नि.४१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३४२/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १४/७/२०१०
तक्रार दाखल तारीख : १५/७/२०१०
निकाल तारीख : २३/८/२०११
----------------------------------------------------------
जलाराम भवन
नोंद पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट,
तर्फे सेक्रेटरी,
श्री अश्विनकुमार भगवानदास राजे,
वय वर्षे ५९, धंदा नोकरी,
रा.२१ ब, सुभाषनगर, मिरज,
ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंक लि.,
सांगली, मुख्य शाखा सांगली मिरज रोड
तर्फे चिफ एक्झिक्युटीव्ह
२. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंक लि.,
शाखा लक्ष्मी मार्केट, मिरज तर्फे अवसायक
३. श्री नरसगोंडा सातगोंडा पाटील, व्हा.चेअरमन
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. नांद्रे, ता.मिरज जि. सांगली
४. श्री मदन विश्वनाथराव पाटील, संचालक,
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.विजय, वसंत कॉलनी, वसंत मार्केट यार्ड,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
५. श्री सुरेश आदगोंडा पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. वसंत मार्केट यार्ड, जनरल कमिशन एजंट,
सांगली ता.मिरज जि. सांगली
६. श्री अमरनाथ सदाशिव पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. सदाशिव-४, शनिवार पेठ, माधवनगर
सांगली ता.मिरज जि. सांगली
७. श्री किरण राजाभाऊ जगदाळे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. १११३, खणभाग, जगदाळे गल्ली,
सांगली ता.मिरज जि. सांगली
८. श्री अरविंद शामराव पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. पदमाळे, ता.मिरज जि. सांगली
९. श्री आनंदराव मारुती पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. सांगलवाडी, ता.मिरज जि. सांगली
१०. श्री सुरेश जिनगोंडा पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. समडोळी, ता.मिरज जि. सांगली
११. श्री श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. मौजे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
१२. श्री सर्जेराव सखाराम पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. कवठे पिरान, ता.मिरज जि. सांगली
१३. श्री निवास दत्ताजीराव देशमुख, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. मु.पो. शिराळा, ता.शिराळा, जि. सांगली
१४. श्री दत्तात्रय श्रीपती सुर्यवंशी, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.मु.पो. अंकलखोप, ता.पलुस, जि. सांगली
१५. सौ बेबीताई मारुती पाटील, संचालिका
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.कमानवेस, मंगळवार पेठ, मिरज
ता.मिरज, जि. सांगली
१६. सौ वंदना संभाजी पाटील, संचालिका
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.मु.पो. कवठेपिरान, ता.मिरज, जि. सांगली
१७. श्री सुधाकर धोंडीराम आरते, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.विजय, वसंत कॉलनी, वसंत मार्केट यार्ड,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
१८. श्री गजानन लक्ष्मणराव गवळी, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.११२, गवळी गल्ली, सांगली ता.मिरज जि. सांगली
१९. श्री मुजीन आब्बास जांभळीकर, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.४०४, खणभाग, सांगली ता.मिरज जि. सांगली
२०. श्री भरत महादेव पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.मु.पो. बुधगाव ता.मिरज जि. सांगली
२१. श्री सतिश आप्पासो बिरनाळे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा. वसंत कॉलनी, वसंत मार्केट यार्ड,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
२२. श्री विजय विरुपाक्ष घेवारे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.४, उत्तर शिवाजीनगर, दडगे गर्ल्स हायस्कूल नजीक,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
२३. श्री बी.आर.तावसे, व्यवस्थापकीय संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार
रा.रामचंद्र बंगला, सावंत प्लॉट,
दक्षिण शिवाजीनगर, सांगली ता.मिरज जि. सांगली
२४. डिपॉझिट इन्शुरन्स ऍण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन,
रिझर्व बॅंक ऑफ इंडिया, भायखळा ऑफिस,
दुसरा मजला, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनसमोर,
मुंबई सेंटर ४००००८
(दि.१८/८/२०११ चे मंचाचे आदेशान्वये वगळले)
२५. रिझर्व बॅंक ऑफ इंडिया,
अर्बन बॅंक डिव्हीजन, मुंबई
विभागीय कार्यालय, गारमेटर हाऊस,
डॉ ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०० ०१८
२६. अवसायक मंडळ, वसंतदादा शेतकरी सह.बॅंक लि.
