::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 09.12.2014)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने दि.3.2.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे समूह क्र.132 मध्ये रोज 100/- प्रमाणे खाते उघडले. या योजनेनुसार दररोज रुपये 100/- प्रमाणे एक महिण्यात रुपये2500/- प्रमाणे 40 महिने पैसे भरल्यानंतर खातेधारकाला रुपये 1,00,000/- देण्याची योजना आहे. यामध्ये पहिल्या महिण्यात झालेली रक्कम गैरअर्जदार क्र.1 ने ठेवायची. त्यानंतर प्रत्येक महिण्यात पहिल्या तारखेला बोली बोलण्यात येते. गरजु ग्राहक त्याचे सोईनुसार बोली बोलून भिसी विकत घेता. अर्जदाराने भिसीमध्ये बोली बोलून भिसी खरेदीकेली असता, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने अर्जदारास बोलीप्रमाणे भिसीची रक्कम दिली नाही. याचप्रमाणे अर्जदाराने ऑगष्ट 2010 मध्ये दि.6.8.2010 रोजी गैरअर्जदाराकडे दुसरे खाते उघडले असून त्यामध्ये सुध्दा अर्जदाराने रुपये 23,012/- जमा केलेले आहेत. याशिवाय अर्जदाराने दि.13.12.2010 रोजी गैरअर्जदारांकडे तिसरे खाते उघडले असून त्यामध्ये सुध्दा रुपये 4,000/- भरणा कलले आहेत असे एकूण रुपये 49,121/- अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जमा केले आहेत. अर्जदाराने 132 क्रमांक असलेल्या योजने मध्ये 6 व्या महिण्यात, तर 134 क्रमांक असलेल्या योजनेत 12 व्या महिण्यात बोली बोलून चिट खरेदी केली. गैरअर्जदाराच्या मागणीनुसार करारनामे व कोरे चेक सह्या करुन गैरअर्जदार क्र.2 ला देवून सुध्दा चिटची रक्कम गैरअर्जदाराने अर्जदारास दिली नाही. अर्जदाराने दि.29.12.2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी केली असता, गैरअर्जदाराने दि.11.1.2013 ला खोट्या आशयाचे उत्तर नोटीस पाठविले. त्यामुळे, गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्णव अनचीत व्यापार पध्दती ठरविण्यात यावी. अर्जदाराचे गैरअर्जदाराकडेवर नमूद केल्याप्रमाणे तीन खात्यात जमा असलेली रक्कम रुपये 49,121/- दि.3.2.2010 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द व्हावा. अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व केसच्या खर्चापोटी रुपये 10,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द व्हावा, अशी मागणी केली.
2. अर्जदाराने नि.क्र. 4 नुसार 2 झेरॉक्स दस्ताऐवज, नि.क्र.6 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.13 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तर नमूद केले की, अर्जदाराला सदर ग्राहकवाद दाखल करण्याकरीता कोणतेही कारण घडले नाही. अर्जदार व गैरअर्जदारांमधील वाद हा मंचाचे न्यायकक्षेत येत नाही. त्यामुळे, मंचाला सदर वाद चालविण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदारांनी अर्जदाराची तक्रार खोटी असल्याने अमान्य केली. गैरअर्जदाराने लेखीउत्तरात पुढे असे नमूद केले की, अर्जदाराच्या गैरअर्जदाराकडे मौजा गडचांदुर येथील व्यंकटेश चिट फंड्स (चंद्र) प्राय.लिमिटेड मध्ये एकूण 3 चिट होत्या. सदर चिटचा नंबर VCF-01/132-11, VCF-01/134-10 व VCF-01/156-29 असा होता. चिट नंबर VCF-01/132-11, VCF-01/134-10 चिट ग्रुपमध्ये अर्जदाराने महिण्याला मिळणारा नफा वजा करुन मासीक हप्ते भरले व अर्जदार महिण्याला होणा-या बोलीमध्ये सहभागी होऊन सदर चिटची उचल केली. परंतु, अर्जदाराने द चिट फंड अॅक्ट 1982 अन्वये कलम 64 प्रमाणे गैरअर्जदाराच्या कंपनीच्या फोरमनने मागितलेल्या कागदपञांची व दोन जमानतदारांची पुर्तता न केल्यामुळे सदर ग्रुपची सोडत रक्कम अर्जदाराला देण्यात आली नाही. अर्जदाराचे चिट ग्रुप VCF-01/132-11 मध्ये एकूण रुपये 17,820/- व VCF-01/134-10 मध्ये एकूण रुपये 16,668/- गैरअर्जदाराकडे जमा आहे. अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे व्यंकटेश चिट फंड्स (चंद्र) प्राय.लिमिटेड, मौजा गडचांदूर येथील चिट नंबर VCF-01/156-29 मध्ये अर्जदाराने फक्त पहिल्या मासिक हप्त्यात रुपये 2500/- भरले होते व त्यानंतर अर्जदाराने चिट ग्रुप मध्ये मासिक हप्ते भरले नाही. त्यामुळे, सदर चिट ग्रुपमधून अर्जदाराचे नांव रद्द केले. गैरअर्जदाराने पुढे असे नमूद केले की, गैरअर्जदाराच्या व्यंकटेश चिट फंड्स (चंद्र) प्राय.लिमिटेड,शाखा राजुरा येथे एक चिट असून चिट ग्रुप नंबर VCF-02/56-12 असा होता. सदर चिट ही रुपये 25,000/- ची असून ग्रुपचा कालावधी 25 महिने होता. सदर चिट ग्रुपमध्ये 21 हप्ते भरल्यानंतर अर्जदार महिण्याला होणा-या बोलीमध्ये सहभागी होऊन सदर चिटची उचल केली. परंतु, त्यानंतर अर्जदाराने पुढील चार हप्ते एकूण रक्कम 4360/- कंपनीत भरले नाही. अर्जदाराचे गैरअर्जदाराच्या वरील चिट फंड कंपनीमध्ये एकूण रक्कम रुपये 30,054/- जमा आहे. गैरअर्जदाराच्या कंपनीत न भरलेली रक्कम रुपये 4360/- वजा करुन अर्जदारास देण्यास तयार होते. अर्जदाराने कोर्टासमोर खोटी व बनावटी केस दाखल केली व ती खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार रिजॉईन्डर शपथपञ दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.16 नुसार शपथपञ व नि.क्र.20 नुसार 11 दस्ताऐवज, नि.क्र.17 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे :
काय ? होय.
(4) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने दि.3.2.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे समूह क्र.132 मध्ये रोज 100/- प्रमाणे खाते उघडले. या योजनेनुसार दररोज रुपये 100/- प्रमाणे एक महिण्यात रुपये2500/- प्रमाणे 40 महिने पैसे भरल्यानंतर खातेधारकाला रुपये 1,00,000/- देण्याची योजना आहे. यामध्ये पहिल्या महिण्यात झालेली रक्कम गैरअर्जदार क्र.1 ने ठेवायची. त्यानंतर प्रत्येक महिण्यात पहिल्या तारखेला बोली बोलण्यात येते. गरजु ग्राहक त्याचे सोईनुसार बोली बोलून भिसी विकत घेता. अर्जदाराने भिसीमध्ये बोली बोलून भिसी खरेदीकेली असता, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने अर्जदारास बोलीप्रमाणे भिसीची रक्कम दिली नाही. याचप्रमाणे अर्जदाराने ऑगष्ट 2010 मध्ये दि.6.8.2010 रोजी गैरअर्जदाराकडे दुसरे खाते उघडले असून त्यामध्ये सुध्दा अर्जदाराने रुपये 23,012/- जमा केलेले आहेत. याशिवाय अर्जदाराने दि.13.12.2010 रोजी गैरअर्जदारांकडे तिसरे खाते उघडले असून त्यामध्ये सुध्दा रुपये 4,000/- भरणा कलले आहेत अर्जदाराने 132 क्रमांक असलेल्या योजने मध्ये 6 व्या महिण्यात, तर 134 क्रमांक असलेल्या योजनेत 12 व्या महिण्यात बोली बोलून चिट खरेदी केली. ही बाब गैरअर्जदाराला मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. गैरअर्जदाराने नि. क्रं. 13 वर त्यांचे लेखी जबाबात परि. क्रं. 12 मध्ये असे मान्य केले आहे कि, अर्जदाराचे गैरअर्जदारांच्या कंपनीमध्ये एकूण रक्कम 39,054/- जमा आहेत. अर्जदाराने उर्वरित मासीक हप्ते न भरल्यामुळे व कंपनीच्या शर्ती व अटी नुसार कागदपञाची व दोन जमानतदाराची पुर्तता न केल्यामुळे अर्जदाराला फंडाची रक्कम देण्यात आली नव्हती. मंचाच्या मताप्रमाणे जरीही अर्जदाराने उर्वरित मासिक हप्त्यांचा भरणा नाही केला व कंपनीच्या शर्ती व अटी नुसार जमानतदाराची पुर्तता केली नाही तरी सुध्दा गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराचे भरलेले पैसे व्याजासह अर्जदाराला परत करायचे होते. परंतु आज पर्यंत गैरअर्जदाराने अर्जदाराने भरलेली रक्कम परत न केल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविली आहे असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतीम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे जमा केलेली रक्कम
रु. 39,054/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने
अर्जदारास आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत दयावी.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी
रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2,500/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत दयावी.
(4) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 09.12.2014