Maharashtra

Nagpur

CC/149/2021

SHRI. RAHUL VIJAYSHANKAR THAKUR - Complainant(s)

Versus

VBPSUNCORP NIDHI LIMITED, THROUGH DIRECTOR, BHUSHAN BALAJIRAO DHONGLI - Opp.Party(s)

ADV. KIRANSINGH N. LAD

04 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/149/2021
( Date of Filing : 22 Feb 2021 )
 
1. SHRI. RAHUL VIJAYSHANKAR THAKUR
R/O. QTR NO. 1C/59, NEAR UNION BANK, WAYGAO-GOTURALI, UMRED, NAGPUR-441204
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. VBPSUNCORP NIDHI LIMITED, THROUGH DIRECTOR, BHUSHAN BALAJIRAO DHONGLI
OFF PLOT NO.11, HANUMAN NAGAR, MOHATA SCIENCE COLLEGE ROAD, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
2. BHUSHAN BALAJIRAO DHONGLI, VBPSUNCORP NIDHI LIMITED, THROUGH DIRECTOR
OFF PLOT NO.11, HANUMAN NAGAR, MOHATA SCIENCE COLLEGE ROAD, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
3. PRIYADARSHANI KAILASH GAJBHIYE, VBPSUNCORP NIDHI LIMITED, THROUGH DIRECTOR
OFF PLOT NO.11, HANUMAN NAGAR, MOHATA SCIENCE COLLEGE ROAD, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
4. VIKKI PRAMOD SHRIVASTAV, VBPSUNCORP NIDHI LIMITED, THROUGH DIRECTOR
OFF PLOT NO.11, HANUMAN NAGAR, MOHATA SCIENCE COLLEGE ROAD, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
5. NAVNEET KAILASH GAJBHIYE, VBPSUNCORP NIDHI LIMITED, THROUGH MEMBERS
OFF PLOT NO.11, HANUMAN NAGAR, MOHATA SCIENCE COLLEGE ROAD, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. KIRANSINGH N. LAD, Advocate for the Complainant 1
 
Dated : 04 Feb 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35(1) नुसार प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुद्ध पक्ष 1 ही VBPSUNCORP NIDHI LIMITED नागपूर या नावाने नोंदणीबध्‍द कंपनी असून तिचा नोंदणी क्रमांक 326914 हा आहे. विरुध्‍द पक्ष 2 ते 5 हे सदरच्‍या कंपनीत संचालक म्‍हणून कार्य करतात.  विरुद्ध पक्ष हे ग्राहकांचे पैसे विविध योजने अंतर्गत गुंतवणूक करून मुदतीनंतर रक्कम व्याजासह परत करण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्‍याने विरुद्ध पक्षाच्‍या कंपनीत दिनांक 13.03.2020 रोजी  रुपये 3,00,000/- दरसाल दर शेकडा 10 टक्के दराने मुदती ठेव क्रमांक MIS00004 अन्वये 12 महिन्‍यासाठी  गुंतविली असून तिची परिपक्‍वता तिथीनंतर तक्रारकर्त्‍याला सदरची रक्‍कम दिनांक 13.03.2021 ला व्‍याजासह रुपये 3,30,000/- मिळणार होते.
  2.      तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्‍याला वैयक्तिक कारणास्तव रक्‍कमेची आवश्‍यकता असल्‍यामुळे त्‍याने विरुद्ध पक्षाकडे मुदत ठेवीत  ठेवलेल्या रक्‍कमेची दिनांक 01.10.2020 ला मागणी केली असता विरुद्ध पक्षाने आर्थिक कारण पुढे करून तक्रारकर्त्‍याची  मुदती ठेवीतील रक्‍कम  डिसेंबर 2020 पर्यंत परत करण्याचे लेखी आश्वासित केले होते.  त्‍यानंतर  तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाकडे वारंवांर रक्‍कमेची मागणी करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीतील रक्‍कम परत केली नाही,  त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षाला वकिला मार्फत दिनांक 01.02.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करून खालीलप्रमाणे मागणी केली की,

अ.  विरुद्ध पक्षाला निर्देश देण्यात यावे की, विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला  मुदत ठेवीतील रक्कम रुपये 3,00,000/- दिनांक 13.03.2020 पासून द.सा.द. शे. दहा टक्के दराने व्याजासह परत करावी.तसेच   मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ते 5 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष हे आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 16.07. 2021 रोजी पारित करण्यात आला.
  2.      तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्ताऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

मुद्दे                                              उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ           होय

 

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?      होय

 

  1.  काय आदेश ॽ                                    अंतिम आदेशानुसार     

                

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुद्ध पक्षाच्‍या कंपनीत दिनांक 13.03.2020 रोजी  रुपये 3,00,000/- दरसाल दर शेकडा 10 टक्के दराने मुदती ठेव क्रमांक MIS00005 अन्वये 12 महिन्‍यासाठी  गुंतविली होती व तिची परिपक्‍वता तिथी 13.03.2021 असून तक्रारकर्त्‍याला व्‍याजासह रक्‍कम रुपये 3,30,000/- मिळणार होते हे नि.क्रं. 2(3) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याला वैयक्तिक कारणास्तव रक्‍कमेची आवश्‍यकता असल्‍यामुळे त्‍याने दिनांक 01.10.2020 ला मुदत ठेवीत गुंतविलेल्‍या रक्‍कमेची मागणी परिपक्‍वता तारखेच्‍या पूर्वी केली असल्‍याचे नि.क्रं. 2(8) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेवीत गुंतवणूक केलेली रक्‍कम परत करण्‍याची अनेक वेळा विनंती करूनही विरुद्ध पक्षाने आर्थिक कारण पुढे करून तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीतील रक्कम परत केली नाही, ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील दोषूपर्ण सेवा असल्‍याचे दिसून येते.

      सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याची मुदत ठेवीत गुंतविलेली रक्‍कम रुपये 3,00,000/- व त्‍यावर दिनांक 01.10.2020 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  2. विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.