अ. व्ही.पी.पाटील – अध्यक्ष
ब. बी.बी. यादव - सदस्य
क. जे.पी.शिंदे – सदस्य .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò: +ìb÷.श्री.सतिश पटेल, ए.आर.कुडाळकर
जाबदार क्र.१, २, १५ व २५: एकतर्फा
जाबदार क्र.३ ते १४ व १६ ते २२ तर्फे :+ìb÷.श्री माधव ताम्हणकर
जाबदार नं. २३ तर्फे : +ìb÷.श्री.एस.पी.मगदूम
जाबदार नं. २६ : +ìb÷. श्री.हणमंत पाटील
जाबदार नं. २४ : वगळले
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार बॅंकेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंक लि. सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘सहकारी बॅंक’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम मुदतठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्या मुदत ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण १५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. जाबदार क्र.२३ यांनी नि.१९ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२३ यांनी आपल्या म्हणण्यामध्ये प्रस्तुत जाबदार हे सदर बॅंकेचे केव्हाही संचालक नव्हते. बॅंकेतील नोकर होते व त्यांची नोकरी केव्हाच संपुष्टात आली आहे. त्यामुळे ते तक्रारदार यांची रक्कम देण्यास वैयक्तिक जबाबदार रहात नाहीत असे नमूद केले आहे. जाबदार क्र.२३ यांनी नि.२० ला शपथपत्र दाखल केले आहे.
३. जाबदार क्र.१९ यांनी नि.२७ वर आपले म्हणणे दाखल केले आहे व जाबदार क्र.३ ते १४, १६ ते १८ व २० ते २२ यांनी सदरचे म्हणणे adopt करत असलेबाबत पुरशिस नि.३५ वर दाखल केली आहे. तसेच जाबदार क्र.५ यांनी नि.३६ वर अर्ज देवून नि.२७ वरील म्हणणे adopt केले आहे. सदर जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये बॅंकेवर अवसायक यांची नेमूणक करण्यात आल्यामुळे अवसायक यांच्या नियुक्तीनंतर संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. बॅंक अवसायनात गेल्यामुळे महाराष्ट्र सहकार कायद्यातील तरतुदींनुसार पूर्तता केलेशिवाय प्रस्तुतचा चालू शकत नाही. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार ग्राहक होत नाहीत या सर्व बाबींचा विचार करुन प्रस्तुतचा अर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.२८ ला शपथपत्र दाखल केले आहे.
४. जाबदार क्र.२६ यांनी नि.३७ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सदरचे अवसायक मंडळ हे मे.कमिशनर ऑफ को-ऑपरेशन ऍण्ड रजिस्ट्रार ऑफ को-ऑप. सोसायटीज महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि.२४/११/२०१० च्या आदेशाने बदलले आहे. सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज सदर जाबदार यांचेविरुध्द फेटाळणेत यावा असे नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.३८ ला शपथपत्र दाखल केले आहे.
५. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. १, २, १५ व २५ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
६. जाबदार क्र.३ ते १४ व १६ ते २२ यांनी नि.३९ वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सदर जाबदार यांचेतर्फे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांचे विधिज्ञ हे युक्तिवादाच्या दरम्यान अनुपस्थित राहिले. जाबदार यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये तक्रारदार हे ग्राहक होतात का ? याबाबत मुद्दा उपस्थित केला. सदर मुद्याच्या अनुषंगाने विचार करताना तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात काय ? हे या ठिकाणी ठरविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जातच जलाराम भवन हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे असे नमूद केले आहे. चॅरिटेबल ट्रस्ट हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होते का ? या बाबत अनेक निवाडे जाबदार यांनी याकामी दाखल केले आहेत याबाबत जाबदार यांनी सन्मा. राष्ट्रीय आयोग यांचा IV (2007) CPJ Page No.33 (NC)Pratibha Pratishthan Vs. The Manager, Allahabad Bankहा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये सन्मा.राष्ट्रीय आयोग यांनी पुढील निष्कर्ष नोंदविला आहे. Trust is not included in the definition of the word “person”. Hence the complaints filed by the Trust are not maintainable.सदर निवाडयातील निष्कर्षाचे अवलोकन केले असता ट्रस्ट हे ग्राहक म्हणून तक्रारअर्ज दाखल करु शकत नाहीत असा निष्कर्ष सन्मा.राष्ट्रीय आयोगाने नोंदविला असल्याने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. तक्रारदार हे ग्राहक म्हणून तक्रारअर्ज दाखल करु शकत नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने इतर मुद्यांबाबतचा ऊहापोह प्रस्तुत प्रकरणी करणे संयुक्तिक होणार नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: २३/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.