मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 25/11/2010) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदाराच्या मौजा-कान्होली, ख.क्र.105/1, प.ह.क्र.48, येथील भुखंड क्र. 46, एकूण क्षेत्रफळ 1530.856 चौ.फु. हा भुखंड रु.4,74,565/- मध्ये घेण्याकरीता रु.23.01.2007 रोजी नोंदणी करण्याकरीता रु.5,000/- गैरअर्जदाराला दिले. तसेच दि.10.02.2007 पर्यंत एकूण रु.95,000/- गैरअर्जदारांना दिले. त्याची पावतीही गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला दिली. उर्वरित रक्कम रु.3,79,565/- विक्रीपत्र नोंदणीच्यावेळेस देण्याचे ठरले. कराराच्या शर्ती व अटीनुसार गैरअर्जदार संबंधित कार्यालयाकडून एन.ए.टी.पी. करणार होते. परंतू त्यांनी सदर कारवाई केली नाही व वारंवार तक्रारकर्तीने उर्वरित रक्कम घेऊन विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केली असता टाळाटाळ केली. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन रु.95,000/- ही रक्कम 18 टक्के व्याजसह मिळावे, मानसिक व शारिरीक त्रासाचा मोबदला, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे की, मौजा-कान्होली, ख.क्र.105/1, प.ह.क्र.48, आराजी 3.10 हे.आर. ही जमिन वास्तुविश्व डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी श्री. लक्ष्मण रंगदेव पाटील यांचेकडून खरेदी केली होती. त्यानंतर फेरफार होऊन गैरअर्जदार एकमेव त्याचे मालक आहेत. सदर भुखंडावर नकाशा तयार करुन संबंधित कार्यालयाकडून तो मंजूर करुन घेतला व गैरकृषीकरीता उपयोग करण्यात आला. तक्रारकर्तीने भुखंड क्र. 46, एकूण क्षेत्रफळ 1530.856 चौ.फु. रु.4,74,565/- मध्ये घेण्याकरीता रु.95,000/- गैरअर्जदाराकडे जमा केले. दि.15.03.2010 रोजी गैरअर्जदाराला पत्र पाठवून भुखंडाचे आरक्षण रद्द करुन रु.95,000/- परत मागितले व त्यानुसार गैरअर्जदाराने मुळ पावत्या तक्रारकर्तीने जमा कराव्या व रु.95,000/- चा धनादेश घेऊन जावे असे सुचित केले. परंतू तक्रारकर्तीने धनादेशही नेला नाही व मुळ पावत्या गैरअर्जदाराच्या कार्यालयात जमा केल्या नाहीत. गैरअर्जदार आजही रक्कम परत करण्यास तयार आहे. म्हणून तक्रार निकाली काढावी अशी विनंती केलेली आहे. आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात तक्रारकर्तीचे म्हणणे गैरअर्जदाराने नाकारले असून तक्रार खर्चासह खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमक्ष दि.18.11.2010 रोजी युक्तीवादाकरीता आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांमार्फत ऐकला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे व कथनांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. उभय पक्षाच्या कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून मौजा-कान्होली, येथील भुखंड क्र. 46, खरेदी करण्याकरीता आवेदन दिले होते व त्यासंबंधी रु.95,000/- गैरअर्जदाराकडे जमा केले होते, यावरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो. 6. गैरअर्जदाराचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने मागणी केलेली रक्कम रु.95,000/- देण्यास गैरअर्जदार तयार आहेत. त्यानुसार गैरअर्जदाराने नि.क्र.13 वर पुरसिस दाखल केले आहे. परंतू सदर रकमेवर तक्रारकर्तीने तक्रारीचे माध्यमातून 10.02.2007 पासून 18 टक्के व्याज मागितले आहे. तक्रारकर्तीने केलेली व्याजाची मागणी ही वास्तविकतः विचारात घेण्यायोग्य आहे. तक्रारकर्तीची व्याजाच्या दराची मागणी जरीही अवास्तव असली तरीही तक्रारकर्ती ही द.सा.द.शे. 9 टक्के व्याज सदर रकमेवर मिळण्यास पात्र ठरते असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे भुखंड खरेदी करण्याकरीता प्रस्ताव दिला होता. परंतू गैरअर्जदाराने सदर भुखंडास विक्रीकरीता लागणारे भुमीचे अकृषीकरण न केल्याने त्याची विक्री करु शकत नाही आणि त्यामुळे तक्रारकर्ती नाईलाजास्तव रक्कम परत मागण्यास बाध्य झाली. भुखंडाचे अकृषीकरण न करणे, विक्रीकरीता आवश्यक दस्तऐवज तयार न करणे, संबंधित विभागाची परवानगी न घेणे व विक्रीकरीता ठेवणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीमध्ये शारिरीक व मानसिक त्रासाच्या भरपाईकरीता रु.25,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी अवास्तव असून तक्रारकर्ती न्यायोचितदृष्टया रु.5,000/- शारिरीक व मानसिक त्रासाच्या भरपाईकरीता मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. वरील सर्व निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.95,000/- दि.10.02.2007 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज दराने द्यावे. 3) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने रु.5,000/- शारिरीक व मानसिक त्रासाच्या भरपाईकरीता तक्रारकर्तीला द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ने संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |