::: आदेश निशाणी क्र.1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 22.11.2011) 1. अर्जदाराने, सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कयदा 1986 चे कलम 27 अन्वये गैरअर्जदाराविरुध्द दाखल केले असून, गैरअर्जदार यांनी ग्राहक तक्रार क्र. 43/07 च्या आदेशाचे अनुपालन करण्यास जाणीवपूर्वक कसूर केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम- 27 अन्वये दंडात्मक कार्यवाही होण्याची, प्रार्थना केली आहे. 2. अर्जदार/फिर्यादीची दरखास्त नोंदणी करण्यात आले. दरखास्त फिर्यादीचे पडताळणी जबाबाकरीता ठेवण्यात आले. अर्जदाराने, चौकशी अर्ज, या अगोदर गैरअर्जदाराविरुध्द आधीच चौकशी अर्ज क्र.30/2007 सुरु आहे, करीता नव्याने दाखल केलेला चौकशी अर्ज चालवू इच्छित नसल्याने, चौकशी अर्ज परत घेण्याची परवानगी मिळावी, या आशयाचा अर्ज नि.क्र.6 नुसार दाखल केला. अर्जदारास नि.क्र.6 चे मजकुराबाबत विचारणा केली असता, बरोबर असल्याचे सांगीतले. 3. अर्जदार/फिर्यादीने अर्ज नि.क्र.6 नुसार नव्याने दाखल केलेली दरखास्त परत घेण्याची परवानगी मागीतली आहे. अर्जदार/फिर्यादी यांनी याच आशयाची दरखास्त यापूर्वी दाखल केले असून, मा.राज्य आयोग, सर्कीट बेंच, नागपूर यांचे स्थगिती आदेशान्वये प्रलंबीत ठेवण्यात आले आहे. गैरअर्जदार/आरोपी विरुध्द प्रलंबीत यादीत (Sine dies list) असलेली दरखास्त क्र.30/07 पुढे चालवू इच्छित असल्याने, हे नवीन प्रकरण पडताळणी जबाब होण्याचे पूर्वी परत घेत असल्याने, ही दरखास्त निकाली काढून नस्तीबध्द करण्यात येत आहे. चंद्रपूर, दिनांक : 22/11/2011. |