Maharashtra

Jalgaon

CC/09/884

Bhanudas Ramchandra Dhake - Complainant(s)

Versus

Venkatesh Arban Soci. Bhusawal - Opp.Party(s)

Adv. Bharambe

06 Jun 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/09/884
 
1. Bhanudas Ramchandra Dhake
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Venkatesh Arban Soci. Bhusawal
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Poonam N.Malik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 884/2009                    
                                    तक्रार दाखल करण्‍यात आल्‍याची तारीखः-04/07/2009.       
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 06/06/2013.
 
 
 
      श्री.भानुदास रामचंद्र ढाके,
      उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
      रा.मु.पो.वराडसिम,ता.भुसावळ,जि.जळगांव.       ..........     तक्रारदार.
 
            विरुध्‍द
1.     व्‍यंकटेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
छत्रपती शिवाजी कॉम्‍प्‍लेक्‍स,पहीला माळा,भुसावळ,
ह.मु.गणराया प्‍लाझा, अपार्टमेंट,बेसमेंट बी-1,
सपना नगर, प्रभाकर हॉलचे पुढे, भुसावळ,ता.भुसावळ,
जि.जळगांव.
2.    व्‍यवस्‍थापक,
व्‍यंकटेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
समन्‍स 1 चे पत्‍यावर बजवावेत.
3.    प्रशासक, व्‍यंकटेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
उपनिबंधक कार्यालय,सहकारी संस्‍था जामनेर रोड,भुसावळ,जि.जळगांव.
4.    संपुर्ण संचालक मंडळ (जुने व नवे )
व्‍यंकटेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
जुने संचालक मंडळः-
4-1) श्री.रितेश देवराम पाटील,चेअरमन,सहकार नगर,भुसावळ.
4-2) डॉ.किशोर दोधू चौधरी,संचालक,रा.गजानन महाराज नगर,भुसावळ.
4-3) डॉ.प्रेमचंद महारु महाजन,संचालक,रा.जामनेर रोड,भुसावळ.
4-4) डॉ.गुणवंत वसंत महाजन,संचालक,रा.प्रोफेसर कॉलनी,भुसावळ.
4-5) श्री.विवेक भिमराव नरवाडे,संचालक,रा.आर.एम.एस.कॉलनी,भुसावळ.
4-6) श्री.किरण देविदास पाटील,संचालक,रा.भोळे कॉलनी,भुसावळ.
4-7) श्री.सुयश शालीग्राम न्‍याती,संचालक,रा.भोळे कॉलनी,भुसावळ.
4-8) श्री.सुधीर रामदास पाटील,संचालक,रा.भोळे कॉलनी,भुसावळ.
4-9) श्री.मनोज लक्ष्‍मीकांत पाटील,संचालक,रा.कॉलेज रोड,भुसावळ.
4-10) श्री.विशाल अशोक पाटील,संचालक,रा.गणेश कॉलनी,भुसावळ.
4-11) श्री.जितेंद्र बन्‍सी मोरे,संचालक,रा.कोळीवाडा,कंडारी,ता.भुसावळ.
नवीन संचालक मंडळ.
4-12)       श्री.सुनिल मंगलसिंग कौशल,चेअरमन.
4-13)       श्री.रितेश मंगलसिंग पाल,संचालक.
4-14)       श्री.उमेश रामसेवक परदेशी,संचालक.
4-15)       श्री.चंद्रकांत सांडू पाटील,संचालक.
4-16)       श्री.अविनाश सुधाकर लांडगे,संचालक.
4-17)       श्री.वरुण शंकर बावस्‍कर,संचालक.
4-18)       श्री.स्‍वप्निल विजय तायडे,संचालक.
4-19)       श्री.सचिन प्रकाश खांडवे,संचालक.
4-20)       श्री.सुरेश भगवानराव मोरे,संचालक.
4-21)       श्री.रामभाऊ धोंडीराम अंबोरे,संचालक.
4-22)       श्री.संदीप हरीदास गेडाम,संचालक
4-22)सर्व 4-12 ते 4-22 रा.आगवाली चाळ,
4-22)कंडारी रोड,भुसावळ,जि.जळगांव.
4-23) श्री.प्रवीण दत्‍तात्रय इखणकर,संचालक,
रा.मोठया मारुती मंदीराजवळ,गांधी चौक,
भुसावळ,जि.जळगांव.                         .........      विरुध्‍द पक्ष
 
     
                        कोरम- 
                        श्री.विश्‍वास दौ.ढवळे                    अध्‍यक्ष
                        श्रीमती पुनम नि.मलीक                 सदस्‍या.
      तक्रारदार तर्फे श्री.के.आर.भारंबे वकील.
      विरुध्‍द पक्ष क्र.4-5, 4-4 तर्फे श्री.विजय भि.तायडे वकील.
विरुध्‍द पक्ष क्र. 1 तर्फे श्री.डी.डी.शंकपाळ वकील.
विरुध्‍द पक्ष क्र.4-1, 4-2, 4-7, 4-8, 4-9, 4-10 तर्फे श्री.सुनिलदत्‍त व्‍ही.अकोले वकील.
विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 4, 4-3, 4-6,4-11 ते 4-23 एकतर्फा.
निकालपत्र
श्री.विश्‍वास दौ.ढवळे, अध्‍यक्षः   तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष सहकारी संस्‍थेत
मुदत ठेव पावती  अन्‍वये गुंतविलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणुन
त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
      2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष व्‍यंकटेश अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि  या संस्‍थेत मुदत ठेव पावतीत रक्‍कम गुंतवणूक केल्‍याचा तपशिल खालीलप्रमाणेः

अ.क्र.
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय दिनांक
देय रक्‍कम
1.
694
08/12/2006
17,000/-
08/06/2007
18,020/-
2.
695
08/12/2006
17,000/-
08/06/2007
18,020/-

 
            3.    तक्रारदार यांनी गुंतविलेल्‍या रक्‍कमेची मागणी विरुध्‍द पक्ष संस्‍थेत केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.   सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडे गुंतवणुक केलेली रक्‍कम व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.  
      4.    सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्‍द पक्ष यांना ग्राहक
संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. विरुध्‍द पक्ष क्र.4-5, 4-4, 4-8   हे याकामी वकीलामार्फत हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्‍हणणे दाखल न केल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली. विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 4, 4-3, 4-6,4-11 ते 4-23 हे याकामी नोटीस मिळुनही हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
            5.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे.   तक्रारदार हे आजपावेतो कधीही ठेव रक्‍कम मागण्‍यासाठी संस्‍थेकडे आलेले नव्‍हते व नाहीत. मा.उच्‍च न्‍यायालयाने पतसंस्‍थेचे जवळपास तीन कोटी रु चे थकीत कर्ज वसुलीस तात्‍पुरती स्‍थगीती दिली असल्‍याने तक्रारदाराचे ठेव पावतीत नमुद रक्‍कमा एकरक्‍कमी देणे शक्‍य नाही.   तक्रारदाराची ठेव रक्‍कम हे विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे योग्‍य नियोजनाव्‍दारे परत करण्‍यास तयार आहेत.   सबब विनंती की, विरुध्‍द पक्ष क्र. 2 ते 4-23 यांची नावे तक्रार अर्जातुन वगळण्‍यात यावीत.
            6.    विरुध्‍द पक्ष क्र.4-1, 4-2, 4-7, 4-9 व 4-10 यांनी हजर होऊन तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.   विरुध्‍द पक्षांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला असल्‍याने ते तक्रारदाराची ठेव रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाहीत.   थकीत कर्जाची वसुली कारवाई सुरु असल्‍याने जशी रक्‍कम वसुल होईल त्‍या प्रमाणे रक्‍कम परत करण्‍यास विरुध्‍द पक्ष क्र. 1 हे तयार आहेत.   सबब याकामी विनाकारण सामील केल्‍यामुळे तक्रारदाराकडुन नुकसानी दाखल रु.10,000/- मिळावेत व तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍द पक्षांनी केलेली आहे.    
            7.    तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
            मुद्ये                                       उत्‍तर
1)    विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या
      सेवेत त्रृटी केली आहे काय ?                         होय.
2)    आदेश काय ?                                     खालीलप्रमाणे.
                              वि वे च न
8. मुद्या क्र.1 -     प्रस्‍तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी संस्‍थेत मुदत ठेव पावत्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतविलेली होती ही बाब सिध्‍द होते.   तक्रारदार यांनी सदरची रक्‍कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्‍कम त्‍यांना देण्‍यात आलेली नाही.        वास्‍तविक तक्रारदार यांनी मागणी केल्‍यानंतर तात्‍काळ विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडील जमा असलेली रक्‍कम त्‍यांना परत करणे संस्‍थेचे कर्तव्‍य होते.   परंतू मागणी करुनही संस्‍थेने रक्‍कम न देऊन सेवेत त्रृटी केली आहे या मतास आम्‍ही आलो आहोत.   सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
            9. मुद्या क्र.2 तक्रारदार यांनी त्‍यांची संपुर्ण रक्‍कम देण्‍याची जबाबदारी संस्‍थेची व संचालक यांची वैयक्‍तीक व संयुक्‍तीक आहे असे नमुद करुन त्‍याबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.   यासंदर्भांत आम्‍ही मा.मुंबई उच्‍च न्‍यायालयातील रिट याचिका क्रमांक 5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई // विरुध्‍द // राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायीक दृष्‍टांताचा आधार घेत आहोत.   सदर निकालात पुढीलप्रमाणे तत्‍व विषद करण्‍यात आलेले आहे.
      As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of  Consumer Protection Act is entertainable against the society, the Directors or members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/ members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.  
      वरील न्‍यायीक दृष्‍टांतातील तत्‍व पाहता संचालकांची महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम, 1960 च्‍या कलम 88 नुसार चौकशी होऊन जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत संचालकांना वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरवता येणार नाही असे म्‍हटले आहे त्‍यामुळे रक्‍कम देण्‍यास संचालकांना वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरवता येणार नाही व तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी ही विरुध्‍द पक्ष क्र. 1 संस्‍थेची आहे या मतास आम्‍ही आलो आहोत.     सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                              आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       विरुध्‍द पक्ष क्रं.1 संस्‍था यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी या निकालपत्राच्‍या परिच्‍छेद क्र. 2 मध्‍ये नमुद केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍या मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.   
           ( क )       विरुध्‍द पक्ष क्रं.1 संस्‍था यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 500/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
             ( ड )      वर नमुद आदेश अनुक्रमांक (ब) मधील मुदत ठेवीच्‍या रक्‍कमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरीत रक्‍कम अदा करावी.
  गा 
दिनांकः-  06/06/2013. 
 
                        ( श्रीमती पुनम नि.मलीक )        (श्री.विश्‍वास दौ.ढवळे )
                             सदस्‍या                            अध्‍यक्ष
               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,जळगांव.
 
 
[HON'ABLE MR. Vishwas D. Dhawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Poonam N.Malik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.