नि.68
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.356/2010
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 22/07/2010
तक्रार दाखल तारीख : 11/08/2010
निकाल तारीख : 19/05/2012
----------------------------------------------------------------
श्री.चंद्रकुमार श्रीकिसन बंग
वयवर्षे 60, धंदा टॅक्स कन्सल्टंट
ट्रस्टी व सेक्रेटरी
श्री रामकृष्ण सांस्कृतीक प्रतिष्ठान
(सार्वजनिक विश्वस्त नोंदणी क्रमांक ई/764 सांगली)
मंगळवार पेठ, माधवनगर, जि.सांगली. ..... तक्रारदार
विरुध्द
1. वसंतदादा शेतकरी सह.बँक लि. सांगली
शाखा मुख्य शाखा सांगली मिरज रोड, सांगली.
2. श्री.नरसगोंडा सातगोंडा पाटील (व्हा.चेअरमन)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.नांद्रे, ता.मिरज, जि.सांगली.
3. श्री.मदनराव विश्वनाथराव पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा समाजसेवा,
रा.विजय बंगला, वसंत कॉलनी,
वसंत मार्केटयार्ड, सांगली.
4.श्री.सुरेश आदगोंडा पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.माजी महापौर, इंदिरानिवास,
दक्षिण शिवाजीनगर, नेमीनाथनगर,
सांगली.
5. श्री.अमरनाथ सदाशिव पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.सदाशिव 4, शनिवार पेठ,
माधवनगर, सांगली.
6. श्री.किरण राजाराम जगदाळे (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.1113, खणभाग, जगदाळे गल्ली,
सांगली.
7. श्री.अरविंद शामराव पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.पदमाळे,
ता.मिरज, जि.सांगली.
8. श्री.आनंदराव मारुती पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.सांगलीवाडी,
ता.मिरज, जि.सांगली.
9. श्री.सुरेश जिनगोंडा पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.समडोळी,
ता.मिरज, जि.सांगली.
10. श्री.श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.मौजेडिग्रज,
ता.मिरज, जि.सांगली.
11. श्री.सर्जेराव सखाराम पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.कवठेपिरान,
ता.मिरज, जि.सांगली.
12. श्री.निवास दत्ताजीराव देशमुख (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.शिराळा,
ता.शिराळा, जि.सांगली.
13.श्री.दत्तात्रय श्रीपती सुर्यवंशी (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.अंकलखोप,
ता.पलूस, जि.सांगली.
14. सौ.बेबीताई मारुती पाटील (संचालिका)
व.व.सज्ञान, धंदा घरकाम,
रा.कमानवेस, मंगळवार पेठ, मिरज.
15. सौ.वंदना संभाजी पाटील (संचालिका)
व.व.सज्ञान, धंदा घरकाम,
रा.मु.पो.कवठेपिरान,
ता.मिरज, जि.सांगली.
16. श्री.सुधाकर धोंडीराम आरते (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.कसबेडिग्रज,
ता.मिरज, जि.सांगली.
17. श्री.गजानन लक्ष्मणराव गवळी (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.112, गवळी गल्ली, सांगली.
18. श्री.मुजीर आब्बास जांभळीकर (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.बुधगांव,
ता.मिरज, जि.सांगली.
19. श्री.भरत महादेव पाटील (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.मु.पो.बुधगांव,
ता.मिरज, जि.सांगली.
20. श्री.सतिश आप्पासो बिरनाळे (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.वसंत कॉलनी, वसंत मार्केटयार्ड,
सांगली.
21. श्री.विजया विरुपाक्ष घेवारे (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.उत्तर शिवाजीनगर, सांगली.
22. श्री.अशोक कृष्णा फावडे (संचालक)
व.व.सज्ञान, धंदा व्यापार,
रा.1357 ब, रिसाला रोड, सांगली.
23. श्री.बी.आर.तावसे (व्यवस्थापकीय संचालक)
व.व.सज्ञान, धंदा नोकरी,
रा.रामचंद्र बंगला, सावंत प्लॉट,
दक्षिण शिवाजीनगर, सांगली.
24. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन
रिझर्व बँक ऑफ इंडिया भायखळा ऑफिस,
दुसरा मजला, मुंबई सेंट्रल, रेल्वे स्टेशनसमोर,
मुंबई सेंट्रल 400 008.
25. रिझर्व बँक ऑफ इंडिया
अर्बन बँक डिव्हीजन, मुंबई
विभागीय कार्यालय, गारमेंट हाऊस,
डॉ.अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 400 008.
26. अवसायक मंडळ
वसंतदादा शेतकरी सह.बँक लि. सांगली
अ. श्री.व्ही.पी.पाटील अध्यक्ष
ब. श्री.बी.बी.यादव सदस्य
क. श्री.जे.पी.शिंदे सदस्य .....जाबदार
तक्रारदारतर्फे : अॅड.हरीष जी. प्रताप
जाबदार क्र.1, 14 : एकतर्फा
जाबदार क्र.2 ते 13,15 ते 22: अॅड.माधव ताम्हणकर
जाबदार क्र. 23 : अॅड.एस.पी.मगदूम
जाबदार क्र.24, 25 : प्रतिनिधी
जाबदार क्र. 26 : अॅड.एच.आर.पाटील
नि का ल प त्र
व्दारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
1. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार बँकेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम व बचत खात्यामध्ये शिल्लक असलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार वसंतदादा शेतकरी सह.बँक लि.(ज्यांचा उल्लेख यापुढे ‘बँक’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम मुदतठेवी अंतर्गत व बचत खात्याअंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्या मुदत ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.3 अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.5 अन्वये एकूण 8 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
2. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.1 व 14 यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला.
3. जाबदार क्र.22 यांनी नि.55 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्येतक्रारदाराच्या तक्रार अर्जातील बहुतांशी मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये बँकेवर दि.25/07/08 रोजी भारतीय रिझर्व बँक यांचे निर्बंध आले आहेत त्यामुळे सदर रक्कम परत देणे अशक्य झाले आहे असे म्हणले आहे. तसेच दि.06/01/2009 रोजी भारतीय रिझर्व बँकेने जाबदार बँकेचा परवाना रद्द केलेनंतर जाबदार बँकेवर अवसायक मंडळाची नेमणूक केली आहे व संचालक मंडळ बरखास्त झाले आहे त्यामुळे जाबदार यांना संचालक म्हणून कार्यरत असणेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जाबदार यांना विनाकारण पक्षकार म्हणून सामिल केले असलेने तक्रार खर्चासह नामंजूर करावी असे म्हणले आहे. जाबदार हे सेवक नियुक्त प्रतिनिधी असून ते जाबदार बँकेत नोकरीस होते त्यामुळे त्यांना सदर कामातून मुक्त करणेत यावे असे म्हणले आहे. जाबदार क्र.22 यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.57 चे यादीसोबत 7 कागद दाखल केले आहेत.
4. जाबदार क्र.18 यांनी नि.58 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये जाबदार बँकेवर दि.25/07/2008 रोजी भारतीय रिझर्व बँक यांचे निर्बंध आले आहे त्यामुळे सदरची रक्कम परत देणे अशक्य झाले आहे. तसेच जाबदार बँकेचा बँकिंग परवाना हा दि.06/01/2009 रोजी भारतीय रिझर्व बँक यांनी रद्द केलेनंतर जाबदार बँकेवर अवसाय मंडळाची नेमणूक केली असून संचालक मंडळ बरखास्त केले आहे त्यामुळे जाबदार यांना संचालक म्हणून कार्यरत असणेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जाबदार यांना विनाकारण पक्षकार म्हणून सामिल केले असलेने तक्रार खर्चासह नामंजूर करावी असे म्हणले आहे. तसेच अर्जदार हे ट्रस्ट असलेने ग्राहक संरक्षण कायदयाच्या ग्राहक या संज्ञेखाली बसत नाहीत तरी सदरचा अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा. जाबदार क्र.18 यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.58 अ ला शपथपत्र दाखल केले आहे.
5. जाबदार क्र.23 यांनी नि.42 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तसेच जाबदार हे कधीही संचालक नव्हते ते नोकर होते. त्यामुळे त्यांचेविरुध्दची मागणी फेटाळणेत यावी असे म्हणले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचेकडून जाबदार बँकेवर आर्थिक निर्बंध आलेमुळे ठेवीदारांच्या रकमा परत देता येत नव्हत्या. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा. जाबदार क्र.23 यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ नि.43 ला शपथपत्र व नि.44 चे यादीसोबत 3 कागद दाखल केले आहेत.
6. जाबदार क्र.24 यांनी नि.45 वर शपथपत्राच्या स्वरुपात आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तसेच जाबदार यांनी अवसायक यांचेकडून यादी मिळाल्यानुसार तक्रारदार यांचा दावा डिआयसीजीसी अॅक्ट, 1961 नुसार सेटल केला आहे. तसेच तक्रारदारास जाबदार यांनी कोणतीही सेवा दिलेली नसलेले तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होत नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणले आहे.
7. जाबदार क्र.25 यांनी नि.46 वर शपथपत्राच्या स्वरुपात आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तसेच तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक संरक्षण कायदयानुसार ग्राहक होत नाही. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 नुसार देशभरातील बँकिंग व्यवहारांवर देखभाल व नियंत्रणाचे काम रिझर्व बँक करते. जाबदार बँक अवसायनात गेल्यानंतर तक्रारदार यांनी अवसायक यांचेकडे ठेवींबाबत दावा करणे गरजेचे आहे. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणले आहे.
8. जाबदार क्र.26 यांनी नि.53 वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सध्याचे अवसायक मंडळ अस्तित्वात नसून ते बदलले आहे त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज सदर अवसायकांचेविरुध्द चालू शकत नाही. प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करण्यापूर्वी तक्रारदार यांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम 107 नुसार योग्य ती परवानगी घेतली नाही त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज चालण्यास पात्र नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावत्या या रामकृष्ण सांस्कृतीक प्रतिष्ठान यांचे नावच्या आहेत. प्रस्तुतचा तक्रार अर्ज रामकृष्ण प्रतिष्ठान यांचे नावे दाखल होणे आवश्यक होते परंतु तक्रारदार यांनी त्यांचे नांवे वैयक्तिक तक्रार अर्ज दाखल केला आहे तो चालणेस पात्र नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.54 ला शपथपत्र दाखल केले आहे.
9. जाबदार क्र.3 ते 14, 16 ते 17, 19 ते 22 यांनी जाबदार क्र.18 यांनी दिलेले म्हणणे सदर जाबदाराबाबत वाचण्यात यावे अशी पुरशीस नि.60 वर सादर केली आहे.
10. तक्रारदार यांनी नि.61 वर शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.3 ते 14, 16 ते 22 यांनी नि.62 वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.63 वर तोंडी व लेखी पुरावा संपला अशी पुरशीस दिली आहे. तक्रारदार यांनी नि.65 वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार क्र.26 यांनी दाखल केलेले म्हणणे हाच लेखी युक्तिवाद समजणेत यावा तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशीस नि.66 वर दाखल केली आहे. जाबदार क्र.3 ते 14, 16 ते 22 यांनी नि.67 चे यादीने निवाडे दाखल केले आहेत.
11. आजरोजी तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. जाबदार क्र.3 ते 14, 16 ते 22 तर्फे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
12. जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तक्रारदार हे धर्मदाय संस्था असल्याने ग्राहक होत नाही असे आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जाच्या परिच्छेद 1 मध्ये रामकृष्ण सांस्कृतीक प्रतिष्ठान ही विश्वस्थ कायदयाप्रमाणे नोंदणीकृत ट्रस्ट आहे असे नमूद केले आहे. दाखल ठेवपावत्या हया रामकृष्ण सांस्कृतीक प्रतिष्ठान यांचे नावच्या आहेत त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज रामकृष्ण सांस्कृतीक प्रतिष्ठान या ट्रस्टसाठी दाखल केला आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांनी त्यांच्या सरनाम्यामध्ये ट्रस्टच्या नावे तक्रार अर्ज दाखल न करता स्वत:चे नावे तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदरचा तक्रार अर्ज हा ट्रस्टतर्फे दाखल केला आहे ही बाब जरी विचारात घेतली तरी ट्रस्ट हे ग्राहक होतात का ? याबाबत जाबदार यांनी दाखल केलेला सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा दाखल केलेला IV (2007) CPJ 33 (NC) हा प्रतिभा प्रतिष्ठान वि. मॅनेजर, अलाहाबाद बँक हा निवाडा महत्वपूर्ण ठरतो. सदर निवाडयाचे कामी सन्मा.राष्ट्रीय आयोग यांनी “Trust which is registered under Bombay Public Trust Act cannot be considered to be person which can file complaint under the Consumer Protection Act.” असा निष्कर्ष काढला आहे. सदर निष्कर्ष विचारात घेता तक्रारदार हे ग्राहक होणार नाहीत असे या मंचाचे मत आहे.
13. जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये प्रस्तुत बँकेवर अवसायक नेमला असल्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्जास महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम 107 ची बाधा येते असे नमूद केले आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी जाबदार क्र.26 यांना अवसायक म्हणून सामील केले आहे. तसेच तक्रारअर्जामध्ये सदर बॅंक अवसायनात गेली असल्याचे नमूद केले आहे. प्रस्तुत बॅंकेवर अवसायक मंडळाची नेमणूक झाल्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्जास महाराष्ट्र सहकार कायद्यातील कलम 107 ची बाधा येते का ? हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित होतो. महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम 107 नुसार एखादी बॅंक अथवा पतसंस्था अवसायनात निघाली असल्यास सदर बॅंकेविरुध्द अथवा अवसायकांचे विरुध्द कोणताही दावा अगर इतर कायदेशीर प्रकरण दाखल करण्यापूर्वी अथवा प्रस्तुत प्रकरण चालू ठेवणेसाठी निबंधक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रकरणी अशी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रस्तुतच्या तक्रारअर्जास सहकार कायदयातील कलम 107 ची बाधा येते. जाबदार यांनी त्याबाबत सन्मा. राज्य आयोग यांचेकडील काही निवाडे दाखल केले आहेत. सन्मा.राज्य आयोग यांचेकडील दाखल केलेल्या अपिल क्र.67/11 व 68/11 या मदनराव पाटील विरुध्द गजानन नागरी पतसंस्था या निवाडयाच्या कामी तसेच अपिल नं.648/2010 मदनराव पाटील विरुध्द धनसंपदा नागरी पतसंस्था या निवाडयाचे कामी दिलेल्या कलम 107 च्या परवानगीबाबत ऊहापोह केला आहे. सन्मा.राज्य आयोग यांनी सदर निवाडयाचे कामी पुढील निष्कर्ष काढला आहे.
As per the provisions of section 107 of Maharashtra Co-op. Societies Act 1960, in absence of permission of the Registrar of Cooperative Society, is specifically obtained either to file the proceeding or continue with the proceeding in the nature of consumer dispute, the consumer complaints ought not to have been continued.
सन्मा.राज्य आयोग यांनी वर दिलेल्या निवाडयाचे कामी दिलेला निष्कर्ष विचारात घेता तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज पुढे चालू ठेवणेस निबंधक यांची कोणतीही परवानगी आणलेली नाही त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज बॅंकेविरुध्द चालणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. तसेच तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार बॅंकेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. 5223/09 सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक 22 डिसेंबर 2010 रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम 88 अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे संचालकांनाही प्रस्तुत प्रकरणी पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दिनांक: 19/05/2012.
(गीता सु.घाटगे ) (अनिल य.गोडसे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.