Maharashtra

Nagpur

CC/502/2019

SHRI. CHAVVA RAJA MOHAN REDDY - Complainant(s)

Versus

VASTSALYA REALITIES NAGPUR, THROUGH MANAGING DIRECTOR SHRI. PRAFULLA PURUSHOTTAMRAO GADGE - Opp.Party(s)

ADV. JITENDRA M. HINGWE

24 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/502/2019
( Date of Filing : 07 Sep 2019 )
 
1. SHRI. CHAVVA RAJA MOHAN REDDY
R/O. SHRI. SHANKARRAO KANUJWAR, P.T.S. QUARTER NO. 73, CHANDANNAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. VASTSALYA REALITIES NAGPUR, THROUGH MANAGING DIRECTOR SHRI. PRAFULLA PURUSHOTTAMRAO GADGE
H.OFF. AT, 201, 2ND FLOOR, GANESH CHAMBER, MEHADIA CHOWK, DHANTOLI, NAGPUR-02
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. PRAFULLA PURUSHOTTAM GADGE
H.OFF. AT, 201, 2ND FLOOR, GANESH CHAMBER, MEHADIA CHOWK, DHANTOLI, NAGPUR-02
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 24 Feb 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्ष कंपनी विकत घेतलेल्‍या जमिनीवर भूखंडाची आखणी करुन ग्राहकांना ठरलेल्‍या दरात विकून व त्‍या जमिनीला राहण्‍यायोग्‍य विकसीत करुन विकण्‍याचा व्‍यवसाय करते. तक्रारकर्त्‍याने मौजा वाठोडा, पटवारी हलका नंबर ८१, तह.जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक १०८,११७/१, ११७/२ आणि ११८ येथील शेतजमिनीवर आखलेल्‍या ‘वात्‍सल्‍य गोल्‍ड’ या नावाने असलेल्‍या जमिनीवरील भूखंड क्रमांक १०१,१०२ एकूण क्षेञफळ २३७३.४६२ चौरस फुट रुपये ३७५ प्रती चौरस फुटाप्रमाणे विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी १००/- रुपयाचे स्‍टॅंम्‍प पेपरवर दोन साक्षीदार समक्ष दिनांक ९/५/२०१५ रोजी करण्‍यात आला. करारानुसार तक्रारकर्त्‍याला लेआऊटचे विकासापोटी रुपये ७५/- प्रती चौरस फुटाप्रमाणे एकूण १,७८,०१०/- दिनांक २४/२/२०१५ ते दिनांक २४/८/२०१५ या कालावधीत विरुध्‍द पक्षाला अदा करावयाचे होते. करारानुसार लेआऊटचे विकसन नागपूर सुधार प्रन्‍यास करणार होती. विरुध्‍द पक्ष कंपनीने लेआऊटचे विकसनाकरीता नागपूर सुधार प्रन्‍यास यांचेशी करार करणार होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट नंबर १०१ व १०२ च्‍या खरेदीपोटी व लेआऊटच्‍या विकसनापोटी एकूण रुपये ११,५८,७५८/- अदा केले व त्‍याबाबतची रितसर पावती विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास भूखंड क्रमांक १०१ व १०२ चे विक्रीपञ करुन देण्‍यास विनंती केली असता विरुध्‍द पक्षाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. विरुध्‍द पक्षाने करारानुसार लेआऊटचे विकसनाबाबत कायदेशीर कारवाई केली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वकीलामार्फत दिनांक २२/७/२०१५ रोजी विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली व सदर नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबत काहीच दखल घेतली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केल्‍या आहेत. 
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम तसेच विकसन शुल्‍कापोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये ११,५८,७५८/-, २४ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला परत देण्‍याचे आदेश द्यावे.
  2. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या सेवेच्‍या  ञुटी बाबत विरुध्‍द पक्षाला रुपये ३,००,०००/- दंड थोटावा व ती रक्‍कम तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेश द्यावे.
  3. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये २,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ३०,०००/- व येण्‍याजाण्‍याचा खर्च रुपये ५०,०००/- देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्ष यांना रजिस्‍टर्ड ए.डी. व्‍दारे नोटीस पाठविण्‍यात आली. मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ मंचासमोर हजर झाले नाही. म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ४/१/२०२० रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद याचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                      उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                          अंतिम आदेशाप्रमाणे 

 

 

  1. तक्रारकर्त्‍याने मौजा वाठोडा, पटवारी हलका नंबर ८१, तह.जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रमांक १०८,११७/१, ११७/२ आणि ११८ येथील शेतजमिनीवर आखलेल्‍या ‘वात्‍सल्‍य गोल्‍ड’ या नावाने असलेल्‍या जमिनीवरील भूखंड क्रमांक १०१,१०२ एकूण क्षेञफळ २३७३.४६२ चौरस फुट रुपये ३७५ प्रती चौरस फुटाप्रमाणे विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी १००/- रुपयाचे स्‍टॅंम्‍प पेपरवर दोन साक्षीदार समक्ष दिनांक ९/५/२०१५ रोजी करण्‍यात आला. करारानुसार तक्रारकर्त्‍याला लेआऊटचे विकासापोटी रुपये ७५/- प्रती चौरस फुटाप्रमाणे एकूण १,७८,०१०/- दिनांक २४/२/२०१५ ते दिनांक २४/८/२०१५ या कालावधीत विरुध्‍द पक्षाला अदा करावयाचे होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट नंबर १०१ व १०२ च्‍या खरेदीपोटी व लेआऊटच्‍या विकसनापोटी एकूण रुपये ११,५८,७५८/- अदा केले व त्‍याबाबतची रितसर पावती विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिली. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता असे निर्दशनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट नंबर १०१ व १०२ चे विक्रीपञ नोंदनी करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे. 

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २  यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा  संयुक्‍तीकपणे तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट विक्रीपोटी स्विकारलेली एकूण रक्‍कम रुपये ११,५८,७५८/- त्‍वरीत द्यावी आणि सदर रकमेवर दिनांक १९/९/२०१९ पासून १४ टक्‍के व्‍याज तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत अदा करावे.   
  3. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना आदेशीत करण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा  संयुक्‍तीकपणे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ३०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.