ग्राहक तक्रार क्र. : 219/2014
दाखल तारीख : 21/11/2014
निकाल तारीख : 17/06/2015
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री.भाऊसाहेब उत्तम सरवदे,
वय-सज्ञान, धंदा-शेती,
रा.पाडोळी (ना.), ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. तेरणा शेतकरी सहकारी कारखाना लि.
ढोकी, ता. जि. उस्मानाबाद.
2. वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद,
‘अर्थभवन’ शिवाजी चौक, उस्मानाबाद - 413501. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.सी.ए.महामुनी.
विरुध्द पक्षकार क्र. 1 तर्फे : हजर नाही.
विरुध्द पक्षकार क्र. 2 तर्फे विधिज्ञ : श्री. एस.एस.बागल.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
तक्रारदाराने विप च्या विरोधात तक्रार दाखल करुन विप क्र.2 (वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद) यांनी तक्रारदाराचे नावे कर्ज खाते जमा करुन बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश व्हावे अशी विनंती केली होती. त्यानंतर सदरच्या तक्रारीमध्ये विप यांना नोटीस बाजावणी होऊन ते हजर झाले नंतर विप क्र.2 यांनी तक्रार अधिकार क्षेत्राबाबत आक्षेप घेऊन सदरच्या तक्रारीबाबत सदर मंचाला अधिकार क्षेत्र प्राप्त होत नाही असा अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर तक्रारदाराने त्यांच्यावर म्हणणे दाखल केले त्यावर उभय पक्षाने युक्तिवाद केला त्यानंतर दि.01/11/2014 रोजी विप क्र.2 यांचा कार्यक्षेत्राबाबत प्राथमिक आक्षेप अर्ज फेटाळण्यात आला. सदरच्या अर्जावरील आदेशाच्या नाराजीने विप क्र.2 यांनी मा.राज्य आयोग औरंगाबाद खंडपीठ येथे रिविजन पिटीशन दाखल केले. सदर रिविजन पिटीशन मा. राज्य आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हा मंचाला सदरचे प्रकरण चालविण्याचे अधिकार क्षेत्र प्राप्त होत नाही असे तत्व विषद करुन विप क्र.2 (वसंतदादा नागरी सहकारी बँक लि. उस्मानाबाद) यांचे रिव्हीजन पिटिशन मंजूर केले. सदर रिव्हीजन पिटिशनचा आदेश सदरच्या प्रकरणात दाखल केलेला आहे. म्हणून आम्ही खालील आदेश पारीत करत आहोत.
आदेश.
1) मा. राज्य आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्या रिव्हीजन पीटीशन मधील आदेशाप्रमाणे सदर प्रकरणाला या मंचास अधिकारक्षेत्र प्राप्त होत नसल्याने प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.