Maharashtra

Nanded

CC/08/273

Sumanbai Balasaheb Kadam - Complainant(s)

Versus

vasanth sahakari sakar karkana Lit - Opp.Party(s)

ADV.R.N.Kulkarni

04 Dec 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/273
1. Sumanbai Balasaheb Kadam R/o.Hadsani Tq.Hadgoan Dist.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. vasanth sahakari sakar karkana Lit NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 04 Dec 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  273/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 11/08/2008
                           प्रकरण निकाल तारीख   - 12/01/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर          -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते,                 - सदस्‍य.
             
जवाहरलाल गणूलाल उर्फ गणपत जयस्‍वाल
वय, 65 वर्षे, धंदा,शेती
रा. माहूर ता. माहूर जि. नांदेड.                            अर्जदार
 
      विरुध्‍द.
 
1.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी
    तर्फे कनिष्‍ठ अभिंयता
    माहूर ता. माहूर जि. नांदेड
2.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी                  गैरअर्जदार    तर्फे सहायक अधिकारी
    किनवट ता. किनवट जि.नांदेड
3.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी
    तर्फे कार्यकारी अभिंयता
    भोकर ता. भोकर जि. नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - कू.अड.तनूजा उजळमकर
गैरअर्जदार क्र. 1 ते 3  तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर.
 
                            निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार विज वितरण कंपनीच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदार हे घर नंबर 1137 मौ.माहूर येथील घराचे मालक व काबीज आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून ग्राहक क्र.565190082960 याद्वारे विज पूरवठा घेतला आहे व ते नियमितपणे बिल भरीत आहेत. अर्जदारांच्‍या मालकी बाबत सौ. शोभाबाई दताञय तेलेवार  यांचेशी वाद चालू आहे व दिवाणी न्‍यायालयात दावा नंबर 67/1998 मध्‍ये मनाई हूकूमाची डिक्री पारीत झाली आहे. जिल्‍हा न्‍यायालय अपिल नंबर 8/2008 प्रंलबित आहे. अर्जदाराने शेवटचे देयक दि.6.7.2008 रोजी रु.1470/- चे प्रदान केले आहे. गैरअर्जदाराने शोभाबाईचे सांगण्‍यावरुन विज पूरवठा खंडीत करण्‍याचा प्रयत्‍न केला असता  अर्जदाराने प्रकरण नंबर 6/2008 या न्‍यायमंचात दाखल केले. त्‍यावर नियमाचे अधीन राहूनच विज पूरवठा खंडीत करता येईल असे आदेशीत केलेले आहे. गैरअर्जदाराने नोटीस नंबर 18/2008 दि.11.8.2008 रोजी दिली व घराचा मालकी बाबतचे कागदपञ मागितले. नसता विज पूरवठा खंडीत करण्‍याची धमकी दिली. एखादया व्‍यक्‍तीस विज जोडणी मागावयाची असल्‍यास तो मालकच असला पाहिजे असे नाही. अर्जदाराने सदरील मालमत्‍ता गोपालसिंह यांचेकडून दि.15.4.1992 रोजीच्‍या खरेदी खताद्वारे खरेदी केली आहे व ते खरेदी खत नोंदणीकृत नसल्‍यामूळे  वाद झालेला आहे. अर्जदाराची मागणी आहे की, दि.01.04.2008 रोजीची गैरअर्जदाराची नोटीस बेकायदेशीर ठरवून रद्य करावी व विज पूरवठा खंडीत करु नये असा हूकूम दयावा.
 
              सर्व गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जास कोणतेही कायदेशीर कारण नसताना अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदाराच्‍या घराच्‍या मालकी बाबत सौ. शोभाबाई दत्‍ताञय तेलेवार  यांचेशी वाद चालू आहे. दिवाणी दावा आरसीएस नंबर 67/1998 यांची डिक्री पारीत झाली आहे. व यामध्‍ये अपील नंबर 8/2008 प्रलंबित आहे. थोडक्‍यात अर्जदाराची मालकी निर्वीवाद नाही ही बाब स्‍वतः अर्जदाराने मान्‍य केली आहे. अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्‍याचा  मानस आहे हे त्‍यांचे म्‍हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराचा मालमत्‍तेवर हक्‍क  नाही व ते स्‍वतःच भांडेकरु म्‍हणून राहत असले तरी त्‍यात मूळ मालकाचे नाहरकत प्रमाणपञ व संमती आवश्‍यक आहे. दोन व्‍यक्‍तीमध्‍ये जर जागेसंबंधी वाद असेल तर त्‍यामध्‍ये गैरअर्जदार यांना ओढण्‍याचे काही कारण नाही. प्रकरण नंबर 67/1998  मध्‍ये पान रंबर 7 वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे अर्जदाराने काही करार केला होता परंतु त्‍या कराराची पूर्तता त्‍यांने केलेली नाही. अर्जदार स्‍वतःच मालक म्‍हणत असतील तर विक्रीखत  त्‍यांचे ताब्‍यात राहीला असता. खरे ती जागा अर्जदाराचे नांवाने नाही असे जागेचे कागदपञ गैरअर्जदाराने दिलेले आहे. यात त्‍यांनी काही ञूटी केलेली नाही. म्‍हणून खर्चासह अर्जदाराची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेला दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                      उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द करतात
काय ?                                         नाही.
   2.        काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                             कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जातच असे नमूद केले आहे की, त्‍यांने 10 ते 12 वर्षापूर्वी ग्राहक नंबर 565190082967 याद्वारे विज  पूरवठा घेतला होता व 1998 पासून सौ. शोभा तेलेवार  यांचेशी जागेबददल वाद चालू आहे. अर्जदाराने या न्‍यायमंचात प्रकरण नंबर 6/2008 दाखल केले आहे व त्‍यांचा निकालही झालेला आहे. गैरअर्जदार विज कंपनीस नियमांच्‍या अधीन राहूनच विज पूरवठा खंडीत करता येईल असे स्‍पष्‍ट आदेश केलेले आहे. दिवाणी न्‍यायालयातला दावा नंबर आरसीएस नंबर 67/1998 यांचा निकाल अजूनही लागलेला नाही. अंतरिम आदेशात अर्जदाराच्‍या ताब्‍यात असलेल्‍या जागेचा अडथळा करुन नये असा हूकूम केला आहे व यात नंबर 08/2008 जिल्‍हा न्‍यायालयात अपील ही प्रलंबित आहे. या न्‍यायमंचात आदेश झाला  व दिवाणी न्‍यायालयात आदेश व्‍हायचा शिल्‍लक आहे असे असूनही अर्जदार पून्‍हा पून्‍हा तिच तक्रार दाखल करतात हे रेसज्‍यूडिकेटा कायदयाप्रमाणे करता येत नाही. एकदा आदेश झाल्‍यानंतर परत अर्जदाराला तिच तक्रार दाखल करता येणार नाही. अर्जदाराने म्‍हटल्‍याप्रमाणे त्‍यांने गोपालसिह यांचेकडून दि.15.4.1992 रोजीच्‍या खरेदी खत द्वारे जागा खरेदी केली आहे. पण जे खरेदी खत त्‍यांनी दाखल केलेले आहे ते 1998 चे असून गोपालसिह वर्मा यांने मालमत्‍ता नंबर 1137 माहूर ही मालमत्‍ता बळीराम मल्‍लया पिंपळकर  यांना विकल्‍याचे दिसून येते. यात अर्जदार जवाहरलाल यांचा काय संबंध आहे हे स्‍पष्‍ट होत नाही. यानंतर ही जागा ग्रामपंचायतीमध्‍ये श्री. बळीराम पिंपळकर यांचे नांवाने लावलेली आहे. यानंतर दि.05.10.2005 रोजीचा जो फेरफार रजिस्‍ट्रर उतारा दाखल केलेला आहे यात बळीराम पिंपळकर यांनी ही मालमत्‍ता सौ. शोभाबाई तेलेवार  यांना विक्री केलेली आहे व त्‍याद्वारे त्‍यांचे फेरफार अन्‍वये श्री. शोभाबाई तेलेवार  यांचे नांवाने झालेली आहे. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे घराची मालकी जर अर्जदाराची आहे तर त्‍या बाबत स्‍पष्‍ट असे मालकी हक्‍काचा पूरावा ते आजपर्यत देऊ शकलेले नाहीत व विज पूरवठा घेण्‍यासाठी मालकी असणे गरजेचे नाही असे त्‍यांचे म्‍हणणे असल्‍यास जागेचा ताबा त्‍यांचेकडे कसा काय आला ? यांचेही उत्‍तर ते देऊ शकत नाहीत. अर्जदार भाडेकरु असेल तर  त्‍या बाबतचे भाडेपञ व मालकीचे नाहरकत प्रमाणपञ हे ही अर्जदार आजपर्यत दाखल करु शकले नाहीत. घर नंबर 1137 चा ताबा अर्जदार यांचेकडे कसा आला हे गूढच आहे व गैरअर्जदार विज वितरण कंपनी त्‍यांना कूठल्‍या आधारे 12 वर्षापासून विज पूरवठा देत आहे हे ही एक न उलगडणारे गूढ आहे. यात खरे काय आहे व काय सत्‍य आहे हे समोर येणे आवश्‍यक आहे. दिवाणी न्‍यायालयात अपील प्रलंबित असताना व या न्‍यायमंचात अगोदर आदेश केलेला असताना परत यावर आदेश करणे योग्‍य होणार नाही. दिवाणी न्‍यायालयाचे संबंधीत कागदपञे व आदेश यात दाखल आहेत. अर्जदार यांनी दि.29.06.2008 रोजी नंतर विज बिलाची रक्‍कम भरलेली दिसत नाही व सहा महिन्‍यापासून ते विनामोबदला विज वापरीत आहेत असे दिसून येते. भारतीय विज कायदा,2003 कलम 56 नुसार विजेचे बिल थकीत असल्‍यास तशी नोटीस देऊन गैरअर्जदार सदर ग्राहकाची विज जोडणी तोडण्‍याचा अधिकार त्‍यांना आहे. या अंतर्गत ते कारवाई करु शकतात परंतु मालकी हक्‍का संबंधीचा वाद स्‍पष्‍ट झाल्‍यानंतरच गैरअर्जदार कंपनीस त्‍याप्रमाणे पूढील कार्यवाही करता येईल.
              वरील सर्व बाबीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे प्रकरण रेसज्‍यूडिकेटा या कायदयाखाली परत या न्‍यायमंचात चालविता येत नाही म्‍हणून त्‍यांचा अर्ज खारीज करण्‍यात येतो.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकाराना आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे                                    श्रीमती सुजाता पाटणकर                                सतीश सामते    
   अध्‍यक्ष                                                           सदस्‍या                                                      सदस्‍य.
 
 
               
 
जे.यु.पारवेकर
लघूलेखक.