Maharashtra

Sangli

CC/11/315

Shri. Ramjan Hasan Maldar etc.4 - Complainant(s)

Versus

Vasantdada Shetkari Sah.Bank Ltd.Sangli etc 4 - Opp.Party(s)

N B Kolekar

02 Dec 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/315
 
1. Shri. Ramjan Hasan Maldar etc.4
Aashiyana, Opp. Civil Hospital, Sangli
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Vasantdada Shetkari Sah.Bank Ltd.Sangli etc 4
H.0. Miraj Road Sangli
Sangli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:N B Kolekar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

तक्रार अर्ज क्र.३१५/२०११
 
 
 
नि.१ वरील आदेश
 
व्‍दारा मा.अध्‍यक्ष, श्री.अनिल य. गोडसे - प्रस्‍तुत तक्रार अर्ज आज रोजी दाखल करुन घेणेचे मुद्यावर मंचासमोर ठेवणेत आला. प्रस्‍तुत तक्रार अर्ज सहकार कायदा कलम १०७ नुसार अवसायक यांचेविरुध्‍द परवानगी घेतलेशिवाय दाखल करुन घेता येईल का ? याबाबत तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी आपले युक्तिवादामध्‍ये उपनिबंधक, सांगली यांचेकडे परवानगीसाठी अर्ज दिला आहे परंतु अद्याप परवानगी मिळाली नाही असे नमूद केले आहे. महाराष्‍ट्र सहकार कायदा, कलम १०७ नुसार ज्‍या पतसंस्‍थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे त्‍या पतसंस्‍थेविरुध्‍द व अवसायकाविरुध्‍द कलम १०७ नुसार परवानगी घेतलेशिवाय तक्रार अर्ज दाखल करुन घेता येणार नाही. सदरची बाब सन्‍मा.राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र यांनी अपील क्र.६४८/२०१० मदन भाऊ पाटील वि. धनसंपदा पतसंस्‍था या निवाडयाचेकामी स्‍पष्‍ट केली आहे. प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये जाबदार क्र.३ व ४ चेअरमन व व्‍हाईस चेअरमन यांनाही सामिल केले आहे. परंतु सदर जाबदार यांचेविरुध्‍द कोणतीही दाद मागितलेचे विनंती परिच्‍छेदामध्‍ये दिसून येत नाही. जाबदार क्र.३ व ४ विरुध्‍द तक्रार अर्जामध्‍ये कोणताही मजकूर नमूद नाही. सदरचा तक्रार अर्ज एकूण चार तक्रारदार यांनी एकत्रित दाखल केला आहे. सदर तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज एकत्रित कसा दाखल केला आहे हे तक्रार अर्जात नमूद केलेले नाही. असा एकत्रित तक्रार अर्ज दाखल करणेस परवानगी मागणारा अर्ज नाही. सदर तक्रारदार यांना एकत्रितरित्‍या तक्रार अर्ज दाखल करता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांचा तक्रार अर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे. 
 
 
 
 
दि.०२/१२/२०११.
सांगली.
 
                              सदस्‍या                  अध्‍यक्ष
                         जिल्‍हा मंच, सांगली        जिल्‍हा मंच, सांगली
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.