्या सहया आहेत. त्यापैकी काशीनाथ जयंवताव सूर्यवंशी अर्जदार क्र.2 यांचे एक शपथपञ अर्जदाराने दाखल केलेले आहे. पण गैरअर्जदाराने घेतलेल्या आक्षेपाप्रमाणे त्यांने हे बटाईपञ करुन घेतले त्यांने ती जमीन त्यांच्या मालकीची असल्याबददलचा पूरावा म्हणजे 7/12 किंवा होल्डींग किंवा रजिस्ट्री दाखल करणे आवश्यक आहे. मूळात हे नसल्याकारणाने व बटाईनामा हा अधिकृत आहे असे मानता येणार नाही. ग्राहक संरक्षण कायदा,1986 कलम 2(1)(ड) नुसार ते ग्राहक होऊ शकत नाहीत. हे ग्राहक मंच असल्याकारणाने ग्राहकाचेच प्रकरण येथे चालू शकते. अर्जदार हे ग्राहक आहेत हे सिध्द होऊ शकत नाही म्हणून त्यांचे प्रकरण या मंचात चालविता येणार नाही. म्हणून मूददा क्र. 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 1 नुसार अर्जदार हे ग्राहक होत नाहीत म्हणून मूददा क्र. 2 बददल चर्चा करणे योग्य होणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |