निकालपत्र :- (दि.10.12.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे एकाच कुटुंबातील असून तक्रारदार क्र.4 यांच्या आई सौ.शांताबाई अर्जुन खामकर यांनी त्यांच्या अज्ञान मुलाच्या शिक्षणासाठी सामनेवाला संस्थेमध्ये दामदुप्पट योजनेखाली ठेवी ठेवलेल्या आहेत. यातील तक्रारदार क्र. 1 व 2 हे सज्ञान झाले असून तक्रारदार क्र.3 व 4 हे अज्ञान आहेत. सदर ठेवींचा तपशील हा खालीलप्रमाणे :- अ.नं. | ठेवीदारांची नांवे | रक्कम | पावती क्र. | खाते क्र. | ठेवीचा दिनांक | मुदत संपली | 1. | सुनिता खामकर | 25000/- | 11247 | 2917 | 15.07.1998 | 30.03.2003 | 2. | संगिता खामकर | 25000/- | 11246 | 2916 | 15.07.1998 | 30.03.2003 | 3. | कु.दिपाली खामकर | 25000/- | 11244 | 2914 | 15.07.1998 | 30.03.2003 | 4. | मंजुनाथ खामकर | 25000/- | 11245 | 2915 | 15.07.1998 | 30.03.2003 |
(3) उपरोक्त उल्लेख केलेल्या ठेवींच्या मुदती या दि.30.03.2003 रोजी संपलेल्या होत्या व सदर ठेवींचे पुर्न नुतनीकरण करुन दामदुप्पट ठेवीमध्ये ठेवणेत आलेचे सांगणेत आले. त्याचा दि.15.12.2007 रोजी संपलेला आहे. सदर ठेवींची मागणी केली असता सामनेवाला बँकेने नकार दिला असल्याने त्यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली. त्यास सामनेवाला बँकेने नोटीस पाठवून सदरच्या ठेव रक्कमा श्री.अर्जुन खामकर यांच्या कर्ज खात्यास वर्ग करुन घेतलेचे उत्तर दिले आहे. सामनेवाला बँकेने सदर ठेवींच्या रक्कम दिल्या नसल्याने उपरोक्त उल्लेख केलेल्या ठेवींच्या रक्कमा द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचा आदेश करावा. तसेच, मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेवपावत्या, वयाचे दाखले, सामनेवाला यांना दि.07.03.09 रोजी पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांनी दि.17.04.2009 रोजी पाठविलेली उत्तरी नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी काही महत्त्वपूर्ण माहिती जाणीवपुर्वक लपवून ठेवलेली आहे. तक्रारीत नमूद केलेल्या ठेवी या अर्जुन रामा खामकर यांनी सदर ठेव तारणावर कर्ज घेतले आहे. अर्जुन रामा खामकर व शांताबाई अर्जुन खामकर हे पती-पत्नी असून एकत्र रहातात. त्यांनी सदर ठेवीवर वेळावेळी चार कर्ज प्रकरणे केलेली आहेत व त्याप्रमाणे कर्ज रक्कमा उचल केलेल्या आहेत. सदर ठेव तारण कर्ज प्रकरणाच्या परतफेडीसाठी नमूद ठेव रक्कम दि.22.03.2001 रोजी सदर कर्ज खात्यास जमा केलेल्या आहेत. सदर कर्ज प्रकरणी रक्कम जमा करुन घेणेबाबत अर्जुन रामा खामकर व शांताबाई अर्जुन खामकर यांनी सामनेवाला बँकेस तसे पत्र दिले आहे व त्याप्रमाणे दि.22.03.2001 रोजी सदर ठेव पावत्या डिस्चार्ज करुन ठेव तारण कर्ज भागवून घेतले आहे. याची माहिती अर्जुन रामा खामकर व शांताबाई अर्जुन खामकर यांना पूर्णपणे माहिती होती अशी वस्तुस्थिती असतानाही खोटया मजकूराची नोटीस पाठविली व त्यास सामनेवाला बँकेने उत्तर दिले आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत यावी व दंडात्मक नुकसान भरपाई रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यासोबत मंजुनाथ खामकर यांचे नांवे ठेव खाते उघडणेचा अर्ज, दि.02.09.1998, 26.03.1999 व दि.31.03.2000 चे ठेव तारण कर्जासाठी अर्ज-करार-प्रॉमिसरी नोट, दि.22.03.2001 रोजीचा ठेव तारण कर्ज खातेउतारे, डिस्चार्ज केलेली ठेव पावती नं.11245, 11244, 11246, 11247 अर्जुन खामकर यांनी दिपाली खामकर-संगिता खामकर-सुनिता खामकर यांचे नांवे ठेव खाते उघडणेचा अर्ज, अर्जुन खामकर यांनी दि.22.03.2001 रोजी दिलेला अर्ज इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (7) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या ठेव पावत्या या सन 1998 साली ठेवलेल्या आहेत व ठेवी तारण देवून दि.15.07.1998 रोजी कर्ज घेतले आहे. सदरची वस्तुस्थिती ठेव तारण कर्जाच्या अर्जावरुन दिसून येते. सदरच्या ठेव पावत्या कर्ज खाती दि.22.03.2001 रोजीच जमा करुन घेतलेल्या व ठेव पावत्या डिस्चार्ज केलेल्या आहेत व त्यास सौ.शांताबाई अर्जुन खामकर यांनी संम्मतीदाखल सहया केलेल्या आहेत. सदरच्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही खोटी असल्याचे दिसून येत आहे. सबब, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 26 यातील तरतुदीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला बँकेस कॉम्पेनसेटरी कॉस्ट द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येते. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. तक्रारदारांनी सामनेवाला बँकेस कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावी.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |