Maharashtra

Kolhapur

CC/10/389

Shantabai Rangrao Gavade. - Complainant(s)

Versus

Vahandhark Nagari Sah Pat Sanstha and others. - Opp.Party(s)

Y.L. Warute.

27 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/389
1. Shantabai Rangrao Gavade.Are.Tal-Karvir.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Vahandhark Nagari Sah Pat Sanstha and others.Haldi.Tal-Karvir.Kolhapur2. Krishnat Shripati Chavan, ChairmanBalekundri Market, Kolhapur3. Shankar Hari Harale, V. ChairmanPirachiwadi, Tal. Karveer, Dist. Kolhapur4. Vilas Pandurang Patil, DirectorSadoli Khalsa, Tal. Karveer, Dist. Kolhapur5. Rajaram Lakhu Kamble, DirectorHaldi, Tal. Karveer, Dist. Kolhapur6. Puroshttam Ganesh Mahishwari, DirectorJatharwadi, Tal. Karveer, Dist.Kolhapur7. Pandurang Ganapati Khade, DirectorJatharwadi, Tal. Karveer, Dist. Kolhapur8. Balwant Dnynu Patil, DirectorHasur, Tal. Karveer, Dist.Kolhapur9. Akaram Mahadev Gaikwad, DirectorSane Guruji Vasahat, Kolhapur10. Shivaji Ashru Patil, DirectorMangalwar Peth, Kolhapur11. Sita Ramchandra Ingale, DirectorS.T. Colony, Kolhapur12. Sita Ramchandra Ingale, DirectorS.T. Colony, Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Y.L. Warute., Advocate for Complainant

Dated : 27 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

 

 

नि का ल प त्र :- (दि.27/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)    प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 2 ते 5 व 7 ते 9 आणि 11 हे वकिलामार्फत हजर झाले. त्‍यानी म्‍हणणे दाखल केले. उर्वरीत सामनेवाला यांना नोटीसा लागू होऊनही सामनेवाला गैरहजर आहेत.  सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. 
 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
            सामनेवाला क्र. 1 संस्‍था सहकारी कायद्याखाली नोंद झालेली संस्‍था आहे. सामनेवाला क्र. 2 ते 11 हे संचालक आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट व सौरभ बॉण्‍ड ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
रुपये
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम/व्‍याजदर
1. सौ. शांताबाई रंगराव गावडे
1.
482
4,000/-
17/11/2000
17/05/2006
दामदुप्‍पट
2.
485
4,000/-
17/11/2000
17/05/2006
दामदुप्‍पट
2. श्री. रंगराव बाळू गावडे
1.
0016
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
2.
0017
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
3.
0018
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
4.
0019
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्‍कमांची आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि. 17/06/2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सौरभ ठेव डिपॉझिट सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठलिलेली नोटीस, व त्‍याची पोहाच इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र. 2 ते 5 व 7 ते 9 आणि 11 तर्फे यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याअन्‍वये  तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे.  सामनेवाला यांची ठेवीची रक्‍कम देण्‍याची वैयक्‍तीक जबाबदारी नाही.   सामनेवाला संस्‍थेवर दि. 10/02/2004 रोजी प्रशासक मंडळ नेमण्‍यात आले आहे.   दि. 26/12/2008 रोजी संस्‍थेची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ स्‍थापन झालेले आहे. थकीत कर्जदारांकडून लवकरात लवकर वसुली करणेचे प्रयत्‍न चालू आहेत.   तर काही रक्‍कम देणे लागत असलेस थकीत कर्ज वसुलीच्‍या प्रमाणात तक्रारदार यांचे देणे रक्‍कमेच्‍या प्रमाणात हप्‍त्‍याने देत आहोत. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती केली आहे.   
 
(6)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये दामदुप्‍पट व सौरभ बॉण्‍ड ठेवीमध्‍ये रक्‍कमा ठेवल्‍या आहेत व त्‍यांची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे दामदुप्‍पट व सौरभ बॉण्‍ड ठेव रक्‍कमा ठेवल्‍या आहेत व दि.17/06/2010 रोजी  वकिलामार्फत नोटीस पाठवून मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 11 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत कथन केले आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 11 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचे तक्रारदारांचे कथन हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(5)   प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदारांनी जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, शहर विभाग, कोल्‍हापूर यांना सदर सामनेवाला संस्‍थेची महाराष्‍ट्र सहकारी कायदा अन्‍वये कलम 88 प्रमाणे चौकशी झाली किंवा कसे याबाबतचा अहवाल मंचाने साक्षी समन्‍स पाठवून मागविला होता.  परंतु जिल्‍हा उपनिबंधक, सहकारी संस्‍था, शहर विभाग, कोल्‍हापूर यांनी त्‍यांचेकडील अहवाल साक्षी समन्‍स पाठवूनही प्रस्‍तुत प्रकरणी पाठविलेला नाही.   
 
(6)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता काही ठेव पावत्‍या या दामदुप्‍पट ठेवींच्‍या व सौरभ बॉण्‍डच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(7)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आ दे श
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील तपशिलातील दामदुप्‍पट ठेव रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर तपशिलात नमूद तारखांपासून रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
रुपये
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम/व्‍याजदर
1. सौ. शांताबाई रंगराव गावडे
1.
482
4,000/-
17/11/2000
17/05/2006
8,000/-
2.
485
4,000/-
17/11/2000
17/05/2006
8,000/-

  (3)   सामनेवाला क्र. 1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील तपशिलातील सौरभ बॉन्‍ड ठेव रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
रुपये
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम/व्‍याजदर
2. श्री. रंगराव बाळू गावडे
1.
0016
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
2.
0017
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
3.
0018
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
4.
0019
1,000/-
17/11/2000
17/11/2004
सौरभ बॉंन्‍ड
 
(4)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT