(मा. सदस्या अॅड. सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडून मानसिक, शारिरीक, आर्थीक त्रासापोटी तसेच पुढील औषधोपचाराचा, दवाखान्याचा, शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च, नोकरीवर जाता येत नसल्याने होणा-या नुकसानीचा तसेच कॉम्पेन्सेशन म्हणून रक्कम रु.2,31,843/- मिळावा व सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैद्यकिय व्यवसायात बेजबाबदारपणा दाखवला म्हणून त्यांचेविरुध्द योग्य ती कारवाई व्हावी तसेच अर्जाचा मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. तक्रार क्र.149/2011 या कामी सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.25 लगत लेखी म्हणणे व पान क्र.26 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.27 लगत लेखी म्हणणे व पान क्र.28 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?-होय. 2) सामनेवाला यांनी वैद्यकिय सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केला आहे काय?- नाही. 3) अंतिम आदेश? -तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. विवेचन याकामी अर्जदार यांनी पान क्र.34 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. तसेच अर्जदार यांचेवतीने अॅड.श्रीमती एस. ए. पठाण यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी पान क्र.31 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे तसेच सामनेवाला नं.2 यांनी पान क्र.86 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. तसेच सामनेवाला नं.2 यांचेवतीने अँड श्रीमती एस.एस. पुर्णपात्रे यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार हे ग्राहक असल्याची बाब अमान्य केलेली नाही तसेच सामनेवाला यांनी अर्जदार यांचेवर उपचार केलेले आहेत ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. या कामी पान क्र.5 ते पान क्र.15 व पान क्र.55 ते पान क्र.69 लगत वैद्यकिय उपचाराची कागदपत्रे दाखल आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी नाकारलेली नाहीत. पान क्र.5 ते पान क्र.15 व पान क्र.55 ते पान क्र.69 लगतची उपचाराची कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार हे सामनेवाला क्र.1 कडे दि.06/10/2000 रोजी त्यांचे दोन्ही डोळे तपासणीसाठी गेले. त्यानुसार सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचे डोळयांची तपासणी करुन त्यांचे उजव्या डोळयात मोतीबिंदु असल्याचे निदान काढले व सदर मोतीबिंदु शस्त्रक्रिया करुन काढणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. तसेच डाव्या डोळयात लेन्स बसविण्याबाबतचा तक्रार क्र.149/2011 सल्ला दिला. सदर सल्ल्यानुसार अर्जदार यांनी दोन्ही डोळयांची शस्त्रक्रीया करण्याची संमती दिली. आवश्यक तपासण्या केल्या व दि.25/3/2011 रोजी डोळयांची शस्त्रक्रिया करण्यात आली.” असा उल्लेख केलेला आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये “शस्त्रक्रीयेनंतर अर्जदार यांना डाव्या डोळयाने काहीएक दिसत नव्हते. दि.13/4/2011 रोजी अर्जदार यांनी नाशिक येथील सुशिल आय हॉस्पीटल अॅण्ड ब्रम्हा लेसर सेंटर या दवाखान्यात जावून डोळयांची तपासणी केली असता सामनेवाला नं.2 यांनी अर्जदाराचे डोळयाची चुकीची शस्त्रक्रिया करुन लेन्स योग्य ठिकाणी बसविलेली नसल्याचे निदान काढले. दि.28/3/2011 रोजी डॉ.जगदाळे तसेच डॉ.शरद पाटील यांचेकडे डोळयाची तपासणी केली. त्यांचे तपासणीतसुध्दा चुकीची लेन्स बसविल्याचा खुलासा झाला. त्यांनी पुन्हा डोळयाची शस्त्रक्रीया केल्याशिवाय काहीही दिसणार नाही असा सल्ला दिला. डॉ.जगदाळे यांनी तसा दाखलाही दिलेला आहे. सदरची चुक ही सामनेवाला नं.1 व 2 यांचे बेजबाबदारपणामुळे घडलेली आहे. याबाबत सामनेवाला नं.1 व 2 यांना भेटून हकिकत सांगितली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.” असा उल्लेख केलेला आहे. अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्ज व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदारास डावा डोळयाने काहीएक दिसत नाही. तसेच सामनेवाला नं.2 यांनी शस्त्रक्रिया करतेवेळी खोलवर कट (Deep cute) मारुन डोळयास टाके टाकल्याने अर्जदाराच्या डोळयात दुखत आहे. तसेच लेन्स योग्य ठिकाणी न बसविल्यामुळे डोळयाचे बुबुळमध्ये त्रास होत आहे. सतत डोळयातून पाणी निघत आहे. अर्जदारास सतत डोळयांचा त्रास सहन करणे अशक्य झाले आहे. सामनेवाला यांचे चुकीमुळे अर्जदार हे नाहक शारिरीक मानसिक तसेच आर्थीक त्रास सहन करीत आहेत. दररोज औषधोपचाराचा खर्च सोसावा लागला आहे. तसेच नोकरीपासूनही वंचीत रहावे लागत आहे.” असा उल्लेख केलेला आहे. वरीलप्रमाणे अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये सविस्तर कथन केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचा तक्रार अर्ज खोटा असून त्यातील संपुर्ण कथन मान्य नाही. अर्जदार यांना उत्पन्नाचे काहीएक साधन नसल्यामुळे तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब व इतर आजार असल्यामुळे व दोन्ही डोळयांनी दिसत नसल्यामुळे तपासणी करण्याची विनंती केली. त्याअनुषंगाने तपासणी केली असता उजव्या डोळयात मोतिबिंदु असल्याने दिसत नाही असे निदान केले व व डाव्या डोळयात वरील आजारामुळे लेन्स बसविल्याशिवाय दिसणार नाही असा खुलासा केला. सामनेवाला नं.1 यांचेकडे तज्ञ तक्रार क्र.149/2011 डॉक्टर, नर्सेस, व स्टाफ आहे तसेच शस्त्रक्रियेचे सर्व सामान उपलब्ध आहेत. त्यानुसार दि.30/10/2010 रोजी सामनेवाला नं.2 यांनी उजव्या डोळयाची शस्त्रक्रीया केली. ती सफल झाली. अर्जदारास उजव्या डोळयाने व्यवस्थीत दिसत होते व आहे. त्यानंतर अर्जदारास वर नमूद केलेल्या आजारांमुळे डावा डोळा निकामी झालेला होता. त्यास काहीएक दिसत नव्हते. अर्जदाराचे विनंतीवरुन वेळोवेळी चाचणी घेतल्यानंतर दि.25/3/2011 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी रक्कम रु.3500/- सामनेवाला नं.1 कडे जमा करण्यात आले. तशी पावतीही अर्जदार यांना देण्यात आलेली आहे. त्याव्यतिरीक्त कुठलीही रक्कम न घेता औषधे देण्यात आली. सामनेवाला नं.1 हे चॅरिटेबल ट्रस्ट असून अर्जदारास ना नफा ना तोटा या आधारे सेवा दिलेली आहे. परंतु अर्जदार यांचे हलगर्जीपणामुळे त्याचदिवशी सामनेवाला यांची कुठलिही परवानगी न घेता हॉस्पीटलमधून पलायन केले व डोळयाची योग्य ती काळजी न घेतल्याने अर्जदारास त्रास झालेला आहे. सामनेवाला नं.2 यांनी लेन्स व्यवस्थीत बसविलेले होते परंतु अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदारास त्रास झालेला आहे. या विधानास बाध न येता सामनेवाला नं.2 यांचे असेही म्हणणे आहे की लेन्सबाबतची कुठलिही तक्रार सुधरवून घेता येते त्यामुळे डोळयास इजा होत नाही. अगर दृष्टी कमी होत नाही. परंतु अर्जदार यांनी खोटयात शिरुन सामनेवाला यांचेकडून पैसे उकळता यावेत म्हणून सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी अर्जदार यांना व्यवस्थीत सेवा दिलेली आहे त्यात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा केलेला नाही. तसेच शस्त्रक्रीया करतांना टाके टाकण्याचा प्रश्नच येत नाही यावरुन अर्जदार हे खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होते. अर्जदार यांचा अर्ज रद्द करावा व सामेनवाला यांचेविरुध्द खोटी तक्रार दाखल केली म्हणून रु.50,000/- नुकसान भरपाई देववावी.”असे म्हटलेले आहे. सामनेवाला नं.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांची संपुर्ण तक्रार त्यातील मागणी खोटी असून ती मान्य नाही. तसेच सामनेवाला नं.2 यांनी या क्षेत्रात एम एस ची डिग्री घेतलेली असून सुमारे 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून या प्रकारची शस्त्रक्रीया करत आहेत. अर्जदार हया ज्या वेळेस प्रथम ऑक्टोबर 2010 मध्ये तपासण्यात आले त्यावेळेस त्याची दृष्टी अत्यंत कमी होती. याबाबत त्याचेकडून संपुर्ण माहिती घेतल्यानंतर उजव्या डोळयाचे मोतीबिंदुचे ऑपरेशन करण्यात आले व अर्जदारास मधुमेह जास्त असल्याने त्याची वेळोवेळी तपासणी केल्यानंतर मार्च 2011 मध्ये डाव्या डोळयाची शस्त्रक्रीया करण्यात आलेली आहे. वास्तविक अर्जदार यांस उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर आजार असल्यामुळेच तक्रार क्र.149/2011 त्याची डोळयाची दृष्टी कमी झालेली होती. अर्जदार यांच्या डाव्या डोळयाचे ऑपरेशन झाले त्याच दिवशी अर्जदार सामनेवाला नं.1 अगर सामनेवाला नं.2 यांची परवानगी न घेता शस्त्रक्रीयेनंतर 4 तासांनी निघून गेला व त्याने डोळयाची व्यवस्थीत काळजी घेतलेली नाही तसेच याच कालावधीत त्यांनी निरनिराळया ठिकाणी डोळयाची तपासणी केल्यामुळेच त्रास झालेला आहे. त्यास अर्जदार हेच स्वतः जबाबदार आहेत. सामनेवाला यांनी सफल शस्त्रक्रीया केलेली आहे. अर्जदार यांची दृष्टी चांगली असून त्यास शस्त्रक्रियेची काहीएक जरुरी नाही. सामनेवाला यांनी अर्जदार यांना व्यवस्थीत सेवा दिलेली आहे त्यात कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा केलेला नाही. तसेच शस्त्रक्रीया करतांना टाके टाकण्याचा प्रश्नच येत नाही यावरुन अर्जदार हे खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होते. अर्जदार यांचा अर्ज रद्द करावा व सामेनवाला यांचेविरुध्द खोटी तक्रार दाखल केली म्हणून रु.50,000/- नुकसान भरपाई देववावी.”असे म्हटलेले आहे. वरीलप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये सविस्तर कथन केलेले आहे. या कामी सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांचेवर शस्त्रक्रीया व उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे याचा कोणताही स्पष्ट उल्लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्ये केलेला नाही. अर्जदार यांनी सामनेवाला यांना जी संमतीपत्रे लिहून दिलेली आहेत ती संमतीपत्रे पान क्र.64, पान क्र.65 व पान क्र.68 लगत दाखल आहेत. या पैकी पान क्र.68 चे संमतीपत्रामध्ये “ऑपरेशन नंतर कितपत दिसेल हे सांगता येत नाही, हे सर्व डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशनच्या आधी समजावून सांगितले आहे व मला ते मान्य आहे.”असा उल्लेख असून त्याखाली नातेवाईकाची सही आहे. तसेच पान क्र.64 व पान क्र.65 चे संमतीपत्रामध्ये “मी लिहून देतो की माझ्या काकावरती जी डोळयाची शस्त्रक्रीया होणार आहे तिला मी पुर्णपणे सहमत आहे. वयोमानानुसार त्यांच्या उजव्या डोळयाचा पाठीमागील पडदा कमजोर असून तो मोतीबिंदुमुळे दिसु शकत नाही म्हणून ऑपरेशनंतर त्यांना कितपत दिसेल हे सांगता येत नाही हे सर्व डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशनच्या अगोदर समजावून सांगितले आहे व मला ते मान्य आहे असा मजकूर असून त्याखाली नातेवाईकांची सही आहे. पान क्र.64, पान क्र.65 व पान क्र.68 लगतची संमतीपत्रे व त्यामधील मजकूर याचा विचार होता ऑपरेशनबाबत व ऑपरेशनच्या यशस्वीतेबाबत सामनेवाला यांनी अर्जदार यांना संपुर्ण कल्पना दिलेली होती असे दिसून येत आहे. तक्रार क्र.149/2011 अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये त्यांनी त्यांचेवर सामनेवाला यांनी शस्त्रक्रीया केल्यानंतर पुढे सुशिल आय हॉस्पीटल यांचेकडे तपासणी केली आहे तसेच डॉक्टर शरद पाटील व अमोल जगदाळे यांचेकडेही उपचार घेतलेले आहेत असा उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणे अर्जदार यांचे मागणीनुसार डॉ.अमोल जगदाळे, डॉ.शरद पाटील व डॉ.अमोल वानखेडे यांना मंचामार्फत साक्षीसमंस काढण्यात आलेले होते व त्यानुसार तीनही डॉक्टरांची प्रतिज्ञापत्रे या कामी दाखल झालेली आहेत. पान क्र.71 लगत डॉ.अमोल जगदाळे यांचे सर्टिफिकेट दाखल आहे व या सर्टिफिकेटबाबत डॉ.अमोल जगदाळे यांचे प्रतिज्ञापत्र पान क्र.70 लगत दाखल आहे परंतु सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर शस्त्रक्रीया व उपचार करतांना निष्काळजीपणा केलेला आहे असा कोणताही उल्लेख पान क्र.70 चे डॉ.अमोल जगदाळे यांचे प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येत नाही. तसेच अर्जदार यांचे दोन्ही डोळयामध्ये कोणता दोष निर्माण झालेला आहे व अर्जदार यांची दृष्टी कमी झालेली आहे याबाबतही कोणताही उल्लेख या पान क्र.70 चे प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येत नाही. या कामी पान क्र.75 लगत डॉ.शरद पाटील यांचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार डॉ.शरद पाटील यांनी दि.13/4/2011 रोजी अर्जदार यांचेवर उपचार केलेले आहेत असे दिसून येत आहे व दि.20/6/2011 रोजी शस्त्रक्रीया केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. परंतु सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर शस्त्रकीया व उपचार करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे याचा कोणताही उल्लेख पान क्र.75 चे डॉ.शरद पाटील यांचे प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येत नाही. याउलट पान क्र.75 चे डॉ.शरद पाटील यांचे प्रतिज्ञापत्रामधील शेवटच्या ओळीमध्ये “Post treatment he has good vesual recovery of 6/6 when last examined.” असाच उल्लेख आहे. म्हणजे अर्जदार यांचे डोळयांना चांगल्याप्रकारे दृष्टी आहे हीच बाब पान क्र.75 चे डॉ.शरद पाटील यांचे प्रतिज्ञापत्रावरुन दिसून येत आहे. तसेच अर्जदार यांचे दोन्ही डोळयामध्ये कोणता दोष निर्माण झालेला आहे व अर्जदार यांची दृष्टी कमी झालेली आहे याबाबतही कोणताही उल्लेख या पान क्र.75 चे प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येत नाही. पान क्र.79 लगत डॉ.अमोल वानखेडे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे परंतु सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर उपचार व शस्त्रक्रीया करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे याचा कोणताही उल्लेख या प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येत नाही. तसेच अर्जदार यांचे दोन्ही डोळयांमध्ये कोणता दोष निर्माण झालेला आहे व तक्रार क्र.149/2011 अर्जदार यांची दृष्टी कमी झालेली आहे याबाबतही कोणताही उल्लेख या पान क्र.79 चे प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येत नाही. या कामी वर उल्लेख केल्यानुसार सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर शस्त्रक्रीया केल्यानंतर पुढे अर्जदार यांचेवर ज्या डॉक्टरांनी उपचार व शस्त्रक्रीया केलेली आहे त्या डॉक्टरांची प्रतिज्ञापत्रे अर्जदार यांनी स्वतः साक्षीसमंसमार्फत मंचासमोर दाखल केलेली आहेत. परंतु पान क्र.70 चे डॉ.अमोल जगदाळे यांचे प्रतिज्ञापत्र, पान क्र.75 चे डॉ.शरद पाटील यांचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.79 चे डॉ.अमोल वानखेडे यांचे प्रतिज्ञापत्र या तिनही प्रतिज्ञापत्रांचा एकत्रीतरित्या विचार करीता सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर उपचार व शस्त्रक्रीया करताना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब स्पष्ट होत नाही. सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर उपचार व शस्त्रक्रीया करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे हे स्पष्टपणे शाबीत करण्याकरीता अर्जदार यांचेवर सामनेवाला नं.2 यांनी केलेली शस्त्रक्रीया व उपचाराची पान क्र.55 ते पान क्र.69 चे लगतचे सर्व कागदपत्रांची योग्य ती तपासणी व अर्जदार यांची योग्य ती तपासणी तज्ञ वैद्यकिय मंडळाकडून होवून मंचासमोर योग्य तो अहवाल येण्याकरीता अर्जदार यांनी मंचासमोर मागणी केलेली नाही व कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. वर उल्लेख केल्यानुसार अर्जदार यांचेवतीनेच दाखल करण्यात आलेले पान क्र.70, पान क्र.75 व पान क्र.79 चे लगतचे प्रतिज्ञापत्रे व त्यामधील मजकूर तसेच पान क्र.55 ते पान क्र.69 लगतचे उपचाराची कागदपत्रे व त्यामधील मजकुराचा तसेच पान क्र.64, पान क्र.65 व पान क्र.68 लगतचे संमतीपत्राचा एकत्रीतरित्या विचार करता सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांचेवर उपचार व शस्त्रक्रीया करतांना नक्की कोणता निष्काळजीपणा केलेला आहे ही बाब अर्जदार यांनी स्पष्टपणे शाबीत केलेली नाही व त्यायोगे सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांचेवर उपचार व शस्त्रक्रीया करतांना कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही असे या मंचाचे मत आहे. या कामी सामनेवाला यांनी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे सादर केलेली आहेत. 1) नॅशनल कमीशन कंझुमर लॉ केसेस. पान 237. राष्ट्रीय आयोग. मुन्नी देवी विरुध्द आर पी टंडन डॉक्टर 2) नॅशनल कमीशन कंझुमर लॉ केसेस. पान 672. राष्ट्रीय आयोग. कुणाल शहा विरुध्द सुकुमार मुखर्जी. तक्रार क्र.149/2011 3) 2004 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 595. इंदरजितसिंग विरुध्द डॉ.जगजितसिंग. 4) 2002 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 199. इंदिरा कर्था विरुध्द डॉ.मॅथ्यु सॅमेल. 5) मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली प्रथम अपील क्र.476/06. निकाल ता.6/9/2011. बेथला मार्टीन विरुध्द डॉ.एन अमन्ना 6) 2005 सी.टी.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 1085. जेकब मॅथ्यु विरुध्द स्टेट ऑफ पंजाब. 7) 1(2009) सी.पी.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 32. मार्टीन एफ डिसुझा विरुध्द महम्मद इशपाक 8) मा.सर्वोच्च न्यायालय. नवी दिल्ली यांचेसमोरील सिव्हील अपील 1385/2001 कुसूम शर्मा विरुध्द बत्रा हॉस्पीटल 8) सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुत तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे. यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार या कामी घेतलेला आहे. याकामी मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे 1) 3(2011) सी.पी.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 54. सेंथील स्कॅन सेंटर विरुध्द शांती श्रीधरण 2) 4(2011) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 677. हेमंत चोप्रा (डॉक्टर) विरुध्द कुलविंदर सिंग 3) 2012 सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 178. शकील मोहम्मद वकील खान विरुध्द सी के दवे 4) 4(2011) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 280. नलिनी विरुध्द मणीपाल हॉस्पीटल 5) 2(2011) सी.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 513. नामदेव एकनाथ घोंगे विरुध्द रुबी हॉल तक्रार क्र.149/2011 अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, अर्जदार यांचे वतीने लेखी व तोंडी युक्तीवाद, तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे वतीने दाखल करण्यात आलेले लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, सामनेवाला यांचे वतीने लेखी व तोंडी युक्तीवाद, सामनेवाला यांनी दाखल केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे |