निकालपत्र :- (दि.21.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला बँकेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :- अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 169121 | 281163/- | 07.04.2008 | 07.07.2009 | 322016/- | 2. | बचत खाते क्र.2407 | 262724/- | -- | -- | -- |
(3) सदर ठेवींची मुदत संपूनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना ठेव रक्कमा व्याजासह दिलेल्या नाहीत. सामनेवाला क्र.4 ते 6 हे सामनेवाला बँकेचे प्रशासक आहेत. सामनेवाला क्र.7 ते 28 हे प्रशासक नियुक्तीपूर्वीचे बँकेचे संचालक आहेत. तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा देणेची सदर पदाधिका-यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे. सबब, तक्रारदारांची व्याजासह रक्कम, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावती, बचत खात्याचे पासबुक, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र. 8 यांनी म्हणणे देवून तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बॅंकेवर रिझर्व्ह बँकेने बंधन घातले असून बँकिंग परवाना रद्द केला व अवसायकाची नेमणुक केली आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.8 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ भारतीय रिझर्व्ह बँकेचे दि.25.07.2008 रोजीच्या पत्राची प्रत दाखल केली आहे. (7) सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेवर दि.16.02.2009 रोजी अवसायक समितीची नियुक्ती केली आहे व बँकेचे अस्तित्त्व संपुष्टात निघाले आहे. तक्रारदारांची रक्कम देणे अवसायकांवर बंधनकारक आहे. प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्द कोणतीही दाद मागता येणार नाही. तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला क्र.4 ते 12 व 19 ते 24 यांनी सामनेवाला क्र.8 यांनी दिलेले म्हणणेच प्रस्तुत सामनेवाला यांचे म्हणणे म्हणून वाचणेत यावे अशी पुरसिस दाखल केलेली आहे. (9) सामनेवाला क्र.28 यांनी म्हणणे देवून तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेचा परवाना रद्द केला आहे. तसेच, सदर सामनेवाला हे सेवक नियुक्त संचालक आहेत. सबब, तक्रारदारांची रक्कम देणेची त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (10) सामनेवाला क्र.28 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत सेवक प्रतिनिधी असलेबाबतची कागदपत्रे, पगार दाखला इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (11) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकलेले आहेत. तसेच, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला अवसायक मंडळाचे अॅड.भास्कर शिंदे व सामनेवाला क्र.4 ते 12 व 19 ते 24 यांचे अॅड.ताम्हणकर यांनी युक्तिवादाचेवेळेस सहकार कायद्यातील तरतुदीनुसार प्रस्तुत सामनेवाला हे तक्रारदारांची ठेव रक्कम देणेस जबाबदार नाहीत असे प्रतिपादन केले. परंतु, तक्रारदारांनी सदर सामनेवाला हे संचालक असतानाच त्यांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 कलम 35 अन्वये यापूर्वी निर्बंध घातले होते व त्यानंतर अवसायक यांची नेमणुक झालेली आहे. त्यामुळे सदरचे निर्बंध संपुष्टात आलेले आहेत. वादाकरिता जरी सद्यस्थितीत, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सामनेवाला बँकेवरती बँकिंग रेग्युलेशन अक्ट, 1949 यातील कलम 35 (ए) अनुसार सामनेवाला बँकेवरती निर्बंध आहेत असे गृहित धरले तरी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 यातील तरतूद विचारात घेतली असता सदरचा कायदा हा इतर कायद्यास न्युनतम आणणारा नसून पुरक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या निर्देशांचा विचार केला असता प्रस्तुतचे प्रकरण निर्णित करणेबाबत कोणतीही बाधा येत नसलेचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सदर निष्कर्षास पूर्वाधार म्हणून मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी खालील रिव्हीजन पिटीशनमध्ये दि.24 जुलै, 2008 रोजी पारीत केलेला निर्णय हे मंच विचारात घेत आहे. सदरचा पूर्वाधार विचारात घेतला असता प्रस्तुतची तक्रार निर्णित करणेबाबत कोणतीही बाधा येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (1) Revision Petition No. 2528 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (2) Revision Petition No. 2529 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (3) Revision Petition No. 2530 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (4) Revision Petition No. 462 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Bhimsena Tukaramsa Miskin (5) Revision Petition No. 463 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Subhas (6) Revision Petition No.2254 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Ramdas Bhosale (7) Revision Petition No.2255 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Shettar (8) Revision Petition No.2256 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Saraswati R. Bhosale (9) Revision Petition No.2746 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari (10) Revision Petition No.2747 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Savitri Desaigoudar 11) Revision Petition No.2748 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari (12) Revision Petition No.2591 462 of 2007 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Basangouda R Kandagal (12) उपलब्ध कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले आहे. सामनेवाला क्र.4 ते 6 हे अवसायक समितीचे सदस्य आहेत व अवसायकांवर जबाबदारी निश्चित केली जात नाही. तसेच, सामनेवाला क्र.27 व 28 हे निर्वाचित पदाधिकारी नाहीत. त्यामुळे सदर सामनेवाला क्र; 4 ते 6 व 27 व 28 हे तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देणेकरिता जबाबदार नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (13) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारीशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 ते 3, 7 ते 26 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा देण्यास जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावतीचे अवलोकन केले असता सदर ठेव पावती क्र.169121 ही कल्पवृक्ष ठेवीची असून तिची मुदत संपलेली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे कल्पवृक्ष ठेव पावती क्र. 169121 या पावतीवरील मुदतपूर्ण रक्कम मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (13) तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपातदेखील रक्कमा ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 2407 वर दि.0707.01.2009 रोजीअखेर रुपये 2,62,724/- (रुपये दोन लाख बासष्ट हजार सातशे चोवीस फक्त) जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (14) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 3 व 7 ते 26 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना कल्पवृक्ष ठेव पावती क्र.169121 ची मुदतपूर्ण रक्कम रुपये 3,22,016/- (रुपये तीन लाख बावीस हजार सोळा फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर कोष्टकात नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र.1 ते 3 व 7 ते 26 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना त्यांच्या सेव्हिंग्ज खाते क्र.2407 वरील रक्कम रुपये 2,62,724/- (रुपये दोन लाख बासष्ट हजार सातशे चोवीस फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.07.01.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. (4) सामनेवाला क्र.1 ते 3 व 7 ते 26 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |