Maharashtra

Nagpur

CC/8/2019

DR. ANIL RAMBHAU SHERKE THROUGH ITS PAO RAMBHAU KOTHIRAMJI SHERKE - Complainant(s)

Versus

VASTU VIHAR DEVELOPERS PVT LTD THROUGH ITS DIRECTOR YOGESH BABURAO KAIKADE - Opp.Party(s)

ADV ROSHAN R. BAGDE

18 May 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/8/2019
( Date of Filing : 04 Jan 2019 )
 
1. DR. ANIL RAMBHAU SHERKE THROUGH ITS PAO RAMBHAU KOTHIRAMJI SHERKE
PLOT NO 289 BANK COLONY, NALANDA NAGAR, NARI ROAD, NAGPUR
...........Complainant(s)
Versus
1. VASTU VIHAR DEVELOPERS PVT LTD THROUGH ITS DIRECTOR YOGESH BABURAO KAIKADE
201, GANESH CHAMBER SECOND FLOOR, MEHADIYA CHOWK, DHANTOLI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 May 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्ता हा तेलंगना राज्‍यात प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत असल्‍यामुळे त्‍याने त्‍यांचे वडील रामभाऊ कोठीरामजी शेरके यांना हे सदर प्रकरण कोर्टात चालविण्‍याकरिता आममुख्‍यत्‍यारपत्र तयार करुन अधिकार दिलेले आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा- डोंगरगांव, खसरा क्रं.10, प.ह.नं. 73, तह. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 24, एकूण क्षेत्रफळ 2484.954 चौ.फु. एकूण रक्‍कम रुपये 6,70,938/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक 14.06.2007 रोजी केला व करारपत्राच्‍या वेळी रुपये 3,25,000/- चेक द्वारे  दिले व उर्वरित रक्‍कम रुपये 3,45,938/-  इतर खर्चासह दि. 14.11.2008 म्‍हणजेच एक वर्षाच्‍या आंत ठरल्‍याप्रमाणे दिले होते व रक्‍कम स्‍वीकारल्‍याबाबतच्‍या पावत्‍या  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या आहेत. तरी सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने अद्याप पर्यंत तक्रारकर्त्‍याला भूखंडाच्‍या कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्रासाठी लागणारे आवश्‍यक कागदपत्र पुरविले नाही अथवा भूखंडाचे विक्रीपत्र सुध्‍दा करुन दिलेले नाही.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे आवश्‍यक दस्‍तावेजांची वांरवांर मागणी करुन ही दस्‍तावेज देण्‍यास विरुध्‍द पक्षाने टाळाटाळ केली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला तोंडी सांगितले की, उपरोक्‍त जमीन ही मेट्रो रीजनमध्‍ये आल्‍यामुळे संबंधित कार्यालयाकडून रीतसर परवानगी प्राप्‍त झालेली नसल्‍यामुळे सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने स्‍वतः दि.29.07.2018, 30.08.2018 व 24.09.2018 रोजी पत्र पाठविले. सदरचे सर्व   पत्र प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरची  तक्रार मंचासमक्ष दाखल केली.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  मौजा-डोंगरगांव, खसरा क्रं.10, प.ह.नं. 73, तह.जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं.24, एकूण क्षेत्रफळ 2484.954 चौ.फु चे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे नोंदवून द्यावे. किंवा विरुध्‍द पक्षाचे त्‍याच परिसरात असलेले ले-आऊटमधील समान क्षेत्रफळ असलेल्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे आणि  हे देखील शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची जमा असलेली रक्‍कम दि. 14.06.2007 पासून द.सा.द.शे. 16 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्षा विरुध्‍द दि. 15.10.2019 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं.     मुद्दे                                   उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?          होय

 

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय?              होय

 

3. काय आदेश ?                            अंतिम आदेशानुसार

 

  •                 निष्‍कर्ष 

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा- डोंगरगांव, खसरा क्रं.10, प.ह.नं. 73, तह. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 24, एकूण क्षेत्रफळ 2484.954 चौ.फु. एकूण रक्‍कम रुपये 6,70,938/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक 14.06.2007 रोजी केला व करारपत्राच्‍या वेळी रुपये 3,25,000/- चेक द्वारे  दिले व उर्वरित रक्‍कम रुपये 3,45,938/-  इतर खर्चासह दि. 14.11.2008 म्‍हणजेच एक वर्षाच्‍या आंत ठरल्‍याप्रमाणे रुपये 6,70,600/- संपूर्ण रक्‍कम अदा केलेली होती हे  दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यास दि. 14.11.2008 पर्यंत कायदेशीररित्‍या भूखंडाच्‍या नोंदणीकरिता लागणारे सर्व आवश्‍यक दस्‍तावेज पुरविणार होता, परंतु भूखंडाची संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला भूखंडा संबंधिचे आवश्‍यक दस्‍तावेज पुरविले नाही अथवा तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केलेली नाही. ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे आयोगाचे स्‍पष्‍ट होते.     

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                           अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा- डोंगरगांव, खसरा क्रं.10, प.ह.नं. 73, तह. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंड क्रं. 24, एकूण क्षेत्रफळ 2484.954 चौ.फु. चे कायदेशीर‍रीत्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे.

 

  •    किंवा

 

उपरोक्‍त भूखंडाचे कायदेशीररीत्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला मौजा- डोंगरगांव, खसरा क्रं.10, प.ह.नं. 73, तह. जि. नागपूर येथील ले-आऊट मधील किंवा या ले-आऊड मधील इतर दुसरा भूखंड ज्‍याचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ 2484.954 चौ.फु.असेल अशा भूखंडाचे कायदेशीररीत्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांव त्‍याच्‍या सहमतीनुसार करुन द्यावे.

 

  • किंवा

 

उपरोक्‍त दोन्‍ही बाबी शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने 2484.954 चौ.फु. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या भूखंडासाठी मौजा- डोंगरगांव, तह.जि. नागपूर प.ह.नं.  73, मिळकतीच्‍या झोन मधील अथवा नजीकच्‍या इतर झोन मध्‍ये 2484.954 चौ.फु.च्‍या अकृषक भूखंडाकरिता शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणि सदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आंत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्चम्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.